Oratory । Raju Parulekar । How to become a speaker । वक्तृत्व शिकता येतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2022
  • हल्ली अनेक ठिकाणी आपल्याला 'वक्ता कसे बनावे' हे शिकवणारे क्लास सुरू झालेले पाहायला मिळतं. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परूळेकर हे उत्तम लिहितातच शिवाय ते उत्तम वक्ते देखील आहेत. त्यांनी वक्तृत्वाची कला कशी अवगत केली? त्यांनी कुठला क्लास लावला होता का ? त्यांना 'कसं बोलावं' हे कोणी शिकवलं? असा अनेकांना प्रश्न पडतो.
    'मनातलं' च्या व्हिडीओंना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये 'तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही माझ्या जे मनात होतं ते बोललात' अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात. राजू परुळेकर यांना हजारो, लाखो लोकांसमोर भाषण करणं, व्याख्यानं देणं हे कसं जमतं? त्याचं उत्तर त्यांनी स्वत:च दिलं आहे. यामुळे हा व्हिडीओ तुमच्या सगळ्या आवडणाऱ्या व्यक्तींपर्यंत आणि खासकरून वक्ता बनण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहचवा. त्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ शेअर करू शकता.
    राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

КОМЕНТАРІ • 69

  • @theinsider1
    @theinsider1  10 місяців тому

    ua-cam.com/video/pL5L7b4HRXo/v-deo.html

  • @dr.mrudulkumbhojkar2778
    @dr.mrudulkumbhojkar2778 2 роки тому +14

    मनातलं... ही series प्रचंड आवडलीय... मन लावून ऐकावंसं वाटतं असं बोलणं जर कोणाचं असेल तर ते फक्त raju sir. 😌...!

  • @vpark1
    @vpark1 2 роки тому +6

    'वक्ता' आणि 'उत्फूर्तता' हे एक समीकरणच आहे.'उत्तम वक्तृत्व' म्हणजे दुसर्याच्या काळजाला हात घालण्याची कला.वक्त्याच्या हृदयातून निघालेल्या बाणाने थेट श्रोत्याच्या काळजाचा ठाव घेणं इत्यादि इत्यादि म्हणजे 'वक्तृत्व'.पण प्रत्येकालाच हे जमतंच असं नाही.वक्ता हा जन्माला यावा लागतो.म्हणूनच काही जण उत्तम वक्ते असतात तर काहीजण उत्तम श्रोते असतात.बाकीचे अध्येमध्ये घुटमळत असतात.'उत्तम वक्तृत्व' ही एक कला आहे.कुठलीही कला काही प्रमाणात कष्टसाध्य असली तरी प्रत्येक व्यक्ती कसलेला कलाकार होऊ शकत नाही.पाठ्यपुस्तकात डेमाॅस्थेनिसची वगैरे उदाहरणे वाचली असली तरी स्वानुभवाने हेच सांगावेसे वाटते की वक्तृत्वकला ही उपजत देणगी आहे.व ती साधण्यासाठी एकतर ज्ञान हवे किंवा अंतरीची तळमळ हवी.या दोन बाबी असतील तर आणि तरच माणूस 'बोलू' शकतो अन्यथा तो मुखदुर्बळ बनून राहतो.कारण 'वक्तृत्वासाठी' लागणारा आत्मविश्वास या दोन्हींतून येतो.तसंच अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे 'सराव किंवा अनुभव'.जितका सराव जास्त तितका माणूस अधिक सरावतो व पुढे सरसावतो.रसवंती स्त्रवण्यासाठी सरस्वती प्रसन्न असण्याची आवश्यकता नसली तरी विचारांची पक्की बैठक असावीच लागते.'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' असे करून चालत नाही.अशा व्यक्तीला लोक स्वीकारत नाहीत.ह्या कलेचा वरदहस्त होता व ज्ञानाची, माहितीची शिदोरी होती म्हणूनच आपण ओघवत्या शैलीत उत्तम वक्तृत्व करू शकता.ज्याला तीव्र इच्छा असेल तो वक्तृत्व थोडेफार शिकू शकतो परंतु पकड घेऊ शकत नाही व स्वतः शिकण्यासाठी प्रत्येकाकडे एकलव्याची जबर निष्ठा व चिकाटी असेलच असं नाही.
    इथेच गुरूंचा हस्तक्षेप येतो.पाठीवर हात ठेवून फक्त 'लढ' असं म्हणायला कुणीतरी लागतं. चुका सुधारायला कुणीतरी लागतं.( इथे मी गल्लीबोळात दुकानं उघडून बसलेल्या गल्लेभरू क्लासेसबद्दल बोलत नाही तर तळमळीने मार्गदर्शन करणार्या अध्यापकांबद्दल बोलतेय).आत्मविश्वास वाढवणारी वातावरणनिर्मिती लागते.(हे सगळं नशीबाने लाभलं तर ठीक अन्यथा 'एकलव्य' बनण्यावाचून गत्यंतर नसते).पण 'वक्तृत्व' हे रक्तात असावं लागतं, ते धमन्यांतून वहावं लागतं.व याकरता मार्गदर्शनाची गरज नसती तर आपला हा व्हिडीओ आपण बनवलाच नसता.
    बाकी आपल्या प्रत्येक मताशी पूर्णपणे सहमत आहे.अत्यंत सुंदर,विचारांना चालना देणारे व्हिडीओज असतात.
    लहान तोंडी मोठा घास घेतला असल्यास क्षमस्व!
    तुमच्यासारखंच हीदेखील माझ्या मंकी 'मन की बात'!..😃😃

