कहाणी गड नदीची । भुदरगड उगमापासून ते तळाशील समुद्र संगमापर्यंतचा नदीचा अनोखा प्रवास ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • कहाणी गड नदीची । भुदरगड उगमापासून ते तळाशील समुद्र संगमापर्यंतचा नदीचा अनोखा प्रवास । #rivers
    कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात नजरही पोहोचणार नाही इतके अथांग, थेट क्षितिजाला भिडणारे, गर्जनेने आसमंत व्यापणारे निळेशार समुद्र. कोकण हा मुळातच पाण्याने समृद्ध प्रदेश. पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे ४० ते ६० किलोमीटर रुंदीच्या या कोकणपट्ट्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. कोकण प्रदेश उत्तरेकडे रुंद असून दक्षिणेकडे अरुंद होत जातो. कोकणातल्या सगळ्या नद्या या पश्चिमवाहिनी आहेत म्हणजेच पूर्वेला सह्याद्री पर्वतात उगम पावून त्या पश्चिमेला अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे या सर्व नद्यांची लांबी कमी आहे पण सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे त्यांचा वाहण्याचा वेग जास्त आहे.
    सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या या नद्या अनेक उपनद्यांना सोबत घेत अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि मुखापाशी अद्भुत सौंदर्य पाहण्याची आपल्याला संधी देतात. मालवण तालुक्यातील अशीच एक महत्वाची नदी म्हणजे गड नदी. भुदरगड येथे उगम पावलेली गड नदी 84 किमी चा प्रवास करून तळाशील येथे समुद्राला मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र 1036 वर्ग किलोमीटर आहे.कसाल नदीची लांबी सुमारे 30 किलोमीटर आहे तर जानवली नदीची लांबी 33 किलोमीटर आहे. कणकवलीहून आचऱ्याकडे जाणारा रस्ता गड नदीला समांतर वाहतो. या प्रदेशात मसुरे, बांदिवडे अशी नितांतसुंदर गावे आहेत. भरतगड आणि भगवंतगड असे दोन किल्लेही आहेत.
    कोकणातल्या नद्या मळ्याच्या शेतीच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. नद्यांच्या किनारी गाळाची सुपीक जमीन तयार झाल्यामुळे कडधान्ये आणि भाजीपाल्याची शेती होते. सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे छोटी धरणे बांधून गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा करणं शक्य होतं. मात्र भारतातल्या इतर नद्यांप्रमाणेच कोकणातल्या नद्याही औद्योगिक प्रदूषणाची शिकार बनल्या आहेत. कोकणची जलश्रीमंती असणार्‍या या नद्या स्वच्छ आणि प्रवाही ठेवणं ही काळाची गरज आहे.
    ref - Daryafirasti.com
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_T...
    #gadnadi #GadNadi #RiversOfKonkan #गडनदी #कोकणातीलनदी #कोकण #konkan #kokan #कोकणातील #नदी #explore #rivers

КОМЕНТАРІ • 198

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 роки тому +2

    Sundar nisarg. Sundar samalochan

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 2 роки тому +1

    Very good 👍

  • @saniyarane5726
    @saniyarane5726 2 роки тому +2

    Very nice

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 2 роки тому +1

    नदीची सुरुवात ते नदी समुद्र संगम.
    एकट्याचा प्रवास अप्रतिम.

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +1

    ग्रेट , मस्त व्हिडिओ 👍👍🙏🙏

    • @rajanpawar2941
      @rajanpawar2941 2 роки тому

      भाऊ आपल्याला पण आवड आहे पण काय करणार नोकरीत अडकलो😭

  • @bebitaiwankhade9402
    @bebitaiwankhade9402 2 роки тому +1

    खूप छान चित्रिकरण आणि खूप छान माहिती दिली संचित,👌

  • @user-ry1bp1fv1x
    @user-ry1bp1fv1x 2 роки тому +1

    छान व्हिडिओ .तुझ्या धाडसाला आणी मेहनतीला लाख लाख सलाम.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому +1

    Great Efforts dada khup chaan video chaan mahiti dili khup thanks

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि नदी स्वच्छतेचा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता असे विडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 2 роки тому +1

    खुप सुंदर विडीयो..

