निंबोळी अर्क तयार करणे...!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 сер 2024
  • निंबोळी अर्क तयार करण्याची अत्यंत सोपी आणि साधी योग्य पद्धतीने पद्धत...!
    निंबोळी अर्क कसा तयार करावा?
    घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत
    Nimaark kaisa banaye
    निमार्क कैसे बनाये?
    जैविक कीटकनाशक- निंबोळी अर्क
    कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत
    निंबोळी पावडरचा पाण्यामधून काढलेला अर्क म्हणजेच निंबोळी ५% अर्क
    - आज सर्वत्र कीड नियंत्रणामधील स्वस्तातले वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून वापरतात.
    या अर्कचा वापर भाजीपाला पिके, तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्ये, कपाशी अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये कीडनाशक म्हणून केला जातो.
    निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत:-
    निंबोळ्यांची बारीक पावडर करुन घ्यावी.
    निंबोळ्य़ा गोळा केलेली नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास, बाजारात मिळणारी निंबोळी पावडरचा उपयोग अर्क बनविण्यासाठी करता येतो. वर्षभर अशी निंबोळी पावडर बाजारात उपलब्ध असते. फ़वारणीसाठी नैसर्गिक घटकांचा अर्क हा ५ टक्क्यापर्यंत काढला जातो.
    ५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी
    ५ किलो निंबोळी भुकटी फ़डक्यात बांधून किंवा मोकळी ९ लिटर पाण्यात बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. व २०० ग्रॅम साबण चुरा १ लिटर पाण्यात भिजत ठेवावा.
    निंबोळी भिजविताना बादली व्यवस्थित झाकून ठेवावी.
    त्याचबरोबर निंबोळी पावडर भिजविण्यासाठी थंड पाणी वापरावे. कारण गरम पाण्याने निंबोळी अर्कामधील सक्रिय घटक कमी होऊ शकतात.
    रात्रभर निंबोळी पावडर पाण्यात भिजल्यानंतर व्यवस्थित फ़डक्याने गाळून घ्यावे.
    गाळून काढलेली निंबोळी पावडर एखाद्या झाडाला खत म्हणून टाकावी. गाळून घेतलेल्या पाण्यात साबणाचे १ लिटर पाणी मिसळून १० लिटर द्रावण होईल असे पाहावे. अशा प्रकारे १० लिटर अर्क तयार होईल.
    हे द्रावण १ लिटर/१० लिटर पाण्यात मिसळून याप्रमाणे फवारणी करावी.
    यामुळे फ़वारणी व्यवस्थित पिकावर पसरुन उत्तम परिणाम मिळतील.
    निंबोळी अर्काचे होणारे फ़ायदे:-
    १) संपूर्णपणे नैसर्गिक स्रोतांपासुन तयार होत असल्यामुळे खर्च अतिशय कमी येतो.
    २) निंबोळी अर्काच्या फ़वारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते
    ३) किडींच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासुन परावृत्त केले जाते तसेच रसशॊषक किडींचेदेखील अंडी
    नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यामुळे एकूणच जीवनचक्रामध्ये अडथळा येतो.
    ४) नैसर्गिक घटक असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही.
    यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्यास सुलभ आहे. निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फ़वारणी फ़ायदेशीर ठरते.
    ५) कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येत असल्या कारणाने तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीमध्ये वापरण्यास अगदी सोपे असे हे नैसर्गिक कीडनाशक आहे.
    ६) पांढरी माशी, मावा, फ़ुलकिडे, विविध प्रकारच्या अळ्यांचे देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. मोठ्या अळ्यांचे नियंत्रणात निंबोली अर्काची जास्त मदत होत नाही यासाठी अळी लहान अवस्थेत असतानाच निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.
    असेच नवनवीन व्हिडिओ माहिती मिळविण्यासाठी आमच्या शाश्वत शेती समूहात सहभागी व्हा.
    शाश्वत शेती SA फेसबूक ग्रुप JOIN करा 👇लिंक
    / 282781736449537
    शाश्वत शेती SA Yutube चॅनेल SUBSCRIBE करा👇लिंक
    / @shashwatshetisa
    शाश्वत शेती SA फेसबुक पेज LIKE Follow करा 👇 लिंक
    / shaashwatshetisa