    • @VaibhavBVaim
      @VaibhavBVaim 2 роки тому +1

      हे खूप व्यवस्थित मांडले आहे, पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत वक्तृत्वासाठी.. धन्यवाद

    • @vpark1
      @vpark1 2 роки тому

      @@VaibhavBVaim इथे लिहायला मर्यादा पडतात.धन्यवाद 😊🙏

    • @VaibhavBVaim
      @VaibhavBVaim 2 роки тому +1

      हो बरोबर

    • @ninad9960
      @ninad9960 Рік тому +1

      @@vpark1 ithech Liha Purna , avadel vachayla ani sapdel suddha

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 3 місяці тому

    Raju ji mi tumcha fan aahe tumcha nishpaksh patrakarita baddal u r clear hearted person

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 10 місяців тому +2

    'वक्तृत्व शिकता येत नाही किंवा शिकवता येत नाही 'असं म्हणता म्हणता वक्ता कसा व्हावा हेच शिकवलंत, छानचं!

  • @adv.prashant
    @adv.prashant 2 роки тому +5

    *भीती बाहेर नाही, आत असते, great thought* 👌👍

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 2 роки тому +3

    अप्रतीम.. जे बोलायचं ते भिडल पाहीजे... त्यासाठी उक्ती आणि कृतीत मेळ हवा

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Рік тому +1

    उत्कृष्ट विश्लेषण. वत्कृत्व ही उपजत देणगी असून ते सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. आम्ही पर्वी बाबासाहेब भोसले, राम शेवाळकर यांची खूप व्याख्याने ऐकली आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी नवविध भक्ती मध्ये "श्रवण" भक्तीचे महत्व विशद केले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, माणसाने हुशार होण्याकरता व्याख्याने ऐकली पाहिजेत कारण पुस्तके वाचण्यापेक्षा थोर वक्त्याची व्याख्याने ऐकली की, त्यांचे विचार लवकर समजतात.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 2 роки тому +1

    मनातल या तुमच्या सिरीज्मुळे माझ्या विचारात फार मोठे बदल झाले.....मनापासून आभार सर

  • @balasaheb2827
    @balasaheb2827 2 роки тому +1

    सर तुमची एखादा विषय समजून सांगण्याची जी कला आहे ना ती एकदम अप्रतिम आहे . साध्या सुटसुटीत भाषेत सांगण ...Great .

