Which Mudras do you need to perform? तुमच्या शरीराला कोणत्या मुद्रा आवश्यक आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2022
  • In the series Mudra shastra, we learnt about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). We discussed Mudras that balance the various elements and also ones that increase or decrease a particular element. Some of the Mudras are performed by both hands separately, while others are performed by using both hands together. From today, we will try to address the doubts that commonly arise in the minds of people about Mudra shastra.
    What is the relation between seasons, diet, lifestyle, mental state and the five elements? How long can we perform a Mudra? Can we engage in Mudras after meals? How many Mudras can be performed in one sitting? What can be done if we cannot manage a Mudra properly? Which Mudra is useful in dealing with hair and skin problems? Smt. Amruta Chandorkar from Niraamay answers questions arising in the minds of people about Mudras and their techniques.
    Watch the video for details and clear the doubts of your acquaintances by sharing it with them!
    तुमच्या शरीराला कोणत्या मुद्रा आवश्यक आहेत?
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितले. विविध तत्त्वे संतुलित करणाऱ्या, तसेच एखादे तत्त्व कमी करणा-या किंवा वाढवणाऱ्या मुद्रा आपण पाहिल्या. काही मुद्रा दोन्ही हात वेगवेगळे ठेवून तर काही मुद्रा दोन्ही हातांनी एकत्रितपणे केल्या जातात. मुद्राशास्त्रासंबंधी लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्याचा आपण आजपासून प्रयत्न करणार आहोत.
    ऋतू, आहार, विहार, मनःस्थिती व पंचतत्त्वे यांचा नेमका काय संबंध आहे? एखादी मुद्रा किती वेळ करावी? जेवण झाल्यावर मुद्रा कराव्यात का? एका सत्रात किती मुद्रा केल्या जाऊ शकतात? एखादी मुद्रा नीट जमत नसल्यास काय करावे? केस व त्वचेच्या समस्यांवर कोणती मुद्रा उपयुक्त आहे? मुद्रा व त्या करण्याच्या पद्धतींसंबंधी लोकांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि तुमच्या परिचयातील लोकांना पाठवून त्यांच्या शंका दूर करा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Mudras #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 353

  • @shyamraodespande3485
    @shyamraodespande3485 Місяць тому +2

    सकारण समजावून सांगण्याची खुपच छान पद्धत. समजावून सांगत असताना तुमचे चेहर्यावरील भाव खुपच सुंदर.

  • @tejaliware4642
    @tejaliware4642 Рік тому

    Namaskar,khup Chan,eagerly waiting for next video.......

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. पुढील भागात नक्की भेटूया. तोपर्यंत निरामय मालिकेचे इतर भाग नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sayalisawant7192
    @sayalisawant7192 Рік тому

    फार उपयुक्त माहिती दिली मॅडम. धन्यवाद

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 Рік тому +24

    कौतुक करावे तेवढे थोडे आहेत खूपच छान मुद्रा शास्त्र आणि समजून सांगायची पद्धत अप्रतिम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @Shownature.8895
      @Shownature.8895 Рік тому +1

      शरीराविषयी अनमोल माहिती.. सहज सोप्या पद्धतीने.. आणि सहज.. समजेल उमजेल.. अशा तरेने आरोग्याचीच गुरुकिल्ली प्रत्येकाला देत आहेत... खूप खूप धन्यवाद मॅडम......... 🙏💐

    • @rohinideshpande6833
      @rohinideshpande6833 Рік тому

    • @shraddhaghatage802
      @shraddhaghatage802 8 місяців тому

      ​@@NiraamayWellnessCenter😂à

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Рік тому

    Khupch chhan mahiti dilit thanku so much tai 👌🙏

  • @anandbhandare5708
    @anandbhandare5708 Рік тому

    खूप छान माहिती, धन्यवाद🙏🙏🙏

  • @sulochanasavant5234
    @sulochanasavant5234 Рік тому +1

    Khup chan

  • @snehagurav246
    @snehagurav246 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली.

