गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्र्वर मंदिराची | Restoring Saptakoteshwar Temple

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • गोमंतकाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे श्री सप्त कोटेश्वर मंदिर.
    गेल्या शेकडो वर्षांत कित्येक ऐतिहासिक उलथा पालथी या मंदिराने बघितले आहेत
    गोव्याच्या पुरातत्व विभागाने या मंदिराचा जूनेपणा टिकवून शास्त्रीय पद्धतीने जीर्णोद्धार नुकताच पूर्ण केला त्या अनुषंगाने या मंदिराची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत
    गोव्याची जीवन वाहिनी मांडवी नदीतील दिवार बेटावर कदंब राजवटीच्या काळात बाराव्या शतकात श्री सप्तकोटेश्वराची स्थापना करण्यात आली
    हे राज्य म्हणजे श्री सप्त कोटेश्वराचाच प्रसाद आहे अशी कदबांची श्रद्धा होती
    त्या काळातल्या नाणी आणि ताम्रपटांवरील सप्त कोटेश्वर लब्ध वर प्रसाद असे कोरलेल्या संस्कृत वचनातून याचे पुरावे सापडतात
    कदंबांचा काळ इतका समृद्ध होता की त्याला गोव्याचं सुवर्णयुग म्हटलं जातं
    पण या सुवर्ण युगाला बहामण्यांची नजर लागली त्यांच्या आक्रमणात कित्येक मंदिर श्रद्धास्थान उध्वस्त केले गेले त्यात सप्तकोटेश्वराचाही समावेश होता
    याच दरम्यान दक्षिण भारतात एका महान आणि विशाल साम्राज्याचा उदय झाला
    विजयनगर साम्राज्य
    ज्याच्या भगनावशेषांना आज आपण हम्पी या नावाने ओळखतो
    गोवा देखील या साम्राज्याचा भाग होता
    या महान साम्राज्याचे सम्राट देवराज द्वितीय यांच्या आदेशाने गोव्याचे प्रधान श्री माधव मंत्री जी यांनी शिवलिंग पुन्हा एकदा श्रद्धेने आणि सन्मानाने स्थापित केले
    हा या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता काही वर्षातच गोव्याच्या इतिहासातील अंधार युग सुरू झाले
    साल पंधराशे दहा पोर्तुगीजांनी गोव्यावर ताबा मिळवायला सुरुवात केली बार्देश तिसवाडी साष्टी या भागात त्यांनी आपले पाय रोवले
    त्यांनी लोकांच्या श्रद्धा भावना दुखावण्यासाठी मंदिरांची तोडफोड सुरू केली आणि ह्यात अग्रस्थानी होते सप्तकोटेश्वर मंदिर
    पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला परकीय ताकदीने चीरडायला सुरुवात केली श्री सप्त कोटेश्वराचे शिवलिंग विहिरीत फेकले गेले त्याचे विडंबन केले
    कित्येकांनी यासाठी बलिदान दिले
    लोकांवर धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केली गेली
    शिवलिंग विडंबनाची बातमी कानावर पडताच दिवार च्या पल्याड डीचोली गावातील सरदेसाई नारायणराव यांनी ते शिवलिंग रातोरात आणले आणि गावाजवळील एका गुहेत लपविले
    इथून पुढे अनेक वर्ष राजदैवत श्री सप्त कोटेश्वराची पूजा या गुहेतच होऊ लागली
    पण शिवलिंगाला मंदिराचे रूप देण्याचे धाडस कोणीच करू शकले नव्हते
    पण त्याच काळात या भारत भूमीवर क्रांतीचा एक सूर्य उगवला होता ज्यांच नाव
    छत्रपती शिवाजी महाराज
    भयान अंधाराने होते जीव कोंडूनी गेले जोखड वाहत मानेवरती जगणे नशीब आले या अंधारी दिशा दिशांवर प्रकाश फेकत येशी महानतेचा मानदंड तू भारतात अवतरसी
    बारदेश दौऱ्यावर असताना शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर कोलवाळ मध्ये
    मात दिली
    त्यानंतर दिचोली महालच्या लोकांकडून महाराजांना सप्तकोटेश्वर मंदिराच्या विडंबनाबद्दल कळले
    या जाणत्या राजाने 13 नोव्हेंबर १६६८ रोजी कदम यांचा राजदैवत श्री सप्त कोटेश्वराच्या आज्ञा दिली
    पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेली भग्न मंदिरे पुन्हा उभी करण्याची प्रेरणा महाराजांनी दिली
    पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे पर जुन्या
    भारत भुमी ला महानते प्रत नेसी तू शिवराया
    Special Thanks to
    Sawani shetye
    / @sawanishetye
    Archeological department of Goa
    Intellectual property rights with Directorate of Information and Publicity
    #goa #heritage #restoration #archeology

