नयना आपटे यांची मुलाखत - भाग १ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 1 | Amrutnayana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2024
  • नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग १)
    ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाउल ठेवलं आणि आईच्या अकाली निधनानंतर आपल्या अभिनय शैलीने आपलं स्वतःचं अस्तित्व आणि "मी नयना आपटे" अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाची पंचहात्तरी आणि कारकिर्दीची सत्तरी या निमित्ताने नयना आपटे यांच्या कलाप्रवासाला सांस्कृतिक मानवंदना म्हणून 'संस्कृती सेवा न्यास' या संस्थेने 'सवाईगंधर्व एन्टरटेन्मेंट' च्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'अमृतनयना' या कार्यक्रमात रंगलेली नयना बाईंची विशेष मुलाखत (भाग १).
    मुलाखतकार - सौ. मंगला खाडिलकर
    An interview of Nayana Apte ji taken by Mangala Khadilkar (Part 1).
    Veteran actress Nayana Apte was given a cultural tribute on her 75th birthday at Kalidas Natyamandir Mulund on 24 February 2024. He has received 'Padma Shri' from the Government of India and 'Lifetime Achievement Award' from the Government of Maharashtra. Nayana Apte created a great image of her art in all three domains of acting, singing and dancing. As the daughter of actress Shanta Apte, she made her foray into theater at the age of just four and after her mother's untimely death, her acting style created her own presence and identity as "I am Nayana Apte". Her acting career has now completed 70 years. On the occasion of her 75th birthday and completion of 70 years to career, the program 'Amritnayana' organized by 'Sanskriti Seva Nyas' in collaboration with 'Sawaaigandharva Entertainment' as a cultural tribute to Nayana Apte's artistic journey. This is the interview of Nayana Apte ji taken on that day (Part 1).
    Interviewer - Mrs. Mangala Khadilkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 26

  • @Vinayamulay
    @Vinayamulay Місяць тому +1

    खरंच मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे दोघेही तोडीसतोड आहेत . दोघीही ग्रेट . सलाम .

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Місяць тому +2

    नयना ताईंचा आवाज अजूनही कडक आहे आणि अभिनयाच्या बाबतीत त्या सर्वात उंचीवर आहेत. परमेश्वरकडे प्रार्थना त्यानी आपली शंभरी पार करावी आणि असाच ठणठणीत त्याचा आवाज राहावा. खूपच सुंदर मुलाखत.

  • @supriyabapat139
    @supriyabapat139 2 місяці тому +8

    मुलाखत घेणाऱ्या आणी देणार ह्या दोघीही आवडत्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Місяць тому +2

    नयनाताई दीलखुलास ❤दाद सलाम🎉

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Місяць тому +3

    नानी च character जबरदस्त केलेलं तुम्ही

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 2 місяці тому +5

    खूपच सुरेख मुलाखत. नयना आपटे ऑलवेज ग्रीन व्यक्तिमत्त्व. मला त्या अतिशय आवडतात. त्यांच्यासाठी 'जीवेत शरद शतम" इतकेच मी म्हणेन.कमाल अभिनेत्री आणि कमाल अभिनय आहे.संपूर्ण मुलाखत पाहायला मिळायला हवी होती.🎉🎉🎉

    • @SawaaiGandharva
      @SawaaiGandharva  2 місяці тому

      मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित होतोय रात्री 8:30 वा.
      आमच्या चॅनेलवरील अमृतनयना या प्ले लिस्ट मध्ये आपणास 8:30 च्या भागाचे notification लावता येईल.

  • @vasudhadhamankar9384
    @vasudhadhamankar9384 2 місяці тому +3

    मुलाखत खूपच आवडली

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 місяці тому +2

    खूप सुंदर मुलाखत.... त्यांना खूप शुभेच्छा

  • @manoharpatil7234
    @manoharpatil7234 2 місяці тому +2

    खुप छान मुलाला त्यांच्याकडे धन्यवाद

  • @manishaparanjape8899
    @manishaparanjape8899 Місяць тому +2

    सुंदर मुलाखत,🙏

  • @prabhakarbhange7549
    @prabhakarbhange7549 2 місяці тому +2

    दुग्ध शर्करा योग. दुर्लभ दर्शन
    नमस्कार

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Місяць тому +2

    Saglech Apratim.

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Місяць тому +2

    Pharach chaan mulakhat.

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 2 місяці тому +3

    अभिनंदन 🎉❤

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f Місяць тому +1

    नयना आपटे ताई ची मी लहान पणा पासून फ्यान आहे

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 2 місяці тому +6

    त्या खुप प्रसन्न असतात. कुठे दर्मुखलेल्या चैहरा नसतात मला खुप आवडतात

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому +1

    Apratim Maaast Chhaan

  • @NaynaUdar
    @NaynaUdar Місяць тому +1

    नायनाताई दिलखुलास मुलाखत

  • @pradnyaphadnis3146
    @pradnyaphadnis3146 Місяць тому +2

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Місяць тому +1

    ही। मुलाखत मी। रोज। बघतो। पण। समाधान च। होत। नाहीत

  • @Kajarari_akhiyaan
    @Kajarari_akhiyaan Місяць тому +5

    हे असे मुलाखतकार होणे नाही, आत्ताच्या मुली आनि पानी करणार्‍या, उगाच हसणारा, पांचट personal प्रश्न विचारणाऱ्या, vishayache सखोल dnyyan नसणार्‍या.

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Місяць тому +1

    Mothyanda vachne hich purvichya mansanchi shist ase.mi pan nanasahebanche natak pahile aahe
    .

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 Місяць тому

    मुलाखतकाराने किती प्रस्तावना करावी ???
    बापरे !!!

    • @SawaaiGandharva
      @SawaaiGandharva  Місяць тому +1

      आजकालचे मुलाखतकार थेट मुद्द्याला हात घालतात कारण त्यांच्याकडे तेवढं ज्ञान नसतं, शब्दसाठा नसतो. मुलाखत कशी रंगवावी हे मंगलाताईंनी सिद्ध केलंय. अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत.