Shunya Mudra will help when you are nonplussed - सुन्नपणा घालविण्यासाठी शून्य मुद्रा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • We have been learning about the Panch Tatvas (basic elements in the body) and the consequences of their imbalance on the body and the mind, through our ongoing series Mudra shaastra. We have seen the role of Mudras (specific arrangements of fingers) in bringing them in equilibrium. We are now trying to understand the ways in which the excessive growth in a particular Tatva can be corrected. In this episode we will learn about Shunya Mudra. How does the practice of this Mudra help in curing various ailments? Let us learn more in this video.
    So, do watch the video, and share it with your friends, acquaintances and relatives. Thank you!
    -----
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण समजून घेतोय शरीरातील पंचतत्व आणि त्यांच्या असंतुलनातून शरीर व मनावर होणारे परिणाम. त्यांचे संतुलन साधण्यासाठी मुद्रा कशा उपयुक्त आहेत, हे आपण पाहिलेच आहे. एखादे अतिरिक्त वाढलेले तत्व संतुलित कसे करायचे हे आता आपण समजून घेतोय. या भागामध्ये आपण पाहतोय शून्य मुद्रा. या मुद्रेचा उपयोग कोणत्या आजारात कसा होतो ? हे पाहू सोबतच्या व्हिडीओ मध्ये.
    तर व्हिडिओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित आणि नातेवाईकांना पाठवा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Mudrashastra : niraamay.com/s...
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #shunyamudra #nonplussed #panchtatvas #body #mind #mudrashaastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana #niraamaywellnesscentre #mudrashastra #shunyamudra #energyhealing #alternativemedicine
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 370

  • @swanand434
    @swanand434 2 роки тому +6

    तुम्हाला पाहून खूप आनंद होतो खूप छान माहिती दिली आहे

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 2 роки тому +4

    छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 2 місяці тому

    आपण मुद्रेवर सुंदर माहिती देतात धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      खूप खूप आभार 🙏🙏,
      आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी, आनंदी राहा.

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 2 роки тому

    भाषा अत्यंत सुंदरसमजावून सांगण्याची पद्धत अत्यंत सुंदर घरच्यच कुणीतृरी आहात असे वाटतै छान समजते

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 2 роки тому +3

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अमृता मॅडम 🙏🙏🙏

  • @anilgite5902
    @anilgite5902 Місяць тому

    तीन वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं आहे....
    असा एकही दिवस जात नाही....मन खूप व्याकुळ होतं, हे असं का झालं?म्हणून विचार करत असतो
    परंतु हे सगळं आतल्या आत घडत असते....खूप आनंदात आहोत असं बाहेर दाखवायचा केविलवाणा प्रयत्न कायमच असतो......
    पण आज त्यावर तुमच्या शून्य मुद्रे मुळे उपाय मिळाला. खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      मुद्रा करण्यासोबतच ध्यानाचा देखील अभ्यास करून परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत होऊ शकते. स्वयंपूर्ण उपचार हे देखील मानसिक दुखा:तून/त्रासातून बाहेर येण्यास लाभदायक ठरू शकतात. ध्यान्विश्यक Video पुढीलप्रमाणे आहे.
      *सगळी दुःखे दूर करणारे ध्यान - *ua-cam.com/video/V3I3yF8Pqak/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vijayakhandagle3843
    @vijayakhandagle3843 2 роки тому

    नमस्कार म्यॅम मी श्रीमती विजया. सगळ्यात खट्याळ विद्यार्थी हा मन असतो. त्यालाच तुम्ही तुमच्या सुरेल शब्दात शांत करत आहात धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूप छान. मनःपूर्वक आभार 🙏

  • @kishordangi4146
    @kishordangi4146 2 роки тому

    धन्यवाद मॅडम,आपण मुद्रचे खुप सुंदर आणी सर्वांना समजेल आणी उमजेल असे सुंदर विवेचन केले आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.पुन्हा एकदा कृतज्ञेतेने खुप खुप धन्यवाद.🙏

  • @babapagare8172
    @babapagare8172 Рік тому

    खूप छान माहिती..... ज्या पध्दतीने तुम्ही समजावून सांगतात तसे कुठले योगाचार्य देखील सांगत नाही... धन्यवाद 🙏

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 2 роки тому +4

    Total satisfaction. God bless you.

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 5 місяців тому

    ❤धन्यवाद छान माहिती मिळाली मँडम आपल्या योग शास्तात ही माहिती आहे🎉

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत.