  • @pb148
    @pb148 Рік тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती🙏🙏

  • @swanand434
    @swanand434 Рік тому

    Thanks madam khup chan mathi aahe 👌👍🙏

  • @sheetalp2811
    @sheetalp2811 Рік тому +1

    खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली 🙏🏻🤗

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 Рік тому

    Khup mast 👍👍

  • @ujwalamorevijay3828
    @ujwalamorevijay3828 4 місяці тому

    खूप छान मुद्राची माहिती देता,
    धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      वा! छान. मग इथूनपुढे नियमित करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏

  • @ashokchannawar6876
    @ashokchannawar6876 6 місяців тому

    खूप छान माहिती आपण सांगितलेली आहे धन्यवाद

  • @pramilaghanekar7412
    @pramilaghanekar7412 Рік тому

    अतिशय सुंदर विवेचन

  • @jayadharmale1468
    @jayadharmale1468 5 місяців тому

    Mam,khupach useful mahiti ,khup khup abhar

  • @archanakarmarkar4678
    @archanakarmarkar4678 Рік тому

    अतिशय सुंदर पध्दतीने समाजावून सांगितले आहे खूप खूप धन्यवाद

  • @kalpanadaware8367
    @kalpanadaware8367 Рік тому

    Khup chaan 🙏🙏

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Рік тому +1

    अतिषय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹

  • @user-wn4pr8xk5g
    @user-wn4pr8xk5g 3 місяці тому

    Khup chhan information Tai

  • @AaradhyNaik-uv7fi
    @AaradhyNaik-uv7fi 10 місяців тому

    Khup chhan mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात. नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी राहा.

  • @premateli5647
    @premateli5647 Рік тому

    Khup chan mahiti sagta madam

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 Рік тому

    खूप छान माहिती दिली मॅडम 🙏

  • @anandathorave4316
    @anandathorave4316 Рік тому

    Very nice lot of thanks

  • @ushasawant8773
    @ushasawant8773 11 днів тому

    सुंदर माहिती

  • @dilipkekre2047
    @dilipkekre2047 Рік тому

    अप्रतिम सांगण्याची पद्धत आणि समजून सांगता धन्यवाद दिलीप केकरे

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 Рік тому

    खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @anujarane470
    @anujarane470 Рік тому +1

    🙏 मॅडम, खुप उपयुक्त माहिती मिळाली.
    खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pramodnagrale1097
    @pramodnagrale1097 Рік тому

    मैडम आज दिलेली माहिती खुप खुप छान आणि उपयुक्त आहे धन्यवाद

  • @harshgaming202
    @harshgaming202 Рік тому

    Very nice information.

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Рік тому

    सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 Рік тому

    👌 uttam mahiti dili mam, aabhar 🌹👍🙏🙏

  • @sunilshinde2011
    @sunilshinde2011 2 місяці тому

    खूप छान माहिती सांगितली मॅडम

  • @user-te1sm6jw1j
    @user-te1sm6jw1j 3 місяці тому

    Outstanding knowledge mam ji👌👍👍

  • @prakashkharkar9233
    @prakashkharkar9233 Рік тому

    Very good explanation and information

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Рік тому

    Manapasun aabhar Mam .🙏🙏🙏🙏🙏

  • @ramnathmedane1988
    @ramnathmedane1988 Рік тому

    Good explain

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 3 місяці тому

    Namskar very nice eagerly waiting for next

  • @prachitirodkar9259
    @prachitirodkar9259 Рік тому

    खूप छान मॅडम

  • @harshadzargad3651
    @harshadzargad3651 4 місяці тому

    Very nice

  • @shubhangipanse3288
    @shubhangipanse3288 7 місяців тому

    तुम्ही छान सांगता

  • @vijayaraskar3191
    @vijayaraskar3191 2 місяці тому

    धन्यवाद

  • @amarsinghrajput5173
    @amarsinghrajput5173 Місяць тому

    ताई आपले प्रचंड ज्ञान, ते अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची आपली हातोटी, स्वभावातील नम्रपणा व सर्वांविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व करुणा यामुळे मी खुपच भारावून गेलो आहे आपले सर्वच व्हिडिओ मी आवर्जून पाहतो व आपणाविषयी मनापासून कृतज्ञता

  • @aditipawar2624
    @aditipawar2624 Рік тому

    Nice

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Рік тому +1

    खुप समजावून माहिती देता मॅडम धन्यवाद

  • @punjaharihase254
    @punjaharihase254 2 місяці тому +1

    ताई तुम्ही खुपच छान समजावून सांगता.

  • @rekharuiwale5216
    @rekharuiwale5216 Рік тому

    सहजपणे समजून सांगण्याची शैली उत्तम🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Рік тому

    आज अनेक प्रश्र्नांची उत्तर आणि मनातील काही शंकांचे निरसन केले . त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद .आपली कृपाभिलाषी 🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +2

      वा! खूप छान. नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Рік тому

    आत्मा नमस्ते 🙏सुंदर माहिती

  • @shobhanaukudkar3243
    @shobhanaukudkar3243 2 місяці тому

    खूपच छान सांगता मॅडम अशीच मुद्रांन बधल माहिती सांगत रहा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.

