| सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या |Sunya Sunya maifilit majhya | Mugdha Vaishampayan | Umbartha |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024
  • #sunyasunyamaifilit #Mugdhavaishampayan #Sureshbhatumbartha
    Song : Sunya Sunya Maifilit Makhya
    Movie : Umbaratha
    Music : Pandit Hridayanath Mangeshkar
    Lyrics : Suresh Bhat
    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
    तुझेच मी गीत गात आहे
    अजुन ही वाटते मला की
    अजुन ही चांद रात आहे
    कळे ना मी पाहते कुणाला
    कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे
    तुझे हसू आरशात आहे
    सख्या तुला भेटतील माझे
    तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
    अबोल हा पारिजात आहे
    उगीच स्वप्नांत सावल्यांची
    कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला
    तुझ्याच जे अंतरात आहे
    “सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ. जयश्रीताई गडकर” एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या…!
    त्या चित्रपटासाठी त्यांना एक खास.., वजनदार असे गाणे हवे होते..!
    त्यांनी त्या साठी कै. श्री. सुरेश भटांना विचारले…!
    श्री. सुरेश भट म्हणजे एकदम तब्बेतीचे ✍️🎼 कवी..,एक मस्त.., कलंदर व्यक्तीमत्व.., सिनेमाच्या 🎼गाण्यांचा रतीब घालणारे…!
    ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणारे कोणी ‘नाना’ नव्हते ते…!
    सौ. जयश्रीताईंची विनंती मानून श्री.सुरेश भट असे एखादे गीत ✍️लिहिण्यास तयार झाले..!
    “माझी मुंबईत राहण्या खाण्याची सोय करा.., म्हणजे मी मुंबईत येऊन तुम्हाला गाणे ✍️लिहून देईन..!”
    सौ. जयश्रीताई त्याला तयार झाल्या…., कविवर्य मुंबईत दाखल झाले..!
    सौ. जयश्रीताई.., चित्रपटाचे कथा आणि पटकथाकार, संगीतकार आणि सुरेशभाऊ यांच्यात काही बैठका झाल्या..!
    आता जयश्रीताई गाणे कधी हातात पडते याची वाट पाहू लागल्या..!
    पण सुरेशभाऊंकडून काही गाणे लिहून होईना..!
    काही दिवस थांबून जयश्री ताईंनी सुरेश भाऊंना आठवण करुन दिली..!
    “सुरेश भाऊ आता आपल्याला जास्त वाट पाहता येणार नाही.., नाही गाणे सुचत तर राहू दे…!
    असे व्हायला नको होते.., त्यांनी तडक दादर स्टेशन गाठले..! नागपूरची गाडी उभी होती.., सुरेशभाऊ निवांत खिडकीची जागा पटकावून बसले होते..!
    बाईंनी त्यांना विचारले…, त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले…, गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!
    “हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे काय आहे…, काव्य ही एक दैवी देणगी आहे..! प्रतिभेचा हुंकार आहे.., याला काळ.., काम.., वेगाची बंधने लागू पडत नसतात.., सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते…!
    आज भल्या पहाटेच हे गाणे सुचले मला.., हातासरशी ✍️लिहून टाकले…!”
    “याच्या मानधनाचा चेक आपल्याला पाठवून देते…, लगेचच…!”
