फार सुंदर विश्लेषण. जात्यावरील ओव्या आणि लोकगीतांमधून रामाबद्दल इतका विद्रोह प्रकट झाला असताना त्याला ईश्वरी अवतार म्हणून सादर करून उदात्तीकारण करण्याचा प्रकार कधी, कोणी आणि कशासाठी केला ही खरोखरच विचार करण्याची गोष्ट आहे.
रविंद्र पोखरकर साहेब या समाजातील लोकांनी आपले खूप खूप ऋण मान्य केले पाहिजे कारण जे आजवर आपल्याला कुणी सांगितलं नाही ते आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकांना आपुलकीने सांगता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर. तारा भवाळकर मँम या आमच्या नेहमीच प्रेरणास्थान आहेत. पण सितायणावर ही प्रदीर्घ मुलाखत आपल्या मुळे ऐकायला मिळाली. डोळे पाणावले काही प्रसंग ऐकताना. खूप खूप आभार !👍💐💐💐
विविध क्षेत्रातील अभ्यासक व मान्यवरांच्या मुलाखती व विचार समजून घेणे हे महत्वपूर्ण काम दादा आपण करत आहात.. मनापासून धन्यवाद .. डॅा. तारा मॅडम ला ऐकताना सरोजिनी आक्कांची आठवण आली… ❤️🙏
अभियक्ती ला सलाम.आपण राजकीय विषयासह असेही विषय हाताळता,आपलं अभिनंदन कौतुक.आपली मांडणी,संदर्भ आभ्यसपूर्ण असतात. फार मोठं प्रबोधन तेही निर्भीडपणे …?अप्रतिम ..! पुनश्च अभिनंदन.
रवींद्र सर, खूब शान समजावून सांगितले आई तुल्य म्यॅडम नी. खरच सगळ बाहुला सारून, माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. स्त्रियांना सुद्धा आपल्या माणुसकीनेच वागले पाहिजे. कारण तिच्या गर्भातून सर्व नर, नारीची उत्पत्ती झाली. तिला किती वेदना सहन करून, तूम्हा आम्हा या जगात उभ केल. किती भाग्यवान आहो आपण. तरीही तिच्यावर आपण अन्याय, अत्याच्यार होत असतांना पाहतो. किती दुर्देवी आहो आपण. म्हणून तिच्यावर कोणतेही कारण नसता. तिच्यावर अन्याय करीत असेल तर तो तिचा पती का असेना. आणखी कोनीही असो. दंडित व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटले नुसता रावण संपून चालनार नाही. सितेला वनवासात पाठवणारा राम पण संपायला हवा. बिल्कुल जे ने करू स्त्री ही सुरक्षित असायला हवी. कारण ती परिवारिक अनेक भूमिका कष्ट घेऊन गाजवते. ती एक प्रकारची विरांगनाच आहे. पण आपण तिला अबला समजतो. हा भ्रम आहे. जय भारत 🙏.
खूप छान विश्लेषण. मॅडम म्हणाल्या आंधळं प्रेम, या मताशी 100% सहमत आहे. रामाने सीतेवर अन्याय केला, तरीही त्याला कोणीही अन्यायी म्हणतं नाही अस का.? हा प्रश्न लहानपनापासून मनात टोचत राहिलाय. राम कितीही वाईट वागला तरी त्याला चांगलंच म्हणायचं का??? मॅडम नी खूप छान उलगडा केला धन्यवाद 🙏 सर तुम्हाला ही मनापासून धन्यवाद 🙏
अभिव्यक्ती द्वारेच डॉ तारा भवाळकर यांची भेट झाली त्यानंतरच त्यांच्यातल्या तत्कालीन आणि वर्तमानातिल स्त्रियांच्या अंतस्थवेदनेचा ठाव लागला जाणिवां जाग्या झाल्या.आणि आतातर त्याना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळालं आहे या निमित्ताने त्यांचे खूप खूप मनःपुर्वक अभिनंदन (अतिशय सुयोग्य निवड)क्रुपया त्यांच्या पर्यैत शुभेच्छा संदेश दिला तर आपले खूप आभार.