  • @jayonthkulkarni3930
    @jayonthkulkarni3930 Рік тому +2

    विचार आणि भावना यांचे संतुलन मुद्रा मधून उत्तम राहतील याची खात्री पटली.

  • @shubhangipanse3288
    @shubhangipanse3288 7 місяців тому

    तुमच्या मुद्रा मी नेहमी करते छान वाटते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      वा! खूपच छान..तुम्ही सकारात्मक असल्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळू शकतो.मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏.

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Рік тому

    👍👍

  • @shalinivibhute4285
    @shalinivibhute4285 6 місяців тому

    👌👍

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Рік тому

    Tai aaj tumhi khupch chhan disat aahat. 👍😍khup chhan rang disat aahe tumhala 👍🙏
    Khup chhan mahiti 👍aabhari aahe 👍🙏😍🌹

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Рік тому

    Hare krishna mataji

  • @bhalachandradhole4450
    @bhalachandradhole4450 Рік тому

    🙏🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Рік тому

    Good evening Tai.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Рік тому

    Khup sunder🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому +1

    🙏🙏🌹

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому +1

    🙏🌹

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Рік тому

    खूप छान माहिती दिली.
    धन्यवाद

  • @devdattab1387
    @devdattab1387 Рік тому

    धन्यवाद म्याडम, माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, पुढील भागाची वाट पाहत आहे.
    सर्वांनी हा व्हीडिओ जास्त वेळा पहावा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @kedarlonkar9306
    @kedarlonkar9306 26 днів тому

    नमस्कार , खूपच छान सांगता आहेत , व्हिटामिन डी कमी साठी कोणती मुद्रा करायची

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  23 дні тому

      नमस्कार,
      व्हिटामिन डी साठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेणे. हा पर्यायी मार्ग आहे. मुद्रा केल्याने शरीरातील पाच तत्व ही संतुलित होय असतात. मात्र आपण निरामयचे स्वयंपूर्ण उपचार देखील घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 Рік тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई .पित्तशामक मुद्रा करताना बाकीची बोट सरळ होत नाहीत आणि करंगळी पण अंगठ्यावर नीट राहत नाही माझी पण अस का होत हे आज कळलं तुमच्यामुळे .धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते. विनाकारण ताण देऊ नका,
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @pratibharane9717
    @pratibharane9717 Рік тому

    मॅडम खुप अभारी आहे

  • @manda5783
    @manda5783 Рік тому +1

    Khupch sunder explanation 👍🙏

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Рік тому

    खुप खुप धन्यवाद ताई मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मला ॲसिडीटीचा खुप त्रास होतो मी
    पित्तशामक मुद्रा करते . पण
    कधी डोके खुप दुखते . यांवर थोडे
    मार्गदर्शन करा.
    आजचा भाग खुप छान झाला🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, sinus असू शकते, प्रत्येकाने कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप मुद्रा कराव्यात. आजारचे कारण शोधून त्या अनुरूप मुद्रा कराव्यात.
      धन्यवाद 🙏

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter ठीक आहे . तुम्ही मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद . मी नक्की तसा
      अभ्यास करुन कारण शोधते 🙏

  • @madhubhosale8374
    @madhubhosale8374 7 місяців тому

    अमृताताई शुभ रात्री मला सतत भेडसावत असलेल्या प्रश्नांचे ऊत्तर तुम्ही मला साध्यासोप्या भाषेत समजाऊन सांगितल्याबद्दल खुप खुप आभारी आहे धन्यवाद

  • @savatagaikwad6437
    @savatagaikwad6437 5 місяців тому +2

    चिंचवड येथील सेंटर चा कृपया पत्ता व फी संबंधी सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड, पुणे .
      तसेच रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
      अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @smitaghule3331
    @smitaghule3331 Рік тому +4

    ताई तुम्ही जगण्यासाठी ताकत देता,❤

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Рік тому

    खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली मँडम तुम्ही बोलत असताना ऐकत रहावे वाटले

  • @shubhangibindage5773
    @shubhangibindage5773 Рік тому +1

    🙏🙏👌👌

  • @anuradhamuley1602
    @anuradhamuley1602 Рік тому

    सौ. अनुराधा मुळे.
    मुद्रा शात्राची तुम्ही दिलेली माहिती खूपच ऊपयुक्त आहे. मी तुमच्या केंद्रातून उपचार ही घेतले आहेत. तुमचे खूप खूप धन्यवाद!!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप आभार 🙏 याविषयी इतरांना देखील मार्गदर्शन करा.
      धन्यवाद ..

