Це відео не доступне.
Перепрошуємо.

महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita
    महाराष्ट्र दिन स्पेशल महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी | महाराष्ट्रीयन पिठल्याचे ३ प्रकार | पिठलं भाकरी | झुणका भाकरी | Maharashtrian Pithala Bhakari Recipe | 3 Types of Maharashtrian Pithale | Zunaka Bhakar Recipe |
    पिठलं भाकरी, पिठलं भात, झुणका भाकरी म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची खरी ओळख. कधी पटकन स्वयंपाक करायचा तर पिठलं आणि भाकरी किंवा साधा पिठलं भात पण पुरेसा होतो. तेच महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं आणि भाकरी कशी करायची ते पाहुयात. आज आपण पिठल्यांचे तीन जबरदस्त प्रकार बघतोय , गाठीचं पिठलं रेसिपी, झुणका रेसिपी आणि
    ताकातलं पिठलं रेसिपी। तीनही रेसिपी करायला एकदम सोप्या व पटकन होणार्या आहेत
    गाठीचं पिठलं रेसिपी | वैरून केलेलं गाठीचं पिठलं Gathicha Pithale Recipe -
    साहित्य | Ingredients
    बेसन १ वाटी | Besan 1 Cup
    हिरव्या मिरच्या ४-५ | Green CHilies 4-5
    लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic Cloves 10-12
    तेल ३ चमचे | Oil 3 tbsp
    मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
    जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
    हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp
    कढीपत्ता | Curry Leaves
    बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Large
    हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
    बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
    पाणी अडीच कप | Water 2.5 Cups
    मीठ चवीनुसार | Salt to taste
    ताकातलं पिठलं रेसिपी | ताकातला झुणका रेसिपी | Takatale Pithale Recipe | Takatala Besan Recipe | Takatala Zunka Recipe |
    बेसन १ वाटी | Besan 1 Cup
    आंबट ताक १ वाटी | Chas / Butter Milk 1 Cup
    पाणी २ कप | Water 2 Cups
    हिरव्या मिरच्या ४-५ | Green CHilies 4-5
    लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic Cloves 10-12
    तेल २ चमचे | Oil 3 tbsp
    मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
    जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
    हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp
    कढीपत्ता | Curry Leaves
    बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Large
    हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
    बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
    मीठ चवीनुसार | Salt to taste
    झणझणीत झुणका रेसिपी | Zanzanit Maharathrian Zunka Recipe | तव्यावरचा झुणका रेसिपी | बेसन भाकरी रेसिपी |
    तेल ३-४ चमचे | Oil 4 tbsp
    मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
    जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
    हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp
    ठेचलेला लसूण पाकळ्या १०-१२ | Crushed Garlic Cloves 10-12
    कढीपत्ता | Curry Leaves
    बारीक चिरलेले कांदे २ मोठे | Finely Chopped Onions 2 large
    मीठ चवीनुसार | Salt to taste
    बेसन १ कप | Besan 1 Cup
    लाल मिरची पावडर 1-2 tsp | Red Chilly pw 1-2 tsp
    पाणी फक्त बेसन शिजेल असा हबका मध्ये मध्ये द्यावा | Water to sprinkle
    बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
    तेल १ चमचे वरून टाकण्यासाठी | Oil 1 tbsp
    Other Recipes -
    ना सातारची, ना कोल्हापूरची, ही थाळी अवघ्या महाराष्ट्राची | महाथाळी भाग १ Maharashtrian Thali • ना सातारची, ना कोल्हाप...
    महाराष्ट्राची महाथाळी भाग २ । सोलापुरी शेंगा चटणी ,कर्जत शिपी आमटी, खान्देशी खिचडी, कोंकणी सोलकढी • महाराष्ट्राची महाथाळी ...
    स्पेशल आमरस थाळी | अक्षय तृतीया खास हलकंफुलकं झटपट बनणारे संपूर्ण जेवण | Special Veg Thali Recipe • स्पेशल आमरस थाळी | अक्...
    चटपटीत टोमॅटो रस्सम | उन्हाळ्यात २० मिनिटांत बनवा पोटभरीचा बेत टोमॅटो रस्सम-भात Tomato Rassam Recipe • चटपटीत टोमॅटो रस्सम | ...
    स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात • कुडकुडत्या थंडीत स्वयं...
    #Pithalabhakarirecipe #zunkabhakarirecipe #zunkabhakarrecipe #saritaskitchenmarathi #quickandeasymaharasthraiandinner #maharashtriandinnerrecipes
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 872

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 3 місяці тому +27

    सरिता हा तुझा समंजस पणा ....आपल्या कडे असलेलं दुसऱ्याला खुशीने देण्याचा ....आईने दिलेला बीजमंत्र ....तुझ्या यशाचं , परिपूर्णतेच गमक आहे ....खूप सहज पणे त्यातल्या बारकाव्यासह रेसिपी सादर करतेस ....कौतुक तुझं ....👍 👌 मी ही तुझ्या काही रेसिपीज फॉलो करते ....आणि त्या खरंच टेस्टी होतात ....धन्यवाद सरिता ❤