खूप छान मुलाखत ! मा.ताराताईंना सा.न. आमच्या गावच्या मोठ्या आक्काची आठवण आली.आक्काकडून ऐकलेल्या काही ओव्या. रामसीता चाले वाटे झाडी लक्षुमन काटे प्रेमाचे असे बंधु जगात नाही कोठे. गुंजभर सोनियाने गळसरी शोभे गळा सोनियाच्या हरणाचा कां गे सीताबाई लळा. धाकटा देर बाई पाठचा ल्हाना भाऊ लक्षुमन तुला तसा संशेव नको घेऊ. तुम्ही मारिला रावण संगे मारूती बिभूषन सीता झुंजली एकली तिच्या नशीबी दूषन. रामा तुझ्या मनापाठी कसा संशेवाचा काटा वाटे रावणाचा दंभ खरा सीतेचा शब्द खोटा. महर्षी वाल्मिकींनीच सांगीतलंय , रामायण म्हणजे -- सीताया:चरितं महत् वाल्मिकींची सीता अतिशय कणखर क्षत्राणी आहे.तिचा कणखरपणा , प्रसंगावधान,दूरदृष्टी,सहृदयता आत्मविश्वास ,सतत जाणवत राहतो. इतकी कणखर सीता लोकसाहित्यात " बिचारी "का ठरली ?परकीय आक्रमणांच्या हजार वर्षांच्या काळातल्या हताशेचा अवसादाचा हा परिणाम असेल का ?बाहेर आक्रमकांपुढे लाचारीने झुकणारा पुरूष घरात,कुटुंबात स्त्रियांवर हुकुमत गाजवत असे.अरेरावी आणि आक्रस्ताळेपणा म्हणजे पुरूषार्थ ! नांगर तराजू आणि तलवार हीच संपत्तीची साधने असण्याच्या काळात वाल्मिकी रामायण कोण वाचणार ? याच काळात रामायणाच्या मूळ कथेभोवती अनेक अद्भुत,अतर्क्य, अविश्वसनीय,आकर्षक चमत्कार दंतकथांमधून चिकटले. त्या दंतकथांची महिरप,मखर बाजूला ठेवून एका आख्यायिकेला समाजाभिमुख,सकारात्मक रूप मिळालं आहे.रावेरी,तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ इथे परित्यक्ता सीता मंदीर होते.आख्यायिका सांगते की रामाने त्याग केल्यावर सीता महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहिली.तो आश्रम रावेरीला आहे.त्या काळातली तमसा नदी म्हणजे इथली रामगंगा. लव आणि कुश यांच्या जन्मानंतर सोजी करण्यासाठी गावकऱ्यांनी गहू दिले नाहीत म्हणून सीतेने शाप दिला की या परिसरात गहू पिकणार नाही.संकरित वाण येईपर्यंत तिथे गहू पिकत नव्हता. रावेरीच्या परिसरात सीतेने लव,कुशांना वाढवले ,घडवले युद्धनिपुण केले. रामाच्या अश्वमेधाचा घोडा लव,कुशांनी अडवला ,सैन्याला पराभूत केले, हनुमानाला वेलींनी बांधून ठेवले.वेलींनी बांधलेल्या हनुमानाचं मंदीरही इथे आहे. त्या जीर्ण,भग्न मंदीराचा जीर्णोद्धार शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी स्वखर्चाने केला.तिथे प्रशिक्षणार्थी स्त्रियांसाठी " माहेर " नावाचे सभागृह बांधले.परित्यक्ता सीतेच्या पाठीशी बाप म्हणून उभं राहणाऱ्या वाल्मिकींचाही तो सन्मान आहे.ते मंदीर आता - स्वयंसिद्धा सीता मंदीर आहे. शेतकरी संघटना त्या मंदिराच्या प्रांगणात स्वयंसिद्धा सन्मान सोहळा साजरा करते. पतीच्या पश्चात् एकटीने मुलांना घडवणाऱ्या मातांच्या सजग मातृत्वाचा तिथे सन्मान केला जातो.ह्या कार्यक्रमात मा.ऍ.वामनराव चटप,सौ.सरोजवहिनी काशीकर आणि सौ.शैलाताई देशपांडे यांचे सक्रीय योगदान आहे.आम्हा संघटनेच्या पाईकांसाठी रावेरी हे शक्तीपीठ आहे. तुम्ही रामाच्या विरोधात आहात का ? असा तिरपा प्रश्न आम्हाला विचारला जातो.आम्ही रामाच्या विरोधात नाही . कारण सीतामाईच रामाच्या विरोधात नव्हती.जिथे राम थांबले तिथून सीतेने एकटीने कर्तव्यपथावर चालायला सुरवात केली.सीता त्याग केल्यावर राम हळहळत राहिले.सीतेने त्याग होऊनही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. रघुवंशाचे राजकुमार घडवले.पण क्षणभर आणि कणभरही आसक्ती न ठेवता रघुवंशाकडे त्या मानिनीने पाठ फिरवली.धरित्रीच्या लेकीने आभाळाला दान दिले.आजही संपूर्ण भारतात सीतेच्या दोनदा परित्यक्त होण्याचा, दोनदा घडलेल्या वनवासाचा जराही विचार न करता नवजात मुलीचे नाव सीता,जानकी,वैदेही,मैथिली ,सिया असे ठेवले जाते.सीतेच्या व्यक्तिमत्वाचा हा प्रभाव आहे. सीतादर्शन घडवल्या बद्दल संयोजकांचे आभार.मा.डाॅ.ताराताई भवाळकर यांना सादर नमस्कार .🙏🙏
डॉ तारा भवाळकर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलानाध्यक्षपदी निवड झाल्याने आता 'सितायान' बाबत अधिक चर्चा होईल. आपण त्या अगोदरच त्यांची मुलाखत घेतलेली असल्याने ही मुलाखत देखील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचेल यात शंका नाही.
जेव्हा आशीर्वाद आटा आला, आणि बायका सर्व्हिसला जावू लागल्या तेव्हा ह्या जत्यावरच्या ओव्या लुप्त होतात की काय अशी भीती वाटत असतानाच भवाळकर मॅडम सारख्या लेखिका त्यांना ठिकठिकाणी जावून वेचून घेवून येत्तात हे नक्कीच कौतुकास्पद आहे, धन्यवाद सर!
