Sunya Sunya Maifilit Majhya | Umbartha | Full Video | Lata Mageshkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2024

КОМЕНТАРІ • 551

  • @mi_siddhant
    @mi_siddhant Рік тому +23

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
    अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे
    कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?
    पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे !
    सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !
    उगीच स्वप्‍नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
    दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?

  • @jagdishpawar5520
    @jagdishpawar5520 4 роки тому +54

    असे शब्द, असे संगीत आणि लता दिदीचा स्वर्गीय आवाज .... पुन्हा असे गाणे होणे शक्य नाही 🙏

  • @shrikesari
    @shrikesari 2 роки тому +134

    All three divine performers in this song (Lata tai, Smita Patil and Girish Karnad) are in heaven now. Om Shanti!

    • @sunilmore5254
      @sunilmore5254 10 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @naynaupadhyay6199
      @naynaupadhyay6199 3 місяці тому

      Singer is different, not lata mangeshkar

    • @Rohan122
      @Rohan122 3 місяці тому

      @@naynaupadhyay6199 thats lata

  • @atuldpatil
    @atuldpatil 5 років тому +487

    काल १३ डिसेंबर... तुझा स्मृतिदिन... तुझे गाणे आठवल्याशिवाय "माझी मराठी गाणी" पूर्ण होणार नाहीत. "उंबरठा" चित्रपटातील तुझ्या या गाण्याची पं. हृदयनाथ मंगेशकरांनी फार हृदयस्पर्शी आठवण सांगितली आहे. गीतकार मा. सुरेश भट यांना चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले होते. त्यासाठी निवांतपण मिळावे म्हणून हॉटेल सुद्धा बुक करून दिले होते. पण चार दिवस झाले, आठ दिवस झाले भटसाहेबांना गाणे सुचायला तयार नाही. इकडे हॉटेलचे बिल तर वाढतच होते. अखेर हृदयनाथ यांना निर्मात्यांनी बोलवून घेतले. म्हणाले, "भटसाहेबांना हॉटेल सोडायला सांगा". हृदयनाथानी भटसाहेबाना तसे सांगितले. भटसाहेब काही बोलले नाहीत. शांतपणे जाऊन खाली गाडीत बसले. हृदयनाथानी हॉटेलचे बिल भरले आणि भटसाहेबाना निरोप देण्यासाठी म्हणून गाडीजवळ आले. नमस्कार केला. तसे भटसाहेब म्हणाले, "तो बिलाचा कागद जरा मला दे". हृदयनाथाना काही कळेना, हे असे का म्हणत आहेत? ते बुचकळ्यात पडले. भटसाहेबांनी आग्रह केला. तेंव्हा हृदयनाथानी तो बिलाचा कागद त्यांच्या हाती टेकवला. भटसाहेबांनी तो कागद हाती घेतला, खिशातला पेन काढला. आणि त्या बिलाच्या कागदाच्या मागच्या कोऱ्या जागेत एकहाती गाणे लिहून काढले "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे..." आणि तो कागद हृदयनाथांच्या हाती सुपूर्द करून ते निघून गेले.
    हेच ते गाणे जे पुढे लतादीदींच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले. आणि स्मिताताई, चित्रपटात ते तुझ्यावर चित्रित केले गेले. तेच पुढे अजरामर झाले. आजही लोक ऐकतात.
    या गाण्याची हृदयनाथानी सांगितलेली अजून एक आठवण म्हणजे गाणे रेकॉर्ड करताना यात शब्द होते "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे". सगळा रेकॉर्डींगचा सेट तयार होता. वादक तयार होते. लतादीदी तयार होत्या. आणि निर्माते अचानक म्हणाले, "चित्रपटाची नायिका तर विवाहित आहे. 'कुणीतरी आरशात आहे' हे शब्द तिच्यासाठी योग्य होणार नाहीत. हे गाणे असे रेकॉर्ड करता येणार नाही". सर्वाना काय करावे ते कळेना. नेमके पर्यायी शब्द सुचेनात. रेकॉर्डिंग थांबले. बराच वेळ गेला. सगळे ताटकळत उभे. वेळ नुसताच वाया चालला होता. तेंव्हा तिथे योगायोगाने प्रख्यात कवयित्री शांता शेळके आल्या होत्या. ह्रदयनाथ यांना त्यांनी सहज विचारले रेकोर्डिंग का थांबले आहे? हृदयनाथानी अडचण सांगितली. तेंव्हा शांता शेळके अगदी सहज म्हणाल्या, "अरे मग त्यात काय इतके? 'कुणीतरी आरशात आहे' च्या ऐवजी 'तुझे हसू आरशात आहे' असे म्हणा". चुटकीसरशी प्रश्न निकालात निघाला आणि अखेर रेकॉर्डिंगला सुरवात झाली.
    तेच हे गाणे. स्मिताताई तू आज या जगात नाहीस. पण तुझी गाणी आजही तितकीच जिवंत आहेत जितकी ती तुझ्या काळात होती. तुला जाऊन आज तब्बल तेहतीस वर्षे झाली. म्हणून आज हे गाणे तुला समर्पित....
    चित्रपट: उंबरठा (१९८२)
    गायिका: लता मंगेशकर
    गीतकार: सुरेश भट
    संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर

