आजचा भारत आणि विज्ञान: जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांचे अंतर्मुख करणारे व्याख्यान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • निपाणीचे सुपुत्र व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' गत वर्षीपासून ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला वाहिलेली आहे. या व्याख्यानमालेच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षीचे दुसरे पुष्प जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात गुंफताहेत. डॉ. थोरात यांनी कोविड-१९वरील लस संशोधनासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने नियुक्त केलेल्या चमूमध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. जगावरील संकटाशी मुकाबला करण्यामध्ये या भारतीय शास्त्रज्ञाने बजावलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. या व्याख्यानमालेमध्ये डॉ. थोरात हे 'आजचा भारत आणि विज्ञान' या विषयावर मांडणी करत आहेत. हे व्याख्यान ऐकून आजचा भारतीय युवक अंतर्मुख झाल्याखेरीज राहणार नाही, याची खात्री आहे.

КОМЕНТАРІ • 2

  • @user-wt3lc9kc2s
    @user-wt3lc9kc2s Рік тому

    Nice way to pay tribute. The session was informative and useful to all people for their knowledge.
    Best Regards

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      Thank you for watching Sir...