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas5675 2 роки тому +1

    समोरच्या माणसाच्या उपयोगाकरिता आपल्याकडे असलेली माहिती सहज व्यक्त करणे हे उत्तम वक्तृत्व म्हणता येईल. त्याचा आदर्श राजू सर आपण आहात. धन्यवाद

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 3 місяці тому

    खुप छान 😅 👌👍

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 Рік тому +1

    संस्कृत श्लोकांमध्ये ज्ञान नसते, ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली आहे.

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Рік тому +1

    Khupach vidvan manus...ase lok far Kami ahet...Raju sir we respect u and salute you

  • @shelakeba3924
    @shelakeba3924 Рік тому +2

    मी ही एक ऑनलाईन क्लास लावला होता, आता तुमचे आयकले आता झालेला क्लास आणि त्यातील गमती आठवल्या आणि माझ्यावरच हसलो अत्ता 😂

  • @sameerjadhav4532
    @sameerjadhav4532 Рік тому +1

    खूप छान सांगितलं सर तुम्ही 👌

  • @dhananjaydeshmukh8466
    @dhananjaydeshmukh8466 2 роки тому +1

    असं बऱ्याचदा होतं की आपण चार-पाच मित्राबरोबर विविध विषयांवर छान गप्पामारतो, चर्चा करतो पण हिच गोष्ट तेच मित्र समोर बसले असतील आणि फक्त तुम्हीच स्टेज वर असाल तेव्हा दडपण येतं...विषयाबद्दल माहिती असताना सुध्दा प्रभावी पणे मांडता येत नाही आणि मांडणी चुकल्यामुळे विषय भरकटत जातो किंवा त्या विषयाबद्दल समोरच्याना माहिती देता येत नाही.

  • @kamaluddinmapari4026
    @kamaluddinmapari4026 2 роки тому +1

    Khara ahe khub bare watle

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 Рік тому

    मनातलं...या विषयावरील आपण खोलवर अनुभवलेला अनुभव फार सविस्तरपणे कथन केला, खूप आवडला तसेच या विषयावर विचार करायला लावणारा, खूपच छान विषय.

  • @sameerkadam3689
    @sameerkadam3689 10 місяців тому

    सुंदर आणि सुरेख... मनापासुन 👌

  • @pradipshinde2175
    @pradipshinde2175 2 роки тому +1

    Its excellent.. Sir.. Nice.. Information...

  • @shilparevale83
    @shilparevale83 Рік тому

    अगदी बरोबर

  • @mamtaramteke9695
    @mamtaramteke9695 2 роки тому

    khupach mahatvache

  • @suhasshinde5705
    @suhasshinde5705 2 роки тому

    खुप सुंदर सर... 🙏

  • @cookwithgrandma123
    @cookwithgrandma123 Рік тому +1

    खूप छान..

  • @amitrathod6947
    @amitrathod6947 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद सर !

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Рік тому

    खुप छान माहिती सर

  • @ganeshchavan7928
    @ganeshchavan7928 Рік тому

    खूप छान सरजी 🙏

  • @milindraut4675
    @milindraut4675 Рік тому

    सर तुम्ही छान बोलता.
    Thank u.

  • @VikSangle
    @VikSangle Рік тому

    Khup chan

  • @sarwarshaikh1417
    @sarwarshaikh1417 Рік тому

    💞🇮🇳
    Nice series Sir 🌹
    May Parameshwar-Allah bless you 🤲

  • @sonbasalve3919
    @sonbasalve3919 2 роки тому

    Excellent clarification about one's own knowledge. We should accept ourselves. You are absolutely right Sir.

  • @charvaktv7035
    @charvaktv7035 11 місяців тому

    वास्तविक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sunilpatil7621
    @sunilpatil7621 Рік тому

    Hello Sir- I wanted to meet you along with my son and daughter. You are amazing personality..

