'आविष्कार जल-अभियांत्रिकीचा!' या महत्त्वाच्या शाखेची माहिती देताहेत प्रख्यात जलअभियंते विनय कुलकर्णी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • निपाणीचे सुपुत्र, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' सन २०२२ पासून ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला समर्पित आहे. या व्याख्यानमालेत यंदा तिसऱ्या वर्षीचे दुसरे पुष्प गुंफताहेत प्रख्यात जल-अभियंते श्री. विनय कुलकर्णी. श्री. कुलकर्णी हे टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि., पुणे या कंपनीत उप-सरव्यवस्थापक पदावर कार्यरत असून गेल्या वीस वर्षांहून अधिक काळच्या कारकीर्दीत त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या स्थापत्य, विशेषतः जल-अभियांत्रिकी प्रकल्पांवर काम केले आहे. या व्याख्यानमालेमध्ये श्री. कुलकर्णी हे 'आविष्कार जल-अभियांत्रिकीचा' या विषयावर मांडणी करत आहेत. जल-अभियांत्रिकी या शाखेचे वेगळेपण, महत्त्व, वैशिष्ट्ये आणि त्यामधील करिअरच्या संधी या अनुषंगाने त्यांचे मार्गदर्शन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांसाठी महत्त्वपूर्ण स्वरुपाचे आहे.
    #dralokjatratkar #vinaykulkarni #hydroprojects #watermanagement #hydroengineering #water #waterproject

КОМЕНТАРІ • 1