सुरेश भट : एल्गार ( गझल ) भाग 2 Elgaar Part 2 of 2 : Original & Very Rare recording

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2021
  • #SureshBhat #Elgaar #Gazal
    सुरेश भट : एल्गार ( गझल ) भाग 2 Elgaar Part 2 of 2 : Original & Very Rare recording with Various Rare photographs of memorable moments .
    Suresh Bhat (Marathi: सुरेश भट; 15 April 1932 - 14 March 2003) was a noted Marathi poet from the state of Maharashtra, India. He was known as Ghazal Samrat (Emperor of ghazals) for his exposition of the ghazal form of poetry and its adaptation to the Marathi language. Bhat published his first collection of poems, Roopgandha in 1961. In 1974, he published his second collection, Ranga maazhaa wegalaa and in 1983 he self-published a collection named Elgaar. Bhat's poems are generally classified as Marathi ghazals. He is considered a pioneer in adapting the ghazal (which originated as a Persian form of poetry) to the Marathi language.
    एल्गार म्हणजे 'जोराचा हल्ला'. अगदी नावाप्रमाणेच या काव्यसंग्रहात सुरेश भटांनी आपल्या धारदार लेखणीने अवतीभवती घडणार्‍या घटनांवर प्रभावीपणे भाष्य केले आहे. काव्यसंग्रहाच्या प्रारंभीच आपली भूमिका विशद करताना ते म्हणतात...
    "साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
    हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही !"
    जीवनाचे समग्र सारच जणू त्यांनी या काव्यसंग्रहात मांडले आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली जाती व्यवस्था असो किंवा शिकूनही नोकरीच्या शोधात पायपीट करणारी तरुणाई. प्रत्येक विषयाला सुरेश भट यांनी योग्य न्याय दिला आहे.जितक्या ताकदीने ते सामाजिक विषयांवर लिहतात तितक्याच हळुवारपणे ते आपल्या सखीशी, प्रेयसीशी हितगुज करताना दिसून येतात. एकच व्यक्ती सणसणीत टोला लगावणारी आणि अंगावर मोरपीस फिरवल्यागत वाटणारी कविता कशी काय लिहू शकते, हा विचार एल्गार काव्यसंग्रह वाचणाऱ्याला बुचकळ्यात टाकतो. यातून सुरेश भटांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. त्यांची कविता किंवा गझल कुठल्याही एका विशिष्ट विषयापुरती मर्यादित नाही. तिचा सर्वत्र विस्तार झाला आहे. इतकी वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या काव्यात आजही तेच नाविन्य जाणवते. त्यांच्या शेरांचे संदर्भ आजही जसेच्या तसे लागू पडतात. त्यांची कविता कालातीत आहे.
    सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.त्यांना दोन मुले . हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी मृत्यू झाला.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 6

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 2 роки тому +4

    Maze ! Aamche he Gazale che prerana kendra ! 🥉🥉🥉

  • @engineerscom-vz3ty
    @engineerscom-vz3ty 2 роки тому +3

    खूप छान..
    ऊपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Рік тому

    मराठीतील सर्वश्रेष्ठ गझल सम्राट सुरेश भट यांच्या कविता आणि गझलांचा कार्यक्रम 'एल्गार' ह्याची दुर्मिळ ध्वनिफित उपलब्ध करून दील्या बदल शतशः आभार. ‌ही माझ्यासाठी अविस्मरणीय अशी स्वर्गीय अनुभूती झाली आहे.
    माझ्यासाठी आजी सोनियांचा दिनू आहे.माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. मनःपूर्वक शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravindrakhetle9029
    @ravindrakhetle9029 2 роки тому

    निव्वळ अप्रतिम, असा खजिना रसिकांसाठी खुला केल्याबद्दल धन्यवाद

  • @sureshmogarnekar4593
    @sureshmogarnekar4593 Рік тому

    Excellent.

  • @gaytripawar8757
    @gaytripawar8757 2 роки тому

    Thnx