Samadhan Ingle
Samadhan Ingle
  • 193
  • 132 975
KSHITIJ Upkram/ SAKAR Shishu Sangopan/ क्षितीज प्रकल्प/‘साकार’ सुसज्ज शिशु संगोपन गृह/ जागर पालकांचा
क्षितिज
मराठवाड्यातील दत्तक क्षेत्रात कार्य करणारी पहिली शासनमान्य स्वयंसेवी संस्था म्हणून "साकार" १९९४ पासून कार्यरत आहे. संस्थेने आजपर्यंत ४०० हून अधिक बालकांना हक्काचे घर मिळवून दिले. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांकरिता त्यांच्या आरोग्याची, वाढ विकासाची आणि शिक्षणाची काळजी घेणारे तसेच या वयातील बालकांना दत्तकासाठी योग्य बनवणारे ‘साकार’ हे सुसज्ज शिशु संगोपन गृह आहे.
साकार संस्थेत येणारी ९५ टक्के बाळे ही कुमारवयीन मुलींची असतात असे अभ्यासांती लक्षात आले. त्यामागची प्रमुख कारणे म्हणजे लैंगिकतेबाबत अज्ञान, उपलब्ध नसलेली आरोग्यसेवा ही आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयातली तथाकथित प्रेम प्रकरणे हे प्रामुख्याने आढळून आलेलं कारण दिसते. ह्या सर्व मुली सर्वसामान्य आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक स्तरातील आहेत. त्यामुळे साकारने क्षितीज हा प्रकल्प सुरू केला. ज्यामुळे कुमारवयीन मुलामुलींचे प्रबोधन होऊन त्यांचे लैंगिक, सामाजिक जीवन सुधारेल.
आकाशावर लिहिन म्हणते
क्षितीजाच्या रेषेपासून
पाटी पुसून, पहिल्यापासून
आज नाही, आत्तापासून
कुमारवयीन मुला-मुलींमध्ये 'वयात येणे' म्हणजे नक्की काय असते याबद्दल अज्ञान दिसून आले. वयात आलेल्या मुलामुलींच्या पालकांचेही प्रबोधन झालेले नसल्याने पाल्यांकडून काही चुकीचे होण्याची भीती, घरात संवादाचा अभाव आणि भोवतालच्या वातावरणाच्या प्रभावातून लहान वयातच मुलींचे विवाह लावून दिले जातात. त्यामुळे "साकार"ने सर्वप्रथम किशोरवयीन मुला-मुलींसाठी 'क्षितिज' हा 'कुटुंब जीवन शिक्षणाचा' प्रकल्प पैठण तालुक्यात फेब्रुवारी २००१ मध्ये सुरू केला.
तारूण्यात पर्दापण करताना देहभान, आत्मभान ते समाजभानापर्यंत मनात होणारा गोंधळ, येणारा ताण, चुकीच्या पर्यायामुळे आयुष्याची वाट चुकणे इत्यादींचा केलेला मनमोकळा संवाद व या सगळ्यांचे व्यवस्थापन म्हणजे आपले क्षितीज.. तुमचे हक्काचे, गरजेचे व्यासपीठ..
'क्षितिज' या उपक्रमाद्वारे मुलामुलींना कुमार वयात होणाऱ्या शारीरिक - मानसिक बदलांची माहिती दिली जाते. ज्या प्रश्नांवर एरव्ही संवाद होत नाही त्या प्रश्नांची चर्चा घडवून आणली जाते. तसेच क्षणिक मोहाला बळी पडून मुलींचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणार नाही यासाठी जनजागृती करण्यावर या प्रकल्पात भर दिला जातो. यास शाळांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
मी मोठी की लहान? आई म्हणते मोठी झालीस तू
बाबा रात्री बाहेर जाऊ देत नाहीत
म्हणतात अजून लहान आहेस तू!
