गावरान तिखट चकोल्या / वाफाळती डाळफळं | माझ्या सासरच्या पद्धतीने झणझणीत वरणफळं Zanznit ChakolyaRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    गावरान तिखट चकोल्या / वाफाळती डाळफळं | माझ्या सासरच्या पद्धतीने झणझणीत वरणफळं Zanznit ChakolyaRecipe
    गरमागरम वाफाळती डाळफळं, नुसते म्हंटले तरी लगेच तोंडाला पाणी सुटते. थंडी असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा वरणफळं कोणत्याही सीजन मध्ये करायला उत्तम. तसं तर चकोल्याला बरीच नावे आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये नावं बरीच आहेत. जसं कि डाळ चकोल्या, गावरान पद्धतीने केल्या जाणाऱ्या तर्रीदार गावरान झणझणीत चकोल्या, वरणफळं रेसिपी, डाळफळं रेसिपी, काही ठिकाणी डाळ चिखल्या पण म्हंटले जाते. काही ठिकाणी चकुल्या तर गुजरात मध्ये डाळ ढोकली रेसिपी. महाराष्ट्रीयन आणि गुजराथी पद्धत थोडं सामान आहे, थोडा फरक आहे पण दिसायला अगदी एकसारखेच दिसतात चवीत थोडा फरक पडतो.
    आज आपण महाराष्ट्रीयन गावरान, झणझणीत चकोल्या कश्या करायच्या ते पाहुयात.
    साहित्य I Ingredients:-
    For Kneading Dough
    • गव्हाचे पीठ २ वाटी I Wheat Flour 2 cups
    • मीठ चवी अनुसार I Salt as per taste
    For Vatan
    • कोथिंबीर I Coriander
    • लसूम पाकळी १५ -२० I Garlic Cloves 15-20
    • किसलेले सुके खोबरे २-३ चमचा I Grated dry coconut 2-3 tsp
    For Fodni
    • मोहरी १/२ चमचा I Mustard seeds 1/2 tsp
    • जिरे १/२ चमचा I Cumin seeds ½ tsp
    • हिंग - १/४ चमचा I Asafoetida 1/4 tsp
    • कडीपत्ता १०-१५ I Curry Leaves 10-15
    • हळद १/४ चमचा I Turmeric ¼ tsp
    • मिरची पावडर १ चमचा I red chili powder 1 tsp
    • कांदा लसूण मसाला २-३ चमचे I Onion Garlic Masala 2-3 tsp
    • शीज लेली तूर डाळ १-१.५ वाटी I Steamed Tur Dal 1-1.5 cups
    • कच्ची तूर डाळ २-३ चमचे I Raw Tur Dal 2-3 tsp
    • तेल २-३ चमचे I Oil 2-34 tbsp
    • वाटण तयार केलेले I Gravy
    • पाणी ४-५ वाटी I Water 4-5 cups
    • कोथिंबीर चवी पुरते Coriander For Garnishing
    Description: -
    Winter is one such season, where we Indians can make delicious hot recipes and serve them to our family & friends. These recipes are easy to make and taste yummy.
    One such Recipe is: Chakolya”. Every state has a unique name for it. In Gujarati it is called “Daal Dhokli”, in Marwari it is called “Dal Bafla”, and in Marathi we call it “Varan Faal”.
    So let’s get started to make this super delicious recipe of “Chakolya”
    Chakolya / Varan Phal Recipe: -
    1 First, knead the wheat flour and keep it aside.
    2 In a mixer grinder, prepare gravy using grated dry coconut, garlic, coriander.
    3 For Tadka, pour oil in a Kadhai, add mustard seeds, cumin seeds, asafoetida, curry leaves, grinded gravy and nicely roast it .
    4 Add turmeric, black pepper, black masala and roast it well. Then add water to it.
    5 After a boil, add cooked daal, raw daal, salt as per taste, and bring it to a boil.
    6 Till the time, the daal gets nicely boiled and cooked, prepare roti cuts.
    7 Roll a chapatti and cut it into small pieces.
    8 Slowly start adding the cut small pieces of chapatti to the daal which is cooking on the gas.
    9 Allow it boil n get cooked slowly on low flame.
    10 Later turn off the gas, add Coriander for garnishing.
    11 Delicious to “Chakolya/Varan Phal/ Daal Dhokali” is ready to be served hot.
    Other Recipes:
    फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
    • फोडणी देताना हे माहित ...
    थंडी स्पेशल थाळी | झणझणीत अंबाडीचं गरगट्ट - बाजरीची भाकरी | रोजच्या जेवणासाठी अंबाडी भाजी Veg Thali
    • थंडी स्पेशल थाळी | झणझ...
    २ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe
    • २ महिने टिकणारे १ किलो...
    सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी आलू पराठे | खुसखुशीत पराठ्यासाठी 2टिप्स / टिफिन रेसिपी Aalu Methi Paratha
    • सकाळचा नाष्टा गरमागरम ...
    #चकोल्या #वरणफळ #डाळढोकळी #दालबाफया #थंडीस्पेशियल #भाकरीचे तुकडे #वरणफळ रेसिपी #थंडीस्पेशलथाळी #Chakolya #VaranPhal #DalDhokli #DaalBafya #WinterSpecial #bhakrichetukde
    डाळ चकोल्या रेसिपी | वरणफळ रेसिपी | गरमागरम वाफाळती डाळफळं | डाळढोकळी I दाल बाफया I थंडी स्पेसिअल I वरण फळ रेसिपी I थंडी स्पेशल थाळी | Chakolya Recipe | VaranPhal Recipe | Maharashtrian Dalfal Recipe | Dal Dhokali | Daal Bafya I
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 608