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 2 роки тому +1

    खूपच छान माहिती Thank Madam

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar Місяць тому

    खुप छान माहिती दिली आभारी आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @vasantdeo871
    @vasantdeo871 2 місяці тому

    खूपछान माहिती- धन्यवाद

  • @user-nb3ux2ej2m
    @user-nb3ux2ej2m 4 місяці тому

    खुप छान ज्ञान मिळतें आहे

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 2 роки тому

    फारच छान माहिती. मॅडम फारच गोड बोलताय. फारच छान वाटतंय 🙏🏻

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 2 роки тому

    अमृता मॅडम खुप छान समजावुन सांगता तुम्ही. धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏💐

  • @suryakantshinde5515
    @suryakantshinde5515 2 роки тому +1

    जयश्री कृष्ण
    खूप छान माहिती आहे
    प्राणायाम ची माहिती कृपया दया

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      यासाठी आपल्या channel वरील प्राणायमाची Video आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल, Video ची लिंक खाली दिलेली आहे.
      ua-cam.com/video/4yEsc1ZeWLI/v-deo.html

  • @raginijagtap-mt9nk
    @raginijagtap-mt9nk 5 місяців тому

    खुप छान माहीती देत आहात मॅडम...धन्यवाद..!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому +1

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 2 роки тому

    नमस्कार मँडम, आपले सर्व व्हिडीओ खूपच छान व महत्त्वाची माहिती देणारे आहेत. धन्यवाद.

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 2 роки тому

    मॅडम तुम्हाला पाहूनच प्रसन्नता येते, मी दादरच्या क्लीनिक मध्ये उपचारासाठी येणार आहे.🙏❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      धन्यवाद 🙏
      मुंबई :- ऑफिस नं ४०७ ते ४१०
      म्हात्रे पेन बिल्डींग ,
      सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई
      (शनि ते गुरु) दु १२ ते ८
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)

  • @vinayakulkarni7434
    @vinayakulkarni7434 2 роки тому +3

    Very well explained . तुम्हाला पाहूनच प्रसन्न वाटते. खूप खूप धन्यवाद !

  • @ratnamalalandge9526
    @ratnamalalandge9526 2 роки тому +2

    Very nice information 💐God bless you 💐

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 2 роки тому +1

    धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @manishakandalgaonkar4625
    @manishakandalgaonkar4625 2 роки тому

    Tumchya kadunach yetat positive vibes 🙏 thanks

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 роки тому

    खूप छान madam.
    तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटतं

  • @shilasalunkar6759
    @shilasalunkar6759 10 місяців тому

    Khoob Sundar Mahiti Shankar madam dhanyvad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 8 місяців тому

    उपयुक्त माहिती...धन्यवाद मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      खूप खूप आभार 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Рік тому

    खूप छान मॅडम नमस्कार.
    धन्यवाद

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 2 роки тому

    किती सुंदर माहिती सांगीतली. धन्यवाद म्याडम.👌💐

  • @noorainshaikh5620
    @noorainshaikh5620 2 роки тому

    खुप छान मॅडम तुम्हाला पाहुन खुप छान वाटल 🙏🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 роки тому

    खुप सुंदर माहिती देत आहात मॅडम धन्यवाद 🙏🙏

  • @advikacreations3109
    @advikacreations3109 2 роки тому +1

    Khup chan

  • @sambhajikunjir1605
    @sambhajikunjir1605 2 роки тому

    शून्य मुद्रा खुप छान माहिती धन्यवाद

  • @ruchakale2715
    @ruchakale2715 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणे च मुद्रेबद्दलची छान माहिती दिलीत. धन्यवाद डॉक्टर मॅडम

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 2 роки тому

    Dhanyawad Dr.Madam khup upyukta mahiti aapan det aahat.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
    किती प्रसन्न वाटत आहे madam
    तुम्हाला पाहून

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @rajanikatkar6144
      @rajanikatkar6144 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter मँडम प्रसन्न वाटत ऐकताना तुमच पुस्तक आहे का याची माहिती असलेल असे ल तर सांगा

  • @rohinidingankar9606
    @rohinidingankar9606 2 роки тому

    वा खूपच छान माहिती सांगता मॅडम तुम्ही!

  • @jagdishkhadke8979
    @jagdishkhadke8979 2 роки тому +1

    Dhanyawad 🙏

  • @vaishalichalke5320
    @vaishalichalke5320 2 роки тому

    खूप छान समजावून सांगता .धन्यवाद

  • @pritikorve2656
    @pritikorve2656 2 роки тому

    खूप छान माहिती आहे

  • @snehals8078
    @snehals8078 2 роки тому

    अमृता मॅडम, आपण खुपच छान आणी सोप्या शब्दात सगळे समजावून सांगता,मी आपले चॅनल subscribe केले आहे, आपला प्रत्येक व्हिडीओ अमूल्य आहे धन्यवाद 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप छान ! धन्यवाद ! आपणांस ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांसोबतही शेअर करा.