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 3 місяці тому +28

    सरिता ताई तिन्ही झुणके छान वाटले. त्यात तुम्ही तुमच्या आईची आठवण करून जे सांगितले. ते खरोखरच बरोबर आहे.धन्यवाद ताई तुम्ही शेअर केल्या बद्दल.🙏👌👌👍👍❤️❤️

  • @user-jl4kv2ub6c
    @user-jl4kv2ub6c 3 місяці тому +14

    मी नागपूर येथे राहते. आमच्याकडे पिठलं या शब्दाऐवजी बेसन हा शब्द प्रचलित आहे. मी बेसन चे हे सगळे प्रकार बनवते. तुम्ही कुठलाही पदार्थ बनविताना खूप छान पद्दतीने समजावून सांगता ते मला खूप आवडतं. ❤

  • @anitagiri9663
    @anitagiri9663 3 місяці тому +8

    तुम्ही जे तुमच्या आई बद्दल सांगितलं ते ऐकुन माझ्या डोक्यात पाणी आले कारण माझी पण आई आणि वडील आता ह्या जगात नाही पण माला त्या दोघांचीही खुप आठवण येते खास करून जेव्हा मी आजारी असते तेव्हा

  • @monaraipurkar6070
    @monaraipurkar6070 3 місяці тому +8

    तुम्ही तीनही प्रकार खूप छान सांगितले फक्त आम्ही नागपूर चे लोकं शक्यतो सगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्ता टाकत नाही. झुणका आणि पिठलं ह्या दोन्ही पदार्थांमध्ये कढीपत्ता टाकत नाही आणि मिरची लसणाचे वाटण पण लावत नाही. पिठल्या मध्ये लसणाचे मिरचीचे तुकडे मात्र टाकतात. पण तुम्ही खूप छान पद्धतीनी प्रत्येक पदार्थ सांगता. हे पण छान लागत असेल. तुमच्या रेसिपीज मस्त असतात. खूप शुभेच्छा.

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 2 місяці тому +15

    तुम्ही सांगितलेल्या पिठल्याच्या रेसिपी फारच सुंदर आहे आणि तुमचं बोलणं ही फार सुंदर आहे ग्रेट आहात ताई तुम्ही

  • @meenak6269
    @meenak6269 3 місяці тому +14

    आम्ही पिठलचं म्हनतो 👍. आमच्या कडे हिरव्या मिरचीचे पिठलं करते वेळेस कांदा घालत नाही फोडणीत थोडी मेथीची भाजी पण घाला खूप छान लागते 👌🏻
    पिठल्याचे प्रकार छान 👍😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +2

      आम्ही पण कांदा नाही घालत फक्त lasu मिरची ठेचा :)

    • @saraladongare7488
      @saraladongare7488 2 місяці тому

      Khup chan nivedan 19:01

  • @sampadaranade3766
    @sampadaranade3766 3 місяці тому +3

    मी कोकणची आहे आमच्या कडे झुणका भाकरी कायम मेनू असतो असेच करतो आम्ही पण तुझा शेवटचा झुणका रेसिपी खूप आवडली मी नक्कीच करून बघेन पण साजूक तूप घालून बघ कोकणात गावी घालतो आम्ही वरुन खूप छान लागते बघ❤ महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा ❤❤

  • @shubhadagosavi1839
    @shubhadagosavi1839 3 місяці тому +16

    कोकणात आमच्या कडे कुळथाचे पिठले बनवतात बेसनाच्या पिठल्याला आमच्या कडे झुणका म्हणतात खूप छान तिन्ही प्रकार झुणका चे

  • @shitalbharatparit3740
    @shitalbharatparit3740 3 місяці тому +11

    मी कोल्हापूरची आहे आणि आम्ही Goa.. mdhe rahto आणि आम्ही त्याला पातळ झुणका म्हणतो...... पण बाकी तुझी recipe trr masttch😋😋😋😋

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 3 місяці тому +7

    आंम्ही पण पिठलं म्हणतो पातळ असत त्याला आणि कोरडं असतं त्याला झुणका म्हणतो मला गाठीच पिठलं आवडत आणि आहोना बिनगाठीच हिरव्या मिरचीचे चरचरीत पिठलं आवडतं आणि लेकीला मोकळा झुणका आवडतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मग आता तीनही प्रकार करा 😛