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 роки тому +1

    खूप छान व्हिडीओ 👍

  • @nayanamestry3218
    @nayanamestry3218 2 роки тому +1

    संचित..
    खुप सुंदर विडिओ अप्रतिम माहिती
    खुपच छान...👍👌

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 роки тому +1

    Informative👍👍👍

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 роки тому +1

    Really kharach chhan video ahe gad nadi khupach sunder by the jungle video dakhavtana take care your self their so much of wild animal 🐵🐔🐶🐷

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 2 роки тому +1

    सुंदर निवेदन व चित्रीकरण!👌

  • @ravishitap5695
    @ravishitap5695 2 роки тому +1

    Khup cchan 👌👌👌 terrific job

  • @prashantsavant9137
    @prashantsavant9137 2 роки тому +1

    No 1sachit bhai

  • @shivlila8982
    @shivlila8982 Рік тому +1

    खुपचं सुंदर संचित

  • @kiranshinde2416
    @kiranshinde2416 2 роки тому +2

    छान मित्रा

  • @SAMEEOK
    @SAMEEOK 2 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 2 роки тому +1

    खुप छान👌👌👌👌👌👌

  • @ravindrapotale2288
    @ravindrapotale2288 2 роки тому +2

    त्या मारुती मंदिरा जवळ मी गेलो आहे
    मस्त निसर्ग आहे.

  • @pravinteli9514
    @pravinteli9514 2 роки тому +1

    Khup chhan 🙏

  • @anjalimanjarekar2289
    @anjalimanjarekar2289 2 роки тому +1

    👍👍

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +5

    संचित मी नरडवे गावचा रहिवासी आहे तुझी माहिती बरोबर आहे एका बाजूला भैरवगड व एका बाजूला सोनगड आहे गड नदी दोन डोंगरातून वाहाते नरडवे येथे धरणाचे बांधकाम सुरू आहे पावसाळ्यात येथे खुपच पाणी असते दोन्हीही डोंगरात सरपटणारे तसेच रानटीपृाणी भरपूर प्रमाणात आहेत अशा ठिकाणी काळजी घेणे आवश्यक असते संचित छानच विडिओ दाखवला अशा ठिकाणी एकटे जाणे बरोबर नाही या नंतर काळजी घेणे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र

  • @stvshorts339
    @stvshorts339 2 роки тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @rsp151
    @rsp151 2 роки тому +1

    Man vs wild baghte as vatal ......Khupach chan sanchit bhava👍👏👏👏

  • @madhavimungekar7688
    @madhavimungekar7688 2 роки тому +1

    सुंदर अप्रतिम👌🏻

  • @shrikantbhoite2068
    @shrikantbhoite2068 2 роки тому +2

    आभारी आहे संचित दादा तू आमच्या भुदरगड मधे येऊन व्हिडिओ केलंय

  • @suchitrasworld4222
    @suchitrasworld4222 2 роки тому

    Khup Chan mahiti dilis 🌹❤️❤️❤️👌

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 2 роки тому +1

    अप्रतीम, सुंदर, छान, क्या बात है, अद्भूत अशी सगळी विशेषणे या video चे वर्णन करायला तोकडी पडतील. तुमचे video बनवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि आत्मीयता खरच वाखाणण्याजोगी. किती चालता तेही दगडात वन्यप्राण्यांची risk घेत. Hats off to you. खूप खूप धन्यवाद. All the best. देव भले करो.

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 роки тому +5

    Great efforts mitra keep it up👍🙏👍🙏

  • @mangeshvalanju4125
    @mangeshvalanju4125 2 роки тому +1

    संचित भाऊ मस्त आणि खूप सुंदर विडिओ 😊

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 роки тому +1

    असेच प्रेम आपल्या गावच्या नदीवर करतील तर पाणी प्रश्न राहणार नाही
    अतिशय सुंदर निसर्ग हे कोकणाला वरदान आहे
    धाडस करा पण अविचारी नको

  • @veenaangane5981
    @veenaangane5981 2 роки тому +1

    खूपच सुंदर विडिओ. खूप मेहनत घेतलीय. प्रथमच गड नदीचा उगम आणि सागर संगम बघितला.धन्यवाद. काळजी घ्या.👍👍🙏

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 2 роки тому +1

    👌👌👍

  • @shantaramparab1888
    @shantaramparab1888 2 роки тому

    सुंदर गड नदी उगम आणि अरबी समुद्र. संगम गड नदीचे भयंकर रूप पावसाळ्यात पाहिले आहे पण तिचा उगम तू दाखवला स बरेवतले

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 роки тому

    खूप छान

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 роки тому

    Khup 👌👌 video
    Mrs. Chavan

  • @umeshkambli5812
    @umeshkambli5812 2 роки тому +1

    संचित दादा तुमचे videos खरच खूप छान असतात खूप काही शिकायला मिळते

  • @milindamare
    @milindamare 2 роки тому

    Khup sundar!!