КОМЕНТАРІ • 94

  • @sanjanagurchal8988
    @sanjanagurchal8988 Рік тому +1

    Nimboli arkachi mahiti dilyabaddal Khup Khup Dhanyavad dada🙏🙏

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 3 роки тому +1

    Very nice information sar thanks

  • @former1163
    @former1163 4 роки тому +1

    1 numbar sir 💐💐💐

  • @vishwnathkangane6869
    @vishwnathkangane6869 Рік тому

    सर एकच नंबर...कमी शब्दात जास्त माहिती ...

  • @gauravchakre7762
    @gauravchakre7762 10 місяців тому

    एक नंबर माहिती दिली सिर तुमी

  • @mangeshbhave9478
    @mangeshbhave9478 2 роки тому

    Nice technical information sir
    Asech video banva

  • @vishnukharat4062
    @vishnukharat4062 4 роки тому +2

    Vare nice

  • @mayuruagle4978
    @mayuruagle4978 3 роки тому +1

    खूप छान विडिओ बनवला भाऊ असेच शेतकरी वर्गाला मदत करत रहा । काही मदत हवी असली आम्ही तत्पर आहो।

  • @pavanjadhao3109
    @pavanjadhao3109 4 роки тому +3

    Good sir

  • @appasul2612
    @appasul2612 4 роки тому +1

    Very nice✌️✌️

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 роки тому

    👌👌👍

  • @Balasaheb_shinde87
    @Balasaheb_shinde87 4 роки тому +1

    खूप छान माहिती..

  • @patil4059
    @patil4059 3 роки тому +1

    🙏

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 роки тому +1

    Good

  • @sachinkokne1394
    @sachinkokne1394 4 роки тому +1

    Good suggestion sir

  • @rahuljadhavbanjaratvchanne8209
    @rahuljadhavbanjaratvchanne8209 4 роки тому +1

    Very nice sir

  • @draj4024
    @draj4024 3 роки тому +3

    Sir very nice 👍 n i appreciate ur dedecation🙏

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому

      Thanks

    • @vasantsonavane4056
      @vasantsonavane4056 2 роки тому

      15 लिटर फवारणी पंपासाठी किती प्रमाण ध्यावे वसंतराव सोनवणे वाडा पालघर

  • @rafikshaikh3776
    @rafikshaikh3776 4 роки тому +1

    Ok

  • @shreekrushnadarekar6461
    @shreekrushnadarekar6461 2 роки тому

    असाच केलं होत सगळ आदल्या दिवशी पाण्यात भिजत घातलं होत पण पाऊस चालू झाला आता 15 दिवस झालेत ते भिजत घालून 10 li मध्ये भिजवल होत ते वापरलं तर चालेल का आता

  • @jayharipagore1725
    @jayharipagore1725 2 роки тому

    सर,
    मी निबोली अर्क तयार केला.
    1.500 kg वाळलेल्या निबोळ्या मिक्सर् मध्ये बारीक करून 15 लिटर पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये 1 पाव गूळ टाकून निंबोळी अर्क तयार करून आज 10 दिवस झाले.

  • @nikhilvnangude
    @nikhilvnangude 3 роки тому +1

    निंबोळी अर्क, Drenching करू शकतो का याचे रोपांना ?...

  • @MH20_21.
    @MH20_21. 2 роки тому +1

    Mi nimoli gola keli ata ti valun halki zali va tichyavar burshi padli ti nimoli chalel ka ata?

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  2 роки тому

      पाण्याने स्वच्छ धुवून काढा नंतर सुकवून वापरा.

