कोकणातील, स्वस्त आणि मस्तच, चविष्ट, सोपा नास्ता, उकड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • तांदुळाचं पीठ, ताक, लसनाची फोडणी एवढ्या कमी समानात उत्तम नास्ता
    कोकण स्वाद

КОМЕНТАРІ • 302

  • @neelalolage8167
    @neelalolage8167 День тому +8

    ही तांदुळाची उकड मला नीला लोळगेला बोरीवला रहाणाट फार आवडते. आम्ही नेहमी करतो. ही उकड.गरम गरम खावी खूप छान लागते व एक सुचना आहे.फोडणीत कढी पत्ता घालावा. हा पदार्थ आम्हांला घरी सगळ्यांना खूप आवडतो व झटपट नाष्टा म्हणून पण खूप.छान आहे. धन्यवाद. 😂

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay День тому +1

      तांदुळाचे पीठ हे चूक आहे योग्य शब्द तांदळाचे पीठ, तांदळाची उकड हे योग्य शब्द आहेत. आपण गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणतो तसेच तांदळाच्या बाबतीत आहे. कोणे एके काळी कोणता तरी गाढव जो ईंग्रजी माध्यमातून शिकला आणि म्हणून मराठी व्याकरणाचं ज्ञान नाही पण आज टिव्हीवर पाककृती दाखवतोय त्याने तांदुळाचं म्हणून मराठीचा खून पाडला त्याला कोणी वेळेवर सुधारलं नाही कारण ते ईंग्रजी माध्यमातून शिकलेले ईंग्रजीचे गुलाम म्हणून हा चुकीचा शब्द रूढ झाला. तरी आपण सुधारणा करावी ही नम्र विनंती

    • @AlpanaTrivedi-u4o
      @AlpanaTrivedi-u4o 6 годин тому

      Jwarichya pitthache pan hote kay

    • @AlpanaTrivedi-u4o
      @AlpanaTrivedi-u4o 6 годин тому

      Lasun vataychi nahi kay

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 День тому +2

    ती लसूण म्हणालात खूप बरं वाटलं इकडे देशावर तो लसूण म्हणतात.... आज अस्सल कोकणी पदार्थ सांगितला छान वाटलं. आम्ही सुद्धा बरेचदा करतो उकड

  • @bhavnakulkarni8700
    @bhavnakulkarni8700 11 годин тому +1

    खरे काका खूप दिवसांपासून ही रेसिपी बघायची होती. धन्यवाद. मला खूप आवडली.

  • @user-fm5ej8sp9w
    @user-fm5ej8sp9w День тому +4

    ताकातली उकड छानच होते. आम्हाला खूप आवडते. तांदळाच्या पिठाची / नाचणीच्या पिठाची / ज्वारीच्या पिठाची / बाजरीच्या पिठाची / भाजणीच्या पिठाची / लाह्याच्या पिठाची अशी कोणत्याही पिठाची करावी. ती अप्रतिमच लागते. लसूण हा ऐच्छिक विषय आहे.

  • @bharatisavekar4100
    @bharatisavekar4100 2 дні тому +9

    फारच छान... असेच आपले जुने नाश्ताचे प्रकार व विसरत चाललेल्या रुचकर व पौष्टिक पदार्थांच्या कृती दाखवत जा.. धन्यवाद 🙏🏻

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 День тому +2

    आमच्या ठाण्यातील लोकांना माहिती माहीत झाली. धन्यवाद.
    भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

  • @pallavishende5429
    @pallavishende5429 День тому +3

    वा लुसलुशीत, मऊ उकड छानच

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 дні тому +7

    मी पण करते उकड मला खूप आवडते शाळेचे दिवस आठवले शाळा सुटली घरी आले माझी आई मला अशीच गरम गरम उकड खायला देत असे उकडिवर कच्चे तेल घातले की क्या बात है

  • @chhayakulkarni83
    @chhayakulkarni83 День тому +4

    खुप छान मी नक्की करून पाहनार

  • @vikasdabir
    @vikasdabir 2 дні тому +10

    पारंपारिक खाद्यपदार्थ सर्व प्रांतात आहेत पण महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेतली विविधता अतुलनीय.आपली रेसिपी छानच.

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay День тому +1

      रेसिपी ऐवजी पाककृती म्हणा ही विनंती. मराठी शब्द अवघड वाटू नयेत कारण ते शब्द आपल्या मातृभाषेतील आहेत

    • @vikasdabir
      @vikasdabir День тому

      @@RanjanaMulay मी मातृभाषेचा अभिमानी आहे.कधीकधी समाधानाचा ओघ अशी चूक घडवितो.मातृभाषेचा प्रेमी मित्र मिळाल्याचा आनंद आहे.चूकीचे समर्थन करू नये.म्हणूनच क्षमस्व.