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 2 роки тому +12

    संचित भाई मस्त आणि भरपूर दिवसानी आज विडिओ आला खुप miss करत होतो. तुझे विडिओ बघून त्यातून खुप काही शिकायला मिळत आणि तुझाच आदर्श समोर ठेऊन मी सुद्धा नवीन सुरवात केलीय ☺️ खुप छान 👍👍

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 2 роки тому +6

    संचित मित्रा , नेहमी प्रमाणे धाडशी व्ही डी ओ , नदीच्या उगमापासून समुद्रा पर्यंत चा प्रवास पाहून छान वाटले , धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @Mangesha_Insights
    @Mangesha_Insights 2 роки тому +1

    दादा खुप मेहनत व धोका पत्करून vlog करतोस ,सुंदर आहे video 👌👌👌

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 роки тому +1

    संचित खूप धाडस केलेस पण एवढा लांब प्रवास करताना कुणातरी सोबत घेत जा भुदरगड हा कोल्हापूर मध्ये येतो तिकडून गड नदीचा उगम आहे हे तुझाकडून समजले बाकी व्हिडीओ खूप chan

  • @sandeepkuyeskar5513
    @sandeepkuyeskar5513 2 роки тому +1

    संचित भाई छान माहिती दिलीस d दाखवलीस त्याच प्रमाणे माझे गाव वरवडे (संगम ) दाखवलेस खुप चांगल वाटले त्याच प्रमाणे बांदीवडे चिंदर चा ब्रिज दाखवलास ते पण छान वाटल . एकुणच एका वेगळ्या विषयावर व आपल्या कोकणातील दाखवलंस त्या बद्दल तुझे खुप खुप कौतुक .

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 2 роки тому +1

    Kharach aapale kokan sundar aahe aani te tumhi japayala sangatay
    Khup mahatvacha aani kaalachi garaj aahe bhabishyat sudha
    Japun thevalya pahije
    ,👍👌

  • @MiMalvani-x2l
    @MiMalvani-x2l 2 роки тому

    खुप छान दादा 👌

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 2 роки тому +2

    सुंदर असा गड नदी, आणि तुझी मेहनत पण आहे, आणि ति व्हिडिओ मध्ये दिसतच आहे. अशीच चिकाटी ठेव. धन्यवाद 🙏

  • @mak940
    @mak940 2 роки тому +1

    Mi evdhach sangen tu khup mehnati aahes aani koknatlya ekhadya morhya nadicha prawas kadachit asa koni dakhawla asel👌👌❤🤟👍

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 2 роки тому +2

    पाण्यातील चित्रीकरण एक नंबर 👌👌👌

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 2 роки тому +1

    एकदा प्रचीतगड बद्दल माहिती दे
    व खूप अनुभवी माहिती मिळेल लोकांना

  • @sanjayghadigaonkar5864
    @sanjayghadigaonkar5864 2 роки тому +3

    सुंदर अप्रतिम,.....
    अनाकलनीय माहिती.....
    तुझे मनापासून *आभार*
    धन्यवाद......

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 роки тому

    ऊतम आपन न घाबरता विडीओ ऊतम नमस्कार 👑👍😎👑

  • @samruddhisawant2924
    @samruddhisawant2924 2 роки тому +4

    ईलो व्लाॅग एकदाचो....एवढो मोठो गॅप घेतलंस...सगळा ठिक ना...? व्हिडिओ मस्तच हा.. नेहमीप्रमाणे

  • @snehalv186
    @snehalv186 2 роки тому +1

    Khup chhan mahiti ani nisarg tar bharich

  • @digambarkorgaonkar9245
    @digambarkorgaonkar9245 2 роки тому +1

    संचितजी माझे जन्म गाव रामगड माझी शेती जमीन गोठणे गावी गडनदीच्या पूराचे पाणी आमच्या शेतात येत .माझे वय आता ७८ वर्षे आहे.या वयांत पर्यंत गडनदीच्या बाबत एवढी सुंदर माहिती मला नव्हती.तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात.फार सूंदर .

