धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | बाणाईच्या पद्धतीने बनवा झणझणीत मिसळ पाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2023
  • Misal Pav Recipe | धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी, बाणाईच्या पद्धतीने झणझणीत मिसळ पाव
    #मिसळ
    #मिसळपाव
    #misalpav
    #misalpavrecipe
    #misal
    #dhangarijivan #siduhake #banai #banairecipe

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @rahulshete6696
    @rahulshete6696 Рік тому +61

    सगळ्या सुविधा नसताना देखील आपण एवढा सुंदर स्वयंपाक करता एक सुंदर सुगरण म्हणून मी तुम्हाला उपमा देतो आम्ही उन वारा पाऊस या तीनही ऋतू सामने जाऊन कष्ट करून नेहमी आनंदी राहता हे पाहून आम्हला खूप आनंद होतोय

  • @abbishindang8454
    @abbishindang8454 Рік тому +58

    लाईट नसल्याच दुख: करु नका. ती देवाची आपल्यावर कृपाच आहे.लाईट नसल्यामुळे आपण वेळेवर रात्री झोप घेतात ,त्यामुळे जीवन निरोगी व मन प्रसन्न व निर्मल आहे. 👏

  • @user-ns2tf1ib2m
    @user-ns2tf1ib2m 6 місяців тому +21

    सर्वात सुखी तर तुम्ही आहात ...घर पैसा असून सुध्दा लोकांना समाधान नाही ..पण तुम्ही एवढं अवघड जीवन जगता तरी किती समाधानी आहेत .....पुढील जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा ताई दादा

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 Рік тому +89

    खुप छान तुम्ही अशा प्रकारचे तुमचे उघड्यावर संसार तरी किती छान जेवण बनवून सर्वाना खाऊं घालून खरं चे माऊली सलाम स्त्रीशक्ती 🙏🙏

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +34

    बाणाई मिसळ, पावले पोट तर भरले ग पण बाणाई तुझ मन किती सुंदर आहे. थोडे जरी बनवले तरी सगळयांना बोलावून पोटभर खाऊ घालते . आपल्याला पुरणार का कधीही विचार करीत नाही. खरोखर मन भरून आले ग बाई. अन्नपुरर्णाच आहे आपली बाणाई. सल्युट उगाच नाही करीत आम्ही. 💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +166

    बाणाई ऐक नंबर मिसळ दादा खूप छान सुस्वभावी प्रेमळ बायको मिळाली तुम्हाला शिक्षण कमी पण बोलण कस प्रेमळ मिक्सर नाही तरी येवढ्या लोकांना साठी प्रेमाने सर्वांना बोलवणे चालू सागर शी बडबड ❤❤ दादा कांद्याचा रेंदा😂😂 मस्त पैकी शब्द खूप 👌👌सागर बाळा ची लुडबुड ❤❤❤ पुरुष बाहेर खातात बायकांना जाता येत नाही म्हणून एवढा घाट घातला बाणाई सुगरण अन्नपूर्णा सर्व शब्द कमी पडतात सलाम तुमच्या बायकोला दादा आर्धागिनी असावी तर बानाई सारखी सुख दुःखात हासत मुखाने सर्वाच आदरातिथ्य करणारी ❤❤❤❤ बाना ई

  • @xsaviour1839
    @xsaviour1839 10 місяців тому +33

    जीवन जगण्याची कला तुमच्याकडून शिकायला मिळते. उभारी देणार वाक्य आणि ..हिम्मत येते तुमच्या व्हिडिओ मधून ... धन्य धन्य तुम्ही .

