माझ्यात बदल कसा झाला आणि का झाला....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2022
  • साठीतील बदल, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
    Please note
    1 no personal counselling and consulting
    2 contains health tips, beauty tips
    3 This is motivational channel
    चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
    निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
    या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
    धन्यवाद
    Mrs Anagha Kulkarni
    Ichalkaranji ( INDIA)
    contact। +91 7743840596 dranagharam@gmail. com
    dranagha555@gmail.com

КОМЕНТАРІ • 311

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Місяць тому +1

    तुमचा मुलगा ,सून त्यांचे विचारही छान ,योग्य वाटतात. चांगली शिक्षण घेतलेल्या मुलांचं,सुनांचं छान सेटल होतं /छान झालेलं असतं आयुष्य .पण काही मुलं ,मुली ,सुना बरेचदा लहान गाव,लहान शहरात सेटल झालेली नसतात. अशा मुला ,सुनेच्या आई ,वडिलांना कायम चिंता ,टेन्शन्स भरपूर असतंच. जनरेशन गॕपबद्दल ,चुलीवरचं जेवण ,आयुष्याबद्दलचे मुद्दे मॕडम ,तुम्ही खरंच छान मांडलेत. नेहमीच म्हणते तसंच अगदी माझ्या /आमच्या मनातीलच विचार वाटतात तुमचे. - सौ. मेघना लिमये.

  • @ashabhor184
    @ashabhor184 Рік тому +10

    मी तुमचे अनेक विडिओ पाहिले. माहितीयुक्त असतात. तुम्ही आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या म्हणून आता तुम्हाला त्याचा कंटाळा येतो.
    परंतु नोकरी करताना बऱ्याच गोष्टी राहून जातात.
    आणि मग अशा राहिलेल्या गोष्टी करायला रिटायरनंतर सुद्धा मजा येते. मी आता 58 आहे. परंतु शासकीय नोकरीत असताना काम करायला एवढे आवडायचे की बाकी गोष्टी दुय्यम वाटायच्या.
    मी माझ्या दिसण्याकडे विशेष लक्ष द्यायला एखाद्या वर्षांपूर्वी सुरवात केली आणि मला छान आणि फ्रेश दिसतेस अशा कॉमेंट्स आधी मिळाल्या नाहीत त्या आता मैत्रिणींकडून मिळायला लागल्या. आता फिरायला सुरवात केलीय तेही आवडतेय. तात्पर्य आपल्याला काय आवडतेय काय करायचं राहिलेय ते करायला वयाची आडकाठी नसावी

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 3 місяці тому +3

    डॉ सौ आनघा ताई आज आपण सकाळी सकाळी भेटलो तुमचा व्हीडीओ पाहीला आणि आपणही पुर्विसारखे रहायचे नाही आपल्यातही बदल करायचा काठि नंतर ही स्वता साठि वेळ द्यायला हवा तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे पुर्वि मी आशिष नव्हते तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद ताई शुभ सकाळ

  • @vasantilondhe3633
    @vasantilondhe3633 Рік тому +9

    अगदी योग्य बोलत मॅडम .वया मानाने शरीरात होणारे बदल आणि त्या प्रमाणे कपडे ,दागिने वगैरे ,वगैरे सगळं खरं आहे.

  • @shashikaladeshmukh4909
    @shashikaladeshmukh4909 Рік тому +34

    मँडम अगदी बरोबर आता कोणती जबाबदारी घ्याव वाटत नाही स्वछंद जगाव वाटत.फक्त आपल्याला आवडत तेच कराव वाटत सुटसुटीत न टोचणारे कपडे घालावे वाटत.तुम्ही म्हनता त्या विचाराशी शंभर टक्के सहमत..

    • @sangeetagavali4197
      @sangeetagavali4197 11 місяців тому +1

      Madam sandhivata cha ajar purn bara hoto ka hata chii vakadi zaleli bota para sarad hotat ka

    • @sureshmahajan6451
      @sureshmahajan6451 6 місяців тому

      ककककककटककटटककककककककककककककटटट मी​@@sangeetagavali4197

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 Рік тому +7

    तुम्ही या व्हिडिओ मध्ये व्यक्त केलेले विचार अगदी माझ्या मनातलेच विचार आहेत असे वाटले.