    “ताई…, त्याची काहीच गरज नाही…! आपण माझी मुंबईत जी बडदास्त ठेवलीत तीच मला पावली..! बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे.., परमेश्वरी देन आहे.., त्याचे मोल मी काय करणार आणि तुम्ही काय देणार’..?’
    “अहो पण..?”
    “तुम्ही आता काही बोलू नका…, उलट मीच तुमची क्षमा मागितली पाहिजे.!”
    एव्हढ्यात गाडी हलली…,
    सौ. जयश्रीताईंना पुढचे काही बोलता आले नाही…!
    घरी परत आल्यावर सौ. जयश्रीताईंनी ते गाणे वाचले मात्र त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूंच्या धारा लागल्या..!
    काही कारणामुळे सौ. जयश्रीताईंना ते गाणे त्यांच्या त्या चित्रपटात वापरता आले नाही..!
    ते तसेच त्यांच्यापाशी पडून राहिले… पुढे काही वर्षांनी जेव्हा श्री. जब्बार पटेल एक चित्रपट निर्माण करत होते.. तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना अगदी असेच गाणे हवे होते, कोठून तरी त्यांना त्या सुरेश भटांच्या गाण्याबद्दल कळले…,
    त्यांनी सुरेशभाऊंना विचारले…?
    “वो गाना…?
    वो तो अब “जयश्रीताई जीं” की अमानत हैं…!
    उन्हीसे बात किजीये..!”
    सौ. जयश्रीताईंनी त्या गाण्यासाठी तसे म्हटले तर बराच खर्च केला होता पण…,
    “हे गाणे तर परमेश्वरी कृपाप्रसाद आहे..!
    मी याचे पैसे नाही वसूल करणार.., उलट पं. हृदयनाथजींसारख्या संगीतकारा कडे हे गाणे जाते आहे.., त्याचे खरोखरीचे चीज होईल.., 💎हिर्‍याला कोंदण लाभेल..!”
    असे म्हणत ते गाणे पं. हृदयनाथजींकडे हवाली केले..!
    अर्थातच पं. हृदयनाथजींनी त्या 💎हिर्‍याला साजेसे असे सुरेख कोंदण दिले.., आणि ते गाणे मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर केले..,
    ते हेच गाणे होते…!
    पुन्हा कधी तरी बोलवू आम्ही आपल्याला….!
    आम्ही पुढच्या दोन दिवसाचे लॉजचे सगळे बिल भरले आहे..!
    पण याहून जास्त आपल्याला तिथे राहाता येणार नाही..!
    तेव्हा…,”
    “ठीक आहे, जशी तुमची मर्जी..!”
    सुरेशभाऊ शांतपणे म्हणाले..!
    दुसरे दिवशी त्या लॉजच्या मालकांचा सौ. जयश्री ताईंना फोन आला..!
    “आपले ते नागपूर चे गेस्ट.., अगदी आत्ताच खोली खाली करुन गेले…!
    गडबडीत दिसले.., दादर ला नागपूरची ट्रेन पकडायची आहे असे काही तरी म्हणत होते…!”
    बाईंना आश्चर्य वाटले.., कविवर्य रागावले का काय…?
    असे न सांगताच…,
    न कळवताच कसे मुंबई सोडून निघाले…?
    छे.. छे..,आपल्या बोलण्याने दुखावला वाटतो हा मानी गृहस्थ..!
    “हो जाये गा.., मिल जायेगा..!”
    सुरेशभाऊंचे उत्तर आले…!
    बाईंनी विचार केला मोठे कवी आहेत…, थांबू काही दिवस…, पण असेच आणखी काही दिवस गेले…, गाणे काही भेटेना…!
    ईकडे त्या गाण्यासाठी चित्रीकरण खोळंबले..!
    स्टुडिओच्या तारखांबद्दल प्रश्न निर्माण व्हायला लागले..!
    सौ. जयश्रीताईंचा धीर सुटला.., आता सुरेश भाऊंना तगादे चालू झाले…!
    पण…,
    “हो जाये गा…, मिल जायेगा..!”
    हेच उत्तर मिळत राहिले…!
    इकडे गाणे न मिळाल्याने कामे खोळंबली होती… तर तिकडे सुरेश भाऊंचा लॉज व जेवणा खाण्याच्या खर्चाचे बिल दिवसागणीक वाढत होते..!
    अखेर बाईंनी सुरेश भाऊंना स्पष्ट सांगितले…!