КОМЕНТАРІ • 182

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 Рік тому +54

    खुपचं छान प्रसाद , माझा राजा होता म्हणून देवळात देव आणि घरात देव्हारा राहिला याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सप्तकोटेश्वराचं गोव्यातील मंदिर

  • @sharadtawade8156
    @sharadtawade8156 Рік тому +36

    शास्त्रीय पद्धतीने जीर्णोद्धार करतांना सहभागी असणाऱ्या सर्व कारागिरांचे, अधिकाऱ्यांचे आणि ही चित्रफीत बनवून ते आमच्यापर्यंत पोहचविणाऱ्यांचे मनापासून आभार. देव सदैव तुमच्या सोबत राहो.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Рік тому +20

    खूप छान मंदिर....
    शेवटी इतकचं की आपला राजा होता म्हणून मंदिरे आणि देव टिकले...
    मावळ्यांनी कधीही अशी नासधूस केली नाही ही होती आपल्या राजाची शिकवण.
    जय शिवराय 🚩🙏

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Рік тому +6

    गोवा सरकार आणि प्रसाद दोघांचे कौतुक

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +10

    Maza Raja Dev navta..Pan mazya Rajamule aaj Devlat Dev Ahet..aaj apan hindu mhanun rahilo...🙏.. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..Jay Jijau...🙏

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty Рік тому +13

    Really touching Video Shivaji महाराज 🙏आपले मराठा समाजाला वरदान होते, त्यना त्रिवार मुजरा, जुनी मंदिरे ashi preserve keli पाहिजे🥰 govt ne, आपली संस्कृती जपली पाहिजे Thanks🙏 प्रसाद for blissful😇 video हरी ओम्🙏

  • @radhakrishnamhapsekar3584
    @radhakrishnamhapsekar3584 Рік тому +14

    🙏 गोव्यातील "सप्तकोटेश्वर देऊळ" त्याचे जीर्णोद्धाराचे महत्व पूर्ण काम योग्य व्यक्ती करवी झाले, प्रसाद व सावनी मॅडमचे मनःपूर्वक आभार. 💐
    महाराष्ट्रातील तळकोकणातील देवळांचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी कश्या प्रकारे करायला हवा, या करीता हा व्हिडियो प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.

  • @aniruddhamukadam7749
    @aniruddhamukadam7749 Рік тому +8

    गोव्याला गेल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण.... शांत आणि निसर्गरम्य स्थान..... Restoration सुद्धा खूप छान केलंय. गोव्याची कावी कला जपली आहे हे पाहून समाधान वाटलं 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @ajayzadbuke
    @ajayzadbuke Рік тому +7

    व्वा, निव्वळ अप्रतिम. गोवा हे बीचेस च्या पलीकडे जाऊन पण खूप काही आहे, आणि असे व्हिडिओ ही बाब लोकांपर्यंत पोहचवण्यास खूप मदत करतील. परत एकदा धन्यवाद. आणि गोवा सरकारचे पण आभार या मंदिराचे जुनेपण जपत नूतनीकरण केल्याबद्दल 🙏🙏

  • @manojmasurkar5470
    @manojmasurkar5470 Рік тому +8

    अखंड भारताचे दैवत राजराजेश्वर शौर्यपुरुषोत्तम श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.....