  • @sunitamayekar2880
    @sunitamayekar2880 Рік тому +6

    एकदम बरोबर माझ्या मनातलं बोललात. सरळ साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. मी तुमचे बरेच वीडियों पाहते. खूप आवडतात. मी 74 वयाची आहे. धन्यवाद 🌹👍🙏👌🌹

  • @arpitaranade1426
    @arpitaranade1426 2 роки тому +17

    मनातले बोलल्या सारखे वाटले. खूपच छान वाटले ऐकताना👌👌🙏

  • @user-qx2qt2di3w
    @user-qx2qt2di3w 6 місяців тому +3

    Madam khupch छान तुमच्या सारखे विचारा सारखे लोक स्वत्तहून पुढे येवून मार्गदर्शन केले पाहिजे. त्यामुळे जीवनात खुप चांगली प्रगती होवू शकते. Thanks for Motivation talk.

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 Рік тому +4

    खरंय अस वाटतंय माझ्या मनातलंच बोलताहेत सजावटीच्या वस्तू नकोच वाटतात नाश्ता सुद्धा मुलगा आला तर थोडा थोडा केला गेला मुलगा बोलला तेव्हा लक्षात आलं अरे आपली करण्याची सवय पण। बदलली

  • @nandapagare5126
    @nandapagare5126 2 роки тому +22

    आज तुम्ही सर्व माझ्या मनातलं बोललात, मला खूपच छान वाटलं

  • @vaishalikanade6949
    @vaishalikanade6949 Рік тому +7

    अगदी बरोबर आहे... शंभर टक्के सहमत

  • @amitaghonge
    @amitaghonge Рік тому +5

    डॉ. मी बऱ्याचदा तुमचे व्हिडिओ पहाते.आजचा तर विशेष आवडला.आपण अगदी एकाच वयाच्या आहोत.मीही आता ५८ ची आहे.त्यामुळे आपलाच प्रवास पुन्हा एकदा ऐकतेय असं वाटलं.तुम्ही सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे.आता खरंच निवांतपणे आपल्या आवडी निवडी जपत सुटसुटीत साधं सोपं जगावं असं वाटतं.हा व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +3

    सगळयाचा मनातलं बोलता हे ऐकून फार बरं वाटलं हे खंरच आहे. धन्यवाद

  • @vrushalijagtap1555
    @vrushalijagtap1555 2 роки тому +8

    छान मनातल बोललात माझ्या मनात हे विचार येतात स्वयंपाक करायला तर खुप कंटाळा येतो , कारण आयुष्य भर मोठ्या एकत्र कुटुंबात राहिलो फायदे- तोटे दोन्ही अनुभवले, आनंदी व तणावरहीत जीवन जगले पण काही गोष्टी करायच्या राहूनही गेल्या, ड्रेस घालणे आमच्या घरी चालत नसे सुशिक्षित कुटुंब असुनही या गोष्टी नाही करता आल्या, हवा तेव्हा फिरायला जाणे नाही की खाणे नाही सर्व होते पण तितकीच आदरयुक्त भिती ही असे, बाहेर कोठे गेलो तरी घरातील सर्वांसाठी स्वयंपाक करुन जावे लागे व आल्यावर परत सर्व आवरावे लागे

    • @vrushalijagtap1555
      @vrushalijagtap1555 2 роки тому +2

      आता मुले मोठी झाली मुली सुना म्हणतात हे ड्रेस घाला पण त्या, त्या वयाच्या त्या गोष्टी आता कितीही म्हटले तरी नाही करु शकत
      तरी आता ड्रेस वापरले जात आहेत, कंटाळा आला तर पार्सल मागवतो, फिरायला जातो पण शरीरा सोबत मन पण थकत चाललेय म्हणून तुमच्या प्रसन्न मनाला सलाम

    • @vrushalijagtap1555
      @vrushalijagtap1555 2 роки тому +4

      सर्व होते तरी काही गोष्टी ंसाठी मुरड घालावी लागेल, सतत दुसर् यांसाठी झिजून शरीर थकून गेले आता सर्व करणे शक्य असुनही मनाला उभारी नसते तुमचे बोलणे ऐकून मन मोकळे झाले 😃