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 3 місяці тому +6

    शुभ सकाळ सरिता, काल रात्रीच पहिला तुझा हा वीडियो. तुझे सर्वच (शाकाहारी) वीडियो मी आवर्जून पाहते.
    आमच्या कडे "पिठले " म्हणतात. पहिल जे केलेस ना पीठ पेरून, ते जरा पातळ करतो, म्हणजे भातावर घेता येते. जर पिठले भात खाणार असू तर. कारण पोळी भाजी सारख आमच्याकडे भाताला लावून नाही खात. भुरका मारता आला पाहिजे. हल्ली कोणी मारत नाही, पण लहानपणी गावाला जात असू, तेव्हा कुळथाचं पिठले, गरम मसाल्याची आमटी, असे भुरके मारत जेवत सगळे. भात जेवताना मस्त आमटी, सार, कढी असे पातळ पदार्थ घ्यायची पद्धत आहे. असो. जेव्हा मी स्वैपाक करायला लागले, तेव्हा पासून मी पिठले करताना एखाद दुसरे आमसूल घालते. त्यामुळे चव अधिक छान लागते.
    ताकातल पिठले करतो. पण जसे वर म्हटले तसे जरा पातळ असते. तू पदार्थ करताना पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. पदार्थ करो न करो 😂 मला वाटते तुझ्या आवाजाची जादू आहे. मोठ झाल लिखाण, तुला वाचायला वेळ ही नसेल.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      वेळ काढून एवढी सुंदर कमेंट केलीत त्यासाडठी अगदी मनापासून आभार ❤️❤️

  • @alkachoudhari3440
    @alkachoudhari3440 3 місяці тому +3

    सरिता, तुला सुध्दा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!तू लहानपणीचा जो किस्सा सांगितला तो ऐकून खरं तर खुप कौतुक वाटलं तुझं.चांगले दिवस आले की लोक विसरतात पण तू ती आठवण जपून ठेवली आहेस.आईने तुझ्या वर केलेले संस्कार तू पुढच्या पिढीकडे सुपूर्द करशील यांत तीळमात्र शंका नाही.❤

  • @namrataprabhu1865
    @namrataprabhu1865 3 місяці тому +4

    फारच सुंदर तीन प्रकारचे बेसन पिठलं, झुणका दाखवून, मन प्रसन्न झाले. तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे. विशेष गोष्ट सांगावे वाटते ती म्हणजे तुम्ही सांगितले ले लसलुसीत दहिवडे करून बघितले. फार छान झाले. मैत्रिणींना खावू घातले. धन्यवाद ताई❤❤ तुमची आठवण नि दिसणे नि बोलणे खुप सुंदर. पदार्थ करावेसे वाटते. 👍👍🙏🙏🍧🍧

  • @Womens_Fancystyle
    @Womens_Fancystyle 3 місяці тому +14

    आम्ही बेसन पिठलं आणि जेव्हा भाजीसाठी काही सुचत नाही आणि जेव्हा बेसन करतो त्याला श्रीखंड बोलतो❤

  • @ushapatil6206
    @ushapatil6206 3 місяці тому +11

    🙏मी सीमाभागातील बेळगाव येथे राहते.आम्ही पिठलं म्हणतो. रेसिपी नेहमीसारखी खूपच मस्त! 👍

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 3 місяці тому +14

    मी कराड शहरातील आहे आम्ही पिठले म्हणतो 3 ही रेसिपी करतो महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      🤗

    • @rupali6029
      @rupali6029 3 місяці тому +2

      कराडमध्ये आणि अजबाजूच्या गावात सुद्धा घट्ट झुणका आणि पातळ पिठलं

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 Місяць тому +2

    झक्कास 3 ही झुणका बनवण्याची पध्दत 1नंबर आहे. ❤

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 3 місяці тому +24

    खूप छान पद्धतीने अनुभव सांगितला आईची जुनी आठवण सांगितली पण ज्या व्यक्तीला आईनं भाकरी ‌खाऊ घातली त्यांनी तुम्हाला ‌भरभरु आशिर्वाद दिला ‌म्हणून‌‌ तुम्ही आम्हाला व्हिडिओ वर दिसत आहात ‌धन्यवाद

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 3 місяці тому +1

    छानच प्रकार पिठल्याचे. आम्ही तीनही प्रकार करतो.
    झुणका हा प्रवासातही नेऊ शकतो. तो २ दिवस सहज टिकतो.
    प्रत्येक पिठल्याची वेगवेगळि खमंग चव आणि स्वाद मनात दरवळला.
    आईची आठवण खऊपच छान!❤

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 3 місяці тому +2

    मी खान्देश ची तिन्ही प्रकार चे पिठ ले करतो.एक रूपया वरून मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @shailatalim2808
    @shailatalim2808 Місяць тому

    सरिता, तू जे पिठल्याचे तिन्ही प्रकार दाखविलेस ते अप्रतिम आहेत. आम्ही ह्यास पिठलेच म्हणतो. तुझी बोलण्याची कला फार छान आहे.तू कोणत्याही व्यवसायात खूप मजल गाठू शकतेस😊.
    तूला खूप खूप आशिर्वाद!!!🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Місяць тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @vidyasawadkar7279
    @vidyasawadkar7279 3 місяці тому +4

    खूप छान पिठल्याचे प्रकार, सरिता. तुला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rasikahaate
    @rasikahaate 3 місяці тому +6