  • @bhartiniravadekar818
    @bhartiniravadekar818 2 роки тому

    अतिशय योग्य मार्गदर्शन मॅडम 🙏🙏🙏

  • @shalakajadhav5262
    @shalakajadhav5262 2 роки тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद🙏

  • @manjushakulkarni44
    @manjushakulkarni44 2 роки тому

    Khupch sunder vivaran.thanks mam.

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 2 роки тому

    Khpch chan anubhav yetoy mam thank you

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Рік тому +1

    तुम्ही इतकं समजावून सांगता, की प्रत्यक्ष समोरच आहात असं वाटतं.तुम्हाला भेटायची मनापासून इच्छा आहे.नमस्कार तुम्हा दोघांना.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 2 роки тому

    Khuap chan mahiti sangitali Thanku madam

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 2 роки тому

    खूपच छान अप्रतिम

  • @pramodnagrale1911
    @pramodnagrale1911 2 роки тому

    Thanks Dr tai khup prasanna vatte

  • @lalitabhand9986
    @lalitabhand9986 2 роки тому

    Khup Chan margdarshan ahhe

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 2 роки тому

    खुपच छान डॉक्टर

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 Місяць тому

    धन्यवाद

  • @meenanavale3753
    @meenanavale3753 2 роки тому

    Khup chan aahe👌👌🙏🙏

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 2 роки тому

    आत्मा नमस्ते 🙏खुप छान माहिती 🌹

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 2 роки тому

    खुप chan samjaun sangata madam

  • @dhanashrironghe9724
    @dhanashrironghe9724 2 роки тому

    Khup chhan excellent 👌

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 2 роки тому

    खुप छान छान छान मॅडम

  • @shakuntalamirge7057
    @shakuntalamirge7057 2 роки тому

    Khup chan mahiti thanks madam

  • @priyaamberkar8905
    @priyaamberkar8905 5 місяців тому

    खूप छान समजून सांगता मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @vaishalijadhav5261
    @vaishalijadhav5261 Рік тому

    Uttam mahiti details

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 2 роки тому

    धन्यवाद डॉक्टर

  • @rajashrisonawane11
    @rajashrisonawane11 2 роки тому

    खूप खूप छान माहिती मॅडम

  • @bhartipatil5990
    @bhartipatil5990 2 роки тому

    छान आहे

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 6 місяців тому

    मॅडम तुमच्या साड्या खूपच छान असतात चॉईस छान आहे

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 роки тому

    खूप छान

  • @lalitadhoot932
    @lalitadhoot932 2 роки тому

    Thanks so much god bless you family madam

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 2 роки тому

    सुंदर!! धन्यवाद!!

  • @laxmanshinde7560
    @laxmanshinde7560 2 роки тому

    Thaks dr sab🙏🙏👏👏👏

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 роки тому

    Thanks for information ma'am 🙏🙏🙏

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 роки тому

    Very nice madam 💐 God bless you 🌹

  • @moreabouthealth
    @moreabouthealth 2 роки тому

    Khupkhupkhupkhup ch chan Madam me pan mudra krte khup change hot life thank you so much Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @laxmikantkulkarni7781
    @laxmikantkulkarni7781 3 місяці тому

    Khup Chan pan hi mudra kiti vel karayachi te pan sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sarikaabhyankar3710
    @sarikaabhyankar3710 2 роки тому

    मॅडम नमस्कार तूमचे आभार मानण्यासाठी शब्द च नाहीत या कलियुगातील आपण थोर संत आहात धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपले कौतुकाचे शब्द आमचा हुरूप वाढवतात. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @krantidhage436
    @krantidhage436 2 роки тому

    Thank you tai

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 роки тому

    Very good informative video.

  • @sanuraut1755
    @sanuraut1755 2 роки тому

    अनंत कोटी नमस्कार

  • @shubhangipandit3314
    @shubhangipandit3314 2 роки тому

    Mam your knowledge away some also saris collection is too good like your presentation is excellent.i am Shubhangi from Indore mp recently I have seen your videos mudras topic is very helpful and useful.Thanks

  • @nikhilshete-cw1ny
    @nikhilshete-cw1ny Рік тому

    Good video mach

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 роки тому +1

    Dhanyawad Doctor madam very good information given by you and meditation kartana khup upayog honar . 🙏🙏

  • @partekrishnakant1649
    @partekrishnakant1649 2 роки тому

    Khu chan ahe

  • @nayanapatil3850
    @nayanapatil3850 2 роки тому

    Lovely

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 2 роки тому

    👌धन्यवाद.