फार फार काळाने इतकी सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली.केवढा व्यासंग! तरीही बोलण्यातली नम्रता! सध्याच्या गलिच्छ राजकीय वातावरणात व नेत्यांनी (?) वापरलेल्या अश्रवणीय भाषेला विटलेल्या मनाला अवर्णनीय आनंद झाला. असं काही तरी ऐकवा...बस ते तिरस्करणीय राजकारण आणि जातीयतेनं बरबटलेलं समाजकारण.श्रीमती ताराबाई यांना विनम्र अभिवादन.
ताराबाई अत्यंत सुंदर शब्दात सीता आणि परंपरेने तिचे केलेले हाल कथन केले आहेच पण आजच्या सीतेचा वनवास संपलेला नाही कारण त्या च विचाराचे राम आजही समाजात आहेतच 😮
राम हा तर्क लावण्याच आणि चर्चा करण्याचा विषय नसून प्रत्येकाने राम राम असा सारखा उच्यार व नामस्मरण करण्याचा विषय आहे असे सर्व साधु संतांनी सांगितले आहे म्हणून आमचा विश्वास डोळे झाकून रामनाम वर आहे जय जय राम कृष्ण हरि (वारकरी संप्रदाय चा महामंत्र ) कामामध्ये काम |काही म्हणा राम राम (संत तुकाराम महाराज ) तैसा हृदयामध्ये रामू |असता सुखाचा आरामू (संत ज्ञानेश्वर महाराज ) भावार्थ रामायण ( संत एकनाथ महाराज ) म्हणून वारकरी संप्रदाय चा रामावर आणि राम नामावर खूप मोठी श्रद्धा आहे वारकरी संप्रदाय चा प्राण हा अयोध्या चा राजा प्रभू रामचंद्र आहे राजा राम राम सीता राम राम 🚩🚩🙏🙏
मुलाखत ऐकताना डॉ. तारा मॅडम यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण मनाला खूप भावले. माझ्या मनाला बालपणी पासून हे प्रश्न भेडसावत होते. त्याकाळी आजच्या सारखी स्वतंत्र न्यायव्यवस्था असती तर सितामैय्याला योग्य न्याय मिळाला असता कां ? न्यायाधीशांनी श्रीरामाला फटकारलं असतं कां? असेही मनात येऊन जाते. परवा कुठेसे ऐकले की आजही अयोध्येत मुलांना आपल्या मुली देण्यासाठी पालक कचरतात. आपल्या मुलींवर अशी वेळ येऊ नये ही त्यांची भावना असणे काय चुकीची आहे.
जेंव्हा पित्रसत्ताक पद्धती, मातृसत्ताक पद्धती वर वरचड होते तेंव्हा रामायण होते..भारताची मूळ मातृसत्ताक पद्धती रामायण, महाभारत असे ग्रंथ रचून पितृसत्ताक कशी करण्यात आली या विषई अंदाज येतो..
अभिव्यक्तीला धन्यवाद... सीतायन ह्या पुस्तकावर एपिसोड पाहिला. उत्तमच होता आता लेखिकेची मुलाखत अजूनच परमानंद. ताराताई ह्या मुलाखतीमुळे काही संकल्पना कळल्या . लोकपरंपरा म्हणजे काय व त्याचे महत्त्व म्हणजे समाज मन व ते ओव्या तून मांडलेले🎉विद्रोह पण योग्य प्रकारे सांगितला आहे ...... तुम्ही. राम नाही तोलाचा खूप काही सांगून जाते व लव कुश संबन्धित माहिती प्रथमच कळाली .
आपल्या दोघांच्या, कार्याचे, धाडसाचे अणि सत्याचे कौतुक करण्याकरता शब्दात वर्णन करता येणार नाही. साताऱ्याच्या sitamaichya यात्रेस संक्रांती स सर्वानी जावे असे वाटते.
आद. रविंद्र पोखरकर सर एक विनंती आहे की, सध्या प्रदर्शित झालेला चित्रपट "तंगलान"या पा. रंजीता यांच्या ऐतिहासिक चित्रपटाविषयी चर्चा किंवा आपले सखोल विश्लेषण पूर्ण एक व्हिडिओ ऐकायला नक्की आवडेल.
खूपच सुंदर चर्चा होती. डॉक्टर तारा भवाळकर यांच्या बद्दल आदर होता, तो वाढला. आत्ताच्या दहा वर्षातल्या खोट्या खोटारड्या जगामध्ये न पडता, न राहता अतिशय प्रांजळपणे राम सांगितला आणि कुटील बुद्धीचा व्यापारी कौटिल्य पण... दोघांचेही आभार.🙏🌹
अविस्मरणीय मुलाखत. अभ्यासपूर्ण सखोल संदर्भासहित सविस्तर विश्लेषण म्हणजे पर्वणी ... ! मंत्रमुग्ध होऊन संपूर्ण मुलाखत ऐकून एक वेगळाच अनुभव आला. ह्या वयात डॉ तारा बाईंची एवढी विलक्षण स्मरणशक्ती ... ! डॉ ताराबाईंना उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा ! त्यांनी आत्मसात केलेल्या प्रचंड ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा जेणेकरून सर्वसामान्यांचा वैचारिक दृष्टिकोन सकारात्मक व्हायला प्रेरणादायी ठरेल. डॉ तारा बाई आणि पोखरकर आपल्या दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद !