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 2 роки тому +1

    Very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very nice

  • @milindkanekar8965
    @milindkanekar8965 2 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे

  • @dattatrayghadigaonkar305
    @dattatrayghadigaonkar305 2 роки тому +1

    खुप छान माहीती

  • @sunitasawant6021
    @sunitasawant6021 2 роки тому +1

    सोनवडे,घोडगे,जांभवडे,आमचा कुपवड्या त पण गडनदी आहे ती कणकवली ला जाते ती संचित एकदा नक्की explore कर,कुपवडे मध्ये खूप मोठं पत्र आहे नदीच त्या नदीचा पलीकडे नरडवे आहे कुपवडे मध्ये नदी च पत्र खूपच मोठं आहे पावसात खूप पाणी असत

  • @k2bole902
    @k2bole902 2 роки тому +1

    Khup Chhan Video 👌👌👌👌👌

  • @naturewildlifeandculture1460
    @naturewildlifeandculture1460 2 роки тому +4

    Finally! These vlog come. I was still waiting for this vlog ❤ thanks alot😊

  • @sarangmurudkar15
    @sarangmurudkar15 2 роки тому +5

    Good Morning Sanchit!! 🙂 I was eagerly waiting for your blog. After watching this vlog, I realized that you are just unbelievable and your journey was also awesome. Keep it up Bro!! 👍 Thanks for this beautiful vlog!! 🙏

  • @stockmarketmood
    @stockmarketmood 2 роки тому +1

    bhava tuze video khup chhan astat.....content pan khup different asto....tuzi mehanat ahe khup tyat....mi mazya friends madhe pan share kela tuza channel....tu view vadhvnyavar kam kar khup bhari content ahe tuza...All the best bhava

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 2 роки тому +1

    Bhari khup chala vedio jara care ghya

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 2 роки тому +1

    Ekta pravas karat jau nkos . sobat konala tari gheun jaa , Gadnadi chi mahiti khup chan sangitli .. Video tuze khup bhari astat ..

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 роки тому +2

    Sacit tuzhe vdos mala khup khup aavadtaat.tu risk khup ghetos barobar kaahitari hattyar thev savrakshanasaathi.

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 2 роки тому +1

    Aapan ashya thikanI aalo ki purn nisargaat ramun jato

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 роки тому +1

    आम्ही मीसस करत होते उगमाकचे पाणी पीऊन घट्ट हो खडकातून पाणी येणं म्हणजे देवाची कृपा आम्हाला घरांत बसून बघायला छान वाटले पण तेव्हढ्यात तुम्हाला खुपचं त्रास सहन करावा लागतो काही घाबरू नकोस देवाची कृपा आहे तुमच्या पाठीशी खुपच कष्ट करावे लागतात

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +4

    छान माहिती देतो निर्सगाची जरा जपून एकटा फिरतो आवडला विडियो कोकणाला निर्सगाची देण आहे ही जपली पाहिजे

  • @supriyakhandekar5605
    @supriyakhandekar5605 2 роки тому +1

    gharatil kitchan te swatachi wadi evadhya areat rahun kokan dakhavinapekshatu khare kian aani kotanchi gost dakhavatosh teshi ekta. manale mitra tula.

  • @vishwasraodesai4864
    @vishwasraodesai4864 2 роки тому +1

    लई-भारी.🌹

  • @Hitchintak
    @Hitchintak 2 роки тому

    Karli nadi vr video bnv sindhudurg mdhli sglyat important nadi ahe teee

  • @vaishalipawaskar2146
    @vaishalipawaskar2146 2 роки тому +1

    खुप छान....काळजी घ्या

  • @ajaypalande
    @ajaypalande 2 роки тому +1

    Superb

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 2 роки тому +1

    Nice vlog beatiful nature take care Sanchit👌👌

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 роки тому +1

    खूप छान. संचित तू धाडशी आहेत. तू सांगत होतास की वाघ वगैरे प्राणी असतात मग एकटा कसा काय प्रवास करतो. तुला भीती नाही वाटत का. जीव घेणा एकट्याने प्रवास करू नको. काळजी घे. घरी आपले आई वडील वाट बघत आहेत

