How To Read । Books । Simple Rule पहिले बेशिस्तपणे वाचलं पाहिजे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лют 2022
  • 'मनातलं', ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी वाचनाची सवय कशी अंगी बाणवावी हे बोजड आणि क्लिष्ट स्वरुपात सांगण्याऐवजी अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे. वाचताना पहिले बेशिस्तपणे वाचलं पाहिजे असा एक मंत्रच त्यांनी दिला आहे. वाचताना माणसाने आपली प्रकृती, प्रवृत्ती काय आहे, आपल्याला काय बनायचंय ते विचार करून वाचायला सुरुवात करायला परुळेकर यांनी सांगितलं आहे. मनातलंच्या या भागात पाहूयात आणि ऐकूयात वाचनाबद्दल.
    राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

КОМЕНТАРІ • 71

  • @lochanmajnu
    @lochanmajnu 3 місяці тому +2

    पण आम्हाला माहिती आहे तुम्ही ग्रेट,निर्भिड आणि खूप चांगले तत्त्वज्ञ आहात

  • @kamleshmali007
    @kamleshmali007 2 роки тому +8

    सर, आज तुमच्यासारख्यांची खरंच खूप गरज आहे, आज आपल्या देशात आजचा तरुण, विद्यार्थी खूप भरकटले आहेत. नेमके त्यांनी काय करावं , काय वाचला पाहिजे, काय बघितला पाहिजे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे आणि हे काम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आहात.

  • @supriyabhagat1869
    @supriyabhagat1869 2 роки тому +10

    "पुस्तक हाच खरा मित्र" असा जो निबंध लहानपणी शाळेत असतांना लिहला जायचा ते मनात अगदी घट्ट बसलं आहे... उत्तम मार्गदर्शन केले 👍🏻

  • @deepakpatil1511
    @deepakpatil1511 2 роки тому +4

    परुळेकर जी...खूप छान ! आजच्या मुलांना हे समजणं गरजेचं आहे. पुस्तकांची सोबत असेल तर विचारशक्ती विवेकनिष्ठ होते.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 роки тому +3

    पुस्तके हसवणारी, रडवणारी, माहिती देणारी, ज्ञान देणारी, अस्वस्थ करणारी, ह्रदयात खोलवर रुतून बसलेली. बालपणीची निरागसता, तारुण्यातील धुंदी, प्रौढ पणातील गम्भीरता, वृद्धत्वातील विकलता या सर्व काळात जवळ असणारी पुस्तके. अपूर्ण

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 2 роки тому +4

    कुणी कितीही ठरवलं तरी माणसाचा पिंड जसा असतो तेच माणूस वाचतो किंबहुना तेच त्याला आवडतं.

  • @rajushinde699
    @rajushinde699 3 місяці тому +1

    सर वाचन क्षेत्रातल माझ पहिल पुस्तक येस आय एम गिल्टी नाव इग्रजी पण मराठी भाषेत आहे, फार सुंदर लेखन, कुसंगतीच उदाहरन वा विनाकारण क्रुरता म्हणु शकतो

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +3

    सर मनातलं बोलत रहा ,आपले विचार आमचा जीवन प्रवास समृद्ध करणारे आहेत,,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर,,,

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 2 роки тому +5

    Marathi people are best in practising humility, never found them arrogant but always humble. You spoke Marathi beautifully too. Well-chosen topic and brilliantly articulated. You should make more such videos. More educated/well-read Marathi people should make such videos to guide youths in the right direction.
    Favourite point at 7:05: Read indiscriminately and eventually your taste will emerge.

  • @amardeepnaiknaware1858
    @amardeepnaiknaware1858 2 роки тому +4

    सर तुम्ही सगळयांच्या 'मनातलं' कसं काय ओळखून बोलू शकता ही कमाल आहे. का आपले विचार, दृष्टीकोन एक असल्यामुळे असं वाटत😅🤩

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 роки тому +3

      वाचन असल्याचा तो परिणाम आहे माणसाचे मन वाचण्यासाठी मन प्रगल्भ असावे लागते आणि वाचनामुळे माणूस ते आत्मसात करतो

  • @sindhueducation8398
    @sindhueducation8398 6 місяців тому +2

    ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्र हात पाहून भविष्य सांगणे ह्या विषयी मनातलं हाउद्या ना राजु सर

  • @anilshinde7411
    @anilshinde7411 10 місяців тому

    सर नमस्कार... तुमचे विचार अतिशय वास्तववादी चिकिस्तक बुद्धीला प्रेरक असल्याने मला खूप भावतात

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 Рік тому +4

    अप्रतिम......