गुरुतूल्य तारा माम ह्याना ऐकणे म्हणजे ध्यानस्थ होणे.भाषाप्रभुत्व,लोककलेचा हा महामेरु किती सुरेख त्या पेलतात.आमच्यासारख्या आधुनिक स्त्रियांसाठी,तारा माम दीपस्तंभ.🙏 धन्यवाद,ह्या मुलाखतीसाठी.
डॉ. तारा भवाळकर यांची ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉
खुपच नेमकेपणाने विवेचन. विचार प्रवर्तक विद्रोह्क .
तारा भवाळकर मॅडम यांची मुलाखत घेतल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद
आजचा episode खूपच भारी झाला .
फार सुंदर विश्लेषण. जात्यावरील ओव्या आणि लोकगीतांमधून रामाबद्दल इतका विद्रोह प्रकट झाला असताना त्याला ईश्वरी अवतार म्हणून सादर करून उदात्तीकारण करण्याचा प्रकार कधी, कोणी आणि कशासाठी केला ही खरोखरच विचार करण्याची गोष्ट आहे.
रविंद्र पोखरकर साहेब या समाजातील लोकांनी आपले खूप खूप ऋण मान्य केले पाहिजे कारण जे आजवर आपल्याला कुणी सांगितलं नाही ते आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकांना आपुलकीने सांगता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
💯✅✅✅ 🙏करेक्ट. आपले शिवभूमीसुपुत्र रवींद्रजी.🙏
thank you very much Pokharkarji ani Dr Taraji
धन्यवाद मॅडम व रविंद्र सर
खूपच सुंदर मुलाखत!👌👌
धन्यवाद सर!
ताराताईंचे व्याख्यान ऐकण्याचा योगही आला होता. अभ्यासपूर्ण व वैचारिक मत! 👍👍👌👌💐💐
अप्रतिम वर्णन केले आहे लेखिकेने रामायनातील जे विश्लेषण माहिती नव्हते ते आज स्पश्ट झाले आहे धन्यवाद सर खूप छान माहिती दिली त्या बदल आणि लेखिकेचे पण❤❤🙏🏻
🙏
सर आपले मनःपूर्वक धन्यवाद आम्हाला प्रत्यक्ष मॅडमना भेटता आलं आणि त्यांचे विचार ऐकता आले
खूप खूप धन्यवाद सर.
तारा भवाळकर मँम या आमच्या नेहमीच प्रेरणास्थान आहेत. पण सितायणावर ही प्रदीर्घ मुलाखत आपल्या मुळे ऐकायला मिळाली.
डोळे पाणावले काही प्रसंग ऐकताना.
खूप खूप आभार !👍💐💐💐
🙏🙏🙏
धन्यवाद. खुपच छान मुलाखत घेतली. आत्ता च्या वातावरणात खुप गरज आहे अशा मुलाखतीची.
Tara Tai🙏🙏🙏❤️❤️❤️
अप्रतिम मुलाखत घेतली पोखरकर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद
Her perspectives and views are so clear and progressive, amazing interview!! thank u for this sir...❤❤
Thanks 🙏
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण! डॉ. तारा ताई भावाळकर यांची मुलाखत अतिशय श्रवणीय आणि ज्ञानदायक!पोखरकरजी आपले खूप आभार 🙏👌☝️!🙏!
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद आपले आणि आदरणीय डॉ. मॅडम यांचे ❤💐💐❤🙏🙏
विविध क्षेत्रातील अभ्यासक व मान्यवरांच्या मुलाखती व विचार समजून घेणे हे महत्वपूर्ण काम दादा आपण करत आहात.. मनापासून धन्यवाद .. डॅा. तारा मॅडम ला ऐकताना सरोजिनी आक्कांची आठवण आली… ❤️🙏
अभियक्ती ला सलाम.आपण राजकीय विषयासह असेही विषय हाताळता,आपलं अभिनंदन कौतुक.आपली मांडणी,संदर्भ आभ्यसपूर्ण असतात. फार मोठं प्रबोधन तेही निर्भीडपणे …?अप्रतिम ..! पुनश्च अभिनंदन.
धन्यवाद 🙏
रवींद्र सर, खूब शान समजावून सांगितले आई तुल्य म्यॅडम नी. खरच सगळ बाहुला सारून, माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. स्त्रियांना सुद्धा आपल्या माणुसकीनेच वागले पाहिजे. कारण तिच्या गर्भातून सर्व नर, नारीची उत्पत्ती झाली. तिला किती वेदना सहन करून, तूम्हा आम्हा या जगात उभ केल. किती भाग्यवान आहो आपण. तरीही तिच्यावर आपण अन्याय, अत्याच्यार होत असतांना पाहतो. किती दुर्देवी आहो आपण. म्हणून तिच्यावर कोणतेही कारण नसता. तिच्यावर अन्याय करीत असेल तर तो तिचा पती का असेना. आणखी कोनीही असो. दंडित व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटले नुसता रावण संपून चालनार नाही. सितेला वनवासात पाठवणारा राम पण संपायला हवा. बिल्कुल जे ने करू स्त्री ही सुरक्षित असायला हवी. कारण ती परिवारिक अनेक भूमिका कष्ट घेऊन गाजवते. ती एक प्रकारची विरांगनाच आहे. पण आपण तिला अबला समजतो. हा भ्रम आहे. जय भारत 🙏.