  • @kamlakarghadigaonkar9778
    @kamlakarghadigaonkar9778 2 роки тому +1

    Hoooo joooo hiooooo 🙏🙏

  • @smitam1299
    @smitam1299 2 роки тому +1

    👍👍👌👌👍👍👌👌❤️❤️

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 2 роки тому +1

    ❤️👍 nice vlog 👌👌

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 роки тому +1

    👌👌,,,,👍👍

  • @prashantparab207
    @prashantparab207 2 роки тому +1

    संचित या नदीवर एकही धारण नाही? एकदा कर्ली नदी चा vlog pan होऊदे छान धारण परिसर आहे .

  • @aparnadhuri1166
    @aparnadhuri1166 2 роки тому +1

    Nice vlog 👌 👍 😊

  • @rahulpatil3317
    @rahulpatil3317 2 роки тому +4

    मस्त व्हिडिओ संचित काळजी घेऊन व्हिडिओ कर. एकट्याने प्रवास करणे शक्यतो टाळ.‌‌‍

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 2 роки тому +1

    👌👌

  • @Bhural_Kokanachi
    @Bhural_Kokanachi 2 роки тому +2

    मी तिथेच होतो घोलणवाडीत संचित मला कळालं कोणी तरी पुलावर शूट करतंय, माहित असत तर उगम आणखी explore करता आला असता आणि तुझी भेट झाली आली असती....पावसाळ्यात नक्की एकत्र फिरू....

    • @Bhural_Kokanachi
      @Bhural_Kokanachi 2 роки тому +1

      छान वाटलं 👌🏽👍🏽

    • @sandeepparab200
      @sandeepparab200 2 роки тому +2

      मित्रा पावसात ये... आपण मिळून एक्सपलोर करू

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      हो नक्कीच पावसात मज्जा करू नक्की येणार आहे मी तिकडे ☺️💐

  • @anuradhagolatkar7555
    @anuradhagolatkar7555 2 роки тому +1

    Dangours hote.... be carefull next time baki khup mast hota vlog...aplya gavtli Nadi ch video bghta na proud feel zhla ......best off luck for ur further future

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 2 роки тому +1

    ☺❤

  • @tejasghone3113
    @tejasghone3113 2 роки тому +1

    धन्यवाद संचित घोलानं नरडवे परेंत पोचल्याबद्दल... आणि तोही एकटा वरपरेंत 😂...... पावसात visit कर एकदा नक्की🙏

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 2 роки тому +9

    संचित, एवढी रिस्क घेऊ नकोस. एकतर एकटाच प्रवास करतोस, काळजी घे.

  • @vijaydaristekar6088
    @vijaydaristekar6088 2 роки тому +1

    Songad varun yenari nadi bhudargad yethun yenarya nadi la kuthe milate

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      Songad varun nadi nhi yet hich nadi tikdun khalun vahte...

  • @sandeepsawant4804
    @sandeepsawant4804 2 роки тому

    Hi sanchit माझं गाव नरडवे. पण आम्ही मुंबईत राहतो. माझी आत्या मसुरेची. नदी चा उगम बघुन छान वाटल. नरडव्यात टोकाला घोलानवाडीत ब्राह्मण देवाच मंदिर आहे डोगराच्या कुशीत. त्याच्या पण video बनवायला हवा होता.

  • @yogishirodkarvlogs8668
    @yogishirodkarvlogs8668 2 роки тому +1

    Nice

  • @Afestivecollection.
    @Afestivecollection. 2 роки тому +1

    Which place you can't explore use drone

  • @pankajshinde5454
    @pankajshinde5454 2 роки тому +2

    Tyacha vlog banva na sir tumhi 12 month Pani ast tithe ajun konal jast mahiti nhi

  • @vedantgaming4051
    @vedantgaming4051 2 роки тому +2

    नारडवे नाही ओ नरडवे अस आहे नाव त्या गावाचं

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 2 роки тому +1

    Chhan video Sanchit Naardave nahi Nardave .

  • @poonamjadhav2992
    @poonamjadhav2992 2 роки тому

    tuza vlog bhgitla shivay divas jat nhi.....repeat bhgto vlog tuze .....keep it up

  • @pankajshinde5454
    @pankajshinde5454 2 роки тому +1

    Chiplun talukyat veer la 2 waterfall ahe