  • @17-jivishabhoir54
    @17-jivishabhoir54 Рік тому

    खुप छान माहिती देता तुम्ही सर्वांना त्याचा लाभ होईल. लहान मुले मुद्रा करु शकतात का आणि त्वचाविकारा वर कोणती मुद्रा करु शकतो विशेष ता गजकर्ण खरुज नायटे याबद्दल सांगावे please.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      होय लहान मुले देखील मुद्रा करू शकतात.
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . त्वचाविकार (गजकर्ण , खरुज ) मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @snehalmedhekar9181
    @snehalmedhekar9181 Рік тому

    माझ्या सगळ्या टेस्ट नाॅर्मल आहेत. पण मला खूपच विकनेस आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Рік тому

    👌👌🙏

  • @vaishalishirke2116
    @vaishalishirke2116 11 місяців тому

    तुमचे सर्व व्हिडियो मी आवर्जुन बघते. खूपच छान मार्गदर्शन करता. माझे गेले काही दिवस केस खूप गळायला लागले आहेत व केसांना खूप खाज येते त्यासाठी कुठली मुद्रा करावी जेणेकरून माझा हा त्रास कमी होईल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार ,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
      स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
      हाकिनी मुद्रा - ua-cam.com/video/GDqc8i2ohG8/v-deo.html
      पित्तशामक मुद्रा - ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      शंख मुद्रा - ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      धन्यवाद 🙏

    • @chandrakantpandharipande1444
      @chandrakantpandharipande1444 2 місяці тому

      खूप छान विवेचन. एखाद्या रोगावर तीन-चार मुद्रा असल्याचे वाचनात आले. अशावेळी मनात गोंधळ उत्पन्न होतो. सर्वच मुद्रा कराव्यात की नेमकी एकच मुद्रा केली तर चालेल. त्यातून नेमकी मुद्रा कशी निवडावी?
      आपले मार्गदर्शन हवे आहे.

  • @p.3781
    @p.3781 Рік тому

    Mam plz make one video on insomnia..... Plz mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      -इन्सोमिनिया यासाठी आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html
      आपल्या प्राचीन शास्त्रांचा आधार घेत शांत झोप येण्यासाठी काय करावे ,शांत व गाढ झोप कशी मिळवाल? यासाठी आपण पुढील Video पाहू शकता.
      ua-cam.com/video/auCmkMDKffY/v-deo.html
      धन्यवाद 🙏

  • @santoshkumardanwale4129
    @santoshkumardanwale4129 Рік тому

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद
    अकारण भीती, अनामिक भीती, anixety साठी कोणती मुद्रा करावी. कृपया सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      अकारण भीती, अनामिक भीती, anixety साठी आपणास हाकिनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते .
      हाकिनी मुद्रा - ua-cam.com/video/GDqc8i2ohG8/v-deo.html
      धन्यवाद 🙏

    • @santoshkumardanwale4129
      @santoshkumardanwale4129 Рік тому

      Dhanyawad

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Рік тому +2

    Mdm tumhi niramay upchar ani mudra che classes chalu Kara na. I m interested.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 21 день тому

    🙏🙏🙏🙏🧡❤️

  • @ashadhanve6688
    @ashadhanve6688 3 місяці тому

    आपने खूप छान मुद्रा करुन दाखविले पण ते लक्षात ठेवायला हवी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      हरकत नाही 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्ष्यात राहीपर्यंत पुहा पुन्हा Video पहा. जितके जास्त वेळा आपण ही मुद्रा कराल ती लक्ष्यात राहिलच.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Рік тому

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍

  • @vasudhapatil3441
    @vasudhapatil3441 Рік тому

    Khup Chan mahiti dili ahe
    Mudra kartna dyan made cha basave lagte ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको त्याचबरोबर आपण झोपूनही मुद्रा करू शकता. शरीर शिथील सोडून, दोन्ही हात मुद्रा स्थितीत अंथरुणावर ठेवू शकता. या पद्धतीने आपण मुद्रा करू शकता.
      धन्यवाद🙏

    • @vasudhapatil3441
      @vasudhapatil3441 Рік тому

      Thank you

  • @vijayakamble8028
    @vijayakamble8028 2 місяці тому

    Khup chan tai sangta tumhi. Mala smaran Rahat nahi .ata yeikle ki kahi kalame vismaran hote tar Kay yeikave?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      चंचल मनाला स्थिर करणारी स्मरणशक्ती वाढवणारी आपल्याला उपयुक्त अशी 'ध्यानमुद्रा' आपण करू शकता.
      'ध्यानमुद्रा' - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html