КОМЕНТАРІ • 53

  • @ksambolkar
    @ksambolkar Рік тому +7

    साउंड सिस्टीम लाऊड झाली असल्याने चांगले गीत गाऊन ही मुग्धा आमच्यासाठी बोअर झाली

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar 2 роки тому +30

    लता दीदी त्या लता दिदीच !! काही काही गाणी त्यांची आणि त्यांचीच आहेत !!

  • @sandipavarsare3642
    @sandipavarsare3642 Рік тому +13

    लताची कुठलीही गाणी कुणीच गावू शकत नाही

  • @sandeepkamble9917
    @sandeepkamble9917 Рік тому +2

    Lata di din che gaane gaane phar kathin taru hi mughdha madam dhadas kele ani khup chaan gayile, ani anchor hi khup chaan

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Рік тому +6

    Mughda खुप छान गाईलेस तु.
    Tuzya original आवाजात. नाहीतर कितितरी गायीका लता दिदिची ची बरोबरी करतात.

  • @madhumatikelkar7674
    @madhumatikelkar7674 Рік тому +3

    मला आवडलं मुग्धाचं हे गाणं.छान गायलीस मुग्धा.

  • @sheelashenoy2999
    @sheelashenoy2999 Рік тому +2

    I just heard you sing this song today on UA-cam good effort mugdha you sang it very well and my best wishes for your ahead journey

  • @unmeshkatre507
    @unmeshkatre507 Рік тому +1

    Sunder avaj kup chan song is too very good too

  • @SuperSushant7
    @SuperSushant7 Рік тому

    💐Nice information behind of that fabulous song🤗

  • @makarandkarandikar6496
    @makarandkarandikar6496 Рік тому +4

    खूपच सुंदर 👏👏👏👏

  • @pundliksananse3562
    @pundliksananse3562 Рік тому +2

    Farach khup chan performance

  • @kalaspanda
    @kalaspanda Рік тому +2

    Nice efforts of Mugdha. All the best❤

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 Рік тому +2

    जीवन रूपी महफील अनंत काळापर्यंत सर्व दृष्ट्या भरून राहणार.

  • @smitashukla7136
    @smitashukla7136 Рік тому +1

    Chhan gaylis mugdha,God bless you

  • @mayureshbarve3715
    @mayureshbarve3715 Рік тому +4

    ❤this Song and Those days ....Just nostalgia 😊

  • @ushayavagal448
    @ushayavagal448 Рік тому +1

    Very Superb Song

  • @prathibhajoshi1904
    @prathibhajoshi1904 Рік тому +3

    प्रत्येक वेळेस लता मंगेशकरांशी 5:23 तुलना करू नाही. मुग्धा ही मुग्धा आहे.

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 2 роки тому +4

    मला तर निवेदनातील किस्साच भावला
    गीत नेहमीच ओठांवर असते, अगदी बालपणापासून जेव्हा अर्थही कळत नव्हता. गाणी नेहमीच ऐकत असतो पण त्यामागचा इतिहासही कधीकधी त्या गीताची महती पटवून देतं.

  • @abhayshinde2942
    @abhayshinde2942 Рік тому

    अगदी बरोब्बर गायले.