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 8 місяців тому +66

    कांदा चुलीत भाजून मग वाटला पाट्यावर त्याने किती सुंदर चव आली असेल!!
    खूप छान ताई ,तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 Рік тому +23

    मिसळ पावापेक्षा ज्याप्रेमाने बनवलं ते महत्वाचे. किती काळजी आणि आपुलकी . शेजारी अप्पाची केलेली आठवण हेच सामान्य गरीब माणसाचं जीवन ,आपल्याकडे तयार झालेला नवखा पदार्थ सर्वांनी वाटून खायचं हेच त्यांचे जीवन.
    धन्यवाद

  • @Kasal269
    @Kasal269 11 місяців тому +228

    राहायला धरती अन पांघरायला आभाळ तरीही कुरकुर न करता नीटनेटका माणुसकीचा प्रपंच 🙏🙏
    काय चवदार मिसळ झाली असणार 👍

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 8 місяців тому +16

    विपरीत परिस्थितीत सुद्धा आनंदाने जेवण बनवणारी सुगरण

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 Рік тому +20

    पहिली कमेंट आहे .व्हिडिओ नेहमी पाहते असा एकमेव UA-cam channel आहे कि घरातील वाद भांडणे हेवे दावे मतभेद या फालतू गोष्टींचे भांडवल न करता तुमचे खरे आयुष्य दाखवता एकही वाईट कमेंट नसणारा एकमेव UA-cam channel खूप छान आणि साधी प्रेमळ एकमेकांशी आपुलकीने वागणारे माणसे नेहमी असेच आनंदी रहा.

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 Рік тому +238

    एखाद्या प्रोफेशनल कूकला लाजवेल अशी बानाईची रेसिपी असते.सलाम बानाई तुला.👌🙏🙋‍♂️

  • @karishmapawar9759
    @karishmapawar9759 6 місяців тому +17

    नमस्कार ताई , एवढं कष्टाळू जीवन असलेलं पण तुम्ही आनंदाने सगळ जमून घेता तुम्ही खूपच सुगरण आहात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @rajanikenaudekar7765
    @rajanikenaudekar7765 8 місяців тому +11

    बाणाईची मेथीची भाजी करून बघितली, खूपच रुचकर झाली . धन्यवाद

  • @sunild2794
    @sunild2794 11 місяців тому +61

    मोकळ्या वातावरणात मोकळ्या स्वभावाच्य ताईंनी खुपच भारी मिसळ बनवली तोंडाला पाणी सुटलं आमच्या, दादांनी आणी बाकीच्या परिवाराने पण छान मदत केली 🙏

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 Рік тому +20

    पूर्ण youtub मध्ये एक नंबर व्हिडीओ कोणाच्या अद्यात नाही मध्यात नाही खूप छान बगायला पण छान वाटतं नाहीतर youtub मध्ये भांडण बगुन बगुन वैताग आलय 😊😊😊😊

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 7 місяців тому +17

    😢फरच छान व चवदार मटकीची उसळ तयार केली ❤ . आम्ही नककीच तयार करून पाहू . आपल्या सर्वांचे फार गोड गोड कौतुक व अमिनंदन ❤ . मात्र आपल्या लहान बाळाला खूप खूप शिकवून फार फार मोठे करा . तुमचे व तुमच्या सोबतच लहान बाळाचे रानावनातील कष्टाचे दिवस संपून सर्वांना सुखाचे दिवस येतील , हीच माझी आपणा सर्वांना विनंती ❤ ❤ .

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Рік тому +39

    कोणतीही आधुनिक स्वयंपाकाची साधने नसताना ओपन किचन मद्ये आनंदाने संसार करणारी बनाई. आक्का म्हंजे साक्षात अन्नपूर्णा व लक्ष्मी आहे.

  • @shubhangibochare1733
    @shubhangibochare1733 Рік тому +14

    आनंदी जगण्यासाठी सुखवस्तू नाही तर एकमेकांसाठी त्यागाची भूमिका पाहिजे ..जे आहे त्यात आनंद शोधता आला पाहिजे .... एकमेकांवरती प्रेम असल की माळावर पण संसार फुलतो...अप्रतिम व्हिडिओ शूटिंग नी रेसिपी पण ...

