नयना आपटे यांची मुलाखत - भाग ३ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 3 | Amrutnayana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024
  • नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग ३)
    ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाउल ठेवलं आणि आईच्या अकाली निधनानंतर आपल्या अभिनय शैलीने आपलं स्वतःचं अस्तित्व आणि "मी नयना आपटे" अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाची पंचहात्तरी आणि कारकिर्दीची सत्तरी या निमित्ताने नयना आपटे यांच्या कलाप्रवासाला सांस्कृतिक मानवंदना म्हणून 'संस्कृती सेवा न्यास' या संस्थेने 'सवाईगंधर्व एन्टरटेन्मेंट' च्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'अमृतनयना' या कार्यक्रमात रंगलेली नयना बाईंची विशेष मुलाखत (भाग ३).
    मुलाखतकार - सौ. मंगला खाडिलकर
    An interview of Nayana Apte ji taken by Mangala Khadilkar (Part 3).
    Veteran actress Nayana Apte was given a cultural tribute on her 75th birthday at Kalidas Natyamandir Mulund on 24 February 2024. He has received 'Padma Shri' from the Government of India and 'Lifetime Achievement Award' from the Government of Maharashtra. Nayana Apte created a great image of her art in all three domains of acting, singing and dancing. As the daughter of actress Shanta Apte, she made her foray into theater at the age of just four and after her mother's untimely death, her acting style created her own presence and identity as "I am Nayana Apte". Her acting career has now completed 70 years. On the occasion of her 75th birthday and completion of 70 years to career, the program 'Amritnayana' organized by 'Sanskriti Seva Nyas' in collaboration with 'Sawaaigandharva Entertainment' as a cultural tribute to Nayana Apte's artistic journey. This is the interview of Nayana Apte ji taken on that day (Part 3).
    Interviewer - Mrs. Mangala Khadilkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 25

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 3 дні тому

    आई ला अग्नी देण्याचा जो प्रसंग ऐकून खरोखर अंगावर शहारा आला 😔😔😔खरंच खूप धाडस आहे नयना बाईंच 👍👍

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Місяць тому +5

    🌄🙏🌹मंगलाताई खाडिलकर मुलाखत घेणाऱ्या आणि नयनाताई आपटे मुलाखत देणाऱ्या अफलातून.....👏👏💐💐 मजा आला,दोघींना सलाम....मनापासून आभार

  • @swativaidya8189
    @swativaidya8189 Місяць тому +1

    अप्रतिम मुलाखत (३ हि भाग ) मुलाखतीतून खूप शिकायला मिळालं. 🙏🙏

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Місяць тому +1

    दोघींना नमस्कार
    खूप छान मुलाखत...

  • @prabhakarbhange7549
    @prabhakarbhange7549 Місяць тому +4

    मंगला खाडिलकर याना शतशः प्रणाम .बर्‍याच दिवसात दर्शन झाले.आनंद

  • @chetnasamratha7101
    @chetnasamratha7101 Місяць тому +5

    अजूनही आवाज खणखणीत आहे. आणि स्पष्टवक्ते पणा .खुप छान.❤

  • @manishaparanjape8899
    @manishaparanjape8899 Місяць тому +2

    फारच छान मुलाखत🙏
    दोघिंना सलाम 🙏

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 Місяць тому +1

    खूप सुंदर,, पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटणारी अविस्मरणीय मुलाखत 👌👌👌👍

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 Місяць тому +3

    खरच मोठ्या कलाकार आहे

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Місяць тому +1

    Tumhala khup khup shubechha....ha interview khadilkar madmne ghetla mhanje dudhaat sakhar...

  • @alkahalbe1445
    @alkahalbe1445 Місяць тому +3

    ह्या वयांत किती सुंदर गात आहेत नयनाताई. खुपच सुंदर.😊

  • @seemapurandare4405
    @seemapurandare4405 Місяць тому +1

    Khup khup dhanyawad. Khup shubhecchya. Jio hazaro Sal.

  • @anitasane3903
    @anitasane3903 Місяць тому +5

    फारच छान मुलाखत... यांच्याकडे इतकं सांगण्यासारखं आहे ते समजून घेऊन अभ्यासपूर्वक घेतलेली मुलाखत... पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे

    • @SawaaiGandharva
      @SawaaiGandharva  Місяць тому

      पुढील भाग आलेला आहे

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому +1

    Maaast Chhaan apratim

  • @sujatachoudhari1216
    @sujatachoudhari1216 Місяць тому +1

    Farach cchan mulakhat Nayana Tai Ani Mangala Tai kharch doghi hi takdichya Ani g8 khup khup thanks

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde5111 Місяць тому +1

    वाह खूप छान 👌👌❤️

  • @milindvelhal4911
    @milindvelhal4911 Місяць тому +2

    Energy and spirit like young 18,at age of 75!@ namostubhyam ❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Місяць тому +1

    Vaa..mast zali mulakhat..majja ali khup..

  • @revatigole5424
    @revatigole5424 Місяць тому +1

    खूप छान मुलाखत

  • @sunitidhake5035
    @sunitidhake5035 Місяць тому +2

    अप्रतिम,पुढचे भाग पण येऊ द्या लवकर

    • @SawaaiGandharva
      @SawaaiGandharva  Місяць тому

      सर्व भाग अपलोड केलेले आहेत

  • @sudhakarjoshi5237
    @sudhakarjoshi5237 Місяць тому +1

    Apratim

  • @milindvelhal4911
    @milindvelhal4911 Місяць тому +1

    Great energy, excellent

  • @rstar521
    @rstar521 Місяць тому

    कोर्टाचा issue काय झाला होता?