  • @rutachaphekar2254
    @rutachaphekar2254 Рік тому +11

    प्रसाद आणि सावनी..तुम्ही दोघेही खूप छान काम करत आहात...खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Рік тому +7

    प्रसाद, तुझं खूप खूप अभिनंदन.
    श्री सप्तकोटेश्वर माझं माहेर चे कुलदेव.
    पण मी इथे कधीच पोचले नाही.त्यावेळी जमले नाही.पण मुंबई ,माहीम la मला ह्या देवाचे दर्शन झाले.शिवाय कारवार la आमच्या घराजवळच देवाचे मंदिर आहे,तरी मला नार्वे chya देवलाय
    विषयी उत्सुकता होतीच.तू खूप सखोल माहिती दिलीस,आणि मॅडम नी पण बांधकाम विषयी
    छान सांगितलं.खूप आभार तुझे. माझ्या
    आयुष्याच्या संध्याकाळी आता जाणें शक्य नाही
    पण तुझा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहीन.तुझे सगळे व्हिडिओज बघते मी,खूप युनिक असतात,पण ह्या व्हिडिओ ने तू जो आनंद दिलास,त्याबद्द्ल खूप thanks. 👍👍

  • @hpande-369
    @hpande-369 Рік тому +2

    ♥️🔱🌼हर हर महादेव☘️🚩🕉️🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dynamicvin93
    @dynamicvin93 Рік тому +4

    छत्रपती शिवाजी महाराजांनि स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदुराष्ट्र 🚩त्याचंच एक उदाहरण श्री सप्तकोटेश्वर मंदिर

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Рік тому +5

    सर्व गोवेकरानकडून धन्यवाद प्रसाद, छान माहिती दिलीस. आम्हाला गोव्याचा अभिमान आहे.

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 Рік тому +2

    छान प्रेक्षणीय एकदा अवश्य पाहावा.

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 Рік тому +2

    अप्रतिम दुसरा शब्दच नाही अभिमान आहे मला मी गोव्याचा आहे याचा व तुझा ही असेच काम करत रहा
    अनिल सांगोडकर, मुंबई

  • @gurudasnaik5722
    @gurudasnaik5722 Рік тому +9

    Jai bhawani jai Shivaji.. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 Рік тому +4

    हे सर्व काम चालू होतं तेव्हा मागची चार पाच वर्षे मी सतत जायचे ह्या सर्वांची साक्षीदार व्हायला. .. खुप धन्य वाटतं

  • @sushmaeaswar2724
    @sushmaeaswar2724 Рік тому +15

    🌹🙏🙏🌹 माझ्या माहेरचे कुलदेव आम्ही September 2022 मधेच जाऊन आलो … at that time restoration work was going on …very good temple …thank you very much for this video 👍👍👌👍🙏

  • @prashanttawde185
    @prashanttawde185 Рік тому +8

    प्रसाद तुझे मनापासून आभार आमचे कुलदैवत आहे श्री सप्तकोटेश्वर खूप छान व्हिडिओ बनवला आहे

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 Рік тому +4

    खूप छान व्हिडिओ. प्रसाद, तू आम्हाला आमच्याच गावाची आणि आमच्याच कुलदैवताची नव्याने ओळख करून दिलीस. खूप अभिमान वाटला. खूप खूप धन्यवाद. आम्ही मुंबईत रहातो, पण जेव्हां जेव्हां गोव्यातल्या आमच्या घरी जातो तेव्हां तेव्हां कुलदैवत आणि कुलदेवतेचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करतो. तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.

  • @bharatoswal4600
    @bharatoswal4600 Рік тому +4

    प्रसाद भावा तुझा व्हिडिओ फार चांगला आहे. कोकणसाठी खुप खुप जिव लावतो आहे. जर रानमाणूस हा ब्रॅण्ड बनव मि तुझ्या बरोबर आहे कोकण आपन जगाभर नेऊ

  • @santoshd1378
    @santoshd1378 Рік тому +3

    सुंदर काम झालेले दिसत आहे. गोव्यात आल्यावर भेट द्यायला आवडेल. गोवा शासन आणि पुरातत्व खात्याचे विशेष अभिनंदन. धन्यवाद प्रसाद 🙏

  • @siddheshkadam1170
    @siddheshkadam1170 Рік тому +3

    🚩⚔️ श्री सप्तकोटिष्वर तुळजा भवानी लब्धवर प्रसाद श्री जय केशिंद कदंब ⚔️🚩

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Рік тому +21

    Fantastic restoration by Goa government. Enjoyed the new format of presentation Prasad.