    • @mansigupte5305
      @mansigupte5305 Рік тому

      Vrushali Tai तुम्ही कमेंट केली ती सेम माझ्या बाबतीत झाले आहे आता खरच कंटाळा आलाय पण आता नातवाला संभाळतोय त्यामुळे आम्ही खूप बिझी आहोत

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Рік тому +2

    अगदी बरोबर मनातल बोललात
    खरय या वयात आवरासावरी जबाबदारी
    या गोष्टी नकोशा वाटतात दुसर कोणी
    करेल तर फारच छान अशीही मनाची
    स्थिती होतै बरोबर

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 Рік тому +5

    मनमोकळं...मस्त...मनमुराद शांतता आणि आनंदाचं समाधान एवढं अनुभवता येणं आणि ते कायम आयुष्यात जोपासणं...तुमच्या या सुंदर विचारांसाठी मन:पुर्वक धन्यवाद...!

  • @kamalpotadar6941
    @kamalpotadar6941 2 роки тому +15

    कित्ती छान!!!
    सारं काही ज्या त्या वेळेत मिळालं कि मगअसं बदलनं सहज जमतं.....

    • @shalaka4482
      @shalaka4482 2 роки тому

      हे महत्वाचे बोललात! या व्हिडिओप्रमाणे मॅडम ना सगळं मिळालय आणि सगळ्याचा उपभोग घेतलाय तेव्हा हे नको ते नको वाटलं तर त्यात विशेष काहीच नाही. ते नैसर्गिक आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलंय. शरीर म्हातारं होतं हे जितकं सत्य आहे तितकंच आणि त्यामुळेच गरजा बदलतात आणि आपण ही ते स्वीकारतो. मी हा फोकस सोडून काही वेगळं या व्हिडिओत सांगितलं असतं तर बरं झालं असतं.

  • @veenadamle1228
    @veenadamle1228 11 місяців тому +1

    मस्त ,माझ्यासारखे जीवन जगणारी एक तरी बाई आहे त्याचा आनंद झाला.

  • @jyotiargade2874
    @jyotiargade2874 Рік тому +6

    मॅडम तुम्ही खूप छान बोलता आणि आमच्यातलेच एक कोणीतरी आहेत असा भास होतो खूप छान ऐकावसे वाटते आमच्या सहवासात तुम्ही आल्यामुळे मला सुद्धा खूप बरं वाटतं असेच हसत रहा आनंदात रहा आणि आम्हाला विशेष सांगत रहा

  • @meerapawar149
    @meerapawar149 2 роки тому +6

    खुप खुप , खुप छान विषयांवर बोललात Mam . अगदी मनातलं बोललात . असेच छान छान विषय घेऊन या . तुम्ही बोलत असला की तुमचे बोलणे संपूच नाही असे वाटते

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Місяць тому +1

    डाॕ. अनघा मॕडम ,छान video.अगदी आमच्या मनातीलच विचार वाटतात तुमचे.छान बोलता तुम्ही .माझंही वय 59 आहे.मलाही आता वर्षोनुवर्षे संसारातील घरातील ,बाहेरील कामं ,कर्तव्ये करुन आता थकायला होतं. सगळं सुटसुटीत हवं असं वाटतं. एका सिलेंडर कसा बदलावा या video मध्ये आणि कधी अभिप्राय देताना कधी चुकून एखादं अक्षर ,शब्द वेगळं type होतं. खरंच निवांतपणा हवा असतो.सौ.मेघना लिमये.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Місяць тому +1

      टायपिंग mistake होतातच... सर्वांच्या च...

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 2 роки тому +2

    खूप छान वाटल तुम्ही माझ्या मनात विचार आला होता अगदी तसाच वाटला धन्यवाद तुम्ही आम्हाला सांगितल्या baddhal

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Рік тому +4

    अगदी खरय!आता शांत निवांत आणि साधं सुधं छान रहावसं वाटतं.नको ती धावपळ आणि नको ते हव्यास!गप्पा,मैत्रिणी,बाहेरुन मागवुन वा बाहेर जाऊन खाणं छान वाटतं.ती आवरा आवरही नको आणि कसला धाकही नको.संध्याकाळचे रंग कसे सुंदर असतात तसे हे वयही छान असतं कारण आता आपलं मनच आपल्याला शांतपणे रहा म्हणत असतं.