  • @Kinduncle123
    @Kinduncle123 7 місяців тому +13

    खूपच छान सांगितले ताई. एकदम स्वादिष्ट.. 🙏🙏
    आम्ही घरी वरण फळ म्हणतो. माझी आई आंबट पणा साठी आमसूल घालायची. माझी पत्नी वरून तूप + बारीक कापलेली हिरवी मिरची चा तडका / फोडणी देते. कधी कधी तूप लसूण ची फोडणी देते.
    - पुण्यावरून काका

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      Wow खूप छान.. धन्यवाद

  • @ManjushaMate
    @ManjushaMate 6 місяців тому +5

    आम्ही त्यात फ्लॅवर,मेथी,टमाटा, कांदा,बटाटा हे सगळे बालोक चिरून,फोडणीस घालतो.पण तुमची ही पध्दत छान. आवडली

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 7 місяців тому +74

    मस्त, आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडतात चकोल्या , पण मी कणकेत ही तिखट ,हळद, हिंग ,मीठ घालते खूप मस्त लागतात अश्या चाकोल्या आणि कणिक नेहमी प्रमाणेच भिजवून पातळ लाटून टाकते 😊 माझी मुलगी indian pasta म्हणते

    • @jyotimhetre9583
      @jyotimhetre9583 7 місяців тому +7

      पीठ न लावता तेल लावून लाटते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому +3

      Mast khup chan

    • @SulbhaBorkar-oo2us
      @SulbhaBorkar-oo2us 7 місяців тому

      😊😊😊😊😊😊

    • @archanakale4224
      @archanakale4224 7 місяців тому +3

      Armcha kade pan kanket tikhat mith halad ghaltat😊

    • @poojadhuru6669
      @poojadhuru6669 7 місяців тому

      Khup chan recipe. ❤

  • @ashwinishirke9296
    @ashwinishirke9296 5 місяців тому +6

    Mi atach bnvlele
    Khup ch Chan n tasty zalele tnku for sharing this way
    Amchyakde pivlya dalitle bnvtat fike

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 7 місяців тому +11

    खूपच छान अप्रतिमममम, माझ्या आवडीची रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @vandanakhade9467
    @vandanakhade9467 7 місяців тому +8