    • @pallavidalal22
      @pallavidalal22 4 роки тому +10

      Thanks for sharing this 😊

    • @atuldpatil
      @atuldpatil 4 роки тому +2

      @@pallavidalal22 You welcome. Glad to read your note 🙏

    • @vedika2865
      @vedika2865 4 роки тому +1

      Thanks

    • @ashishramteke5174
      @ashishramteke5174 4 роки тому +4

      Wow man... Felt really good to read !!

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 4 роки тому +40

      आणि विशेष म्हणजे भट साहेबांनी 1 रुपयाही घेतला नाही गाण्याचा मी माझी प्रतिभा विकत नाही असे म्हणाले आणि मग निघून गेले. काय लोकं होते हे खरंच!!

  • @shashikantmane1377
    @shashikantmane1377 6 років тому +253

    पुन्हा पुन्हा मी वाट का पाहतोय! तुझ्या भुतकाळातील आठवणीत दररोज का रमतोय! कुणासं ठाव तु मला भेटशील का नाही हे सुध्दा मला माहीत नाही? तरी पण हे गीत मी न चुकता नित्यनेमाने दररोज लावतोय ! आज सुध्दा मी समुंद्र किणार्‍यावरती ..एकठाच बसतोय! कधी कधी समुद्राची लाट माझ्या ईतक्या जवळून जाते की, तुझ्या सहवासाची आठवण करून देते! पण क्षणात मी वाळुत रेखाटलेली तुझ्या नावाची आक्षरे लाटे बरोबर वाहुन नेहते! भुतकाळातील "आठवणी" जिवंत करणारे गीत!...मणात खोलवर कुणासाठी...तरी राहुन गेलेले "प्रेम" ..अव्यक्त आठवायला लावणारे हेच ते गीत ...सुन्या..सुन्या मैफलीत माझ्या.. तुझेच मी "गीत" गात आहे...

    • @shreedada9562
      @shreedada9562 5 років тому +9

      Shashikant mane इथं सुद्धा धन्यवाद मित्रा..., खूपच सुंदर ओळी आहेत...

    • @shashikantmane1377
      @shashikantmane1377 5 років тому +2

      @@shreedada9562 आभार आपका

    • @nikhilwankhede5470
      @nikhilwankhede5470 5 років тому +1

      Khup chan line ahe bro

    • @rahultaywade1897
      @rahultaywade1897 5 років тому +1

      Sundar

    • @swatipatil9881
      @swatipatil9881 5 років тому +1

      Khup Chan ahet haa hya oli

  • @venkateshgadepatil2982
    @venkateshgadepatil2982 Рік тому +8

    अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात.
    जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
    गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @EsotericMonk
    @EsotericMonk 7 років тому +146

    हृदयाची स्पंदने वाढवणारी श्रवणीय चाल आणि प्रियकराला ला आर्त हाक. ही कमाल फक्त सुरेश भट्ट साहेबांच्या च लेखणीतून होऊ शकते.