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Рік тому +35

    बाणाई ताई खुप छान रेसिपी आहे पाहून तोंडाला पाणी सुटले आहे वीडीओ ची मी आतुरतेने वाट पाहत असते पहिले लाईक माझेच

  • @padmajapawar21
    @padmajapawar21 Рік тому +38

    मी आज पर्यंतची पाहिलेली सर्वात सुंदर मिसळ रेसिपी .. बानाई ताई🙏 ❤

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 8 місяців тому +12

    बाणाई आक्का खूप छान
    खूप छान घर असताना काही लोक दुःखी असतात याना घर नाही तरी किती आनंदात राहतात
    ताईनी पौष्टीक जेवण केलं आहे धन्यवाद ताई

  • @saidatta583
    @saidatta583 11 місяців тому +5

    विचारांना थांबवणारा प्रसंग आहे आपल्या परिवार सोबत काम करून आनंदी जीवन जगतताय

  • @VaishnaviFulamade-ng2oc
    @VaishnaviFulamade-ng2oc 6 місяців тому +8

    कीती सुंदर ❤️ झणझणीत मिसळ....अतिशय गोड पद्धतीने केलेली👏🏻👏🏻😋😋😋😋

  • @kiranbhokre2746
    @kiranbhokre2746 10 місяців тому +19

    बाणाई ताई, किती निरागस, सात्विक , समाधानी जीवन तुमचे! तुमची ती अंग😮त पंगत आणि तो आनंद याला तोड नाही .मोठाच कौतुक आणि आदर वाटतो तुमचा.

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 11 місяців тому +12

    तुमचे उघड्यावर संसार तरी किती छान उस्सल पाव बनवून सर्वाना खाऊ घालताना पाहुन आजीची आठवण आली धन्य धन्य ताई किती सकारात्मक विचार

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 8 місяців тому +4

    सगळ्यांना त्या मिसळीचा आनंद दिला हेच मोठेपण

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Рік тому +12

    खरोखरच बाणाईचे कौतुक सगळे पदार्थ बनवता येतात

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 10 місяців тому +13

    धंगराची बानू महांतत्त ते खोट नहीं आए खरच मस्त 😮

  • @shobhapatil5816
    @shobhapatil5816 4 місяці тому +4

    बानाई तू स्वयंपाक करताना पाटा वापरते त्या त्याखाली कपडाटाकतेस ‍इतर ही सर्व स्व छता तुझे कष्ट दादा ला. तुझी खुपचं मदत होते 👌👍♥️

  • @sidharthbagul7176
    @sidharthbagul7176 Рік тому +4

    एवढ्या उघडया वातावरणात किती छान दिसत साफ सफाई भांडी चकाचक ठेवतात

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Рік тому +29

    मिसळ बनवण खरचं कीती दमछाक करणार काम आहे, बानाई माऊली मन लावून ते करत आहे आपणास दीर्घ आऊष्य मिळो हीच सदिच्छा.

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 Рік тому +18

    बाणाई धन्य आहे तुझी।खरच माऊली असावी तर अशी।

  • @alkanatu9952
    @alkanatu9952 8 місяців тому +8

    वा किती सुंदर मिसळ केलीत नक्कीच खूप छान झाली असणारच. किती साधी माणस आहात तूम्ही.

  • @ashadate2472
    @ashadate2472 Рік тому +8

    अरे वा मस्त एकदमच भारी पुणेरी मिसळ पेक्षा भारी बनवली धन्यवाद ताई

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 11 місяців тому +6

    खूप छान बनवले रेसिपी बाणाई खूप छान माहिती दिलीत दिसायला एवढी सुंदर दिसते खायला किती छान असेल

  • @laxmanchaudhari6058
    @laxmanchaudhari6058 Рік тому +4

    एक नंबर मिसळ बनवली. मस्त रेशिपीआहे.

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 Рік тому +7

    माझी बाणाई सुंदर, बानाईचे राहणीमान सुंदर, बाणाईचे बोलणे सुंदर, बानाईचा स्वयंपाक सुंदर ...खरेच माझी बाना ई सुंदर

  • @mohankale244
    @mohankale244 8 місяців тому +6

    चव फारच छान झाली असेल ताई. मला खूप आवडते मिसळ पाव.🙏🙏

  • @nityanandmahale6786
    @nityanandmahale6786 Рік тому +538

    बानाई ताई खरंच अन्नपूर्णा आहे,मायाळू आणि एवढ्या लोकांसाठी मिसळ केली.काही कंटाळा न करता....त्यांना नमस्कार 🙏