    छान च. मीही करते. मी कणकेत बेसन आणी ओवा जीरे घालते. आणी रश्श्यात मिक्स डाळी वापरते आणी त्यात भाज्या घालते .फारच भन्नाट लागते. मन त्रुप्त होते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому +1

      एक वेगळी पद्धत समजली ...छान

    • @neetachindaliya2444
      @neetachindaliya2444 17 днів тому

      मन तृप्त होते

  • @hemalatapawar2148
    @hemalatapawar2148 7 місяців тому +8

    मी आजच केल्या होत्या चकोल्या माझ्या मिस्टरांना खूप आवडतात आठवड्यात एकदा करते

  • @malini7639
    @malini7639 7 місяців тому +7

    सरीता खानदेशात यांना भरड पण म्हणतात . आमच्या घरीपण चकोल्या आवडला . साध्या व गोड आंबट पण आवडतात .

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 7 місяців тому +9

    खूप छान... मी पण अशाच बनवते पन मी खोबरे नाही घातले कधी.. चिंच आणि गूळ टाकते... माझ्या हातच्या चुकल्या घरात सर्वांना आवडतात... आम्ही त्याला वरण फळ म्हणतो...

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 7 місяців тому +3

    आमच्याकडेही बऱ्याच अशाच पद्धतीने केल्या जातात..फक्त चकोल्यावर वरून तेल घेतले जाते...तुम्ही खूप छान दाखवल्या आहेत ताई...thank you

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 6 місяців тому

      तूप वापर धोडा

  • @vedantadhav6270
    @vedantadhav6270 Місяць тому

    हो आमच्या घरी पण करतो पण आमच्या कडे पुणे येथे आम्ही ह्याला डाळ डोकळी म्हणतात खूप छान लागते आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडते

  • @priyankadhekle5655
    @priyankadhekle5655 7 місяців тому +3

    खूपच छान माझ्या माहेरी आईकडे सगळ्यांना खूप आवडतात...❤❤

  • @pandurangkalel347
    @pandurangkalel347 5 днів тому

    Mi pregnant aahe mla pavtyach kalvan ghavs vatth hoth mitumchi recipe try khup chaan bhaji zali hoti aani aaj mi chakulya hi try krtey ❤❤

  • @amaypandit2673
    @amaypandit2673 7 місяців тому +1

    चकोल्या खुपच सुंदर आणि अतिशय चविष्ट
    तुझे सर्व रेसीपी मी रोज बघत असते.
    मी सर्व तुझ्या पध्दतीने मी जेवन बनवते
    खरच माझी मूल खूप आवडीने जेवतात😄 तुझ्या मुळे चांगले सुगरीणी झालोत
    तुला मनापासून धन्यवाद 🙏असच छान छान रेसिपी दाखवत जा

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 6 місяців тому

      शेंगदाणे तूप पापड खातो आम्ही त्याच्याबरोबर

  • @anjalirakh4743
    @anjalirakh4743 7 місяців тому +6

    Khup chan......same aamchya tikde hi asch bnavtat

  • @rajdhanirecipes
    @rajdhanirecipes 10 днів тому

    माझा favorite आहे गावठी पास्ता 😅😋😋 म्हणजेच चकुल्या ❤

  • @arunamore6219
    @arunamore6219 7 місяців тому +1

    Mi Sataryachi ahe.. amchya kade ashich banavtat zanzanit kanda lasun masala ghalun…this food is my soul food… thanks for sharing this.. love from USA ❤

  • @raniawale-rl8oh
    @raniawale-rl8oh 3 місяці тому

    मी आज पहिल्यांदा तुमची रेसिपी पहिली बाकी काही नाही पण मला तुमचं बोलण खूप आवडलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitantpatki8703
    @nitantpatki8703 6 місяців тому +1