    • @shashidharjoshi8913
      @shashidharjoshi8913 3 роки тому +3

      मोजक्या शब्दात तुम्ही छान सांगितलं

  • @vishalugle90
    @vishalugle90 4 роки тому +16

    काय लिहावे काहीच कळत नाही अाशी गाणी ऐकली तर खूप प्रोफ्रेशनल वाटत जीवनच गीत च समोर उमटून येतो

  • @shrikantgondhale6523
    @shrikantgondhale6523 3 роки тому +107

    इतक्या सुंदर गाण्याला 219 dislike करणारे कर्म दरिद्री आणि कर्णबधिर कोण आहेत.

  • @jdhananjay6284
    @jdhananjay6284 2 роки тому +9

    अव्वल दर्जाचे शब्द, संगीत, गायन, दिग्दर्शन आणि अभिनय.
    लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश भट, जब्बार पटेल, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड सगळेच दर्जेदार कलावंत.
    सर्वांप्रती आदर.

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 3 роки тому +23

    सख्या तुला भेटतील माझे
    तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
    अबोल हा पारिजात आहे...
    सुरेश भट ......

  • @ganeshkumbhar6873
    @ganeshkumbhar6873 Рік тому +7

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.........मनात खोलवर राहून गेलेलं खरं , दुर्लभ अन् अव्यक्त प्रेम आठवायला लावणारं गाणं. भूतकाळ किंवा गतजन्मातील काहीतरी पाशबंध मागे सोडून आलो आहोत अशी काहीशी जाणीव करून देत राहतं. अगदी मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल स्पंदने निर्माण करणारं... अंतर्मुख अन् निःशब्द...... ✍🏻 सुरेश भट, लतादीदी, हृदयनाथ, स्मिता, जब्बार पटेल..... सलाम🙏

  • @amarpatil8808
    @amarpatil8808 5 років тому +97

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
    अंधार दाटलेला.....
    भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटलेला .... #GirishKarnad RIP !!

  • @rakeshgaikwad8607
    @rakeshgaikwad8607 9 років тому +60

    प्रत्येक संगीत प्रेमीच्या ह्रिदयाच्या जवळच गान..अजरामर..स्मिता....तुला त्रिवार धन्यवाद

  • @swaraj1116
    @swaraj1116 5 років тому +107

    दीदींचे स्वर अक्षरशः कंठ दाटून आणतात.... शब्दांमध्ये इतकं मर्म आहे की काळीज पार चिरून जातं ही रचना ऐकताना... मास्तरांबद्दल बोलण्याची आपली कुवत नाही.👍

  • @Paarijat_
    @Paarijat_ 7 місяців тому +12

    या गाण्यासोबत काही अशा आठवणी आहेत, जे गाणं पूर्वी अनोळखी होतं म्हणून आवडीने ऐकू देखील वाटायचं.. आता इतकं परिचित आहे की चूकून कानावर पडलं तरी दाटून येतं..

  • @umeshkeer3764
    @umeshkeer3764 Місяць тому +3

    उंबरठा लताची आणि र्‍हृदयनाथनी संगीतबद्ध केलेली अविस्मरणीय गाणी.लेकीन सुध्दा.

  • @MBhat001
    @MBhat001 2 роки тому +13

    This song is superbly melodious. Om Shanti Lataji. There cannot be another singer of Latajis calibre in this universe ever. May God grant her a place in his heaven. Met Late Girish Karnad many times at Dharwad and had been to his house at saraswatpur several times in early 80s. 10-02-2022.