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 Рік тому +2

    प्रसाद तुझे विष्लेषण अभ्यास पूर्ण आहे, पण जसे श्रीराम सेतू बांधताना ज्या खारीसारख्या वाटा उचलणाऱ्याचा विसर होतो तसाच येथील श्री साप्तकोटेश्वर मंदिरा प्रेमानेच उत्तर गोव्यात असलेली स्वयंभू पुरातन देऊळांचा विसर होतोय.
    आणि महत्वाचे ज्यांनी ही मंदिरे उभारले त्यांचा मी एक वंशज आहे आणि मी ते कार्य पूर्ण कण्याचे हाती घेतले आहे.

  • @pratiktawde2586
    @pratiktawde2586 Рік тому +3

    धन्यवाद प्रसाद दादा एवढा छान व्हिडिओ बनवल्या बद्दल...आमचं कुलदैवत 🙏🙏🙏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Рік тому +11

    प्रसाद मस्तच अगदी मस्त एपिसोड झाला सावनी ने सुद्धा अगदी परिपूर्ण अशी माहिती दिली धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @dipeshnarvekar1957
    @dipeshnarvekar1957 Рік тому +1

    खुप छान मंदिर बाधले आहे आणि ते आमचे कुलदेवत श्री संप्तकोटेश्वर मंदिर आहे

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 Рік тому +7

    ग्रेट ग्रेट आणि ग्रेट, जय शिवराय, हर हर महादेव🚩🚩

  • @mayuradkar
    @mayuradkar Рік тому +5

    प्रसाद खूप भारी अशीच माहिती आमच्या सारख्या लोकांन पर्यंत पोचवत रहा खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @mayursankhe4980
    @mayursankhe4980 Рік тому +2

    थैंकयू प्रसाद दादा, कोकनी राण मानुस ला शूभेछाँ

  • @padmaphadke2762
    @padmaphadke2762 Рік тому +2

    Sundar sundarch mahiti 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Рік тому +3

    प्रसाद खूप छान आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा माझा.

  • @nitin86868
    @nitin86868 Рік тому +3

    Proud to be resident of narve village 🙏🙏

  • @ashwathsavant5349
    @ashwathsavant5349 Рік тому +2

    Om Namah Shivaay .Har Har Mahaadev

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Рік тому +6

    प्रसाद विडीओ खूप सुंदर ! कोकणातदेखील अलिकडे मंदिर जिर्णोध्दार ठिकठिकाणी सुरू आहेत पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत की मंदिराना अधिकाधिक आधूनिक दाखविण्याचा प्रयत्न असतो पारंपारीकपणा जपला जात पुढच्या पिढ्यांना कोंकणी संस्कृती कशी कळणार? सप्तकोटेश्वर जिर्णोध्दार मध्ये पुरातत्व विभागाची कामगिरी उल्लेखनीय 👍

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 4 місяці тому

    अतिशय उत्तम कामगिरी गोवा शासनाने बजावली आहे आहे... अतिशय सुंदर, उत्तम, भव्यदिव्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे... पुरातत्व खात्याचेही मनापासून आभार... आवश्य भेट देण्यायोग्य असे भव्य मंदिराची उभारणी पहाण्यासाठी सज्ज झाली आहे...
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते सदर मंदिराची पुनर्बांधणी झाली होती... जिथे प्रत्यक्ष महाराज येऊन गेले आहेत अशा प्रवित्र ठिकाणी आपण अवश्य भेट द्या...

  • @rupaligaikwad6140
    @rupaligaikwad6140 Рік тому +7

    खुप सुंदर मंदिर आहे.🚩 जय शिवराय. 🚩

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +2

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती मिळाली आणि तुमच्या कामाला मनापासून सलाम

  • @arjunganjave
    @arjunganjave Рік тому +2

    वा!वा!भाऊ एकदम मस्त व्हिडीवो बनवला.