👌👌👌✅✅✅
खूप छान माहतीपूर्ण मुलाखत. आपले खूप खूप आभार 🙏. जमल्यास आईतुल्य मॅडम बरोबर अजून एक भाग करावा
खूप छान विश्लेषण. मॅडम म्हणाल्या आंधळं प्रेम, या मताशी 100% सहमत आहे. रामाने सीतेवर अन्याय केला, तरीही त्याला कोणीही अन्यायी म्हणतं नाही अस का.? हा प्रश्न लहानपनापासून मनात टोचत राहिलाय. राम कितीही वाईट वागला तरी त्याला चांगलंच म्हणायचं का??? मॅडम नी खूप छान उलगडा केला धन्यवाद 🙏
सर तुम्हाला ही मनापासून धन्यवाद 🙏
Jaggi Vasudev yanch Ramacha sitevar anyay yavar vishleshan changle aahe...
98 व्या अ.भा.साहित्य सम्मेलन अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..🎉🎉🎉
अभिव्यक्ती द्वारेच डॉ तारा भवाळकर यांची भेट झाली त्यानंतरच त्यांच्यातल्या तत्कालीन आणि वर्तमानातिल स्त्रियांच्या अंतस्थवेदनेचा ठाव लागला जाणिवां जाग्या झाल्या.आणि आतातर त्याना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळालं आहे या निमित्ताने त्यांचे खूप खूप मनःपुर्वक अभिनंदन (अतिशय सुयोग्य निवड)क्रुपया त्यांच्या पर्यैत शुभेच्छा संदेश दिला तर आपले खूप आभार.
Gratitude to both of you for this 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏
सीतायान खूप वेदनादायी तसेच प्रेरणादायी❤❤
विचार करायला लावणारे व्याख्यान ! धन्यवाद मॅडम !
खूप छान मुलाखत !
मा.ताराताईंना सा.न.
आमच्या गावच्या मोठ्या आक्काची आठवण आली.आक्काकडून ऐकलेल्या काही ओव्या.
रामसीता चाले वाटे
झाडी लक्षुमन काटे
प्रेमाचे असे बंधु
जगात नाही कोठे.
गुंजभर सोनियाने
गळसरी शोभे गळा
सोनियाच्या हरणाचा
कां गे सीताबाई लळा.
धाकटा देर बाई
पाठचा ल्हाना भाऊ
लक्षुमन तुला तसा
संशेव नको घेऊ.
तुम्ही मारिला रावण
संगे मारूती बिभूषन
सीता झुंजली एकली
तिच्या नशीबी दूषन.
रामा तुझ्या मनापाठी
कसा संशेवाचा काटा
वाटे रावणाचा दंभ खरा
सीतेचा शब्द खोटा.
महर्षी वाल्मिकींनीच सांगीतलंय ,
रामायण म्हणजे -- सीताया:चरितं महत्
वाल्मिकींची सीता अतिशय कणखर
क्षत्राणी आहे.तिचा कणखरपणा ,
प्रसंगावधान,दूरदृष्टी,सहृदयता आत्मविश्वास ,सतत जाणवत राहतो.
इतकी कणखर सीता लोकसाहित्यात
" बिचारी "का ठरली ?परकीय आक्रमणांच्या हजार वर्षांच्या काळातल्या हताशेचा अवसादाचा हा परिणाम असेल का ?बाहेर आक्रमकांपुढे लाचारीने झुकणारा पुरूष घरात,कुटुंबात स्त्रियांवर हुकुमत गाजवत असे.अरेरावी आणि आक्रस्ताळेपणा म्हणजे पुरूषार्थ !
नांगर तराजू आणि तलवार हीच संपत्तीची साधने असण्याच्या काळात वाल्मिकी रामायण कोण वाचणार ?
याच काळात रामायणाच्या मूळ कथेभोवती अनेक अद्भुत,अतर्क्य,
अविश्वसनीय,आकर्षक चमत्कार दंतकथांमधून चिकटले.
त्या दंतकथांची महिरप,मखर बाजूला ठेवून एका आख्यायिकेला समाजाभिमुख,सकारात्मक रूप मिळालं आहे.रावेरी,तालुका राळेगाव,
जिल्हा यवतमाळ इथे परित्यक्ता सीता मंदीर होते.आख्यायिका सांगते की रामाने त्याग केल्यावर सीता महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहिली.तो आश्रम रावेरीला आहे.त्या काळातली तमसा नदी म्हणजे इथली रामगंगा.
लव आणि कुश यांच्या जन्मानंतर सोजी करण्यासाठी गावकऱ्यांनी गहू दिले नाहीत म्हणून सीतेने शाप दिला की या परिसरात गहू पिकणार नाही.संकरित वाण येईपर्यंत तिथे गहू पिकत नव्हता.