    • @user-eo2ed7se3n
      @user-eo2ed7se3n 2 місяці тому

      पण मॅम ६० म्हणजे काहीच नाही हॊ.. इतकं नकोस नाही होत हॊ..

  • @knowledge-smita
    @knowledge-smita 2 роки тому +2

    मॅडम, खुप धन्यवाद की तुम्ही अगदी मोकळ्या मनाने हे सांगितले की या वयात मस्त रहावं, अन मला ही vlog करणाऱ्या चे कौतुक वाटते केव्हढा स्टॅमिना,आणि youtube बद्दल च तुमचं मत खूपच छान की views कडे लक्ष अजिबात देणें नाही आपलं समाधान महत्वाचं की आपण छान काहीतरी करतोय.👍

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 3 місяці тому +1

    खरय, वयोमान व परिस्थिती प्रमाणे बदल घडतो .

  • @swatideshmukh7154
    @swatideshmukh7154 2 роки тому +3

    खरंच अगदी बरोबर असंच आयुष्य जगावे असं वाटतंय👌👌😊😊

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 2 роки тому +4

    एकदम बरोबर आहे ,काम करायची इच्छा राहत नाही.त्यात तब्बेत ठीक राहत नसेल तर विचारायलाच नको.तुम्ही अगदी मनातले बोललात मॅडम.

  • @anuradhaashokrane9201
    @anuradhaashokrane9201 2 роки тому +3

    किती छान आणि खर खर बोललात तुम्ही अगदी मनातलं खूप सुरेख

  • @nayanakadam2872
    @nayanakadam2872 2 роки тому +1

    खूप छान आणि सर्वांनाच आपलेसे वाटणारे विचार मांडलेत तुम्ही धन्यवाद. असेच छान छान video बनवत रहा.

  • @arunapatil5248
    @arunapatil5248 Рік тому +1

    नमस्कार अनघाताई,मी 38 वर्षे शिक्षिका होते.खूप.धावपळ , तिशिन तर बीपी या काळात अनेक अडच णाi na पार क रत वयाची 72री त आहे.आजचे गोड वक्तव्य ऐकून खूप समाधान वाटले.पुढील. कार्यास शुभेच्छा

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 2 роки тому +3

    ताई किती छान बोलता आणि मनातलं बोलता .

  • @renukaingale9349
    @renukaingale9349 2 роки тому +4

    तुमच्या सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगत असता आणि कधी कधी मनाला पटतात आज जे ऐकले ते मी पण तसेच एन्जॉय करतेय मला जे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा मिळेल ते पाहते स्वयंपाक करायला नको आयत मिळाले तर बर वाटत आजचा व्हिडिओ बर्याच गोष्टी माझ्या सारख्या वाटल्या

  • @sunitivaidya7928
    @sunitivaidya7928 2 роки тому +1

    नमस्कार
    मॅडम मी नेहमी तुमचे यौ utube vedio बघते आणि मला ते खूप आवडतात
    आजचा हा vedio तर फारच भावला मनाला आणि त्यातील तुमचा प्रांजल्पना हि खूप गोड वाटला
    आपल्या पिढीचे विचार सुंदर पद्धतीने मांडलेले पाहून मनाला खुलं बरे वाटते
    अगदी आपणच आपल्याशी बोलल्यासारखे
    अशाच नाव नवीन vedios ची वाट बघत राहू

  • @surekharedkar3726
    @surekharedkar3726 2 роки тому

    Khup chhan sangitalat bara vataa yeikun

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 Рік тому +1

    खूप छान.अगदी मनातलं बोललात.

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 роки тому +2

    खूपच छान विडियो झालाय,,,, खूप खरा ,,,,,मजा आली विडियो बघतांना व ऐकतांना

  • @sudhapawar692
    @sudhapawar692 2 роки тому +2

    खरच अगदी बरोबर आहे असच जगण असाव मँडम

  • @sujatapawar2009
    @sujatapawar2009 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे .काही करावस वाटत नाही या वयात.👍🙏

  • @kavitaromeo6362
    @kavitaromeo6362 2 роки тому +8

    Very honest and sincere information 👌

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ मलाही अगदि असच वाटत तसच या वयातील दूसर्याला वाटतय हे ऐकून छान वाटल.