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Рік тому +2

    Very informative video prasaad bhai🎉

  • @vilesh8543
    @vilesh8543 Рік тому +8

    Shiv Leela transcending beautiful picturesque narve village at saptkotheswar mandir. Deva Mahadeva tuka koti koti naman. 🌸🌸🙏

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому +3

    🙏 जय जिजाऊ 🙏
    🙏 जय शिवराय 🙏
    🙏जय शंभुराजे 🙏
    🙏 श्री सप्तकोटेश्वराय नमः🙏 आमचं कुलदैवत 🙏

  • @vijaysalunkhe2287
    @vijaysalunkhe2287 Рік тому +4

    Kharch khup Chan Vatale bagun..hats off the madam who have great knowledge about the archeology... need to come forward for other temple work..

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому +9

    Very good work by archeological departments. Keep it up.

  • @ashoktavade1573
    @ashoktavade1573 Рік тому +3

    Goa sarkarche khup aabhari ahot Jai Bhavani Jai Shivaji

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Рік тому +2

    अप्रतिम व्हिडीओ आवडला दादा तुला नमस्कार

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 Рік тому +3

    खुप सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ होता भावा😊🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🙏

  • @sanjubhaud8658
    @sanjubhaud8658 Рік тому +1

    मंदिर परिसराला भेट दिली, फार प्रसन्नता व गर्व वाटला....पण खेदाची गोष्ट म्हणजे गोवा सरकार तर्फे सुशोभीकरण केलेल्या मंदिरात महाराजांनी केलेल्या जीर्णध्दार विषयी काहीच माहिती दिसून आली नाही. वाईट वाटले...

  • @maheshtari6116
    @maheshtari6116 Рік тому +2

    🙏 हे प्रभू आपको कोटी प्रणाम ❤️❤️🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +2

    Apratim. Khoop. Sundar..💞

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Рік тому +2

    वा!खूप छान.आवडला video.माहिती आवडली.खूप शुभेच्छा.

  • @vijayjoshi8317
    @vijayjoshi8317 Рік тому +2

    ओम नमः शिवाय
    छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय

  • @pradeepzaware
    @pradeepzaware Рік тому +2

    अतिशय सुंदर चित्रीकरण , ऍनिमेशन, उत्तम माहिती 🙏

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 Рік тому +3

    बरेच दिवस झाले आपल्या रिळ ची वाट बघत होतो. धन्यवाद. फारच छान आहे मनाला समाधान झाले. असेच VDO टाकत रहा.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Рік тому +2

    फारच सुंदर वीडियो बनविला प्रसाद्जी धन्यवाद

  • @chetanjoshi9153
    @chetanjoshi9153 10 місяців тому +1

    खुपच चांगली माहिती दिली दादा तुमच्या माहिती मुले goa ला जाणारे लोक या मंदिर ला भेट देतील❤️🙏

  • @pravingaikwad3709
    @pravingaikwad3709 Рік тому +3

    अप्रतिम विश्लेषण आणि तुझा काळजाला भिडनारा आवाज....जय शिवराय

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 Рік тому +2

    Very nice friend, great work

  • @user-ik3ul6my7j
    @user-ik3ul6my7j Рік тому +2

    खुप छान महिती सांगितली दादा आनी ताई , हर हर महादेव 🔱🚩
    फक्त thode divas ते चर्च पॅन todnyat yetil 🔱🚩

  • @snehatawde9072
    @snehatawde9072 Рік тому +2

    Khup chan mahiti prasad dada aaplya raja mule aaj aapan dev ani devstan baghu shaktoy. Saptakoteshwar amche kuldaivat aahe. God bless you dada

  • @ajaydarde9588
    @ajaydarde9588 Рік тому +9

    We are with you Prasad keep doing work to save konkan

  • @spidygaming3749
    @spidygaming3749 7 місяців тому +1

    🚩जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🚩

  • @jivanmore9717
    @jivanmore9717 Рік тому +2

    आवाज खुप जबरदस्त आहे रे तुझा दादा 😍🌏🚩

  • @SKITCORP
    @SKITCORP Рік тому +2

    ❤️जबरदस्त...खूप खूप छान वाटलं.... 😍

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому +2

    खूप छान

  • @raveshnaik7557
    @raveshnaik7557 Рік тому +5

    My village narve 😍 thanks for covering this ❤

  • @ushakher9241
    @ushakher9241 Рік тому +2

    खूपच छान !