  • @chitrajoshi8044
    @chitrajoshi8044 2 дні тому +6

    आम्ही देखील करतो पण त्यात मिरची जिरं व लसूण वाटून घालतो तशी पण सुंदर लागते,छान

  • @emperor_editz191
    @emperor_editz191 День тому +2

    Khup chhan recipe like it
    Will try once

  • @dileepjoshi5845
    @dileepjoshi5845 День тому +3

    नाष्ट्या करीता उकड ! फारच चविष्ट पदार्थ...धन्यवाद

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 2 дні тому +14

    खरे साहेब आपण राई म्हणत नाही, मोहरी म्हणतो 😊

    • @vasantmore935
      @vasantmore935 10 годин тому

      आमच्या खान्देशात राईच म्हणतो

  • @rammodak4428
    @rammodak4428 День тому +3

    आम्ही पण अशीच उकड करतो. पण आपण केली एवढी सैल न ठेवता थोडी घट्ट करतो. आता तुमच्या सारखी पातळ करून बघेन.
    धन्यवाद.
    आशा मोडक.
    माझे. माहेर केळशीचे म्हणजे कोकणातले त्यामुळे आमच्याकडे उकड करण्याची पद्धत पहिल्यापासूनच आहे.

  • @ganeshpendse9959
    @ganeshpendse9959 2 дні тому +2

    आम्हसुधा हा पदार्थ करतो आता हॉटेल सवय लागली आहे त्यामुळे छान असून स्वस्त पण मस्त अशा पदार्थाची माहिती प्रस्कृत केलीत धन्यवाद 🙏🏻

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 23 години тому +2

    आम्ही इकडे मराठवाङ्यात पण करतो गव्हाच पीठ ज्वारीच पीठ वापरतो आणि त्याला आमच्याकडे ऊकङपेंङी म्हणतात आधी पीठ भाजून पाण्याला फोङणि द्यायची मीठ मीर्ची हळद शेंगदाणे लाल तीखट सगळं फोङणीला घालून पाण्याला खळखळ ऊकळी आली की पीठ घालून व्यवस्थित मीक्स करून दणदणीत वाफ येऊ द्यायची मस्त होते ऊकङपेंङी ऊकङ पण छान

  • @chetanavaidya9198
    @chetanavaidya9198 7 годин тому

    🙏🙏
    मी पांढरी करते उकड.
    हिरवी लाल मिरची , हिरवा गार कढीलिंब, हिरव्या कोथिंबिरीवर शुभ्र खोबरं. आपण सांगीतलीत तसा लुसलुशीतपणा नाही येत, थोडी घट्ट पण मऊ असते. ही पद्धत जास्ती आवडली.

  • @Shubhangi-w8q
    @Shubhangi-w8q 2 дні тому +4

    काका आज पहिल्यांदाच अशी माहिती मिळाली. सांगणेची पद्धत खूप छान. अजून आजी च्या रेसिपी मसाले सांगा ना. काकी नि अप्रतिम सांगितलं

  • @shailajateredesai1011
    @shailajateredesai1011 День тому +1

    फारच छान आवडली रेसिपी

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 дні тому +4

    खूप छान उकड दाखवली.नककी करून बघेन धन्यवाद

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 День тому

    खूप छान आहे उकड, गरम असतानाच खायला खूप छान लागते, धन्यवाद सर जी, 😅❤🙏🏽

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 дні тому +4

    Mi marathwadyatali ahe pan punyat rahate. Mala kokani veg padarth faar aawadtat. Solachi kadhi., modak, naral ghalun kelele God tilhat padarth faar chan astat. 👍🙏

  • @sanjaysoundalge885
    @sanjaysoundalge885 11 годин тому

    काका खूप छान
    उकडीचे कॉम्बिनेशन आणि दोघांचा सहभाग

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 День тому +1

    आमच्या घरात सगळ्यांना उकड खुप आवडते

  • @meghrajbajaj72
    @meghrajbajaj72 День тому

    खूपच छान कौतुकासाठी शब्द नाहीत

  • @varadavaze4866
    @varadavaze4866 День тому +1

    आम्ही तुपाची फोडणी कढीपत्ता पण घालतो. ही रेसिपी चिपळूण कसे येथील आहे.

  • @shrikantkulkarni95
    @shrikantkulkarni95 3 дні тому +4

    मस्तच ‌झालीय उकड..मी अशीच करते...चवी साठी‌थोडी साखर ही ताकात मिक्स करते..