    मी मुंबईची आहे. पिथल्याचे तिन्ही प्रकार खूप छान आहेत. आमच्या कडे पहिल्या दोन प्रकार त्यांना पिठले म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे त्याला झुणका म्हणतात. माझी आई सुध्दा पीठ टाकताना पीठ वैरते असच म्हणते.❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      🤗

    • @jyotimashalkar1181
      @jyotimashalkar1181 3 місяці тому

      ​@@saritaskitchendharashiv amchykade pitlach mahantat

    • @jyotimashalkar1181
      @jyotimashalkar1181 3 місяці тому

      पिथल्याचे तिन्ही प्रकार खुप छान

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 2 місяці тому +8

    मी नाशिक वरून तुमचा व्हिडिओ पाहते आम्ही याला पिठलं पण म्हणतो आणि सुख केलं तर झुणका म्हणतो

  • @anuyakulkarni3479
    @anuyakulkarni3479 3 місяці тому +1

    सरिता तुझ्या पाककृती सुंदरच असतात. आजच्याही मस्तच आहेत.. मी मात्र थोडासा बदल केला य . बऱ्याच घरांमधे माझ्या सारख्या जेष्ठांना डाळीचे पीठ तर पचत नाही, पण पिठले तर खायचे असते. तर अशा वेळी निम्मे डाळीचे व निम्मे ज्वारीचे पीठ मिसळून पिठले करावे. मस्तच होते. . हलके होते. व चवीमधे किंचितही फरक नसतो . 🙏

    • @urmilapawar5306
      @urmilapawar5306 3 місяці тому

      Tumachi payday aamachya sarakhich Aahe MI Wardha chi Athens urmila pawar

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 3 місяці тому +10

    आईची आठवण आणि शिकवण 👌👍❤

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev 3 місяці тому +3

    मी भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी गावं आहे पण मी कोल्हापूर येथे राहते आमच्या कडे झुणका म्हणतात my favourite झुणका 😋😋

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 3 місяці тому +2

    ताई, फारच छान, रेसिपी आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🎉

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 3 місяці тому

    असा कोरडा झुणका तयार झाल्यावर आमच्याकडे त्यात थोडे उकळीचे पाणी सोडतात मग लगेच झुणका भरभरून फुलून येतो.मग आणखी एक वाफ देतो. झाला झुणका तयार. बाकी पिठले तुम्ही दाखवले तसेच बनवतो.विदर्भातला हा सर्वात आवडीचा पदार्थ आहे.मी विदर्भातली यवतमाळचे आहे. खूप छान सांगता तुम्ही.आवडता मला तुम्ही खूप.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      नक्की करुन बघेन

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 3 місяці тому +1

    खूप छान तिन्ही प्रकारच्या पिठलं आणि झुणका आम्ही करतोच फक्त एक आहे आमची कोकणी पद्धत त्यांच्यामध्ये आम्ही कोकम वापरून करतो कोकम एक फळ आहे ते आंबट असते त्यामधील गर काढून कोकम उन्हात वाळवून त्याला जो गर काढून ठेवतात त्याचा रस लावावा लागतो असं हे सात वेळा कडक उन्हात वाळवून प्रत्येक वेळी रस लावावा लागतो.तर अशी बनवायला थोडा वेळ लागतो पण या उन्हाळ्यातच ती फळ ( कोकम ) येतात ती वर्षभर चांगली टिकतात . त्यातील दोन तीन तुकडे घालून खूप सुंदर चव पिठलं किंवा झुणक्याला येते . अजून एक प्रकार आहे तो म्हणजे चणाडाळ भिजवून जाडसर वाटून त्याचा झुणका खूप सुंदर लागतो अगदी मोकळा होतो तो सुद्धा वाफवून करावा लागतो.त्यात कोकम वापरून करुन बघा चव फार छान लागते.( त्यात थोडं आलं पण वापरायचं बाकी सर्व साहित्य तेच )

  • @vimalhule477
    @vimalhule477 2 місяці тому

    सरिता ताई.. किती सुंदर पद्धतीने तुम्ही या तीनही रेसिपी मांडल्या आहेत.. माझ्याकडून पिठले बऱयाचदा हवे तसे होत नाही. मी पुन्हा एकदा नक्की करून बघेन. धन्यवाद 🙏🙏 आणि तुमचे खूप खूप कौतुक. तुमच्या आईला सॅल्यूट

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 24 дні тому +1

    छान अभिनंदन करते है आप का धन्यवाद ओम शांती

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 3 місяці тому

    ताकातल पिठल पहिल्यांदाच बघितल मी….👌👌 झुणका भाकर सगळ्यांनाच आवडत..आईच्या कष्टांना प्रणाम 🙏🙏