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

    • @nehamohite2355
      @nehamohite2355 5 місяців тому

      सोलापूर मध्ये कुठले गाव

  • @sarojdeshmukh7115
    @sarojdeshmukh7115 7 місяців тому +1

    आम्ही टोमॅटो बारीक चिरून घालतो ,वरून साजूक तूप बाकी हिच रेसीपी खूप छान लागतात आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 7 місяців тому +2

    Wa wa wa Sarita mazya Ani mulinchya awdichi recipe ahe mi nakki ashyach chakolya Karel ekach number zhali recipe ❤❤
    Thank you so much Sarita ❤❤❤❤❤

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 7 місяців тому +2

    खूप छान आम्ही वरण शिजवून लसणाची फोडणी करतो पातळ लाटून तुकडे घालतो तोंडी लावणं लसणाच तिखट कांदा लोणचं पापड मस्त बेत होतो.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      खूप छान.. अप्रतिम

  • @kalpnagaikwad5787
    @kalpnagaikwad5787 6 місяців тому +3

    ताई खुपच छान आहे मला खूप आवडतात मी घरी एकदा बणवेल

  • @sushamadeshpande3897
    @sushamadeshpande3897 3 місяці тому

    Mi try Keli recipe...khup avdli mazya mr la.... thank you 😊

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 7 місяців тому +1

    खूप छान, ताई तु सागितल्या प्रमाणे लिंबाची पावडर केली तीन दिवस लागले माझ्या मुलीला सहज करता येईल, धन्यवाद ताई

  • @riddhihujare8859
    @riddhihujare8859 6 місяців тому +1

    Mihi banavalya khup chan recipe ! Thanku Sarita ❤

  • @hanumantmore7338
    @hanumantmore7338 Місяць тому

    खूप छान tai.
    आमच्या पण घरी हीच पद्धत वापरली जाते. आणि पण सोलापूरची आहे.

  • @vaishaliparulekar9873
    @vaishaliparulekar9873 Місяць тому

    Same as dal dhokari Gujarati dish but I like your receipe mast.

  • @vishakhapatil3618
    @vishakhapatil3618 3 місяці тому

    Khup chhan mam, aamhi suddha khup aavdine khat asto, aathvdyatun 1,2 veles astatch😊

  • @sharnammahirdey4790
    @sharnammahirdey4790 2 місяці тому

    Barik sarik kuuup Chan resipi samjaaun sangtha timin❤❤❤❤❤

  • @vlogswithrajveer9760
    @vlogswithrajveer9760 4 місяці тому

    मस्त सरिता ताई यांचे रेसिपी खूप छान मी नगरचे आमच्या इथे चकुल्या बोलतात तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात सरळ आणि साध्या रेसिपी असतात घरामध्ये जे पण सामान आहे त्यात बनवले जाते 😊

  • @gaureepadwalkar8687
    @gaureepadwalkar8687 7 місяців тому +4

    Mast aani खूप स्वादिष्ट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sangitamane8283
    @sangitamane8283 7 місяців тому +1

    Sarita , mast chakolya , amchyakade same ashavh chakolya karatat. Sangli zilhhayat , pn mi moong dal vaparte , healthy mhanun . Baki same .

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 2 місяці тому

    अगदी बरोबर आहे रेसेपी आवडली

  • @ujwaladhawan155
    @ujwaladhawan155 5 місяців тому +2

    खुप छान

  • @harshadaholay2173
    @harshadaholay2173 7 місяців тому

    खूपच छान पदार्थाची आठवण करून दिली सरीता ताई, धन्यवाद 🙏मी सुद्धा अशाच प्रकारे डाळ चिखल्या करते फक्त कणिक भिजवताना त्यात ओवा आणि मीठ घालते.