  • @prakashmurmurwar9860
    @prakashmurmurwar9860 Місяць тому

    सुंदर माही ती पण सर्दी आल्र्जी कोणती मुद्रा करावी माहिती द्या

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा - आपणास उपयुक्त ठरू शकते.
      "रूक्ष सूर्य मुद्रा"- ua-cam.com/video/Peiu5SiUaJY/v-deo.html

  • @suvarnakulthe2857
    @suvarnakulthe2857 8 місяців тому

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद पण सूज असेल तर कोणती मुद्रा करावी कृपया सांगावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      कृपया आपल्याला होणाऱ्या त्रासाची थोडी सविस्तर माहिती दिल्यास योग्य ते उतर देता येऊ शकते. सूज कुठे आहे व त्याचे मुळ कारण देखील समजून घ्यायला हवे.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Рік тому +1

    Very beautiful information given by Doctor Amruta Chandorkar madam first Mann madhala kachara saaf Karaya pahije , dhyan nirantar karane jarurati aahe , tya sathi mi saman mudra twenty minutes karato(sandhykali aata bote (right hand) jamate, aadhi shivaring hot 🔥 hoti aata jamate dhanyawad madam 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      वा! खूपच छान. नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे तसेच मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात.
      मनःपूर्वक आभार 🙏

    • @ashanilkanth5718
      @ashanilkanth5718 Рік тому +1

      Khupach sunder mam Thanku so much 🙏

    • @rajantawde4511
      @rajantawde4511 Рік тому

      @@ashanilkanth5718 🙏🙏🙏

  • @sairajmorajkar6708
    @sairajmorajkar6708 Рік тому

    Madam safed kod janyasathi konti mudra karavi pls sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @kajalthorat9882
    @kajalthorat9882 3 місяці тому

    Hi tai
    Mla ubha rahil ki chakr cha problem ahe konti mudra krav lagel

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      चक्कर येत असेल तर आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Рік тому

    अप्रतिम। अनाहत चकरा साठी कुठली मुद्रा करायची

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणास अपान वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      वायू मुद्रा - ua-cam.com/video/waOLl2MhL4I/v-deo.html

  • @vinodhajare926
    @vinodhajare926 Рік тому

    Madam diet sathi ek video banava na plz ata saglya youtube var fakt healthy diet mhatl ki fruits and veggies khayla sangtat mag apn apl kayamch jevn sodun dyayla pahije ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      आपल्या सुचनेचे स्वागत आहे ,आहार हा बहुआयामी विषय आहे. त्यावर पुढे सविस्तर बोलू.

  • @madhurimoraskar1577
    @madhurimoraskar1577 Рік тому

    Mam kindey ston Ani piles sathi konti mudra karawi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      मूळव्याध साठी आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पृथ्वीमुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      किडनी स्टोन साठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @manishabokade2090
    @manishabokade2090 Рік тому

    Namaskar madam 🙏 Mazi niramaychi treatment chaluch ahe but right hand thumb dukhtoch ahe,please cause & remedy sanga Doctor 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार ,
      शरीरातील अतिरिक्त वात निघून जाण्यासाठी वायुमुद्र आणि स्नायू बळकट होण्यासाठी पृथ्वी मुद्रा
      आपणांस उपयुक्त ठरू शकते.
      पृथ्वीमुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      वायू मुद्रा - ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html

  • @latagholap7075
    @latagholap7075 Рік тому

    Kavil ani dolyansathi kuthachi mudra upayukt that'll yachi mahiti sangal ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार मुद्रा करणे आवश्यक आहे. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व, हि संतुलित होतात; मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते. पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @jayashreejadhav7622
    @jayashreejadhav7622 2 місяці тому

    Mazye age 53ahi cholesterol LDL khup168 vadthale aahi te kami karnaysathi kahi mudra aahet ka?Triglycerides210

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..-
      अधिक जाणून घेण्यासाठी पुढील सर्व व्हिडियो नक्की पहा
      १) ua-cam.com/video/AvrCNiQoQ6U/v-deo.html
      २) चरबी कमी करणारी सूर्य मुद्रा! -ua-cam.com/video/yKp7DDTQ-pE/v-deo.html

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Рік тому

    Scitica pain sathi mudra suchva madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
      पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      ua-cam.com/video/6ZKKqwf1t9A/v-deo.html

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter Thanks madam