  • @nagueshchodankar6092
    @nagueshchodankar6092 Рік тому +2

    छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद.

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 Рік тому +3

    Very very important information. Very Beautifully restored Temple Architecture. Thanks a lot.

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Рік тому +2

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai.

  • @mayurpatil6663
    @mayurpatil6663 5 місяців тому

    जय शिवराय ......गोवा सरकार चे मनापासून धन्यवाद......💐💐💐💐💐💐

  • @nishanarvekar6081
    @nishanarvekar6081 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे विडिओ मध्ये हे आमचे कुळदैवत आहे धन्यवाद करते दादा तुला 🙏

  • @rohan14686
    @rohan14686 Рік тому +3

    For the first time in many many years the government of the day is taking active efforts to build and restore Hindu temples...
    Be it Ayodhya Ram Mandir or restoration of Kashi corridor or Mahakaleshwar or restoration of sapta koteshwar mandir...
    It's not just restoration of a temple but infact rejuvenation of larger Hindu sanskriti 👍

  • @sandhyakudchadkar641
    @sandhyakudchadkar641 Рік тому +2

    Khup Chaan ,

  • @aayushborkar9560
    @aayushborkar9560 Рік тому +2

    Jagdamb❤

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Рік тому

    Wa apratim Vlog. Thanks for sharing

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Рік тому +2

    खुप छान..

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Рік тому +2

    हर हर महादेव🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 11 місяців тому +1

    अप्रतिम निवेदन धन्यवाद

  • @varshasatam9762
    @varshasatam9762 Рік тому

    उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण ब्लॉग

  • @sujatakale1673
    @sujatakale1673 Рік тому +2

    Chaanch...me jirnodhar kaam chalu hote tevha gele hote...ata nakki pahayla janar... good work👍

  • @PrasannaKarmarkar54
    @PrasannaKarmarkar54 Рік тому +2

    Mitra tujhe video khup avadtat detailed astat thanks

  • @sujatababar386
    @sujatababar386 Рік тому +2

    Kai sunder mandir ahe .....👍

  • @aniket5477
    @aniket5477 Рік тому +2

    दक्षिण कोकणात जाऊन तेथील संस्कृतीचे दर्शन असेच होत राहो आणि गोयं ची जी इमेज लोकांना मध्ये आहे पण दूर व्हावो.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому +3

    Are wahh... Sawani taai 🙏❤️ afaat knowledge ahe tyancha... N tyanchi mahiti sangnyachi paddhat 👌🏻👌🏻 khup bhari vatla hya channel var tyana baghun 🙏

    • @sawanishetye
      @sawanishetye Рік тому

      Thank you so much ❤ Do check out my UA-cam channel too

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 Рік тому +2

    Chan mahiti dili dada

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Рік тому +2

    Khup Sunder

  • @udayhonavar3739
    @udayhonavar3739 Рік тому +3

    छान विडिओ... सुंदर मंदिर... मॅडमनी माहितीही छान दिली... Nice presentation 👏👌

  • @bkishwarchavan7787
    @bkishwarchavan7787 Рік тому +2

    Keep it bro..... Really you are legend for us....

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +2

    खुप खुप धन्यवाद ह्या व्हिडिओसाठी !

  • @Bharatverse308
    @Bharatverse308 Рік тому +2

    अप्रतीम 👍

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 Рік тому +2

    खूप chhaan mahiti amazing

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Рік тому +2

    Kubh saras Prasad

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 Рік тому +2

    👌👌👌👌

  • @advaeetmanjrekarvlogs5333
    @advaeetmanjrekarvlogs5333 Рік тому +2

    Khoop soonder video 🙏🙏

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Рік тому +4

    गोव्या चा रक्त रंजीत इतिहास ही लोकांसमोर आला पाहीजे.

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 Рік тому

      Sawani Shetye taainche videos bagha.. khup mahiti milel.. tyanchya parine tyanni khup kahi jagasamor anlay govyabaddal

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 Рік тому

      Shefali Vaidya hyanni Goa Inquisition var video banavile aahet. Te krupaya bagha. 🙏

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 Рік тому +2

    👍🏻👍🏻👍🏻