  • @swatirisbud1661
    @swatirisbud1661 3 дні тому +8

    मी मुलीच्या भ़ोंडला म्हणजे भूलाबाई ,हादगा जे म्हणतात त्यावेळी खिरापती साठी केली होती. फक्त लसूण घातली नव्हती कुणाचे उपास असतील ह्यामुळे. कुणालाही ओळखता आली नाही. पण सर्वांनी आवडीने खाल्ली.

    • @kusumadhav8129
      @kusumadhav8129 День тому +1

      उपासाला तांदूळ चालतो ?

  • @madhukarlatye6839
    @madhukarlatye6839 День тому +1

    खूपच छान, धन्यवाद!!

  • @alkakulkarni4126
    @alkakulkarni4126 3 дні тому +4

    आम्ही खान्देशी आहोत.पण ही उकड करतो.ह्या प्रमाणे नाचणीची (नागलीची) .शुगर वाल्यासंसाठी ज्वारीची पण करतो.तुम्ही दाखवली ती पण सुरेख आहे.

    • @sandhyachaware7690
      @sandhyachaware7690 День тому

      मीही नाचणीचे किंवा jwariche ही पीठ वापरून अशी उकड करते. मात्र त्यात साखर घालते चवीला. माझ्या सासूबाईंकडुन शिकले मी. वर comments केल्याप्रमाणे त्यात आम्ही kadhilimb घालतो, पण लसुण नाही. आता लसुण घालुन नक्की करून बघेन

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu День тому +2

    खुप छान.माझी आजी पण सुगरण होती.

  • @medhakulkarni2367
    @medhakulkarni2367 2 дні тому +3

    Kupch sunder zali Ukd

  • @anjalithombare7000
    @anjalithombare7000 День тому

    Khup chaan ani clear saangitale ahe Mi jwarichya pithachi pan karate

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 День тому +1

    आम्ही मिरची कोथिंबीर घालून जरा घट्ट करतो.कच्च्या तेलात मळून,मळून गोळे खातो.छान लागते.लसूण नाही घालत,आणि एवढी पातळ नाही करत.आता अशी करून बघीन.

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 День тому +1

    आम्ही पण अतीशय‌ सुगरन आहोत

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 4 дні тому +17

    आम्ही करतो. कोकणस्थ ब्राह्मण आहे आम्ही करतो. पण कढीपत्ता, कोथिंबीर आवर्जून घालतो. छान दिसत होती उकड ❤😊

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal 23 години тому

    Vayovrdhasati sundar recipe

  • @dhanashrikatare4701
    @dhanashrikatare4701 8 годин тому

    काका नमस्कार
    आमच्याकडे ही उकड नेहमीच करतात, मला, माझ्या मुलांना, मिस्टरांना सगळ्यांना खूप आवडते.

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu День тому +1

    खुप छान ताई

  • @prajaktakt
    @prajaktakt 2 дні тому +1

    Khup chan recipe🎉

  • @rajashrikulkarni5174
    @rajashrikulkarni5174 День тому

    खूपच छानडिश आहे उकड

  • @sampadakelkar340
    @sampadakelkar340 3 дні тому +4

    मी पण बर्याच वेळा करते अशी उकड पण फोडणीत ताक घालून मग उकळी आल्यावर पीठ पेरते आणि आणखिन थोडी यापेक्षा पीठ वापरुन घट्ट करते

    • @kundajoshi1939
      @kundajoshi1939 3 дні тому +1

      आम्हीपण अशीच ताक फोडणीला टाकूनपीठ पेरुन घट्ट उकड करतो , कच्चे तेलही वापरतो.

    • @kundajoshi1939
      @kundajoshi1939 3 дні тому +1

      बरोबर शेंगदाणेही (भाजलेले) खायला घेतो.

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  2 дні тому

      ताक आधी नुसते फोडणीत घालून उकळताना ते फाटण्याची शक्यता असते

  • @milindmulay9356
    @milindmulay9356 3 дні тому +3

    माझे बालपण चौल, अलिबाग, रोहा ह्या पट्ट्यात गेले आहे, डांगर, मेतकूट भात,माझी आजी,पंजी बनवायची, पण मोरोणी नावाचा आमटी सारखा प्रकार खूप वर्षात चाखला नाही, त्याची रेसीपी माहीत असेल तर सांगा

    • @kishorideshpande4924
      @kishorideshpande4924 День тому

      खूपच छान कोकण माझं आवडत ठिकाण

  • @surekhadayal1585
    @surekhadayal1585 10 годин тому

    Khup chhan ukad zali. Amhi lasanishivay karyo.Ata lasanachi karu.Subscribe kele bare ka ?