  • @shreedada9562
    @shreedada9562 5 років тому +16

    कमालीचं आज खरंच मन दाटुनी आलंय,
    खुप दिवसांनी आजसुद्धा तुझ्यासाठी व्याकुळ झालंय...♥

  • @sangramjadhav2259
    @sangramjadhav2259 3 роки тому +13

    Smita patil यांच्या चेहेर्यावरचे हावभाव आणि अभिनय कौशल्य अप्रतिम आहे

  • @jayalot9257
    @jayalot9257 Рік тому +1

    आज लतादीदी का जन्मदिन है, बोहत याद आ रहे है आप की गीत,ये गीत master piece है,जन्मदिन पर आप को शत शत नमन di❤😢😢

  • @siddharamtolnure5577
    @siddharamtolnure5577 Рік тому +6

    या सदाबहार,हृदयस्पर्शी गाण्याबद्दल कै.लता'जी, कै.स्मिता पाटील, कै.डॉ.गिरीश कर्नाड, कै.सुरेश भट..यांना विनम्र अभिवादन..💐❣️🙏

  • @subhashhirve290
    @subhashhirve290 8 днів тому

    हृदयाचा ठाव घेणारी शब्दरचना, मनाला भिडणारा आवाज आणि डोळ्यांच्या कडा पालवणारा अभिनय...एक उत्कृष्ट गाणं

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 6 років тому +59

    .ममडे आय लव्ह यू छकुले...तुझी खूप आठवण येते रोज..जिथे कुठे असशील सुखी रहा...

  • @shreedada9562
    @shreedada9562 3 роки тому +5

    ♥️♥️♥️दिल्या घरी सुखी रहा ,,,जेव्हा जेव्हा तुझी आठवण येत राहील,
    तेव्हा तेव्हा मन दाटुन येईल...
    Love U Pilya

  • @shubhampawar113
    @shubhampawar113 5 років тому +23

    I WAS BORN IN 2002 AND FIRST LISTENED THIS SONG IN 2018,REALLY SANGTO MANALA PAR KARUN GELE HEE GAANE .HATS OF AND THANKS TO LATA MANGESHKAR MAM AND REST IN PEACE GIRISH KARNAD SIR

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 роки тому

      Rip Smita didi too...
      Your listening to the song proves that music is timeless and influences people of all ages...btw I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
      ua-cam.com/video/23k35K4yoNY/v-deo.html

  • @snehalparab8795
    @snehalparab8795 3 роки тому +18

    लता दिदींच्या आवाजातले हे गाणे स्मिता ताईनी जेव्हा चित्रपटात पाहिले व ऐकले त्या वेळी स्मिता ताईना गहिवरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले

  • @Monika077-y6h
    @Monika077-y6h 2 роки тому +3

    हे गाणं म्हणजे माझ जीवन आहे का असा विचार सर्व स्त्री यांना वाढतच हे खरच स्मिता दी खूप छान होत्या त्यांचे सर्व गाणी ही खूप मस्त आहेत

  • @Siddhart312
    @Siddhart312 2 роки тому +12

    लता दीदी यांच्या आठवणींना उजाळा देत...
    भावपूर्ण श्रद्धांजली!!🙏🥺

  • @preetamgogate
    @preetamgogate 6 років тому +67

    2:59 The best shot taken in any Marathi movie ever ! :)

    • @neelabh06
      @neelabh06 2 роки тому +1

      Why would say that? I didn't understand 😅

    • @preetamgogate
      @preetamgogate 2 роки тому +10

      @@neelabh06 Because it is a directorial choice to show frozen memories in a way. The background and everything else is moving but those three are frozen in time which makes this shot brilliant. Atleast thats what I think :)

    • @neelabh06
      @neelabh06 2 роки тому

      @@preetamgogate Got your point. उत्तर के लिए धन्यवाद :)

    • @snehasatardekar3982
      @snehasatardekar3982 2 роки тому +1

      @@preetamgogate that's great..thinking...😊👍

    • @shivranjinighegde1113
      @shivranjinighegde1113 2 роки тому

      No offense but i found that shot a little strange.