  • @rushikeshingle7705
    @rushikeshingle7705 Рік тому

    साबन कोणत बारीक करवा

  • @pravinborkar7279
    @pravinborkar7279 3 роки тому

    सोयाबिन वर किती वेळा फवारावे आणी कधी

  • @ganeshchate1059
    @ganeshchate1059 3 роки тому +1

    यासोबत दुसरे कीटकनाशक, बुरशीनाशक वापरता येते का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +1

      कोणतेही वापरू शकता

  • @durgeshrahangadale540
    @durgeshrahangadale540 2 роки тому +1

    Tayar zhalela 10 liter ark kiti liter panyat takava...krupaya sanga...

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  2 роки тому

      90 लिटर पाणी
      टाकून 100 लिटर तयार झालेले द्रावण फवारणीसाठी वापरावे. म्हणजे 6-7 पंप होतील

    • @durgeshrahangadale540
      @durgeshrahangadale540 2 роки тому +1

      @@shashwatshetisa dhanywaad ..mahiti dilya baddal..

  • @rameshwarkendre5282
    @rameshwarkendre5282 3 роки тому +1

    सर, सोयाबीन सोडून माळव्याला चालतंय का हे अर्क वांगी, पत्तागोभी, टोमॅटो...

  • @vijaydhengle6655
    @vijaydhengle6655 3 роки тому +2

    सर ऐका पंपासाठी किती वापरावे

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому

      तयार झालेला 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • @sachinfulzele358
    @sachinfulzele358 3 роки тому +6

    फवारणी करीता १६ लीटर पंपाला अर्काचे प्रमाण नाही सांगितले... व्हिडिओ पाच सहा वेळ झाले पाहून... आणि सांगितले असेल तर व्हिडिओ मधील वेळ सांगा.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +1

      तयार झालेला 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому

      तसदिबद्दल क्षमस्व

  • @vishnukharat4062
    @vishnukharat4062 4 роки тому +1

    हे औषध पॅकिंगमध्ये मिळते का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  4 роки тому

      मिळते पण घरच्या घरीच आपण काहीही खर्च न करता फावल्या वेळात तयार करू शकतो.

  • @former1163
    @former1163 4 роки тому +2

    Sabun chi zaga war Ghadi suda zaman ka

  • @srujanpannalwar9511
    @srujanpannalwar9511 3 роки тому +1

    Saban kashasathi vaprave ???

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +1

      साबण किंवा धुण्याचा सोडा यामुळे कीडनाशक पिकावर जास्त काळ टिकते.

    • @srujanpannalwar9511
      @srujanpannalwar9511 3 роки тому +1

      @@shashwatshetisa k... thank u 👍

  • @rameshumarani6231
    @rameshumarani6231 2 роки тому

    सर आमाला पाणी 1000 लिटर लागते

  • @bhagwatwadode525
    @bhagwatwadode525 3 роки тому +1

    Nimbolichi sal kashi kadhavi hyachi mahiti dya

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +1

      पाण्यात २ तास भिजत ठेवल्याने साल वेगळी होते व बियांही स्वच्छ धुवून घेता येतात. त्यानतंर बिया/गोडांबी सुकवावी.

  • @shaileshraut5988
    @shaileshraut5988 4 роки тому +1

    १५ लि. पंपासा़ठी किती मिली टाकावे निंबोळी अर्क

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  4 роки тому +1

      Video संपूर्ण पहावा उत्तर मिळेल

  • @manishghuge4968
    @manishghuge4968 4 роки тому +4

    9 लिटर पाण्यात 1 लिटर निंबोळी अर्क वापरा म्हणतात व्हिडीओ मध्ये
    पंप 20 लिटर पाण्याचा असतो त्या मध्ये 2 लिटर निंबोळी अर्क टाकावे का सर

  • @rajeshnagargoje3975
    @rajeshnagargoje3975 2 роки тому +1

    पण प्रती पंप हे द्रावण किती वापरायचे सांगितले नाही

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Рік тому

      तयार झालेले 10 लिटर द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      100 लिटर द्रावण 1 एकरला पुरते

