KSHITIJ Upkram/ SAKAR Shishu Sangopan/ क्षितीज प्रकल्प/‘साकार’ सुसज्ज शिशु संगोपन गृह/ जागर पालकांचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • क्षितिज
    मराठवाड्यातील दत्तक क्षेत्रात कार्य करणारी पहिली शासनमान्य स्वयंसेवी संस्था म्हणून "साकार" १९९४ पासून कार्यरत आहे. संस्थेने आजपर्यंत ४०० हून अधिक बालकांना हक्काचे घर मिळवून दिले. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांकरिता त्यांच्या आरोग्याची, वाढ विकासाची आणि शिक्षणाची काळजी घेणारे तसेच या वयातील बालकांना दत्तकासाठी योग्य बनवणारे ‘साकार’ हे सुसज्ज शिशु संगोपन गृह आहे.
    साकार संस्थेत येणारी ९५ टक्के बाळे ही कुमारवयीन मुलींची असतात असे अभ्यासांती लक्षात आले. त्यामागची प्रमुख कारणे म्हणजे लैंगिकतेबाबत अज्ञान, उपलब्ध नसलेली आरोग्यसेवा ही आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयातली तथाकथित प्रेम प्रकरणे हे प्रामुख्याने आढळून आलेलं कारण दिसते. ह्या सर्व मुली सर्वसामान्य आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक स्तरातील आहेत. त्यामुळे साकारने क्षितीज हा प्रकल्प सुरू केला. ज्यामुळे कुमारवयीन मुलामुलींचे प्रबोधन होऊन त्यांचे लैंगिक, सामाजिक जीवन सुधारेल.
    आकाशावर लिहिन म्हणते
    क्षितीजाच्या रेषेपासून
    पाटी पुसून, पहिल्यापासून
    आज नाही, आत्तापासून
    कुमारवयीन मुला-मुलींमध्ये 'वयात येणे' म्हणजे नक्की काय असते याबद्दल अज्ञान दिसून आले. वयात आलेल्या मुलामुलींच्या पालकांचेही प्रबोधन झालेले नसल्याने पाल्यांकडून काही चुकीचे होण्याची भीती, घरात संवादाचा अभाव आणि भोवतालच्या वातावरणाच्या प्रभावातून लहान वयातच मुलींचे विवाह लावून दिले जातात. त्यामुळे "साकार"ने सर्वप्रथम किशोरवयीन मुला-मुलींसाठी 'क्षितिज' हा 'कुटुंब जीवन शिक्षणाचा' प्रकल्प पैठण तालुक्यात फेब्रुवारी २००१ मध्ये सुरू केला.
    तारूण्यात पर्दापण करताना देहभान, आत्मभान ते समाजभानापर्यंत मनात होणारा गोंधळ, येणारा ताण, चुकीच्या पर्यायामुळे आयुष्याची वाट चुकणे इत्यादींचा केलेला मनमोकळा संवाद व या सगळ्यांचे व्यवस्थापन म्हणजे आपले क्षितीज.. तुमचे हक्काचे, गरजेचे व्यासपीठ..
    'क्षितिज' या उपक्रमाद्वारे मुलामुलींना कुमार वयात होणाऱ्या शारीरिक - मानसिक बदलांची माहिती दिली जाते. ज्या प्रश्नांवर एरव्ही संवाद होत नाही त्या प्रश्नांची चर्चा घडवून आणली जाते. तसेच क्षणिक मोहाला बळी पडून मुलींचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणार नाही यासाठी जनजागृती करण्यावर या प्रकल्पात भर दिला जातो. यास शाळांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
    मी मोठी की लहान? आई म्हणते मोठी झालीस तू
    बाबा रात्री बाहेर जाऊ देत नाहीत
    म्हणतात अजून लहान आहेस तू!
    पालकांनी निर्माण केलेल्या या गोंधळातून पाल्यांची सुटका होणे गरजेचे वाटले म्हणून पालकांनाही त्यांच्या पाल्यातील वयानुरुप होणाऱ्या बदलांबाबत जागृत करणे आवश्यक वाटल्याने 'जागर पालकांचा' हा उपक्रम उदयास आला. शहरी आणि ग्रामीण भागातील पालकही आता या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ह्या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. तसेच तीन हजार पालकांचेही क्षितिजच्या माध्यमातून उदबोधन झाले आहे. पालकांसह शिक्षकांनाही आता क्षितिज प्रकल्पाचे महत्त्व वाटू लागले. त्यामुळे क्षितिजने पाल्य व पालकांच्या सत्राबरोबरच शिक्षकांचेही उदबोधन सत्र घेण्यास सुरुवात केली.
    'क्षितिज' चा हा प्रवास एका लहानशा संकल्पनेतून सुरू झाला असला तरी, आता त्याची वाटचाल किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिकता, राष्ट्रभावना निर्माण करून सुजाण नागरिक घडाविण्याकडे झाली आहे. यापुढे क्षितिज प्रकल्पांतर्गत विकसित झालेल्या कार्यक्रमात ५ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थी आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उ‌दबोधन कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधून सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यात पालकांचा आणि शिक्षकांचा सक्रीय सहभाग लाभत आहे. तो आणखी वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
    'साकार' होतो इंद्रधनुष्य
    क्षितिजाच्या पटलावर,
    बदल असतो स्वाभाविक
    खरे मनाला पटल्यावर !
    त्या बदलासाठी एकीने
    समर्थपणे चालूया,
    काळ आहे बोलका हा
    आपण काळाशी बोलूया.

КОМЕНТАРІ •