Це відео не доступне.
Перепрошуємо.

Saptkoteshwar Temple Goa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2022
  • गोमंतक अर्थात गोवा हे एके काळी संपन्न अशा कदंब राजवटीचा एक भाग होता. ‘श्री सप्तकोटेश्वरलब्धवर प्रसाद’ अशी बिरुदावली दिमाखात मिरविणाऱ्या कदंबांचे हे तीर्थक्षेत्र. पुढे पोर्तुगीज सत्ताधीशांकडून मंदिराची विटंबना झाली. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या प्रसंगाचे वर्णन करणारा शीलालेख मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेला आहे. श्रीसप्तकोटेश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण। पंचम्यां सोमे श्रीशिवराजा देवालायस्य प्रारंभ: । असा तो शीलालेख. हे मंदिर खडकात उभारेले आहे. मंदिराच्या मागील बाजूस सलग खोदलेल्या कमानी दिसतात. मागील बाजूला एक पाखाडी असून, ती चढून वर गेले की मंदिर परिसराचे सौंदर्य नेत्रसुखद दिसते. याच मंदिराजवळ असलेल्या देवीच्या मंदिरातील महिषासुरमर्दिनीची मूर्तीही पाहता येईल. पणजी-म्हापसा-डिचोलीमार्गे नारवे येथे जाता येते. मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. गर्द झाडा-झुडपांत वसलेले हे मंदिर प्रेक्षणीय आहेच; पण त्याचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. यामुळे सप्तकोटेश्वर दर्शनाने गोवा पर्यटन सार्थकी लागू शकेल.

КОМЕНТАРІ • 19

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Рік тому

    🙏🌹||ॐ नमः शिवाय||🌹🙏
    🙏🌹जय शिवराय||🌹🙏

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Рік тому

    महाराजांचे वर्णन करावे तेवढे कमीच आहेत..
    महाराज आम्ही आपले शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी च आहोत 🙏🙏🙏🌹
    🙏🌹जय शिवराय||🌹🙏

  • @udaypatil376
    @udaypatil376 2 роки тому +1

    Chhan..

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 2 роки тому

    very nice

  • @pallavikhot6516
    @pallavikhot6516 2 роки тому

    Nice information n video

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 2 роки тому +2

    महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भुमी . आणि त्यांनी स्वतः बांधून घेतलेल मंदिर - .... वर्णन कराव तेवढ थोड आहे . खुप सुंदर ऐतिहासिक माहिती . - एवढे दिवस कल्पना केली होती ' त्याही पेक्षा खुप सुंदर आहे हा व्हिडिओ ... मनापसुन आभार🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 роки тому +1

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Dada farach chhan aani aparichit parantu Maharajanchya padsparshane pawan zalelya jagechi mahiti sangitali tyabaddal anek dhanyawad.

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 2 роки тому +2

    आज बऱ्याच महिन्यात आपला विडिओ पहिला आनंद झाला मस्त विडिओ दादा 👌

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 2 роки тому +1

    खूप छान इतिहास व माहिती किशोर दादा 🙏🚩जय शिवराय 🚩असेच छान video करत रहा 🙏खूप शुभेछा 🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +1

    जुन ते सोनं

  • @udaypatil376
    @udaypatil376 2 роки тому

    तुमच्या जिद्दीला माझा सलाम खूप खूप शुभेच्छा

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому

    एका पुरातन मंदिराची खुप सुंदर माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 роки тому +1

    कोकणातील मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ती सुरेख, खूप सुंदर रंगकाम केलेली असतात आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या अवस्थेत जतन केलेली असतात.