  • @Yuvraaj_07
    @Yuvraaj_07 5 років тому +33

    0:52😢
    भावपूर्ण आदरांजली गिरीश कर्नाड सर.......

  • @MrAshishtm
    @MrAshishtm 3 роки тому +3

    जादू शब्दांची,आवाजाची आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताची... आयुष्याच्या शेवटापर्यंत सोबत असणार गीत.

  • @ravijoshi14
    @ravijoshi14 2 роки тому +32

    Master piece...There won't be another Smita Patil...Gone too soon..🙏

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 2 місяці тому +1

    या गीता साठी सुरेख भट यांना विसरून चालणार नाही , दीदींचा आवाज म्हणजे जणु सरस्वतीची विणा

  • @anushkaramdasi653
    @anushkaramdasi653 3 роки тому +9

    या चित्रपटातील स्मिता यांनी साकारलेली व्यक्तीरेखा पाहिली की मला माझ्या आईची आठवण येते... तिच्यासोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात... 💓💓💓

  • @soniarathi3768
    @soniarathi3768 3 роки тому +6

    The way the happy times are captured and shown is just classic. You really feel the pain of loss of a loved one

  • @prashantpatilkhandagale270
    @prashantpatilkhandagale270 2 роки тому +4

    रेखा तुझे आवडीचे हे गाणे ऐकूण तुझी खुप आठवण येते . फ्लीज जिथे अस सील तेथून परत ये , मी वाट पाहतोय

  • @shaahrukh9788
    @shaahrukh9788 5 років тому +68

    Anyone listening in May 2019? 😍❤❤❤❤

  • @deepaklahare7087
    @deepaklahare7087 3 роки тому +5

    I miss u जिथे आहे तिथे सुखी रहा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही 😥😥

  • @nitinsatange9060
    @nitinsatange9060 3 роки тому +2

    जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हे गाणं आणि हा आवाज अजरामर राहील 👌👌👌

  • @imtiyaz240679
    @imtiyaz240679 3 роки тому +1

    का कुणाला ठाऊक मन रडून येत हे गान बघतले की. Heart touching song

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 5 років тому +14

    आज आम्ही दोघांनाही खूप मिस करतोय.

  • @jyotisworld5206
    @jyotisworld5206 4 роки тому +10

    Maza favorite song🎶🎤 roj aikte, ashi nati hone नाही, itke bolke dole you jgat dusre नाही, smita Patil the great👍👏😊

  • @swarvijayorchestraahmednag8840
    @swarvijayorchestraahmednag8840 6 років тому +13

    अतिशय सुंदर गाणं, मनातलं गाणं आहे ,गीत, संगीत ,अभिनय आणि चित्रीकरण खूप छान

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 5 років тому +57

    एक दारूची बाटली 🍺,खूप शांततेची जागा आणि हे गाणं.. मग मी फक्त तिच्याच आठवणीत😭

    • @MIUSBG
      @MIUSBG 4 роки тому +5

      Lockdown madhe ashya comments 😣😣

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 місяці тому

      frustrated one side ;lover......

  • @siddhikadamsiddhi8126
    @siddhikadamsiddhi8126 5 років тому +7

    Ka konas thauk pan mala he geet aikun maza baddel kahitari magil jalmat zalya sarkhe wathe..... hart touching song

  • @mangalghode4573
    @mangalghode4573 4 роки тому +2

    Ubha tuzhya angani swarancha, abol haan parijat ahe....beautiful lyrics....

  • @darshanwaikar1230
    @darshanwaikar1230 7 місяців тому

    मंत्रमुग्ध!!! ते शब्द, तो सूर,तो अभिनय सर्वकाही अविस्मरणीय...🥺

  • @34-sahilkabadi5
    @34-sahilkabadi5 3 роки тому +4

    ३१ व्या वर्षी जग सोडून गेलात तरी सगळ्यांच्या मनात जीवित आहात.
    Hats off

  • @chetanmatte9111
    @chetanmatte9111 Місяць тому +1

    अजूनही तुझी वाट पाहतो अजूनही माझं प्रेम तितकच आहे 😢 मिस यू डियर

  • @KuldeepKumar-zk4ot
    @KuldeepKumar-zk4ot 4 роки тому +2

    च्या माइला डेडली कॉम्बिनेशन आहे !♥️♥️

  • @ketanpradeeplalan7026
    @ketanpradeeplalan7026 8 місяців тому +4

    अजरामर गाणं... गाण्याचा अर्थ 💔 काय बोलू ? डोळ्यातील अश्रू च सर्व काही बोलून जातात.