  • @GitanjaliBaviskar-yc3ye
    @GitanjaliBaviskar-yc3ye 2 місяці тому

    सरीताताई तआकआतलं आंबट पिठलं तयार करतांना जर तेलामध्ये अर्धा टीस्पून मेथीदाणे घातले तर हिंग व मेथीदाणे यांचं combination जबरदस्त होतं.ताई तुमच्या सर्वच रेसिपीज व समजावून सांगण्याची पद्धत खुपच रसाळ

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 23 дні тому +1

    Khup chhan pitla,aamchya ikde besan mantat.gondiya jillyat.❤

  • @anitakore8940
    @anitakore8940 3 місяці тому +3

    महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ताई मी सोलापूर ताकातल पिठलं मला माहित नव्हतं खूप छान आम्ही मेथी पिठलं करतो

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 3 місяці тому

    मी वसई येथुन पाहते आहे आम्ही पहिल्या दोन प्रकारांना पिकली म्हणतो आणि शेवटचा झूणकाच म्हणतो माझ्या सासूबाई झुणका खुप छान बनवायच्या आठवणी ना उजाळा मिळाला धन्यवाद

  • @vaishalishinde5567
    @vaishalishinde5567 3 місяці тому +1

    मी कराड मध्ये राहते,आम्ही ह्याला पिठलं आणि झुणका अस दोन्ही पण म्हणतो ,पण तुझे तिन्ही प्रकार खूपच सुंदर केलेस 👌👌

  • @nehanivendkar4806
    @nehanivendkar4806 3 місяці тому +4

    जय भवानी जय शिवाजी महाराज की जय. ....महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ..

  • @user-op8rp2ex5d
    @user-op8rp2ex5d 3 місяці тому +1

    मी पुण्यात राहते आम्ही बेसन बोलतो ताई आणि हो मी या रेसिपी ची खुप दिवसा पासून वाट पाहत होते कारण मला बेसन जमत नाही पण आता जमलं कारण तू खुप छान सांगितलं आहे खुप छान रेसिपि झाली आज ची thanku ताई तू माझ्या मनातलं ऐकलं

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      नक्की करुन बघा 🤗

    • @anuradhaparkale9507
      @anuradhaparkale9507 3 місяці тому

      माझं सासर बारामती आहे.तिथे सुद्धा बेसनच म्हणतात.

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 3 місяці тому +2

    मी विदर्भ मधुन आहे . सध्या पुण्याला असते आमच्याकडे पहील लाल पिठलं लग्नाच्या आधल्या दिवशी करतात . दुसर ताकातल पिठल त्याला खट्टू अस म्हणतात शेतात गहू ज्वारी तयार करायच्या दिवशी घरमालका कडून हा खट्टू आणि भाकरी चा बेत असतो . तिसरा प्रकार पण नेहमीच केला जातो . माझ्या ताईच्या हातचा झुणका एकच नंबर लागतो .

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      अरे वा!! नाविन माहीती समजली 🤗

  • @vskale1233
    @vskale1233 3 місяці тому

    सरीताताई अप्रतिम वर्णन आमच्याकडे ,पुण्यामध्ये पातळ असतं ते पिठलं आणि सुका तो झुणका. माझ्या सासूबाई कोल्हापूरच्या होत्या त्या सुक्या पिठल्याला कोमट कांदा म्हणायच्या.

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 3 місяці тому

    सरिता,मी आॅस्र्टेलिया(सिडनी)येथून गेल्या महिनाभरातून तुझे व्हिडिओ पहाते आहे.तिनही प्रकार छानच आहेत.फक्त ताकातील पिठल फारसे खात नाही.तुझी लहानपणीची आठवण ऐकून डोळ्यात पाणी आले.तसेच आॅस्र्टेलियातून सर्वांनाच महाराट्रदिनाच्या शुभेच्छा देते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मनापासुन धन्यवाद 🤗❤️

  • @shakuntalarandive5050
    @shakuntalarandive5050 3 місяці тому +3

    महाराष्ट्र दीनाच्या खूप खूप शुभेछा माज्या कड़े गुठ ल्या चे पिठले व कोरडे पिठले केले जाते मी मुंबई हन बघत होते धन्यवाद ताई❤❤❤❤

  • @baccharacingclubich4646
    @baccharacingclubich4646 3 місяці тому +3

    मी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी येथून आमच्याकडे याला दोन्ही ही म्हणतात पिंठल आणि झुणका

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 3 місяці тому +1

    ताई तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मी पुण्यात रहाते, ताकातल पिठलं मी पहिल्यांदाच पाहीले खूप छान, तिनही पिठल्याचे प्रकार १नंबर, आमच्याकडेही पिठलं म्हणतात, धन्यवाद ताई 👌😍😋🙏

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 3 місяці тому +1

    महाराष्ट्र दिनाच्या दिनाच्या शुभेच्छा.. छान आणि सोप्पे करून पिठला चे ३ प्रकार सांगितले...
    . धन्यवाद

  • @rajashrigramopadhye27
    @rajashrigramopadhye27 3 місяці тому +5

    👌👌 आणि तू सांगितलेली आठवणही खूप ह्दयस्पर्शी आहे 🙏🙏

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 3 місяці тому +1

    ताक पिठलं छान..पहिल्यांदाच समजल ताकातल पण पिठलं बनवले जाते..नक्कीच बनऊन बघेन..