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP 2 роки тому

    Thank you

  • @deepakbakshi1920
    @deepakbakshi1920 2 роки тому

    खूप छान

  • @mikhaw
    @mikhaw 8 місяців тому

    Beautiful explanation Sir.....it's about accepting yourself and your limits....after that there is no fear

  • @prashikamore5432
    @prashikamore5432 2 роки тому

    Khup chan tumhi patakshy bolta yeil tya badal.nakki.tumchya mulakhati chan astat

  • @pratikkute5357
    @pratikkute5357 2 роки тому

    अंतर्मनाचा वेध घेणारा व्हिडिओ

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 роки тому +1

    🙏🙏💐💐🙂🙂

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 2 роки тому +2

    सोपं आहे पण अवघड सुद्धा

  • @user-be4kh9cg3k
    @user-be4kh9cg3k 2 роки тому

    मस्त दिसतो

  • @alkaakolkar3257
    @alkaakolkar3257 2 роки тому

    Namaste

  • @ashokbade4060
    @ashokbade4060 2 роки тому +2

    पण भाषण कला ही सरावाने सुधारते हे सत्यही आपण नाकारू शकत नाही

  • @amitdeokar375
    @amitdeokar375 2 роки тому +2

    केवळ खोलवर अभ्यासच नव्हे
    तर स्वतःच चिंतन किंवा insights / observation
    तुमच्या बोलण्यात जाणवतात.
    दाद देण्याजोगी सहजता...
    हे विषय घेता आले तर बघा plz
    ध्यान /बुद्ध
    आहार /अन्न आणि त्याच मार्केटिंग
    Fitness industry
    जगण्याचा हेतू ..
    आवडती पुस्तक ... क्रमशः...

  • @user-be4kh9cg3k
    @user-be4kh9cg3k 2 роки тому

    12:43

  • @pavansutar1624
    @pavansutar1624 2 роки тому +1

    माहिती खूप असते पण प्रत्येक्षात ती उत्रवता येत नाही सर ....

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 7 місяців тому +1

    While Hitler was a skilled orator, it is widely acknowledged that he was not a good human being.

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Рік тому

    Haay rabba mai mrr jaau

  • @aa6520
    @aa6520 2 роки тому

    Basic gosht sangitali

  • @sagarkondekar5858
    @sagarkondekar5858 Рік тому

    लहान बाळाला आई एक घास चिवुचा म्हणून बावा ईल खा अस कुणाची तरी भीती घालते आणि बाळाला खाऊ घालते तो बावा अनेक रुपाने मनात असतो.

  • @Avinash.Solunke
    @Avinash.Solunke Рік тому +1

    सर त्या नगरसेविकांना आपण काही शिकवलं का नाही?
    #असच

  • @dnyan_man
    @dnyan_man 2 роки тому +2

    मी दोन mail केलेत अजून काही प्रतिक्रिया नाहीत मनात उगाच विचार येतो, माझे विचार अपरिपक्व असावेत.

    • @vpark1
      @vpark1 2 роки тому +1

      मलादेखील 'मेल आय डी' अस्तित्वात नाही असा मेसेज येतो.म्हणून मग इथेच लिहीते.आपण वाईट वाटून घेऊ नका.

    • @dnyan_man
      @dnyan_man 2 роки тому +1

      @@vpark1 नाही वाईट वगैरे काही वाटत नाही😅

    • @vpark1
      @vpark1 2 роки тому +1

      @@dnyan_man झकास 😃

    • @HrushikeshShrotriya
      @HrushikeshShrotriya Рік тому

      बरोबर आहे विचार आपला👍

  • @sasodekar
    @sasodekar Рік тому

    Better you could have told practical ways! eg. join some social clubs, local cultural groups, local natya sanstha.. etc.. it helps to be leader and get away from fear. These are practical ways. What you are telling here is too complicated to handle for someone really wish to understand. Here its also a kind of lecture you are giving on how to speak. Rather one should find ways to mix with society. This is one way.

  • @akpatil6599
    @akpatil6599 2 роки тому

    Ye ♥️da Lasun.
    Kal parva ji Friday la Peaceful community kadun Gagad Fek Jali Police var , ani ek Jaan Shahid jala. Tyavr Bol na 🙏🙏😑😑😑😑😑😑😑

  • @shailesh_joshi
    @shailesh_joshi Рік тому +1

    16:49 पर्यंत सगळं ठीक होतं. मग साहेब त्यांच्या मूळ मुद्द्यावर आले आणि video बंद करायची वेळ आली.

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Рік тому +1

      छान पंत पाहण्यासाठी तसदी घेतली..