  • @ShwetaSawardekar-r7g
    @ShwetaSawardekar-r7g 5 годин тому

    खूपच छान रेसिपीज😢😢

  • @shriramthakurdesai5310
    @shriramthakurdesai5310 День тому

    👌👌👌 ताक कसे असावे आंबट का गोड असावं ते सांगावे धन्यवाद 🙏

  • @shubhadawagh5109
    @shubhadawagh5109 День тому +1

    आम्ही उकड करतो. माझा नातू खूप आवडीने खातो.

  • @vijayachandurkar449
    @vijayachandurkar449 День тому +3

    खरे मॅडम आपणलोकं राइ ह्मणत नाही राइ हिंदी भाषिक लोक ह्मणतात मोहरी ह्मणा! उकडी च्या फोडणीत आपण कढी लिंब घातला नाहीत त्यामुळे स्वाद अजून चांगला लागला असता. आह्मी उकडी़र वरून साजूक तूप घालून खातो 😊

  • @jayantipatil
    @jayantipatil День тому

    Khup chana kele

  • @pramilashirsekar74
    @pramilashirsekar74 23 години тому +1

    Mast

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 2 години тому

    Me sadhi white colour chi ukad karte. Pan aata ashi karun baghin. Chan vatali.

  • @UshaVijay-d2c
    @UshaVijay-d2c 2 дні тому

    Aamchi aai ashi ukad banvte,yamdhe kothimbir, kadiptta, Chimtibhar sakhar dekhil ghalte, uttam chav lagte ukdila, khupach chhan banvte aai.

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 День тому +1

    Chan,ahe

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 дні тому +1

    तांदळाचे पीठ आमच्याकडे रेडीमेड मिळत नाही, म्हणून त्या बद्दल पण सांगा म्हणजे कोणता तांदूळ घ्यावा आणि तांदूळ धुवून, वाळवून किंवा भाजून घ्यावा का?

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  2 дні тому

      तांदूळ फक्त दळून घ्या, मिक्सर मध्ये दळा आणि चाळून, पावडर करून घ्या, भरड नको

    • @suparnagirgune7366
      @suparnagirgune7366 2 дні тому

      @@pramodkhare1006 हो,ठिक आहे

  • @rajanesabade8102
    @rajanesabade8102 День тому

    सुंदर सात्त्विक पदार्थ आहे

  • @sarojgore2760
    @sarojgore2760 15 годин тому

    आम्ही लसूण न घालता जीर मिरची घालतो मस्त लागते आणि स्टील ची क ढ ई. वापरा. कोकणात नॉनस्टिक कशाला

  • @user-4dg
    @user-4dg 3 дні тому +2

    मी गोव्यात राहतो . व गेली ४५ वर्षांपासून हा पदार्थ मला माहित आहे.मी आवडीनं उकड खातो...

  • @swarupabal6673
    @swarupabal6673 3 дні тому +1

    मी पण करते उकड आमच्याकडे सर्वांना फार आवडते पालगड माझ‌आजोळ‌आहै धनंजय जोशी (बाळ जोशी)माझा मामा

  • @anitadeshpande6565
    @anitadeshpande6565 14 годин тому

    आम्हीं देशपांडे मराठवाड्यात आम्ही बाजरीच्या कन्या करतो खूप खूप मस्त लागतात .

  • @veenamukadam1934
    @veenamukadam1934 22 години тому +1

    पीठ भाजून घेतलं तर खमंग लागते. तसंच कढीपत्ता आणि जिरं फोढणीत घालायचं छान वास येतो.आम्ही ताक फोडणीला टाकतो नंतर मीठ घालायचं. कढ आला कि, पीठ हळूहळू सोडायचं आणि ढवळत रहायचं. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.

  • @dilipdeshpande4828
    @dilipdeshpande4828 12 годин тому

    Very nice preparation

  • @SudhaGeorge-d1d
    @SudhaGeorge-d1d 6 годин тому

    छान आहे पन हळद शेवटि टाकायला पाहिजे लसना च्या नंतर जुन्या काळ ची रेसीपि

  • @joystanakulkarni1056
    @joystanakulkarni1056 День тому +1

    मस्त

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 4 дні тому +1

    Khupch tasty, quick n healthy snacks❤

  • @marutidattapatil2901
    @marutidattapatil2901 День тому

    VERY NICE MAHITI SPECH

  • @chandrikapatel9869
    @chandrikapatel9869 День тому +1

    Jwarich pithha pasun kru sakto ka?