  • @trishalambe0208
    @trishalambe0208 4 дні тому +1

    मी दापोली तालुक्यातील आहे मला झुणका भाकरी खुप आवडते ❤

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 3 місяці тому

    तुम्ही ही गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही हळव्या झाल्याचे जाणवले. आमच्या ही डोळ्यात पाणी आले.अशाच भावनाशील रहा.यशवंत व्हाल.

  • @MadhavMhaiskar
    @MadhavMhaiskar 3 місяці тому +47

    ताई, मी पिठल्याचा आणखी एक प्रकार ऐकला आहे तो म्हणजे रावण पिठले. त्यात तिखट पुडीचे प्रमाणे जास्त असते. त्याची रेसिपी माहीत असल्यास प्रेक्षकांना सांगणे.

    • @smeetagujarathi1835
      @smeetagujarathi1835 2 місяці тому +5

      हो, मी करते कायम, सगळे एक एक वाटी, छोटी वाटी बेसन तिखट, दही, किसलेले खोबरे कांदा कोथिंबीर

    • @jyotsnatherade935
      @jyotsnatherade935 2 місяці тому

      ​@@smeetagujarathi1835we😊

    • @babanghanwat4791
      @babanghanwat4791 2 місяці тому

      ​@@smeetagujarathi1835ooooo

    • @pareegupta1779
      @pareegupta1779 2 місяці тому

      "." **
      . . *0. ?. ? . .

    • @musaalisayyad6233
      @musaalisayyad6233 Місяць тому

      @@smeetagujarathi1835 to

  • @preetipomannawar3566
    @preetipomannawar3566 Місяць тому

    Mi kolhapur chi aahe..amhi 2 prakarche pithale karto .pithale ani zunka mhnto amhii..
    Takatle pithle hi navinch paddhat samjli..❤
    Khupp khupp dhanyawad 😊

  • @kaleidoscopebymanjushaamde338
    @kaleidoscopebymanjushaamde338 3 місяці тому

    तुमच्या आईला नमस्कार 🙏 तुमचंही कौतुक आहे. कोणतीही रेसिपी हसतमुखाने आणि विनम्रपणे सांगता. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉

  • @Kokaniswarakitchenvlogs
    @Kokaniswarakitchenvlogs 3 місяці тому +1

    ताई मी कोकणातून आहे आम्ही याला पिठलच म्हणतो. माझ्या मुलीला खुप आवडते पिठलं भात

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 місяці тому +2

    ताई आईची आठवण सांगितली माझ्या आईकडे पण लहानपणी गरिबी पैशांची होती पण मनाने ती खूप श्रीमंत आहे, अशा खूप सार्या आठवणी आहेत.

  • @RajaniGawnar
    @RajaniGawnar 3 місяці тому

    विदर्भात लाल पिठल्याला पातळ बेसन, दही किंवा ताकाच्या पिठल्याला आंबट बेसन आणि झुणक्याला मोकळ बेसन किंवा झुणकाच म्हणतात पिठलं हे बहुधा रात्रीच्या जेवणात असते . तिनही प्रकार आवडतात. सरीताताई तुम्ही सांगीतलेला किस्सा खूप मनाला लागून गेला. तुमच्या रेसिपी छान असतात.

  • @pamg2628
    @pamg2628 Місяць тому

    That was an incredibly, touching story about your Aai. Such a noble woman. It brought tears to my eyes. I was planning to make zhunka today and stumbed upon your video. Great description and loving story. I will prepare your way in memory of your Aai. Love from US.

  • @santoshjadhav1607
    @santoshjadhav1607 Місяць тому +1

    ताई डांगर ची रेसीपी माहीत आहे ❓ असेल तर त्या रेसीपी चा व्हिडिओ बनवून टाका. 👌🏻👍🤣🤣🤣

  • @vandanakubde9445
    @vandanakubde9445 3 місяці тому +1

    Maharashtra Diwsachya khup Shubhechha! You share begin experience about "Zunka Bhakar Kendra " really very emotional experience, so I like so much! Very excellent recipe of 3 zunka! So thanks for you Mam.❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🇮🇳

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Місяць тому +1

    फारच छान अप्रतिम अभिनंदन

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 Місяць тому

    सरिता तातई तुमच्या रेसिपी छान असतात त्यामागच्या ह्रद्य आठवणी खूप आवडतात.धन्यवाद.