रावेरीच्या परिसरात सीतेने लव,कुशांना वाढवले ,घडवले युद्धनिपुण केले. रामाच्या अश्वमेधाचा घोडा लव,कुशांनी अडवला ,सैन्याला पराभूत केले, हनुमानाला वेलींनी बांधून ठेवले.वेलींनी बांधलेल्या हनुमानाचं मंदीरही इथे आहे.
त्या जीर्ण,भग्न मंदीराचा जीर्णोद्धार शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी स्वखर्चाने केला.तिथे प्रशिक्षणार्थी स्त्रियांसाठी " माहेर " नावाचे सभागृह बांधले.परित्यक्ता सीतेच्या पाठीशी बाप म्हणून उभं राहणाऱ्या वाल्मिकींचाही तो सन्मान आहे.ते मंदीर आता - स्वयंसिद्धा सीता मंदीर आहे.
शेतकरी संघटना त्या मंदिराच्या प्रांगणात स्वयंसिद्धा सन्मान सोहळा साजरा करते.
पतीच्या पश्चात् एकटीने मुलांना घडवणाऱ्या मातांच्या सजग मातृत्वाचा तिथे सन्मान केला जातो.ह्या कार्यक्रमात
मा.ऍ.वामनराव चटप,सौ.सरोजवहिनी काशीकर आणि सौ.शैलाताई देशपांडे
यांचे सक्रीय योगदान आहे.आम्हा संघटनेच्या पाईकांसाठी रावेरी हे शक्तीपीठ आहे.
तुम्ही रामाच्या विरोधात आहात का ? असा तिरपा प्रश्न आम्हाला विचारला जातो.आम्ही रामाच्या विरोधात नाही . कारण सीतामाईच रामाच्या विरोधात नव्हती.जिथे राम थांबले तिथून सीतेने एकटीने कर्तव्यपथावर चालायला सुरवात केली.सीता त्याग केल्यावर राम हळहळत राहिले.सीतेने त्याग होऊनही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. रघुवंशाचे राजकुमार घडवले.पण क्षणभर आणि कणभरही आसक्ती न ठेवता रघुवंशाकडे त्या मानिनीने पाठ फिरवली.धरित्रीच्या लेकीने आभाळाला दान दिले.आजही संपूर्ण भारतात सीतेच्या दोनदा परित्यक्त होण्याचा, दोनदा घडलेल्या वनवासाचा जराही विचार न करता नवजात मुलीचे नाव सीता,जानकी,वैदेही,मैथिली ,सिया असे ठेवले जाते.सीतेच्या व्यक्तिमत्वाचा हा प्रभाव आहे.
सीतादर्शन घडवल्या बद्दल संयोजकांचे आभार.मा.डाॅ.ताराताई भवाळकर यांना सादर नमस्कार .🙏🙏
या माहितीसाठी आणि उत्तम प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
त्याबाजूस येणं झालं की मी नक्की ते सगळं पाहण्याचा प्रयत्न करेन 🙏
अप्रतिम विश्लेषण.
डॉ तारा भवाळकर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलानाध्यक्षपदी निवड झाल्याने आता 'सितायान' बाबत अधिक चर्चा होईल. आपण त्या अगोदरच त्यांची मुलाखत घेतलेली असल्याने ही मुलाखत देखील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचेल यात शंका नाही.
अतिशय संवेदनशील पद्धतीने हा विषय मांडलात तुम्हा दोघांनाही खूप खूप धन्यवाद.
मागील 10 वर्षात रामाचे नावावर उन्माद , अतिरेक निर्माण केला गेला असे भवाळकर मॅडम यांनी परखड मत व्यक्त केले. छान मुलाखत , पोखरकर साहेब.
उत्तम विश्लेषण धन्यवाद मॅडम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🌹🙏🙏
🙏
प्रबोधनकारांचे पुस्तक मला श्रेष्ठ वाटतं
खूप खूप आभार.. अभिव्यक्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉ तारा भावळकर मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद ताई साहेब !! पोखरकर साहेब !!!
अनमोल माहिती !!!
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
अप्रतिम मुलाखत ❤
जेव्हा आशीर्वाद आटा आला, आणि बायका सर्व्हिसला जावू लागल्या तेव्हा ह्या जत्यावरच्या ओव्या लुप्त होतात की काय अशी भीती वाटत असतानाच भवाळकर मॅडम सारख्या लेखिका त्यांना ठिकठिकाणी जावून वेचून घेवून येत्तात हे नक्कीच कौतुकास्पद आहे, धन्यवाद सर!
पोखरकर साहेब खूप खूप धन्यवाद भवाळकर ताईनी सामान्य आणि राजकारणी यांच्यातील फरक खूप सुंदर पाणी सांगतो श्रद्धा आणि कुटिलता
खूप खूप धन्यवाद सर आपल्या या उपक्रमाला
अप्रतिम!!! शब्दच नाही!! मॅडमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटत होते. एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला. धन्यवाद सर, मॅडम आणि आमच्यामधे दुवा साधला.
मुलाखत खूप अप्रतिम झाली सर तुमचे खूप खूप धन्यवाद अशा प्रतिभाशाली व्याक्तींशी तुम्ही आमची भेट घडवून देता.
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती मॅडमनी दिली.मॅडम चे आणि तुमचे धन्यवाद.