  • @nikitamokal6494
    @nikitamokal6494 День тому

    Ukad farach chan zali varun kothimbir ghatli ki surekh diste v.chavista lagate

  • @AlpanaTrivedi-u4o
    @AlpanaTrivedi-u4o 6 годин тому

    Va khupch mast dish

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 3 дні тому +2

    Mast kaka amhi pqn karto ukad exactly same way❤❤

  • @smitamarathe7814
    @smitamarathe7814 5 годин тому

    फोडणीत जिरे पण घालायचे..👌👍

  • @medhasomalwar5488
    @medhasomalwar5488 День тому +1

    आम्ही ह्याला आंबील म्हणतो.तूप जिरे, लसूण टाकून करतो

  • @arvindshinde2789
    @arvindshinde2789 День тому +1

    Khup chan aahe

  • @smitalimaye7849
    @smitalimaye7849 3 дні тому +1

    Khupach chhan,nakki karun baghanar

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 День тому

    खुप छान रेसिपी

  • @MinalJoshi-p2b
    @MinalJoshi-p2b 3 дні тому +3

    मी प्रथमच पाहते आहे तुमचा व्हिडिओ खुप छान आहे suscribe kele 😀👍

  • @devikasharma1765
    @devikasharma1765 2 дні тому

    Looks yum will try similar to guju make khichu which is available in mumbai

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 День тому

    आम्ही तांदुळाचे किंवा कधीकधी ज्वारीचे पीठ वापरतो. नेहमीच उकड हा पदार्थ होतो, सर्वांनाच आवडतो. ❤❤

  • @gajanankhare9264
    @gajanankhare9264 2 дні тому

    खूप छान वाटलं कोकणी receive baghun

  • @PrakashZagade-td4tr
    @PrakashZagade-td4tr 3 дні тому +2

    सर तुमच्या नुसत्या दर्शनाने मन प्रसन्न होते.

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar7995 День тому

    Thank. You. So. Much. 😊😊. Mahiti. Avadli

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 4 години тому

    नुसतीच खावी ? की अन्य चपाती/भाकरी/भात कि अन्य कश्याबरोबर खावी ? चवीला जास्त रुचकर कशी लागेल हे सांगितले नाहीत.😊

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 8 годин тому

    Mast recipe

  • @PragatiKhatu-n7r
    @PragatiKhatu-n7r 8 годин тому

    एकदम झकास

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 дні тому

    छान रेसिपी आहे. सहज सोपी.

  • @kanchanjoag2922
    @kanchanjoag2922 2 дні тому +1

    कढीपत्ता का नाही घातला ?

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 День тому +1

    खुप च छान रेसिपी
    आम्ही पण करतो रेसिपी थोडी वेगळी असते आम्ही त्याला तुप जीरे ची फोडणी घालतो आणी हळद आणी लसूण नाही वापरत.
    धन्यवाद

  • @rchopade9825
    @rchopade9825 День тому

    Khup mast

  • @vijaytadphale1681
    @vijaytadphale1681 13 годин тому

    आमच्याकडेही अशीच केली जाते. लसूण या उकडीचा आत्मा आहे.

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 3 дні тому +2

    उकड सोबत लिंबाचे लोणचे घ्या खूप छान चव येते

  • @sandhayavigne1652
    @sandhayavigne1652 3 години тому

    Very tasty

  • @sharadakhasnis3460
    @sharadakhasnis3460 11 годин тому

    छान रेसिपी

  • @medhakulkarni2367
    @medhakulkarni2367 2 дні тому

    Khup sunder ukd keli Thanks

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 День тому

    सगळं समोरचे वाचून का बोलता?

  • @vedantigodbole1682
    @vedantigodbole1682 10 годин тому

    आम्ही पण करतो मी फोडणीत लाल मिरची पण घालते

  • @geetapailwan4948
    @geetapailwan4948 2 дні тому

    खरच खुप छान आहे पैसिटिक पदार्थ आहे माज्या मुलाला असेच पदार्थ अवडतात तेलकट नाहि धन्यवाद नमस्कार

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 23 години тому

    Chan receipe

  • @Literallysomeone.
    @Literallysomeone. 3 дні тому +1

    काका,लिंबू आणि मिरची लोणचे सांगा.

  • @satishsupekar2439
    @satishsupekar2439 5 годин тому

    आमच्या कडे ह्याला ताका च्या कणी म्हणतात.

  • @sunitasahastrabudhe9940
    @sunitasahastrabudhe9940 День тому +1

    कढीपत्ता टाकला नाही, त्या ने चव छान येते, तसेच ताक जर आंबट असेल तर थोडी साखर टाकावी, खूप छान चव येते