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Рік тому +2

    सुंदर मनोगत!"जबरदस्त!

  • @shubhambhople3028
    @shubhambhople3028 2 роки тому +4

    Please make video on your books collection! More on individual book that you want to tell about.

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 Рік тому +1

    भीती ही जिवनातील शाश्वत बाब आहे.. उत्तम मनातल

  • @shobhanikam9691
    @shobhanikam9691 2 роки тому +3

    Sunder vivechan

  • @abhivyakti1965
    @abhivyakti1965 2 роки тому +1

    अतिशय मार्गदर्शक आणि उपयुक्त एपिसोड.. 👍

  • @vijaypawar2359
    @vijaypawar2359 Рік тому +1

    Raju ji I am a senior citizen but I still say ji because I respect your thoughts, I was in Poona when Joshi Abhyankar happened there I was the same age as them, I used to stay in my maternal uncle’s bungalow at swargate, I don’t miss your discussion, I am not a reader but a listener

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 2 роки тому +3

    अतिशय योग्य पदधतीने

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 2 роки тому +1

    खुपच सुंदर विवेचन. अतिशय महत्वाच्या विषयावर.... वाचन...

  • @narendrakulkarni3889
    @narendrakulkarni3889 2 роки тому +1

    खूप सुंदर संवाद, राजूजी!

  • @ahallekatti
    @ahallekatti 2 роки тому +2

    Your conversations evoke interest and often inspire. Thank you. 🙏🏻🙏🏻

  • @rajujathar8209
    @rajujathar8209 Рік тому

    Great...

  • @sk9560
    @sk9560 2 роки тому +1

    अप्रतिम..!👌👌👍

  • @Fawkes021
    @Fawkes021 2 роки тому +1

    Sundar sangitla saheb...!

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 роки тому +1

    सुंदर भाष्य!

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 Рік тому +1

    सुंदर.

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन

  • @rajratnatembhurne463
    @rajratnatembhurne463 Рік тому

    Fascinating, it must not be the first time that i listen to what you said,i mean i might have already heard it or read it. But the humility that you brings in and the Marathi itself there must be lots of people like appreciating just as i do. Namskar.

  • @rohinisapkal7429
    @rohinisapkal7429 2 роки тому +3

    sir, pl. do series only on books

  • @shankarmore7855
    @shankarmore7855 2 роки тому

    Ohhh 👏👏👏👏👏👌👌👌

  • @VloggerTai
    @VloggerTai 2 роки тому +1

    Khupch sunder.. tumchya kade praghalba dhyan ahe te tumchya lihnyatun distech. Pan ashich vachnachi godi mala swatala lavnyasathi mi nakki prayatna karen 🙏

  • @ravimate8106
    @ravimate8106 6 місяців тому

    Great sir

  • @sadguru99
    @sadguru99 10 місяців тому

    I can certainly relate to your talk and your thoughts. Koestler, Marquez, Vinoba... even Geography... or jew homicide

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 2 роки тому +1

    छान सांगताय

  • @tukarammagar69
    @tukarammagar69 4 місяці тому

    मस्तच!!!

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Рік тому +1

    Right pahilyada suruwat kara nanter apoap sur सापडतो

  • @NamdevKatkar
    @NamdevKatkar 2 роки тому +2

    ऋतुरंगमधील तुमचा लेख वाचलाय. आवडला. आणखी एक - तुमचं बोलणं थोडंसं शेवते सरांसारखं आहे. म्हणजे, समजावण्याचा सूर शेवते सरांसारखा वाटला. :)

    • @adityadixit5212
      @adityadixit5212 2 роки тому

      लेखाचं नाव काय आहे...?

  • @prabhujadhav1215
    @prabhujadhav1215 Рік тому +3

    सर खूप चांगली माहिती देत आहात आणि प्रबोधन करत असता आभारी आहोत
    सर तुम्ही लिखाण केलेली मराठी पुस्तकाची नावे लिस्ट देऊ शकता का ? ती कुठे उपलब्ध आहेत?