  • @reshmag9368
    @reshmag9368 4 місяці тому

    खूपच मस्त.रात्री फक्त चकुल्या आणि सोबत पापड लोणच तोंडीलावणं सुख.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 6 місяців тому

    ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी चकोल्या कल्या खूपच सुंदर, अप्रतिमममम झाल्या, सगळ्यांना खूप आवडल्या, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 😘🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      Wow..nice to hear that..my pleasure..thank you so much for trying

  • @jayshreenandkhile1157
    @jayshreenandkhile1157 7 місяців тому +6

    सरिता माझ्या माहेरी पण असच करतात हो मी पण सांगोल्याची आहे

  • @archanakadam2980
    @archanakadam2980 7 місяців тому +1

    Khup sunder recipe… mazi aai same asha karate fakt vatnamadhe thoda khada masala ( lavang,meere and dalchini) vaparate… khup avadicha padharth ahe ha maza

  • @MeghaMarathiRecipe
    @MeghaMarathiRecipe 7 місяців тому +3

    Tai aamhi jirya chi fodani devun cikolya karto aani tyavar lasanacha kadka lal mirchi pavdar asalela galto khup Chan hotat tumhi pan try Kara yekda

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 3 місяці тому +1

    Mast chokoli chan Pani sutle thondala

  • @seemakanthale52
    @seemakanthale52 7 місяців тому +2

    Recipe mast ,pan amchya A.nager said la sadhya fhodnighya vranat krun taktat Ani tya verti tup, tya sobt hirvya mirchitakun kele li sang Dana chatni khupch chan legte kharch ,krun bghta 😊nakkich

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 7 місяців тому +1

    मस्त रेसिपी आमच्या कडे आंबटगोड करून वरून साजूक तूप मस्तच पण आता अश्यापण करीन नक्की

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 17 днів тому

    खुपच छान ❤

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 7 місяців тому +1

    मी ही चकुल्या करते,मी तेल घेतले आहे खूप छान आहे 👍👍 माझे सासरे अकोला वासुद आहे

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 3 місяці тому +2

    मी नागपूरची लहानपणी आई करायची पण लगमी नागपूरची लहानपणी आई करायची पण लग्न झाल्यापासून मी बनवल्या नाही आणि खाल्ल्या पण नाही, परंतु आज तुमची ही रेसिपी पाहून लहानपणाची आठवण करून दिली त्यासाठी धन्यवाद, आई अश्याच बनवायची खूप छान , आम्ही मस्त गरम गरम खायचो ,मी नक्की बनवेल आणि खाणार,खूप धन्यवाद ताई, जुन्या रेसिपी ना दाखवता हेच खूप कौतुक वाटते तुमचे , सुंदर दाखवता आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता ,

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज7न

    ताई तुमचं गाव कोणत आहे

  • @nitaborate5672
    @nitaborate5672 7 місяців тому +2

    Mi banvun baghitlya khup chan zalya hotya thank you so much tai

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 7 місяців тому +2

    ❤मस्तच..वरण फळ.. तयारी इतकी छान केलीय..पाहूनच सुंदर वाटले

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @sandhyayellapantula7035
    @sandhyayellapantula7035 5 місяців тому

    Indian pasta...nice. Can we add veggies?

  • @veenagodkhindi7253
    @veenagodkhindi7253 7 місяців тому +5

    Very nice, I will try to do

  • @ushapawar7960
    @ushapawar7960 7 місяців тому +2

    सरीता मलाही खूप आवडतात चकुल्या 😀😀

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 7 місяців тому +2

    सोलापुरात अगदी हीच रेसिपी आहे. तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणे बनवल्या जातात. लसूण खोब्र्याच वाटण सुध्दा same. माझी आई असच वाटण करते त्यात खडे मीठ घालून बारीक करते म्हणजे मग ते छान टिकते. रेसिपी छान. अगदी घरातली पद्धत दाखवली. सोलापूर मध्ये जास्त करून हीच पद्धत आहे. छान. तुम्ही ही अशीच रेसिपी दाखवली छान. आणि सोलापुरी काळं तिखट/ येसूर म्हणजे झणझणीत जाळ काढणारं तिखट...विषय च नाही...😊😊
    आणि हो, सोलापुरात याच्या गूळ आणि वेलदोडे घालून गोड चकोल्या सुध्दा केल्या जातात. आणि नंतर तूप आणि दूध घालून खातात...अप्रतिम होतात.