  • @storywalichori7600
    @storywalichori7600 5 років тому +5

    Kalena me pahate konala kalena ha chehara konacha
    Kay lyrics aahet yaar 😍😍

  • @ratansalunkhe7062
    @ratansalunkhe7062 11 років тому +5

    Great song !!! No words to describe...lyrics, music and latadidi,s voice.....haunting one

  • @meerajoglekar5707
    @meerajoglekar5707 5 років тому +15

    yes, the baby is of Girish Karnad in real life.(in a song in umbartha) Dr. Jabbar Patel said yesterday in national film archieves of India

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 роки тому

      I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
      ua-cam.com/video/23k35K4yoNY/v-deo.html

    • @PrateiM
      @PrateiM 3 роки тому +1

      Her name is Radha Karnad

  • @sandhyadesh3793
    @sandhyadesh3793 3 роки тому +3

    हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकते... डोळे भरून येतात.

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 роки тому

    खूप सुंदर.simta patil,Girish sar Ani lata didi.. त्रिवेणी संगम 🙏🙏🙏❤️

  • @nikhilkamble3341
    @nikhilkamble3341 4 роки тому +10

    Ever green song . This is actually life

  • @hareshbhande1298
    @hareshbhande1298 Місяць тому

    😢😢😢😢😢😢खूप भावुक गीत आहे हे निखळ प्रेम केले असेल तर 🙏🙏😊

  • @Shivputra1
    @Shivputra1 9 років тому +13

    Love this song. It is heart wrenching at times but very soothing

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 роки тому +8

    हे गाणं रेकॉर्ड होताना स्व.स्मिता ताई स्टुडिओ मधे ढसा ढसा रडल्या होत्या.
    कधी कधी जे ज्याच्या नशीबात असतं ते त्यांच्या च नशीबाची जातं यांचे उत्तम उदाहरण कारण ज्या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड होत होतं तो रिलिज झाला नाही पण हे गाणं नशिबानेच स्व.स्मिता ताईंना मिळाले.
    आज खरंच आठवण येते या सर्वांची.

  • @nitinkuchekar7129
    @nitinkuchekar7129 2 роки тому

    अप्रतिम .... तुझीच सावली जणू या गाण्यात उमटते ...स्मिता पाटील दर्जेदार अभिनेत्री...

  • @नास्तिकd2t
    @नास्तिकd2t 22 дні тому +1

    काय अप्रतिम गाणं लिहल आहे ❤🥺

  • @yogeshkshatriya4265
    @yogeshkshatriya4265 3 роки тому +1

    काय जादुई आवाज...
    काय अप्रतिम शब्द...
    काय अभिनय.... स्वप्नवत सगळं

  • @vishwadeepdeshmukh3893
    @vishwadeepdeshmukh3893 4 роки тому +1

    अप्रतिम या शब्दाला पण लाजवेल इतपत सुरेख 🙏

  • @SharadKamble-m1n
    @SharadKamble-m1n 22 дні тому

    अतिशय सुंदर गीत रचना, हे गाणं कधीच संपू नये असे वाटते..

  • @rajaramdhamale8896
    @rajaramdhamale8896 3 роки тому +3

    मराठी अस्मिता तूला माणाचा मुजरा जय महाराष्ट्र 🎂🎂🎂❤🌹🌹🌹🌹

  • @amols13
    @amols13 3 роки тому +1

    Best lyrics, music, actors, picturization and last but not least the singer..... heavenly.....