  • @rajkumaravhalepatil8711
    @rajkumaravhalepatil8711 3 роки тому +1

    Konte sabun vaprave

  • @armylover4087
    @armylover4087 Рік тому

    प्रति पंप किती प्रमाण घ्यायचं ते सांगा भाऊ.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Рік тому

      तयार झालेले 10 लिटर द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      100 लिटर द्रावण 1 एकरला पुरते

  • @sachinfulzele358
    @sachinfulzele358 3 роки тому +2

    अर्काचे प्रमाण किती मिली प्रति लि. घ्यावे ते नाही सांगितले

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +1

      व्हिडिओ लक्षपूर्वक पहावा ही विनंती..!

  • @rajeshbarse5808
    @rajeshbarse5808 2 роки тому +1

    बायो मिक्स.. आणि निंबोळी अर्क.. एकाच वेळी जमेल का फवारणी साठी

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  2 роки тому

      बायो मिक्स असताना अजून काही घेण्याची गरज नाही

  • @abhijamdar6232
    @abhijamdar6232 2 роки тому +1

    भाऊ पण फवारनि चे प्रमाण नाही सांगितले

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Рік тому

      तयार झालेले 10 लिटर द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      100 लिटर द्रावण 1 एकरला पुरते

  • @9623336458
    @9623336458 3 роки тому +1

    Sir आपण सांगितले की 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यात टाकुन फवारणी करावी पण हे द्रावण जास्त strong होणार नाही का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +2

      10 लिटर द्रावण + 90 लिटर पाणी = फवारणीचे द्रावण

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому

      अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या
      facebook.com/104704314598700/posts/332651918470604/

  • @annakalokhe7424
    @annakalokhe7424 3 роки тому +1

    कांदयाला फवारणी करावी का सर

  • @dagadughadage6374
    @dagadughadage6374 3 роки тому +1

    मकेवर किटकनाशकासाठी हे औशद चालते का

  • @rohitsable2273
    @rohitsable2273 3 роки тому +1

    साबण कोणती

  • @user-kd3px6or7i
    @user-kd3px6or7i Рік тому

    Bau.aka.papala.takaychi.kiti..te.tumi.shagitl.nahi

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Рік тому

      तयार झालेले 9-10 लिटर द्रावण यामध्ये 90 लिटर पाणी मिसळावे तयार झालेले शंभर लिटर द्रावण हे फवारणीचे आहे. एक एकर साठी पुरेसे होते

  • @sandipmisal1212
    @sandipmisal1212 2 роки тому

    प्रमाण कसं आहे लीटर ला

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  Рік тому

      तयार झालेले 10 लिटर द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      100 लिटर द्रावण 1 एकरला पुरते

  • @wankhedemanoj2601
    @wankhedemanoj2601 Рік тому

    Barobar aahe bavalatpana ,,,😂

  • @behorticulturist4626
    @behorticulturist4626 3 роки тому +1

    तयार झालेला अर्क आपण किती दिवस पर्यंत वापरू शकतो

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому +1

      तयार झाला की फवारणी
      साठवून ठेवता येत नाही.
      जेव्हा गरज असेल तेव्हाच तयार करा...

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 3 роки тому +1

      @@shashwatshetisa निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क सोबत वापरला तर चालेल का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 роки тому

      Yes

  • @shaileshkarle2522
    @shaileshkarle2522 2 роки тому +1

    वाळलेल्या निंबोळया मधून आळी निघत आहे मग ती निंबोळी घ्यावि कि नाही घ्यावि

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  2 роки тому

      स्वच्छ व निरोगी आणि चालू वर्षाच्या घ्याव्यात

  • @khandujaybhaye5479
    @khandujaybhaye5479 3 роки тому

    नंबर सेंड करना सर

  • @saiphotography....4008
    @saiphotography....4008 Рік тому

    Nimboli ark ahe changale pn video purn bogas ahe nit nahi sangitl