  • @rameshkamble1457
    @rameshkamble1457 Рік тому +7

    खूप छान पद्धतीने बनवले १ नंबर👌👌

  • @nileshahirao1231
    @nileshahirao1231 11 місяців тому +16

    मिसळ खूप सुंदर केली आहे माझा बहिणीने

  • @najmunmulani8089
    @najmunmulani8089 8 місяців тому +5

    ताईंनी खूपच छान बनवले मिसळ आणि रस्सा तर खूपच सुंदर कलर आलेला आहे बघून तोंडाला पाणी सुटली ती सुखी जीवन आहे आपले

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 Рік тому +51

    मिसळ बघून आम्हाला पण खाऊ वाटली आज आम्ही पण मिसळ बनवणार आहे खूप छान मिसळ बनवली ताई एक नंबर 👍👌👌🤤😊☺️

  • @adheera0213
    @adheera0213 Рік тому +36

    आयुष्याचा आनंद याच गोष्टींमुळे घेता येत असतो.आयुष्य जगण्याचं सामर्थ्य दिलं दादा तुम्ही आम्हाला... नेहमी आनंदी रहा😊

  • @vidyakharat8394
    @vidyakharat8394 Рік тому +11

    बानाई आदर वाटतो तुमचा ,अगदी सहज अन मेहनतीने घरातील सर्वांसाठी मिसळ बनवली त्यात आलेल्या पाहुण्यांची पण काळजी घेत त्यांना आवर्जून मिसळ खायला बोलावलं आणि शेवटी एक छान शिकावनही दिली. 🙏

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 10 місяців тому +4

    खरंच खूपच छान रेसिपी निसर्गात राहून किती आनंदाने स्वयंपाक बनवते धन्यवाद

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 Рік тому +4

    एक नंबर एवढे काम करुन एवढा चमचमीत पदार्थ करता

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +56

    वहिनी मस्तच मटकीला मोड आणुन मस्तपैकी मिसळ पाव बेत एक नंबर रेसिपी 👌👌👌👌👍👍
    सागरची🤗 मस्त गाडी आणि त्याची
    मधीमधी लुडबुड 😊👌👌👍
    दादा video खूपच छान वाटला ❤👌👌👍

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Рік тому +6

    बाणाई चा मालक देव आहे जीवनाचा खरा आनंद वाटतो

  • @samarthzine1388
    @samarthzine1388 10 місяців тому +15

    कमाल आहे तुमची लाईट नसते मिक्सर नसतो तरी इतके चांगले पदार्थ बनवतात

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Рік тому +16

    लय भारी ‌बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा

  • @shwetawaydande2327
    @shwetawaydande2327 10 місяців тому +7

    खरच सुगरण आहात तुम्ही ताई खूप छान रेसिपी. आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खूप साधी सोपी छान आहे.

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Рік тому +2

    काय करता हॉटेल च्या मिस्सळला,,,याला म्हणत्यात
    अस्सल गावरान चुलीवरची मिस्सळ ,पाव आणि घरच्याच बकर्या मेंढ्यांच काढलेल्या दुधाच दही..वा बघुनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं ❤❤

  • @Creator-Sangitabachkar
    @Creator-Sangitabachkar 7 місяців тому +28

    वा आई सगळं बघून डोळ्यात पाणी आलं आणि आमच्याकडे खूप सुख सुविधा आहेत तरी आम्ही मनभरून जगत नाही खूप खूप प्रणाम तुम्हाला माऊली 🌹🌹

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Рік тому +7

    खरंच खूप छान बनवली मिसळपाव होटेल पेक्षा भारी लयभारी बाणाई

  • @rohinishinde6502
    @rohinishinde6502 Рік тому +402

    कोणतीही गोष्ट येत नाही म्हंटल्यावर ती केव्हाच येणार नाही, हे खूप positive वाक्य बोलली बाणाई ताई.👍

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 8 місяців тому +2

    Wa sunder mesal paw.... sakaratmak wicharhi dhanyawad Banae

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Рік тому +7

    हाँटेलमध्ये सुद्धा इतकी सुंदर मिसळ मिळणार नाही अप्रतिम सजावट मयानेजमेंट हाँटेलमध्ये कोर्स पूर्ण केला असे वाटते बाणाई