  • @biganna99
    @biganna99 2 роки тому +1

    सतत होत असणारे भास,
    हातातुन सर्व काही निसटल्याचं शल्य..
    पुन्हा सगळं व्यवस्थित होईल अशी आशा..
    आणि सोबतीला उदास खिन्न एकटेपण......
    "पुन्हा तुला भेटतील माझे,
    तुझ्या घरी सूर ओळखीचे...."
    काळीज चिरणारा आर्त आरोह..💔

  • @vaibhavmate3748
    @vaibhavmate3748 4 роки тому +8

    The greatest Girish sir, smita ma'am and legends of India lata Didi mind blowing 👌👏👍👍👍

  • @shubhamharne7616
    @shubhamharne7616 2 роки тому

    खरंच खूप गाणे येतील जातील, पण हे गाणं ऐकलं की डोळ्यांत पाणी येतं राव 🙏

  • @luckygosavi3840
    @luckygosavi3840 10 місяців тому +8

    17-1-2024 still listing this song 😅

  • @vishaldhavalekar9596
    @vishaldhavalekar9596 2 роки тому +1

    लताजींचा स्वर म्हणजे स्वर्गसुखच ♥️

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 7 років тому +10

    Lata Didi what I can say .. this song make’s me so energetic . Make me fell like get or give my love to somebody

    • @sarikashravge3378
      @sarikashravge3378 6 років тому

      Nice song

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 роки тому

      I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
      ua-cam.com/video/23k35K4yoNY/v-deo.html

  • @abhilashadhanvijay4502
    @abhilashadhanvijay4502 Рік тому

    No match for this song... Superb 🙌🙏
    Thanks for giving us this beautiful song...

  • @poonamnazare815
    @poonamnazare815 Рік тому

    What beautiful songs were written, what melodies tunes. Truly golden period of Indian cinema. Now only soul less songs are written n played.

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan757 5 років тому +185

    कोण कोण आज *गिरीश कर्नाड* यांना पाहण्यासाठी-आठवणींसाठी येथे आलं आहे.

  • @manishsmore299
    @manishsmore299 5 років тому +2

    Kahi lok itke ka negative astat kalat nhi.
    Itkya sundar and apratim 🎶🎶🎼 ganyat dislike karnya sarka,kay ahe..
    Let it go..
    I never put any wrong or dislike comment on any video but felt to comment ,as this song is most versatile and most meaningful..

    • @kumarnaik6870
      @kumarnaik6870 7 місяців тому

      Laiki nahi tyanchi jyani dislike kela ahe te

  • @ashishvairagade6288
    @ashishvairagade6288 2 роки тому +1

    Dada thank u for uploading this song 🙏🙏🙏🙏

  • @mayurikamble2181
    @mayurikamble2181 2 роки тому +1

    मी जेव्हा पण हे गाणे ऐकते, तेव्हा तेव्हा माझे मन भरून येते.🥺🥺

    • @mayurikamble2181
      @mayurikamble2181 2 роки тому +1

      आणि मी हे गाणे मला रडायच असत म्हणून ऐकते

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 4 роки тому

    अप्रतिम शब्दरचना आणि मंञमुग्ध करणारा आवाज..❤ संगीत कमालच काहीतरी वेगळीच जादू आहे या गाण्यात...☺

  • @devidaspinjan2679
    @devidaspinjan2679 11 місяців тому +1

    Smita always grate...

  • @maheshsarmandali8546
    @maheshsarmandali8546 5 років тому +2

    Lataji , nmskr! Ankhi gaane te Kay! Dolyat ashru aale fantastic!

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 роки тому

      I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
      ua-cam.com/video/23k35K4yoNY/v-deo.html

  • @palamol
    @palamol 2 роки тому +4

    RIP both of you. In heaven both you are meeting each other for sure. Nice souls.