    • @meenak6269
      @meenak6269 7 місяців тому

      हो माझी आई आसेच गोड फळ पण करायची 👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @Tanishka-o2l
    @Tanishka-o2l 7 місяців тому +1

    Mi lasun mirchi thechun ghalte dalit khup chhan lagtat.😊

  • @rohinichavan421
    @rohinichavan421 7 місяців тому +1

    खूप मस्त,आम्ही पण अशाच करतो.

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi 7 місяців тому +1

    Ho aamchyakade saglyana avadate.. recipe mastach 👌👍

  • @vimallandge413
    @vimallandge413 5 місяців тому +2

    Very nice recipe 👌

  • @sanjaysuslade2305
    @sanjaysuslade2305 5 місяців тому +1

    खूप छान आम्ही पण करतो खूप आवडतात आम्हाला

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 2 місяці тому

    Oil production baramati madhye konatya shop madhye milatil ka

  • @manojshetty9876
    @manojshetty9876 7 місяців тому +2

    Kup Chan Keli ahe resipe

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 7 місяців тому

    सुंदर 😊
    मला हा प्रकार खूप आवडतो बऱ्याच प्रकारच्या बनवल्या जातात.
    आमच्या घरी याला डाळढोकळी म्हणतात.
    मी आंबटगोड,पालकाच्या, मेथीच्या, साध्या वरणाच्या अशा अनेक प्रकारच्या बनवल्या जातात 😊
    साजूक तूप घालून गरम गरम खातात 😊

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 5 місяців тому

    खूप छान तुझी पध्दत मस्त आहे तूरडाळ कच्ची घातली हे नवीन पध्दत वाटली आम्ही डाळ करुन घेतो व मग चकोलया त्यात सोडतो पण अशी पध्दत करून बघेन धन्यवाद दीदी मस्त रेसीपी 😋👌❤🎊👍

  • @sadhanagaikar4673
    @sadhanagaikar4673 7 місяців тому

    वरण फळ हा माझा अतिशय आवडीचा पदार्थ. माझं ही गाव सोलापूर आहे पण आम्ही अशा तिखट नाही करत आणि वाटण ही घालत नाही. Simple वरण असतं...त्या मध्ये कोकम आणि शेंगदाणे टाकतो. फोडणीला जिरं मोहरी सोबत हिरव्या मिरच्या ही घालतो. आणि हो भरपूर तूप.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      खूप मस्त पद्धत

  • @anjalichavhan-h7o
    @anjalichavhan-h7o 7 місяців тому +2

    खुप छान आहे मला खुप आवडते

  • @SunandaKoli-l5z
    @SunandaKoli-l5z 6 місяців тому

    खुप छान. अप्रतिम. तुमचा आवाज खुप छान आहे. खुप चांगल्या प्रकारे रेसिपी सांगितली. आमच्या बाल पणी आमची आई बनवायची हया चकोल्या. त्या नंतर कधी बनल्याच नाही. आता मी स्वतः तयार करेल हया चाकोल्या. खुप खुप धन्यवाद

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 6 місяців тому

    खूप छान. आम्ही कणकेत तिखट मीठ, डाळीचे पीठ वं तेल घालतो. आणि रश्यात चिंच गुळही घालतो. बाकी वाटण तुमच्यासारखे.

  • @shitalpatil6739
    @shitalpatil6739 7 місяців тому

    Hi,🙏,, ताई,, मी सौ. शितल पाटील, लक्ष्मी -दहिवडी, तालुका - मंगळवेढा. तुम्ही खुप छान रेसिपी करून दाखवता 👌👌. छान आणि सोपी पद्धत असते, तुमची. त्यामुळे मला फार आवडतात💖,आणि मी घरी करून बघते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏💕🩵😊☺️

  • @VijayaJamkar
    @VijayaJamkar 2 місяці тому

    आम्ही यात वांगी टाकतो छान लागतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 місяці тому

      Thanks share केल्याबद्दल

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 5 місяців тому

    Tai Khoopch Chan Reciepe Tondala Pani subtle.Tuzya Rec. Khoopch Sopya Ani Suundar Astat .Dhanyawad.