पालकांनी निर्माण केलेल्या या गोंधळातून पाल्यांची सुटका होणे गरजेचे वाटले म्हणून पालकांनाही त्यांच्या पाल्यातील वयानुरुप होणाऱ्या बदलांबाबत जागृत करणे आवश्यक वाटल्याने 'जागर पालकांचा' हा उपक्रम उदयास आला. शहरी आणि ग्रामीण भागातील पालकही आता या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ह्या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. तसेच तीन हजार पालकांचेही क्षितिजच्या माध्यमातून उदबोधन झाले आहे. पालकांसह शिक्षकांनाही आता क्षितिज प्रकल्पाचे महत्त्व वाटू लागले. त्यामुळे क्षितिजने पाल्य व पालकांच्या सत्राबरोबरच शिक्षकांचेही उदबोधन सत्र घेण्यास सुरुवात केली.
'क्षितिज' चा हा प्रवास एका लहानशा संकल्पनेतून सुरू झाला असला तरी, आता त्याची वाटचाल किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिकता, राष्ट्रभावना निर्माण करून सुजाण नागरिक घडाविण्याकडे झाली आहे. यापुढे क्षितिज प्रकल्पांतर्गत विकसित झालेल्या कार्यक्रमात ५ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थी आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उ‌दबोधन कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधून सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यात पालकांचा आणि शिक्षकांचा सक्रीय सहभाग लाभत आहे. तो आणखी वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
'साकार' होतो इंद्रधनुष्य
क्षितिजाच्या पटलावर,
बदल असतो स्वाभाविक
खरे मनाला पटल्यावर !
त्या बदलासाठी एकीने
समर्थपणे चालूया,
काळ आहे बोलका हा
आपण काळाशी बोलूया.
Переглядів: 45

Відео

डॉ.ऋषिकेश कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत) सुनील उबाळे यांच्या 'उलट्या कडीचे घर' कवितेवर भाष्य
Переглядів 72Місяць тому
Dr Rushikesh Kamble/ Ultya Kadiche Ghar अध्यक्षीय समारोप - डॉ. ऋषिकेश कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत) कवी सुनील उबाळे यांचे 'उलट्या कडीचे घर' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य केले. संपूर्ण भाषण ऐकायला हवे..
भाष्य : कवी पी. विठ्ठल (सुप्रसिद्ध कवी- लेखक) सुनील उबाळे यांच्या बहुचर्चित 'उलट्या कडीचे घर' कविता
Переглядів 204Місяць тому
P. Vitthal Ultya Kadiche Ghar/ Sunil Ubale Kavita भाष्यकार - कवी डॉ. पी. विठ्ठल (सुप्रसिद्ध कवी- लेखक) कवी सुनील उबाळे यांच्या बहुचर्चित 'उलट्या कडीचे घर' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने केलेले संपूर्ण भाष्य इथे दिलेले आहे.
Lalita Gadge Ultya Kadiche Ghar
Переглядів 58Місяць тому
Lalita Gadge/ Ultya Kadiche Ghar
Ravi Korde Ultya Kadiche Ghar Kavy Sangrah Prakashan
Переглядів 117Місяць тому
Ravi Korde Ultya Kadiche Ghar Kavy Sangrah Prakashan
Sunil Ubale Ultya Kadiche Ghar Kavita Sangrah Prakashan
Переглядів 72Місяць тому
Sunil Ubale Ultya Kadiche Ghar Kavita Sangrah Prakashan
Asai Melava Sambhaji Maharaj Jayanti ||#sambhajimaharaj #melava #trending
Переглядів 2912 місяці тому
Asai Melava Sambhaji Maharaj Jayanti ||#sambhajimaharaj #melava #trending
पुस्तकचर्चा भाग 2 -केरळ मधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य- डॉ.ऋषिकेश कांबळे, डॉ.बजरंग बिहारी तिवारी
Переглядів 1294 місяці тому
प्रगतिशील लेखक संघ आणि महात्मा गांधी स्मारक निधी केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित 'माझे लेखन माझी भूमिका' या सदरात हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत डॉ. बजरंग बिहारी तिवारी लिखित आणि अरविंद सुरवाडे अनुवादित 'केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य' या बहुचर्चित पुस्तकावर चर्चा रविवार, दि. १० मार्च २०१४ - सायंकाळी ६ वाजता अध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो (संचालक, लोकवाङमय गृह, मुंबई) ...