  • @the_zen_shreyas9309
    @the_zen_shreyas9309 3 місяці тому +1

    Thanks Tai....🙏Pithale,junaka,v besan ase antat....mi Vidyatai...Rahanar....Nanded...maharadtra👍👍

  • @sangeetachandorkar1696
    @sangeetachandorkar1696 3 місяці тому

    सरिता खूप मस्त 3 प्रकार पिठले मी आज झुणका करून बघणार तू दाखवला तसाच तुझ्या आई बरोबर चा किस्सा 1 रुपया च ऐकताना डोळे भरून आले माझे ,तू मला खूप आवडतेस एकदा भेटावं असं वाटते❤😊

  • @jagrutishirsat6702
    @jagrutishirsat6702 2 місяці тому +2

    Madum good very good recypi I like it god bleese you

  • @vidyavaydande3345
    @vidyavaydande3345 3 місяці тому +2

    Mi Mumbai chi but Nashikla rahte.khup Chan recipies astat.Pital,zunka maz favourite ahe.😊Jay Maharashtra 🙏👍

  • @sunitagaikwad6298
    @sunitagaikwad6298 2 місяці тому

    आईची किस्सा खूप छान पध्दतीने सांगितला.😢तुमची सांगण्याची पध्दत,पदार्थ ही छान होतात 👌मस्तच 👍

  • @prabhavatinakate2827
    @prabhavatinakate2827 3 місяці тому +1

    मी सोलापूर ची आहे आम्ही पातळ असेल तर पिठले घट्ट असेल तर झुणका म्हणतो लहान पणीची आठवण खूप छान हल्लीं मुलींना मागचं सांगितलेलं आवडत नाही अशीच मोठी हो पाय जमिनीवर आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे ❤

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 3 місяці тому

    मी पिंपरी चिंचवड मधून आहे आम्ही पिटलच बोलतो सरिता तुला पण महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ३ प्रकार खूप छान आहेत ❤❤❤

  • @varsharanipatil3299
    @varsharanipatil3299 3 місяці тому +2

    ताई तुम्ही शेंगदाणे नाही घातले ...छान लागतात..माझी आई कच्चे शेंगदाणे, मिरची,जिरे, लसुण कोथिंबीर असा घालून सगळं खलबत्त्यात कुटन मग ते फोडणीला घालायची ...चव खूप अप्रतिम येते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      अरे वा!! मी पण करेन 🤗

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 3 місяці тому +2

    जय महाराष्ट्र ❤
    मस्त ताई पिठल्याचे तिन्ही प्रकार भारी बनवले 👌👌👌
    चेंबुर, मुंबई.

  • @user-dx2qn7hh7c
    @user-dx2qn7hh7c 3 місяці тому +1

    ग्रामिण शब्द झुणका,ब्रम्हणी,शहरी शब्द पिठल, पात्र,भट्ट पिठल,पात्तल,घट्ट झुणका दोन्हीही--पिठल-झुणका हा एकच पदार्थ आहे पण झुणका शब्द झणझणीत व पिठल शब्द अलणी वाटतो,

  • @pramilasamindre3768
    @pramilasamindre3768 2 місяці тому

    मी सांगली जिल्ह्यातील आहे आमच्याकडे झुनका म्हणतात तुम्ही खुप छान रेसिपी बनवता सर्व प्रकारच्या रेसिपी मला आवडतात
    धन्यवाद🌹🙏👍

  • @nandaranade4005
    @nandaranade4005 5 днів тому

    झुणका तर छानच, पण आईची आठवण सांगतानाची संवेदनशीलता भावली. सरिता, तुला खूप शुभेच्छा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 днів тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @varsharanipatil3299
    @varsharanipatil3299 3 місяці тому +2

    आम्ही पण असाच करतो..आमच्यात पण पातळच पिठले लागतं..पण कधी कधी आम्ही त्यात मेथी पण चिरून टाकतो फोडणीला...छान लागते मेथी पिठले...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      हो मेथीचं पिठलंही छान लागतं

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 3 місяці тому +1

    सरिता ताई तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी नाशिकची आहे आमच्याकडे याला पिठलंच म्हणतात कोरडा असो किंवा पातळ पण मी ताकातलं पिठलं पहिल्यांदा करणार आहे तुमचं बघून

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      नक्की करुन बघा

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 3 місяці тому

    विदर्भात याला बेसन म्हटल्या जात.कांद्याचा मोकळा झुनका.जसे आंबट ताक वापरले की नाही तसेच उन्हाळ्यात कैरीच्या फोडी किंवा कोय घालून देखील बेसन केल्या जात.
    रेसिपी नेहमी प्रमाणे उत्तम 👌👌
    तुझी लहानपणी ची आठवण मन खुप हेलावून गेली बघ.🤗

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +1

      अरे वाह !! मी तसे करुन बाघेन

  • @user-xn4wk5im4n
    @user-xn4wk5im4n 2 місяці тому

    ताई खूपच छान. मुंबई हून आहे. हा माझा favourite पदार्थ आहे. त्यापुढे panchpakwanna फिके आहेत. मी करते पण आपण सांगितलेले प्रमाण आणि पद्धत नक्कीच follow Karen dhanyawad

  • @shubhadapurandare7814
    @shubhadapurandare7814 12 днів тому

    You are such a beautiful soul. Your family is lucky to have you. I always enjoy your recipes. Thank you for sharing your memories. Wherever your Aai is ,she must be very proud of you. Also your Baba from heavens. Sending you blessings from USA. All the very best.