  • @ladhaiatoz4191
    @ladhaiatoz4191 7 місяців тому +14

    खुपच छान....
    याला म्हणतात, "वाढ्यावरचा मिसळ पाव "
    आपल्या सर्वांना आमच्या परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा....
    बाणाई ताई, तु तर लाजवाब सुगरण आहेस 👌
    🙏🕉️🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +2

    खुप छान मीसळ मस्तपैकी मीसळ लय भारी बानाई सुगरण आहे साक्षांत अन्यपूर्णा आहे खुप छान व्हिडिओ

  • @user-vh7ui7xi2h
    @user-vh7ui7xi2h 4 місяці тому +5

    खूपच सुंदर ईतक्या छान रेसीपी कशा येतात आणी ते पाट्यावर कीती पटकन व बारीक वाटले जाते

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +32

    खुप खुप सुंदर बानाई खरी लक्ष्मी आहे 🙂🙂👌👌

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 Рік тому +4

    भाना ही खरच अन्नपूर्णा आहे असं मिसळ सुंदरली

  • @BapuBhise-et4tn
    @BapuBhise-et4tn 8 місяців тому +3

    जय मल्हार बाणाई

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 11 місяців тому +4

    तुम्ही लय भारी मिसळ पाव बनवली आहे
    रानात येवढं पदार्थ बनवले तयार भारी आहे

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 Рік тому +74

    😂😂❤❤ तुमची मिसळ बनवायची पद्धत स्वतःची सांगून बरेच जण हॉटेल मध्ये विकणार . लय भारी 🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋😋

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Рік тому +19

    छोट्याशा पाट्यावर वाटण बनवून येवढ्या सगळ्यांना खाऊ घालायच ग्रेट आम्ही मिक्सर असून सुधा बनवायचा कंटाळा 😊मानले banai

  • @sr9441
    @sr9441 4 місяці тому +1

    Very nice Banabai you are great , wonderful misal. Thank you 🙏

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 10 місяців тому +5

    तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान एन्जॉय करता.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +11

    मस्तपाकि झाली मिसळ,बघूनच तोंडाला पाणी सुटलया---आम्ही पण करतो पण बानाईने बनवलेली मिसळ बघूनच 1 नंबर---आवडला आजचा व्हीडिओ❤👌👍

  • @ashwinilokhande9769
    @ashwinilokhande9769 Рік тому +5

    बानाई ताई किती छान जेवण बनवतात... आधी पुरुष मंडळींना जेवण देतात आणि नंतर जेवतात.... त्यांना आणि अर्चना ताईंना जेवताना कधीच बघितलं नाही.. . त्यांनी पण गरमागरम जेवण करायला बसायला पाहिजे ना..!😊😊

  • @raghunathkuwar
    @raghunathkuwar Рік тому +1

    वाड्यावरच्या स्वयंपाकाची लज्जत खूपच छान. बाणाई ताईंनी खूपच छान मिसळ बनवली. साक्षात अन्नपूर्णा देवी. धन्यवाद ताई.🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Рік тому +6

    अतिशय सुंदर मिसल बनविण्याची पद्धत धन्यवाद बानाई धनगर वाडा.
    गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा ता. भिवंडी जि.ठाणे.

  • @surabhisansthaalibag9139
    @surabhisansthaalibag9139 11 місяців тому +6

    लय भारी बाना बाई मिसळ आहे ... मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले आणि खरंच तुमच्याकडे यावंसं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आनंद तो काय वेगळाच... तुम्ही बोलवा आम्ही येतो

  • @mansisurve8368
    @mansisurve8368 8 місяців тому +3

    खूप सुंदर मिसळ चा कलर आलेला आहे...👌👌👌👌👌🌷🌷

  • @prabhabele2378
    @prabhabele2378 8 місяців тому +2

    Banai Tai chi recipe lai bhari 😋😋🙏👌👍💐

  • @alkasarose5272
    @alkasarose5272 Рік тому +2

    Kupch Chan. Misal pav Alka Sarose🙏🙏🙏👌👌👌

  • @user-yh1ux2or1z
    @user-yh1ux2or1z Рік тому +25

    छानच! बाणाई खरंच अन्नपूर्णा आहे ❤️🌹🌹

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 4 місяці тому +3

    मुळात हे सर्व चुलीवर शिजवलेले आहे म्हणून चव एकदम मस्त झक्कास लागेल
    धन्यवाद जी