केरळ मधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य- डॉ. सुधाकर शेंडगे आणि डॉ. दिलीप चव्हाण यांची भाषणे
Переглядів 1204 місяці тому
केरळ मधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य- डॉ. सुधाकर शेंडगे आणि डॉ. दिलीप चव्हाण यांची भाषणे प्रगतिशील लेखक संघ आणि महात्मा गांधी स्मारक निधी केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित 'माझे लेखन माझी भूमिका' या सदरात हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत डॉ. बजरंग बिहारी तिवारी लिखित आणि अरविंद सुरवाडे अनुवादित 'केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य' या बहुचर्चित पुस्तकावर चर्चा रविवार, दि...
कवितादिन २०२४- कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे अभिवाचन. मराठवाडा साहित्य परिषदेचे आयोजन
Переглядів 2434 місяці тому
कवितादिन २०२४- कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे अभिवाचन. मराठवाडा साहित्य परिषदेचे आयोजन समाधान इंगळे, ललित अधाने, आशा डांगे, मेघना गोरे- मनगटे आणि दिपाली कुलकर्णी
Asai Shivjayanti 2024 गावची शिवजयंती..आसई- नभाने घेतलेले व्हिडिओ
Переглядів 1744 місяці тому
Asai Shivjayanti 2024 गावची शिवजयंती..आसई- नभाने घेतलेले व्हिडिओ
घंटा - मराठी कविता/ कवी समाधान इंगळे/ Ghanta - Marathi Poem/Samadhan Ingle
Переглядів 1885 місяців тому
घंटा ती मला पाहताना एवढी काही लाजायची नेम नेमका चुकत गेला तेव्हाच घंटा वाजायची असे नेम कित्येक चुकले पण नित्यनेमे प्रयत्न केला शाळेमध्ये बोंब उडाली आपला घंटा कोठे गेला? घंट्याच्या शोधासाठी बराच प्रयत्न करून झाला मी तिला बोलून गेलो मीच तो चोरून नेला घंट्यासाठी हेडसरांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले शाळा सुटत नाही म्हणून सारेच रडकुंडीला आले ती म्हणाली घंटा नाही तर शाळा केव्हा सुटायची मी म्हणालो हीच ...
चौपाटी बनवायला पाहिजे/कविता/समाधान इंगळे/Chaipati Banvayla Pahije/Poem/Samadhan Ingle मराठी कविता
Переглядів 1375 місяців тому
चौपाटी ना छोटी बनवायला पाहिजे ना मोठी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी आमच्या शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे कुणीही या कितीही वेळ बसा गळ्यात गळे घालून रडा नाहीतर गुदगुल्या करून हसा 'प्रेमवाल्यांसाठी स्पेशल' अशी पाटी बनवायला पाहिजे आपल्यालाच आपल्या माणसाशी मनमोकळं बोलता येत नाही हातात हात धरून तर सोडाच अंतर ठेवूनही चालता येत नाही अशा प्रेम रुग्णांसाठी एक 'घाटी' बनवायला पाहिजे गार्डनमध्ये चोरून जाव...