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp 3 місяці тому

    खूपच छान ताई. आम्ही पण अशाच पध्दतीने पिठलं बनवतो. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 3 місяці тому +1

    खूप छान सांगितलंस ग
    सरिता,हा झुणका लोखंडी कढईत केल्यावर खाली लागतो ना,अहाहा,खरपूस,खरपुडी छान लागते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      खरवड!! मस्त लगते

  • @anujajoshi6105
    @anujajoshi6105 2 місяці тому +2

    आमच्या कडे घेरून पिठलं बनवतात. पण कधी कधी कुलथाचे आणि झुणका पण बनवतो. ताकातल पहिल्यांदाच पाहत आहे.

  • @AIIMS20242
    @AIIMS20242 3 місяці тому +2

    थोडं कच्चा शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलं की अजून भारी चव येते. आमच्याकडे असंच करतात शेंगदाण्याचं कूट घालून🤤😋 मग ते पिठलं असो वा झुणका..

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 місяці тому +1

    🚩🚩 महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹😋😋👍👍👌👌🙏🙏सुंदर ताई 😋😋

  • @Vijayashirsat02
    @Vijayashirsat02 3 місяці тому +3

    ताई महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    मी विदर्भ मधली आहे. तुम्ही दाखविले तीनही प्रकारचे बेसन मी करते.

  • @ravimore37
    @ravimore37 3 дні тому

    कुपच सुंदर रेसिपी, ऑल द बेस्ट.....

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 3 місяці тому +1

    महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा खूप छान 👌 पिठल म्हणतो छुनका पण म्हणतो❤❤

  • @dipalijangam2792
    @dipalijangam2792 3 місяці тому

    मी रोहा रायगड मधून आहे तुमच्या प्रत्येक रेसिपी मी बघते खूप छान असतात पटकन समजतात आणि पिठल पण सुपर ताई 😊❤

  • @baccharacingclubich4646
    @baccharacingclubich4646 3 місяці тому +2

    खूप छान मस्त

  • @sangitayeolekar7470
    @sangitayeolekar7470 3 місяці тому

    मी पुण्यात राहते आमच्या कडे पीठ पेरून केलेले पिठलं म्हणतात आणि हो गरम गरम पिठलं भाकरी आणि भात हाहाहा स्वर्ग सुख.😊😊

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 місяці тому

    खुपच छान, आमच्याकडे कोरडा झुणका व पातळ पिठलं असे म्हणतात. आणखिन एक कधी झाल्यास पातीच्या कांद्याचं पातळ पिठलं करुन गरमागरम भाकरी बरोबर खाऊन बघ .

  • @kshamadesai5977
    @kshamadesai5977 3 місяці тому +29

    मी कोल्हापूरची आहे रहाते ठाणे अंबरनाथ आमच्याकडे झुणका म्हणतात घट्ट झुणका किंवा पातळ झुणका महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ShilpaMadhukarAmkar
    @ShilpaMadhukarAmkar Місяць тому

    Mi virar yethun....Shilpa Amkar.....amchya kade 'Pithala' asa boltat....ani amhi te pnyamadhe phetun banavto....pan tyat Rai, jeere nahi ghalat....Kanda,hirvi mirchi kokam ani kothimbir ghalto.....😊.....ani Junka prakar mi aikun ahe malahi adhi asach vatat hota ki....Pithala ani Junka ekach prakar ahe....pan asa nahi ....Aaj tumhi dakhavlelya 'Pithala' Recipe vidio Varun kalala......khupach chan.....😊

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 19 днів тому +1

    आमच्याकडे बेसन पिठले अजून एक प्रकार आहे थोडे कच्चे पालक कटिंग करून त्यात टाकायचे आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तुम्ही तीन प्रकारचे बेसन पिठले बनवले आहे त्यातली चव कशाची चांगली लागते

  • @saritapawaskar4347
    @saritapawaskar4347 2 місяці тому +1

    रवुप च अनुभव ऐकून व आईची दानत ऐकून मन गहिवरून आले

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 3 місяці тому +1

    खुपच छान प्रकार दाखविले पिठल्याचे .तुमच्या आईला आदरांजली

  • @vandanapatel330
    @vandanapatel330 3 місяці тому +1

    Thank you Tai tujhya recipe pahun khup shikayla milate

  • @rupaliborgave5852
    @rupaliborgave5852 3 місяці тому

    मी कोल्हापूरची आहे खूप छान रेसिपी आहे.आमच्या घरी झुणका सगळ्यांना आवडतो .👌🏻👌🏻

  • @panjabraodhawale279
    @panjabraodhawale279 Місяць тому

    Gathi chya Pithalyat Bharpur kande ghatle ki chan chav yete Tai Amchya Warhad la ache banvitat 👍 Weldone Yammy pithalya che Prakar 🙏😊