  • @sunandagaikwad1117
    @sunandagaikwad1117 Рік тому

    खरंच मँडम खूपखूपछानमाहितीमिळाली मला तर खूप आवडली.धन्यवाद मँडम

  • @niseemdeo5359
    @niseemdeo5359 2 роки тому +1

    Khup chan bolalat Madam agadi manatale 🙏👍

  • @anitadhongade1895
    @anitadhongade1895 2 роки тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 Рік тому

    अगदी बरोबर आहे खूप छान

  • @veenajoshi6233
    @veenajoshi6233 2 роки тому +1

    अगदी मनातील बोलला मॕडम खुप छान

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 2 роки тому +1

    Agadi barobar aahe madam 👍

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Рік тому

    ताई एकदम मनातले आणि योग्य बोललात तुम्ही,प्रत्येक या वयातील व्यक्तीने तिला झेपेल ते करावे वतसे रहावे.

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 Рік тому +1

    Khup chhan tai aagdi manatle bol aahet.khup dhanywad.🙏

  • @user-ub1rt8pv1t
    @user-ub1rt8pv1t 7 місяців тому

    Khup Chan mahiti 💐💐🙏🙏🙏

  • @sunandapatil5411
    @sunandapatil5411 2 роки тому +2

    Khup chaan. Maze 54 ahe tari atach tumchya sarkhe watate. Amchya shejari pan yavet ase gharguti jevan denare...tarich aajkaal jasta tavtavit disayla laglat tumh. Khup farak padto gharala swayanpak cha taan gela ki. Aaj jastach chaan distay tumhi ani dress pan.thank you etka chaan video banvla. Navin disha milali life vishayi vichar karnya chi.

  • @lalitashirsath2642
    @lalitashirsath2642 2 роки тому +1

    खुपचं छान सांगितले तुम्ही

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 2 роки тому +2

    Mam mi ek 30 yrs yuvati ahe pn mla tumche vichar khp avadtat... Especially postive attitude towards lyf😊😇

  • @itsme-ez2nj
    @itsme-ez2nj 2 роки тому +1

    Khup chan vdo I liked it

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Рік тому

    मॅडम खूप छान बोलता.अगदी खरं आहे. 👍

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 Рік тому +1

    Khup chhan madam,nice information

  • @pratibhamadhvi5115
    @pratibhamadhvi5115 Рік тому +1

    झकास...मस्त सल्ला...खुदकन हसणे मनाला भावले....

  • @pushpa_v_6244
    @pushpa_v_6244 2 роки тому +1

    Khup chaan ani aplya manala js avdte tsch rhav simple rahan khrch mast vat ty👌👌👌👍👍💓💓

  • @wowsnehal
    @wowsnehal Рік тому

    Khupch chhan video .agdi manatil bollat Dr.Madam...😊❤

  • @sunitabashetti3703
    @sunitabashetti3703 Рік тому

    खुफच छान विचार

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 Рік тому +4

    मला वाटलं फक्त मलाच अस वाटतयं , तुमचा विडिओ पाहण्यात आला, आणि खूप छान वाटलं, आपल्या सारखं कोणी आहे, हे लक्षात आलं, वयाप्रमाणे बदल होतात , ते नॉर्मल आहे हे लक्षात आलं, अनघाताई , खूप छान

  • @chitranagvekar8153
    @chitranagvekar8153 2 роки тому +1

    Khup chan dista mam tumhi🙏

  • @namratanavalkar3796
    @namratanavalkar3796 Рік тому +9

    Appreciate your frankness and totally agree with your views because I am feeling the same at this stage in life. Actually l used to feel very guilty about my feelings but after seeing your video realised that there are a lot of people who have the same views and l am not the odd one out. Thanks a lot🙏

  • @Namaste_5
    @Namaste_5 2 роки тому +1

    एकदम बरोबर 👍🏼

  • @sunitabhosale500
    @sunitabhosale500 7 місяців тому

    खूप छान माहिती आवडली

  • @aanadichavan2390
    @aanadichavan2390 7 місяців тому

    Barobar hai madam asha sarvani vichar kela pahije

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Рік тому +9

    खूप खूप मनातलं बोललात मॅडम ़़़ हे मोकळेपणाने कबूल करायला फार धाडस लागतं ़़़़ सर्व बायकांना असंच वाटत असेल पण लोक (म्हणजे इतर बायकाच) काय म्हणतील हे मोठे दडपण असतं आपल्या कडे 😀