फार फार काळाने इतकी सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली.केवढा व्यासंग! तरीही बोलण्यातली नम्रता! सध्याच्या गलिच्छ राजकीय वातावरणात व नेत्यांनी (?) वापरलेल्या अश्रवणीय भाषेला विटलेल्या मनाला अवर्णनीय आनंद झाला.
असं काही तरी ऐकवा...बस ते तिरस्करणीय राजकारण आणि जातीयतेनं बरबटलेलं समाजकारण.श्रीमती ताराबाई यांना विनम्र अभिवादन.
@@sudhakartanksale9401 🙏
अतिउत्तम अभ्यासपूर्ण विश्लेषण बाईनी मांडले पण भिडे अथवा भाजपवाल्या भक्तांना पचनी पडणार नाही. कारण त्यांच्या रोमारोमात उन्माद भरला आहे.
ताराबाई अत्यंत सुंदर शब्दात सीता आणि परंपरेने तिचे केलेले हाल कथन केले आहेच पण आजच्या सीतेचा वनवास संपलेला नाही कारण त्या च विचाराचे राम आजही समाजात आहेतच 😮
सर खुप छान विस्लेषण केलंत अशिच माहिती देत जा. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
You are great sir !
🎉❤🎉
फारच सुंदर विवेचन
राम हा तर्क लावण्याच आणि चर्चा करण्याचा विषय नसून प्रत्येकाने राम राम असा सारखा उच्यार व नामस्मरण करण्याचा विषय आहे असे सर्व साधु संतांनी सांगितले आहे म्हणून आमचा विश्वास डोळे झाकून रामनाम वर आहे
जय जय राम कृष्ण हरि (वारकरी संप्रदाय चा महामंत्र )
कामामध्ये काम |काही म्हणा राम राम (संत तुकाराम महाराज )
तैसा हृदयामध्ये रामू |असता सुखाचा आरामू (संत ज्ञानेश्वर महाराज )
भावार्थ रामायण ( संत एकनाथ महाराज )
म्हणून वारकरी संप्रदाय चा रामावर आणि राम नामावर खूप मोठी श्रद्धा आहे
वारकरी संप्रदाय चा प्राण हा अयोध्या चा राजा प्रभू रामचंद्र आहे
राजा राम राम सीता राम राम 🚩🚩🙏🙏
अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण संवाद 👌
तुम्हा दोघांचेही धन्यवाद आणि दोघांनाही मनापासून अभिवादन 🙏🙏🙏💐
आद. डॉ. तारा भवाळकर मॅडमशी संवाद साधला सारं ऐकून कृतकृत्य झाले.
धन्यवाद...पोखरकर सर आणि माईंना...मुलाखतीतुन सितेचा विद्रोह दाखवला...
छान, तारा भवाळकर मॅडम आदरणीय, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.
फारच मार्मिक विषय व सुंदर विवेचन, ..... फार फार आभारी आहोत ‼️
वेदनादायी सितायन..
सर्व धर्मिय आहे...ग्लोबल आहे‼️
मुलाखत ऐकताना डॉ. तारा मॅडम यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण मनाला खूप भावले. माझ्या मनाला बालपणी पासून हे प्रश्न भेडसावत होते. त्याकाळी आजच्या सारखी स्वतंत्र न्यायव्यवस्था असती तर सितामैय्याला योग्य न्याय मिळाला असता कां ? न्यायाधीशांनी श्रीरामाला फटकारलं असतं कां? असेही मनात येऊन जाते. परवा कुठेसे ऐकले की आजही अयोध्येत मुलांना आपल्या मुली देण्यासाठी पालक कचरतात. आपल्या मुलींवर अशी वेळ येऊ नये ही त्यांची भावना असणे काय चुकीची आहे.
जेंव्हा पित्रसत्ताक पद्धती, मातृसत्ताक पद्धती वर वरचड होते तेंव्हा रामायण होते..भारताची मूळ मातृसत्ताक पद्धती रामायण, महाभारत असे ग्रंथ रचून पितृसत्ताक कशी करण्यात आली या विषई अंदाज येतो..
खुप सुंदर 🙏
एैकतच राहावी अशी मुलाखत ,डोळ्यात पाणी आलं.आणखी एक भाग येऊद्या सर....
🙏
अभिव्यक्तीला धन्यवाद... सीतायन ह्या पुस्तकावर एपिसोड पाहिला. उत्तमच होता आता लेखिकेची मुलाखत अजूनच परमानंद. ताराताई ह्या मुलाखतीमुळे काही संकल्पना कळल्या . लोकपरंपरा म्हणजे काय व त्याचे महत्त्व म्हणजे समाज मन व ते ओव्या तून मांडलेले🎉विद्रोह पण योग्य प्रकारे सांगितला आहे ...... तुम्ही. राम नाही तोलाचा खूप काही सांगून जाते व लव कुश संबन्धित माहिती प्रथमच कळाली .
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
खूपच छान मुलाखत, एक अनोखे व्यक्तीमताची आपल्या चॅनेलमुळे ओळख झाली.
खूप खूप धन्यवाद 🌹🌹
आपल्या दोघांच्या, कार्याचे, धाडसाचे अणि सत्याचे कौतुक करण्याकरता शब्दात वर्णन करता येणार नाही.