  • @anujarane470
    @anujarane470 2 роки тому

    🙏🙏🙏धन्यवाद मॅडम

  • @tipseveryday2643
    @tipseveryday2643 2 роки тому +1

    🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +1

    🙏🌹

  • @sukumaridound5023
    @sukumaridound5023 Рік тому

    Ho ,madam mazya sasubainna asech zale aahe tyancya aai gelyanantr ,aaikayla yet nahiye, tya mhnaychya tyamule zale pn aamhi vishvasthevt nvhtat ,khrch mam khup khup dhnyvad 🙏💫asich tumchi khup prgti hot javi hi ishvr chrni prarthna

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏,असाच स्नेह कायम ठेवा. अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      निरामय मालिकेचे इतर सर्व भाग देखील नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 2 роки тому +8

    वयाच्या सहाव्या वर्षी झालेल्या गालगुंडामुळे कानाची नस शुष्क झाली त्यामुळे अजिबात ऐकायला येत नाही त्यासाठी शून्य मुद्रा करायची की आकाशमुद्रा? आता चाळीस वर्ष वय आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +4

      यावर आपल्याला शून्य मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      शून्य मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/NSjlusg1IEY/v-deo.html

    • @bkkamble2333
      @bkkamble2333 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter eka divsat ekapeksha jyada mudra kelyas dosh utpanna hotat he khare ka

  • @mukeshkamble5474
    @mukeshkamble5474 2 роки тому

    Nice 🙏🙏

  • @poonamraut4981
    @poonamraut4981 2 роки тому

    नमस्कार मॅडम, तुमचे प्रत्येक व्हिडीओ खूपच छान, माहितीपूर्ण आहेत. मुद्रां बद्दलची माहिती अप्रतिम. वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल नॉर्मल लेव्हलवर आणण्यासाठी औषधांबरोबर कोणती मुद्रा मुद्रा करावी याचे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती, धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.

  • @madhavigadgil2732
    @madhavigadgil2732 2 роки тому +1

    व्हेरी nice

  • @NiKi-ij2ln
    @NiKi-ij2ln 5 місяців тому

    Thank you for your videos. Does this also mean that excess akash causes lack of processing and absorbing of nutrients from food leading to underweight, cause I am underweight. And yes confused, lot of confusion, especially in the last years...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      Do not get confused you can start Swayampurna Upchar
      वजन वाढण्याच्या समस्येवर आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @jyotsnakadam8639
    @jyotsnakadam8639 2 роки тому

    नमस्कार , मॉडम मि प्रथमच आपली व्हिडीओ पाहीली ़ आपण खुप छान समजावुन सांगतात , खुपच छान माहीती , नक्की फायदा होईल , धन्यवाद ,, डाव्या बगलेत गाठ आहे , त्यासाठी मुद्रा सांगा , कृपया ,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणतीही गाठ, गुठळी, सूज किवा अतिरिक्त वाढ म्हणजे संचय, शरीराची कुठलीही क्रिया विचारांशिवाय होत नाही, त्यामुळे अति विचार, साठवलेल्या भावना हेअनेकदा त्याचे मूळ कारण असते. वाढलेले हे पृथ्वी तत्व कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयुक्त ठरू शकते, पित्त प्रकृती असल्यास पृथ्वी मुद्रा करावी, मात्र याबरोबर मनाची स्वच्छता (ध्यान) आवश्यक आहे.

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Рік тому

    नमस्कार डॉक्टर. हा सर्व मुद्रांचा अभ्यास खूपच उपयुक्त आणि इंटरेस्टिंग आहे नक्कीच. ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती ऑटीझम या विकारावर उपयुक्त आहे का ? यावर मार्गदर्शन पाहिजे. कृपया माहिती द्यावी, ही विनंती. धन्यवाद डॉक्टर ताई!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार पद्धती ऑटीझम या विकारावर उपयुक्त ठरू शकते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @jyotikalekar6513
      @jyotikalekar6513 Рік тому

      नमस्कार. मी कल्याणला राहते. मला दादर केंद्राचा संपर्क मिळू शकेल का ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      दादर केंद्राचा पत्ता व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७ , ८६०००३७१६१.
      Website : www.niraamay.com

  • @nishapai7277
    @nishapai7277 2 роки тому

    Thank you ma'am 😜

  • @ujwalapatkar2144
    @ujwalapatkar2144 2 роки тому

    Khupch chan 👌pls serv Mudra javlun kashe karaychi te dakhawa

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कृपया वेबसाईटला भेट द्यावी. www.niraamay.com वर मुद्रांची माहिती मिळेल. धन्यवाद 🙏

  • @user-ct1kn8dj3b
    @user-ct1kn8dj3b Рік тому

    👌👍🙏🌹

  • @sudampatil1210
    @sudampatil1210 8 днів тому

    कान गच्च झाल्यासारखे वाटतात व ऐकायलापण कमी येते . उपाय सुचवावा . धन्यवाद !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 днів тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rekhanevase9568
    @rekhanevase9568 2 роки тому +1

    Khup chhan mahiti deta madam pan ak sanga ki hi murdra karat Astana shwas ghene sodne mahnjech pranayama karne garjeche aahe ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @shilachoksi815
    @shilachoksi815 2 роки тому

    Tai khub khub dhanyvad
    🙏🙏