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 Рік тому +1

    सहमत आहे

  • @vimalpatil7036
    @vimalpatil7036 Рік тому +1

    तुम्ही खुप छान
    समजाऊन सागतं अगदी माझ्या मणातल

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 Рік тому +1

    खुपच छान...... खरंय.....👍

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 2 роки тому +1

    तुम्ही जें काही सांगताना ते सगळं अगदी खरं खरं आहे. जसं काही माझंच आहे. मला पण तुमच्या सारखेच वाटते साड्यांच्या बाबतीत सुद्धा. 👌

  • @sumanjoshi2457
    @sumanjoshi2457 2 роки тому +1

    छान विचार

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 2 роки тому +2

    Very good my friend thank you so much my friend 😊😊🤗🤗🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 2 роки тому +1

    सत्य आहे मँम.

  • @1lbscamsar
    @1lbscamsar 2 роки тому

    Sunder chhan mast

  • @mansijadhav4697
    @mansijadhav4697 Рік тому +1

    छान सांगितलं 👍🏻

  • @veenapathak9273
    @veenapathak9273 2 роки тому +8

    Very nice and very true 🙏💐💐

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 2 роки тому +2

    Khup chan vatale v log baghun sagalyanca yac bhavana aahet

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Рік тому +1

    Very nice and very true Mam

  • @madhavitonape8848
    @madhavitonape8848 Рік тому +2

    मॅडम तुमचे सगळे व्हिडिओज मी बघते खूप छान वाटतं आणि आजचा हा व्हिडिओ बघून तर खरंच खूप काहीतरी वाटायला लागले आहे मस्त जीवन जगले पाहिजे

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 6 місяців тому

    ,खूप छान वाटलं मला आज य
    तुमचे। विचार ऐकून.

  • @swativarangaonkar4866
    @swativarangaonkar4866 2 роки тому

    100% barobar ✅

  • @rajanibodke7115
    @rajanibodke7115 Рік тому

    Barobar mam malahi asech avadate

  • @soulcraft5449
    @soulcraft5449 Рік тому +1

    Perfect..

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 2 роки тому +2

    खूप छान बोलता

  • @lourdesmurzello9309
    @lourdesmurzello9309 Рік тому +1

    So true

  • @meghadeshmukh457
    @meghadeshmukh457 8 місяців тому

    खुपच छान ताई कोणीतरी आपल मनातील बोलल्या सारख वाटल 😊

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 2 роки тому

    Mlahi aasch vatty

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 11 місяців тому

    नमस्कार मॅडम .मी तुमचे व्हिडिओज रेग्युलरली बघते परंतु आजचा हा व्हिडिओ मनाला अगदी भिडणारा होता .तुम्ही अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहेत असेच छान छान व्हिडिओ करत रहा आणि आम्ही तुम्हाला फॉलो करत राहू.

  • @surekhamahakalkar9431
    @surekhamahakalkar9431 Рік тому +2

    Very true

  • @nirmalabodhe6066
    @nirmalabodhe6066 2 роки тому

    Khup chan

  • @sushamashinde7311
    @sushamashinde7311 Рік тому

    छान वाटल एवढे सुंदर विचार ऐकून माझ्या बाबतीत पण आसच होत

  • @ujwalaa345
    @ujwalaa345 2 роки тому

    Adgi khare ahe khup chan mam👌👌

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 11 місяців тому

    Agadi barobar

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे तुझं
    मी पण तुझ्याच वयाची आहे ।
    जे जाणवतं य आता ते आयुष्याची ती स्टेप गेल्यावर ।

  • @jayashreemathulkar1766
    @jayashreemathulkar1766 2 роки тому

    खरय अगदी

  • @sangitapatil213
    @sangitapatil213 Рік тому

    Khup chan👍 👌👌👌🙏

  • @priyankalohar5088
    @priyankalohar5088 2 роки тому +1

    chan video aahe mam

  • @sunitawalimbe259
    @sunitawalimbe259 Рік тому +3

    Khupach chan. Everybody's representation.

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 Рік тому +1

    Khup chhan video