कॉ.अण्णाभाऊ साठे आणि मुन्शी प्रेमचंद जयंती विशेष व्याख्यान/ Com. Annabhau Sathe & Premchand Jayanti
Переглядів 3711 місяців тому
कॉ.अण्णाभाऊ साठे आणि मुन्शी प्रेमचंद जयंती विशेष व्याख्यान/ Com. Annabhau Sathe & Premchand Jayanti
नभा इंगळे/ गंमत जंमत/ बाल साहित्य दरबार मध्ये पाऊस हा निबंध/ पाऊसगीते/ आकाशवाणी औरंगाबाद
Переглядів 12611 місяців тому
नभा इंगळे/ गंमत जंमत/ बाल साहित्य दरबार मध्ये पाऊस हा निबंध/ पाऊसगीते/ आकाशवाणी औरंगाबाद
फिन्द्री सुनीता बोर्डे 'माझे लेखन माझी भूमिका'
Переглядів 19411 місяців тому
फिन्द्री सुनीता बोर्डे 'माझे लेखन माझी भूमिका'
राज रणधीर यांची गजल/ Gazal Raj Randhir प्रगतिशील लेखक संघ राज्य अधिवेशन टेंभुर्णी, कविसंमेलन
Переглядів 36Рік тому
राज रणधीर यांची गजल/ Gazal Raj Randhir प्रगतिशील लेखक संघ राज्य अधिवेशन टेंभुर्णी, कविसंमेलन
पोवाडा/ Powada सावित्रीबाई फुले/ Savitribai Phule
Переглядів 347Рік тому
पोवाडा/ Powada सावित्रीबाई फुले/ Savitribai Phule
कवी सुनील उबाळे/ काव्यवाचन आणि मनोगत/ स्वागत कार्यक्रम - मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
Переглядів 84Рік тому
कवी सुनील उबाळे/ काव्यवाचन आणि मनोगत/ स्वागत कार्यक्रम - मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
आता ऊठवू सारे रान/ IPTA गायन-वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची
Переглядів 161Рік тому
आता ऊठवू सारे रान/ IPTA गायन-वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची
चांदण्याची छाया/ कवी वामनदादा कर्डक/ नक्षत्र बुद्ध संध्या/ नभा इंगळे/ समाधान इंगळे
Переглядів 659Рік тому
चांदण्याची छाया/ कवी वामनदादा कर्डक/ नक्षत्र बुद्ध संध्या/ नभा इंगळे/ समाधान इंगळे
बल्लीसिंह चिमा/ ले मशाले चल पडे हैं लोग मेरे गांव के/ गाणी चळवळीची/ इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर
Переглядів 76Рік тому
बल्लीसिंह चिमा/ ले मशाले चल पडे हैं लोग मेरे गांव के/ गाणी चळवळीची/ इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर
सत्य सर्वांचे आदि घर- इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
Переглядів 89Рік тому
सत्य सर्वांचे आदि घर- इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
आता उठवू सारे रान- इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
Переглядів 62Рік тому
आता उठवू सारे रान- इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
ले मशाले चल पडे हैं- इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
Переглядів 63Рік тому
ले मशाले चल पडे हैं- इप्टा गायन वादन प्रशिक्षण शिबिर/ गाणी चळवळीची/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
गीत गा रहे है आज हम ग्रुप सॉंग गायन वादन प्रशिक्षण शिबीर/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
Переглядів 108Рік тому
गीत गा रहे है आज हम ग्रुप सॉंग गायन वादन प्रशिक्षण शिबीर/ सब गायेंगे सब बजायेंगे मिशन
माझं सोन्याचं शेत आज गातया गाणं- समाधान इंगळे कविता/ गाणी/ संगीत/ सादरीकरण
Переглядів 417Рік тому
माझं सोन्याचं शेत आज गातया गाणं- समाधान इंगळे कविता/ गाणी/ संगीत/ सादरीकरण
गर्जा शिवाजी राजा/ शिव लोकगीत/ Garja Shivaji Raja/ folk music/ traditional Marathi folk
Переглядів 250Рік тому
गर्जा शिवाजी राजा/ शिव लोकगीत/ Garja Shivaji Raja/ folk music/ traditional Marathi folk
संत कबीर जी के दोहे/ समाधान इंगळे/ Sant Kabir ji ke dohe/ Samadhan Ingle
Переглядів 91Рік тому
संत कबीर जी के दोहे/ समाधान इंगळे/ Sant Kabir ji ke dohe/ Samadhan Ingle
अखंड/ सत्य सर्वांचे आदी घर/ महात्मा फुले/ Mahatma Phule/ Satya sarvanche aadi Ghar/ Akhand/ Samadhan
Переглядів 240Рік тому
अखंड/ सत्य सर्वांचे आदी घर/ महात्मा फुले/ Mahatma Phule/ Satya sarvanche aadi Ghar/ Akhand/ Samadhan

КОМЕНТАРІ