  • @udayjoshi8949
    @udayjoshi8949 7 місяців тому +1

    Excellent, too yummy, it's one of my favourite dish, my wife used to make this dish so yummy, unfortunately she is no more now,I just remembered her watching your video 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      Oh..sorry to hear that..thanks for watching

  • @sachinbhame222
    @sachinbhame222 7 місяців тому +1

    Sarita Tai..... Punyat Sukhi bhel Kiva Oli bhel sathi ek veglich tikhat chatani keli jate ti chatani baddal mahiti detal. Kiva video बनवला असेल तर लिंक शेअर करतात.......

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 7 місяців тому +1

    🌹🌹नमस्कार ताई. आमच्या कोकणात सहसा नाही होत ही रेसिपी पण मी करून पाहिन . छान झाली आहे चकोली रेसिपी. 👌👌👍👍👌👌👍👍❤❤❤❤❤🌹🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      Ok... करून पहा आवडेल

    • @kanchanbhatade4645
      @kanchanbhatade4645 7 місяців тому

      हो नक्कीच. 👍👍🌹🌹

  • @snehalbansude1240
    @snehalbansude1240 5 місяців тому +1

    Me aata banvle aahe Chan zalya aahet.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 5 місяців тому

    मस्त.. आमच्या कडे कोकणात हे नाही करत पण आम्ही घरी बनून खातो. कारण १५ वर्ष आम्ही औरंगाबाद ला राहायचो फार पूर्वी तिथे जळगावची एक शेजारी होते ते याला वरण फळ म्हणायचे. ते खूप छान बनवायचे.

  • @KamalTajve
    @KamalTajve Місяць тому

    खुचछानमलाखुप,आवडताखुपछानसागतासमजुन

  • @raniawale-rl8oh
    @raniawale-rl8oh 3 місяці тому

    आणि मी चकोल्या पण केल्या खूप खूप छान झाल्या आहेत

  • @arunrasal5423
    @arunrasal5423 5 місяців тому +1

    सरिता ताई आपण नगरच्या बाजूच्या का? चकोल्या हा शब्द खूप वर्षानी दिसला, ऐकला. आई करायची त्या "वरण चकोल्या". लग्न झाल्यावर घरात "वरण फळ" व्हायला लागलं. मुलीचं लग्न झाल्यावर त्यांच्याकडे "पातोळ्या" खायला मिळतात. आपण रेसिपी "डाळ चकोल्या" ची दिली आहे. नावं फक्त वेगवेगळी. चव पण थोडी फार वेगवेगळी. पण नेहमीच्या पोळी भाजी पेक्षा वेगळा पदार्थ. पोट तर भरतेच पण समाधान पण होते.

  • @jayshreenandkhile1157
    @jayshreenandkhile1157 7 місяців тому +1

    तुझ्या रेसिपी छान असतात

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 7 місяців тому +2

    मी पिठात थोडं तिखट, ओवा इ. घालते. जास्त चविष्ट लागतात. बाकी सर्व असेच.
    सरिता , तुझ्या सर्व रेसिपीज छान असतात

  • @parisampat3131
    @parisampat3131 6 місяців тому +1

    Thanks. For. Shating

  • @Mona19_05
    @Mona19_05 2 місяці тому

    Very nice explanation... very detail-oriented recipe points covered !! Aprateem :)