साताऱ्याच्या sitamaichya यात्रेस संक्रांती स सर्वानी जावे असे वाटते.
Khupac chan💯💯
फार सुंदर 👍👌👌 🙏 नेमक्या आणि प्रभावी शब्दात सांगितले.... 🙏धन्यवाद
खूप छान धन्यवाद sir
शैला लोहिया मॅडम आम्हा उभयतांच्या शिक्षिका अंबाजोगाईच्या.❤
आद. रविंद्र पोखरकर सर एक विनंती आहे की,
सध्या प्रदर्शित झालेला चित्रपट "तंगलान"या पा. रंजीता यांच्या ऐतिहासिक चित्रपटाविषयी चर्चा किंवा आपले सखोल विश्लेषण पूर्ण एक व्हिडिओ ऐकायला नक्की आवडेल.
Yes, we are waiting for that, Sir!
खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारी मुलाखत 🙏
बरच काही वेगळ ऐकायला मिळाल धन्यवाद सर🙏🙏🙏
👍
हे पुस्तक पाहिजे असं मिळेल सर
Salute to you pokharkar sir.
🙏
खूपच सुंदर चर्चा होती. डॉक्टर तारा भवाळकर यांच्या बद्दल आदर होता, तो वाढला. आत्ताच्या दहा वर्षातल्या खोट्या खोटारड्या जगामध्ये न पडता, न राहता अतिशय प्रांजळपणे राम सांगितला आणि कुटील बुद्धीचा व्यापारी कौटिल्य पण...
दोघांचेही आभार.🙏🌹
शब्द नाही, पण वेदनादायी सितायण
भगवान बुद्ध ने धम्मपद,और जातकथा बताई है! इसमे "दशरथ जातक" प्रमुख कथा है!
खूप खूप आभार ताई❤❤❤❤
Khupch changal vishleshan madamane kele manacha mujara
ऐकत राहावी अशी मुलाखत झाली 🙏🏻
धन्यवाद 🙏
सर, मनापासून धन्यवाद. इच्छा एवढीच आपले हे सारे कष्ट बहुजनांपर्यंत विशेषतः बहुजन तरुणपर्यंत पोहचायला हवं. जयभीम.
ड्रा. तारा भावळकर यांचे सुद्धा आभार.
@@learnertech2295 धन्यवाद 🙏
I have met her. A great lady
खरं आहे..
This is important message for all the people
Beshak janab
खुप छान माहिती आहे.
❤❤
अतिशय सुंदर मुलाखत 👌👌👌.
Jai Bheem Madam.🙏
Sar shmbhuk vad ramane kasa kela hachavar vidio kara❤❤❤
खूप छान माहीत मिळाली साहेब.
खुप, खुप सुंदर झाली मुलाखत स्त्री चे मनोगत सीतेच्या रुपात प्रगट झाले ❤ ❤
जय रावण 🙏
👌👍भवाळकरांचे अभिनंदन
What an old woman! She is younger than 20 by thought process. Age is just number.
सर जी आज मॅडम ची मुलाखत घेऊन सीतायन बाबत छान माहिती
नितांत सुंदर!!!
फारच छान माहिती
आपल्या नॉनबॉयोलॉजीकल नरेंद्राने जसोदाबेन पासुन विभक्त होतांना कसा निरोप घेतला असेल हा ही कुतूहलाचा विषय आहे.
Mala pan hach prashna ahe
@@dipalipandiri2379 😄😄
@@opq5474
सिती पेक्षाही जास्त अन्याय लोकशाहीच्या देशात होत आहे आणि तो सर्वांना मान्य आहे किती दुर्दैवी घटना आहे यालाच रामराज्य म्हणावे लागते
🚩🚩 "" त्याला फोन लावा कि "" 🚩🚩😆😁😛🤪
चल हट घे कट्टी 😅😅
सितेचं स्त्रीसुलभ व्यथा कथन
अविस्मरणीय मुलाखत. अभ्यासपूर्ण सखोल संदर्भासहित सविस्तर विश्लेषण म्हणजे पर्वणी ... ! मंत्रमुग्ध होऊन संपूर्ण मुलाखत ऐकून एक वेगळाच अनुभव आला. ह्या वयात डॉ तारा बाईंची एवढी विलक्षण स्मरणशक्ती ... ! डॉ ताराबाईंना उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा ! त्यांनी आत्मसात केलेल्या प्रचंड ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा जेणेकरून सर्वसामान्यांचा वैचारिक दृष्टिकोन सकारात्मक व्हायला प्रेरणादायी ठरेल.
डॉ तारा बाई आणि पोखरकर आपल्या दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद !
@@raiespatel460 धन्यवाद 🙏
गुरुतूल्य तारा माम ह्याना ऐकणे म्हणजे ध्यानस्थ होणे.भाषाप्रभुत्व,लोककलेचा हा महामेरु किती सुरेख त्या पेलतात.आमच्यासारख्या आधुनिक स्त्रियांसाठी,तारा माम दीपस्तंभ.🙏
धन्यवाद,ह्या मुलाखतीसाठी.
🙏🙏🙏
धन्यवाद ❤
Khup khup Bodjpar. Ravindraji thanks very much.