  • @prachimayekar9264
    @prachimayekar9264 2 роки тому +1

    सुरवातीला अधाशासारखे वाचावे व नंतर आपल्याला आपोआपच कळत जातं की आपल्याला काय आवडतंय, भावतय. पुस्तक वाचताना डोळ्यात पाणी तरारणं हे रसिकाचं लक्षण आहे... कारण वाचक त्या लेखनात कलाकृतीत तद्रूप होत असतो.

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 роки тому +2

    🙏🙏

  • @advaitwankar3995
    @advaitwankar3995 2 роки тому

    Sir tumhi bhalchandra nemade yanchi interview ghya

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 роки тому

    मला ललित लेख आणि कविता वाचन आवडते.

  • @sushilbhise8113
    @sushilbhise8113 2 роки тому

    सर mta चे editor का nahi jhala

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 10 місяців тому

    माझ्यातल्या वाचनप्रीयतेला तुमच्या 'मनातलं' एक दिलासा मिळाला, धन्यवाद!

  • @gauravjadhav230
    @gauravjadhav230 8 місяців тому

    Kahi ashikshit obc wale maratha reservation la virodh kart ahet tyanchya vr video banava

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    Mi shala सोडल्या वर् wachan केल्.🙏🙏

  • @advaitwankar3995
    @advaitwankar3995 2 роки тому

    Sir mala tumcha balpan jithe gela tya konkanavr asleli pustke mala plz sanga

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 роки тому +1

      ह मो मराठे यांचे बालकांड तसेच रविंद्र पिंगे याचे सर्वोत्तम रविंद्र पिंगे वाचायला हरकत नाही ।कोकण बऱ्यापैकी समजेल असे वाटते ।बालकांड तर छानच आहे

  • @Agricultural_innovation
    @Agricultural_innovation 2 роки тому +3

    बाकी परुळेकर सरांच वाचन प्रेमाबद्दल मार्गदर्शन उत्तम चं होते, नियमितप्रमाने.
    👌👌
    परंतु दुसऱ्यांचे पाहून किंवा ऐकून जोपसलेला छंद फार काळ टिकत नाही.
    तो उपजतचं लागतो किंवा स्वतःचा छंद स्वतःला तरी लक्षात आलेला असावा.

  • @sagardarekar1951
    @sagardarekar1951 2 роки тому +2

    Sir Jim carbet nationalpark ch नाव change केलंय आता,😂😂😂

    • @paragrane4760
      @paragrane4760 2 роки тому

      काय केलंय ..

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 роки тому

      @@paragrane4760 रामगंगा पार्क ।

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 8 місяців тому

    मी एक सुधारणावादी, नास्तिक, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आहे, तर मी कोणती पुस्तके वाचली पाहिजे.

    • @shyam_10836
      @shyam_10836 4 місяці тому

      Sapiens

    • @manishpatil3945
      @manishpatil3945 4 місяці тому

      A H salunkhe , God’s delusion,

    • @kishorwajge8255
      @kishorwajge8255 2 місяці тому

      श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके.

  • @nawadkarraj
    @nawadkarraj 6 місяців тому

    Summary -mai itna bhi kuch khas nhi hu😅

    • @arjundevkate2838
      @arjundevkate2838 Місяць тому +1

      Haa...tu andhbkht ch asashil.....so ky khas asanr tu 😂😂😂😂😂

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 2 роки тому +1

    फालतू लोकांचे विवेचन

    • @sandeepdatar9283
      @sandeepdatar9283 2 роки тому

      म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे भाऊ..?

    • @amitbhosale3644
      @amitbhosale3644 2 роки тому

      @@sandeepdatar9283 विवेचन नको कामे हवीत आणि ते पण मूलभूत आणि मुळाशी असलेली

    • @amitbhosale3644
      @amitbhosale3644 2 роки тому

      जगाला ज्ञान शिकवायला खुप येतात पण प्रत्यक्ष काहीच नाही सगळं पुस्तकात

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 2 роки тому +2

      @@amitbhosale3644 देव तुला सदबुध्दी देवो! धक्कादायक विचार आहेत भाऊ तुझे!

    • @elnino9106
      @elnino9106 2 роки тому +1

      @@insecuresoul5490 धक्कादायक नव्हे. बालिश विचार आहेत.