  • @AnitaPetkar-y9q
    @AnitaPetkar-y9q 7 місяців тому +2

    Thanks❤

  • @YasmeenShaikh-dh9kj
    @YasmeenShaikh-dh9kj 3 місяці тому

    तूमच्या रेसीपी छान आहे🎉😊

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 7 місяців тому

    मस्तच ताई खूप खूप छान चकोल्या मस्तच धन्यवाद जी😊❤👌👌

  • @sheelasawant6836
    @sheelasawant6836 7 місяців тому

    हॅलो सरिता
    मी चकोल्या बद्धल ऐकलं होतं पण कश्या करतात ते माहित नव्हते .काल तुझी रेसिपी बघितली आणि आज केल्या . आम्हा दोघांनाही खूप आवडल्या .
    धन्यवाद !!
    तुझ्या सगळ्याच रेसिपि छान असतात अचूक प्रमाण आणि टिप्स पण त्यामुळे तुझ्या सगळ्या रेसिपी मी आवडीने बघते आणि करून पण बघते.
    अश्याच छान छान आणि झटपट होणाऱ्या
    रेसिपी घेऊन ये .वाट बघते😊 .

  • @shalinipatil8203
    @shalinipatil8203 7 місяців тому

    माझ्या माहेरी शेपू पालकची भाजी टाकून हे फोडणीचे वरणफळं खूप आवडतात.आम्ही एकत्र आलो की हा पदार्थ हमखास करतो.

  • @LalitaChilgar
    @LalitaChilgar 4 дні тому

    Very nice didi

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 3 місяці тому

    खुपच मस्त रेसीपी.

  • @rupalibhoite8333
    @rupalibhoite8333 6 місяців тому

    Mazi favourite dish aahe..maza sasubai banvycha.. khup aawdty Mala.bt me gujarati style daal dokri banvty..chinch Gul pn takaycha..khobra nahi aawdt Mala..shengdane pn ghalyche.. Bhari lagtat..garam garam tup takun mast khych 😋😋

  • @samedhvirkhade
    @samedhvirkhade 7 місяців тому +2

    Mi besan na vaparata ragi pith ghalte te pan chan hotat ani healthy pan😊

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 7 місяців тому +1

    मी पण सोलापूर येथे राहते ताई मी याच पध्दतीत करते, फक्त थोडी चिंच गूळ घालते

  • @jayashreeabhyankar5329
    @jayashreeabhyankar5329 7 місяців тому +2

    सरिता ताई, चकोल्याच्या पिठात थोडा ओवा, जिरं हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं तेल घालते.व चकोल्या वाफवून रश्यात घालते.आणखी सुटसुटीत चकोल्या खायला मिळतात.😊😊

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 7 місяців тому +1

    छान मी पण बनवते मला फार आवडते

  • @anjalichavhan-h7o
    @anjalichavhan-h7o 7 місяців тому +1

    माझी आवडती ताई आहे तुम्ही मी खुप काय शिकली तुमची रेसिपी बघून धन्यवाद ताई❤❤❤

  • @culturemarathi7864
    @culturemarathi7864 7 місяців тому +3

    Khup Chan racipe aahe

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 3 місяці тому

    Mala mazya sunbaila chkolay khup aavdtata aamhe ashch karto

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 7 місяців тому +1

    Tai mi gujrati paddhatith banawte Dal Dhokli mhantat..
    Chapaticha peeth,besan,lal tikhat halad honga ova ghalun ghatta. Pith malun latun mag chakolta karsychya..dal mau shikwaychi ...mag oil tyat rai jeera dalchini bot mirchi aala ek hirvi mirchi tomato msg dal otawre tyat tikhat halad dhane jeere oud Gul mith kothmir msg gas fast karun tyat chakolya ghelun 10 mins shijwun waru tup ghalawe.

  • @Geetucutie
    @Geetucutie 7 місяців тому

    Mazi all time fevourite recipe, mast zali ahe, amhi kanket tikhat ova ghalto ani ambat goad karto

  • @saritanimbalkar4002
    @saritanimbalkar4002 7 місяців тому +1

    खरच सांगते मला चकोल्या अजिबात आवडत नाही पण फक्त आणि फक्त विडीओ तुझा आहे म्हणून बघितला 😊