'हरित रसायनशास्त्र' या शाखेतील संशोधनाचे महत्त्व सांगताहेत माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • निपाणीचे सुपुत्र, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' सन २०२२ पासून ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला समर्पित आहे. या व्याख्यानमालेत यंदाच्या तिसऱ्या वर्षीचे पहिले पुष्प गुंफताहेत प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिवाजी विद्यापीठासह भारतातील पाच महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविणारे प्रा. (डॉ.) माणिकराव साळुंखे. डॉ. साळुंखे हे ‘हरित रसायनशास्त्र’ या विषयातील अध्ययन, अध्यापन आणि संशोधन तसेच या विषयाची प्रस्तुतता या अनुषंगाने सदर व्याख्यानामध्ये प्रकाश टाकताहेत. विज्ञानाच्या या संशोधन शाखेचे महत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने हे व्याख्यान सर्वच घटकांसाठी उपयुक्त स्वरुपाचे आहे.
    #drbhalchandrakakade #drmanikraosalunkhe #dralokjatratkar #greenchemistry #greenchemistryinmarathi

КОМЕНТАРІ •