  • @chetanpatil5875
    @chetanpatil5875 2 місяці тому

    Are yaar ha kiti boltoy....😢

  • @vrush68
    @vrush68 Рік тому +1

    खूप छान किस्सा

  • @eknathbelsare8054
    @eknathbelsare8054 8 місяців тому +1

    म्हूणन दुसऱ्या कोणी गाऊ नये असे नाही आता लता दीदी नाहीत

  • @mayashinde3455
    @mayashinde3455 Рік тому +4

    खूप सुंदर

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 Рік тому +2

    सुंदर

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 2 роки тому +2

    Great

  • @suchitradesai5136
    @suchitradesai5136 Рік тому

    Mugdha khup chhan

  • @vaibhavashtekar3495
    @vaibhavashtekar3495 Рік тому

    Nehami pramane chhanach gayalis Mugdha

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 Рік тому +1

    उगीच कौतुक time pass. गीत कसे प्रसवले 😅

  • @pradeepphatak4248
    @pradeepphatak4248 2 місяці тому

    Nivedan thodkyat kele pahije

  • @sandipavarsare3642
    @sandipavarsare3642 Рік тому +2

    जमलं नाही

  • @pushkarkulkarni8065
    @pushkarkulkarni8065 11 місяців тому +3

    Nimma programme haach boltoy.yala gappa kara re

  • @sureshkamath468
    @sureshkamath468 2 роки тому +6

    When the anchor is talking about how the song was written by Mr Bhat, Mugdha despite the anchor asking her to pay attention is busy talking to another singer and the person on harmonium . She and the other singer lack basic etiquette. You might be a great singer but these are simple things.

    • @swapnilmandavkar123
      @swapnilmandavkar123 2 роки тому +1

      काली १ jar kalat nasel tar mansane comments karu naye

    • @sureshkamath468
      @sureshkamath468 2 роки тому

      @@swapnilmandavkar123 yachat Kali 1 cha Kay sambandh Swapnil dada . Je disla te mi lehele .

    • @pratikpatil4
      @pratikpatil4 Рік тому

      Hya karyakrmachi rangit taalim baryach vela zali asnar ani baryach vela ha kissa nivedakanni sangitla asnar. Tyat pratyek veli ti laksh deil ashi apeksha karne chukiche ahe. Ani stage vr mansacha gondhal udalelach asto

    • @hemanthakumarkamath7779
      @hemanthakumarkamath7779 Рік тому

      Very well said👍🏻...

  • @madhusudansathe4240
    @madhusudansathe4240 2 роки тому +2

    email ID धारकाची पत्नी सुधा साठे लिहित आहे...माझ्या माहितीत हृदयनाथांना पूर्ण विश्वास होताच कि सुरेश भटच हे लिहू शकतील...जयश्रीबाईंना अनुभव नव्हता...तो असा आला.

  • @surajlahare4297
    @surajlahare4297 Рік тому +4

    सूत्रसंचालक.... अब बस ना भो😂😂😂

  • @yatink7404
    @yatink7404 Рік тому

    This compere spoke for 5 minutes 😮

  • @rakeshchelani3722
    @rakeshchelani3722 Рік тому +1

    Abhishek ❤

  • @jitendrakulkarni5999
    @jitendrakulkarni5999 Рік тому

    सूत्र संचालकांचे नाव काय आहे

  • @nitinghadi548
    @nitinghadi548 2 роки тому +3

    Dusari lata didi punha nahi ok

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk Місяць тому

    Aare compare Kay kartay.. Kala hi kala aste.. Aanand ghya.. shubheccha…aashirwad dya.. 😊
    Ugach faltu chi comparison kartay

  • @sukh1dham
    @sukh1dham 2 роки тому +4

    निवेदनाचा दर्जा चांगला
    पण लांबड अप्रस्तूत ..
    निवेदन काढून फक्त गाणे ठेवा .

  • @kalpeshrane4550
    @kalpeshrane4550 Рік тому +1

    Yedwya mothe singer aasun.average hote...wow aase vatle nahi

  • @pushkarkulkarni8065
    @pushkarkulkarni8065 11 місяців тому +2

    Kasa popat zalay mugdha

  • @DhanrajDarade
    @DhanrajDarade 3 місяці тому

    Not as like original

  • @seemanikam447
    @seemanikam447 2 роки тому +5

    This anchor voice is very irritating

  • @mrggbhagat8005
    @mrggbhagat8005 2 місяці тому

    Third class

  • @andytechexplorer2688
    @andytechexplorer2688 2 місяці тому

    Sutrasanchalanacha show ahe ki singing cha ky kalalach nahi 😅