  • @creativelife1860
    @creativelife1860 8 місяців тому

    Aataparyant baghitleli sarvat best n sundar yummy 😋 misal chi recipe.. khuch chan

  • @nilamlande3912
    @nilamlande3912 Рік тому +5

    खूपच छान रेसिपी ताई....very nice 👌👌👍
    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @user-zv4hx1gy3e
    @user-zv4hx1gy3e Рік тому +4

    बानाई ताई आपण आणि आपला परिवार खुप खुप छान आणि आपण खुपचं चांगले ग्रामीण जिवनाचेआपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून दर्शन घडवितात आपले आणि आपल्या संपुर्ण परिवाराचे मनापासुन धन्यवाद आणि आभार आणि पुढील सर्व व्हिडिओ साठी हार्दिक सोनेरी स्वामीमय शुभेच्छा

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 10 місяців тому +7

    Kiti sunder disate aahe,khupch chan zali aahe,ek number❤

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 8 місяців тому +2

    गावरान पद्धतीने चुलीवर बनवलेली मिसळ, एकच नंबर झाली असेल, एकदा बनवुन पहावी वाटतय.

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 Рік тому +1

    बाणाई साक्षात अन्नपूर्णा आहे हॉटेल पेक्षाही खूप छान मिसळ बनवली

  • @radhapatil1673
    @radhapatil1673 10 місяців тому +3

    एक नंबर मिसळपाव झालं आहे ताई तुम्ही खूप छान जेवण बनवता

  • @adraambani3525
    @adraambani3525 10 місяців тому +6

    Kalipatta ulat "farfadavar" mast marathi bolatat Ani mst swaympak krtat atachya cook la pn kalya petvayla , masala vatayla kantala yeil Ani jyat kantala yeto tyanich chav yete recipe la hach raz ahe swaympakacha🙌🏻👌😍

  • @bhaskarzaware9397
    @bhaskarzaware9397 8 місяців тому +2

    Far chan misal pav recipes

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 Рік тому +1

    बाणाई आणिक तिची मिसळ व दोन्हीही लाजवाब.अन्नपूर्णा आहे खरी.

  • @SunitaChauhan-iy6no
    @SunitaChauhan-iy6no 11 місяців тому +3

    Khub Chand mast mukhya mukhya vatavaranat ekdam jabarjasth misalpav chi recipe ekadam jordar ekadam bhari banawali aahe recipe Bhagwan amcha tondala Pani suit aaya hai 👌👌👌😋😋👍🙏😊

  • @nilamvachkal4209
    @nilamvachkal4209 Рік тому +13

    बानाई ताई तुम्ही खूप छान रेसिपी बनवली👌😋👌

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 8 місяців тому +2

    माऊली 🙏

  • @vaishalijadhaav5417
    @vaishalijadhaav5417 10 місяців тому +2

    Banai agdi sugran ahes ha..khrch mst recipies banavtes.aanapurna❤

  • @starsonune9968
    @starsonune9968 8 місяців тому +4

    Aamcyakde sglya suvidha asun suddha ashi misal bnvta yenar nhi..kharch kup kup chan ani vishesh mhnj kup premal family.......agdi dolyat pani aale tumchi family bagun...thank you ...

  • @avinashdangare6676
    @avinashdangare6676 8 місяців тому +3

    खूप छान सुंदर मस्त मिसळ व तुम्ही ताई छान माहिती दिलीत. धन्य वाद नमस्कार

  • @milanrathi2390
    @milanrathi2390 10 місяців тому +2

    Mast Banawali Misalpav
    Banai Aakka
    1ch Number

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 11 місяців тому +3

    Gharachha masala mast Aahey
    Dakhava recipes

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Рік тому +54

    मस्त पैकी मिसळ लयभारी❤❤