  • @Uday2310
    @Uday2310 10 років тому +47

    उगीच स्वप्नांत सावल्यांची
    कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला
    तुझ्याच जे अंतरात आहे

    • @ravidurge3094
      @ravidurge3094 9 років тому +1

      Uday Mohole what is the meaning of first two lines ugich swapnat sawalyanchi kashas kelis arjave tu

    • @Uday2310
      @Uday2310 9 років тому +7

      +Ravi Durge
      उगीच स्वप्नांत .. सावल्यांची ...
      कशास केलीस .. आर्जवे तू ...
      म्हणजे स्वप्नांत ( सावल्यांची ) सुखाची कशाला अभिलाषा बाळगलीस … कशाला विनंत्या केल्यास सुखाच्या उगीच … कारण
      दिलेस का प्रेम तू कुणाला
      तुझ्याच जे अंतरात आहे

    • @ravidurge3094
      @ravidurge3094 9 років тому

      Thanks.

    • @shivamthombare4708
      @shivamthombare4708 6 років тому

      Apratim mast

  • @Vishalbhosekar659
    @Vishalbhosekar659 3 роки тому +1

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
    तुझेच मी गीत गात आहे
    अजुन ही वाटते मला की
    अजुन ही चांद रात आहे
    कळे ना मी पाहते कुणाला
    कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे
    तुझे हसू आरशात आहे
    सख्या तुला भेटतील माझे
    तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
    अबोल हा पारिजात आहे
    उगीच स्वप्नांत सावल्यांची
    कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला
    तुझ्याच जे अंतरात आहे

  • @vishalshelar6588
    @vishalshelar6588 4 роки тому +3

    सुन्दर गीत... स्मिताजी च्या अभिनय खुप अवद्ला

  • @rameshingavale1247
    @rameshingavale1247 4 роки тому +3

    अप्रतिम गाणे आहे हे..…...... 👌🏻👌🏻

  • @kasaagro1172
    @kasaagro1172 Рік тому +1

    जो पर्यंत चंद्र सूर्य आहे , तो पर्यंत हे गाणं अजरामर आहे ...

  • @Nishiket_K
    @Nishiket_K 4 роки тому +3

    All instruments so beautiful played..so mesmerizing soothes the soul❤️

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 роки тому

      I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
      ua-cam.com/video/23k35K4yoNY/v-deo.html

  • @akshaykulkarni6049
    @akshaykulkarni6049 4 роки тому

    गाण्याची सुरुवात झाली की लगेचच डोळ्यात पाणी येते.

  • @samruddhipritirajeshbhoir1211
    @samruddhipritirajeshbhoir1211 2 роки тому +2

    1:54 to 1:58 amazing transition 😍

  • @manjirikolambkar7236
    @manjirikolambkar7236 4 роки тому +4

    The expression of Girish Karrnad just amazing.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 3 роки тому +1

    अप्रतिम कलाकृती...🚩☺️👌👍👏💐💐

  • @harishchandrapanchal
    @harishchandrapanchal 5 років тому

    अप्रतिम गीत आहे खरच जुण्या आठवणींना उजाळा मिळाला
    👌🙏🌹💐

  • @Nkii-y1u
    @Nkii-y1u 2 роки тому +1

    Fakta manatun legendsch he song iektat 👍 good choice

  • @sachinmankar5478
    @sachinmankar5478 5 років тому +2

    ह्रदयस्पर्शी आवाज 👌👌👌👌

  • @भास्करराजगुरू

    सुंदर गीत आणि त्या शब्दांनाही प्रासंगिक संगीत सुंदर दोघांनी ही माझा नमस्कार

  • @jayawadyekar9713
    @jayawadyekar9713 4 роки тому

    Haaa ekk surr aahe jo fakta lata Mangeshkar ach kadu shaktat....
    Hands of mam 👍👍🙏

  • @rameshdendge1095
    @rameshdendge1095 5 років тому +11

    Girishji the only actor having won Gyan peeth award till date. His demise is a iIrreparable loss.

    • @sumitchaudhuri
      @sumitchaudhuri 4 роки тому

      I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
      ua-cam.com/video/23k35K4yoNY/v-deo.html