गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @pratibhabhadane5158
    @pratibhabhadane5158 6 років тому +14

    ज्वलंत विषय मांडलात नितीन सर... हीच वाईट अवस्था आहे मराठी माध्यमाच्या शाळांची... अप्रतिम एपिसोड ! सर्वांचाच अभिनय उत्तम... संवादलेखन दर्जेदार.👌👌

  • @MalranProduction
    @MalranProduction 6 років тому +2

    खरच खूप चांगला आणि गरजेचा विषय घेतल्यामुळे नितीन सर आणि टीम चे मनापासून अभिनंदन .आजचा एपिसोड फक्त एकाच विषयावर भाष्य नक्कीच करत नाही .आजच्या एपिसोडमध्ये अनेक विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न अत्यंत यशस्वीपणे केला आहे .सरपंचांची संवादफेक आणि अभिनय अस्सल गावाची आठवण करून देते .संतोष ,अव्या ,बापू ,मास्तर ,या सर्वांच अभिनय अत्यंत खरा आणि आपला वाटतो ...शहरातील मुलांचे काम पण अगदी अप्रतिम झाले आहे .उमेश चा कॅमेरा हे सगळे प्रसंग अक्षरशा जिवंत करतो आणि हे सर्व आपल्या समोरच चालू आहे असेच वाटत राहते.उमेश ग्रेट मित्रा ...........आता विशेष अभिनंद करावं वाटत ते नितीन सरांचे.... ,संवाद काय लिहिलेत राव .....,माणसामाणसातील फरक ......गाव - शहरातील फरक तुमच्या लिखाणातून आणि दिग्दर्शनातून दिसून येतो ...'' शहरात आलेल्या पाव्हाण्याना जेवायला थांबणार का म्हणून विचारता आणि आमची आई पाव्हणा दारात दिसला कि भाकरी टाकायला तवा घेते..अहाहा काय बोलाणार ..'' किती मोजक्या आणि मार्मिक शब्दात माणुसकीची भाषा सांगून गेलात सर तुम्ही ....''आणि सर हे अगदी खर आहे ..अहो जेवायला थांबणार का ?हे तर खूप लांबचे झाले ... जेवायला बसले नां तर बसण्याची आधी तुम्ही दोनच चपाती खाणार ना? असं विचारणारी महाभाग सुद्धा शहरात आहेत,हे मी स्वतः अनुभवले आहे .........''गावाकडं मानसं अजून सिमेंट ची झाली नाहीत ......हे वाक्य प्रत्येकाला अक्षरशा अंतर्मुख करायला लावते ....शेतकऱ्याची अवस्था पण खरी मानाडली आहे ..शेतकरी जगाचा पोशिंदा वगरे हे खरच फक्त ऐकायलाच बर वाटत ..पण शेतकर्याचे दुख कुणालाच कळत नाही ..पण शेतकऱ्यांना नाव ठेवणाऱ्या माझ्या शहरातील मित्रांना एवढं सांगतो ......' यडा गबाळा शेतकरी त्याच्या दिसण्यावर नका जाऊ ..अरे शहरामधलं कुठलं मशिन धान्य पिकवत भाऊ ''.... आता शाळेचा विषय ,,,खरच गावाकडच्या मराठी शाळेची अवस्था खूप अवघड झाली आहे ....पटसंख्या नसल्याने सरकार पटापट शाळा बंद करायला लागले आहे .आणि याला कुठेतरी आपण प्रत्येक जन जबाबदार आहोत .कारण प्रत्येकाला वाटत आपल पोरगं इंग्लिश शिकावं म्हणून आपणच आपली पोरं इंग्रजी शाळेला टाकू लागलोत ...पण इंग्लिश शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते च असं नाही .मराठी शाळेत पण दर्जेदार शिक्षण नक्कीच मिळते .आम्ही पण मराठी शाळेतच शिकलो आहे आणि आज यशाच्या शिखरावर आहे .अशी किती तरी उदाहरणे आहेत कि जे मराठी शाळेत शिकून IAS,IPS झाले आहेत .. शाळा बदलणाऱ्या पालकांना मला एवढेच सांगायच आहे ..कि तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळा बदलण्यापेक्षा तुमची मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे .....कारण बी चांगलं असलं ना, कुठं पण उगवतं ............ पुन्हा एकदा अभिंनदन कोरी पाटी टीम .

  • @vishalkakde1622
    @vishalkakde1622 6 років тому +33

    गरज आहे असे विषय पुढे येऊन समाज प्रबोधन होणची
    सलाम कोरी पाटी & नितीन सर

  • @mahadevkshirsagar1242
    @mahadevkshirsagar1242 5 років тому +1

    खूपच सुंदर भाग, अगदी वास्तव गोष्टी दाखवल्या, आज काल मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत त्याबरोबर आपली संस्कृती ही मातीमोल होत चालली आहे, मी बघतो की जील्हा परिषद चे शिक्षक सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत घालतात मग मराठी शाळा बंद कश्या नाही पडणार

  • @sagarghatal6493
    @sagarghatal6493 6 років тому +7

    पर्व १ व २ मधील हा सगळ्यात चांगला आणि मनाला चटके लावनारा भाग 👌🙏🏻 धन्यवाद कोरी पाटी 🙏🏻

  • @mayaroy8422
    @mayaroy8422 6 років тому +15

    खरच महत्त्वाचा💯 मुद्दा आहे. मराठी शाळेत शिकणारी मुले बालपण आनंदाने 🤗जगतात, ते इंग्लिश मेडियमने शिकणारी कधीच जगू शकत नाही. कारण मुलांना रोबोट सारखे परफेक्ट बनवणे हा मार्ग योग्य नाही. मातृभाषेचा आदर, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मराठी शाळा हाच पर्याय पालकांनी निवडला पाहिजे. 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarchavan7423
    @dnyaneshwarchavan7423 6 років тому +71

    महत्त्वाचा विषय मांडला .धन्यवाद कोरी पाटी टीम .मी इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे .इंग्रजी भाषा आपण जरुर शिकावी पण शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावे .

    • @haridaskumbhar3476
      @haridaskumbhar3476 6 років тому +1

      Capgemini ,samsung, TCS ,Huawei , Ericsson,infosys ,nokia IBM, या सर्व कंपनी तील HR ला मराठीतून interview घ्यायला सांगा।

    • @suhassangar4280
      @suhassangar4280 6 років тому

      इंग्लिश भाषा ही काळाची गरज बनली आहे.

  • @sagarsutar3297
    @sagarsutar3297 5 років тому +2

    Tumche bhag......aayushat shiknya sarkhe asatat.👍👍👍👍👍👍

  • @dattatraykarne4870
    @dattatraykarne4870 6 років тому +62

    माणसं सिमेंटची झाली व गावाकडची माती विसरली.......सलाम नितीन सर.

  • @ankush4030
    @ankush4030 6 років тому +24

    अडचणी पेक्षा.. आम्हाला आपली माणस मोठी वाटतात..!👌

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures 6 років тому +93

    या एपिसोडचा भाग २ बनवा तर खरी मजा येईल. ज्यात मराठी शाळा पुन्हा सुरु होते. ज्यांना पटल त्यांनी लाईक करा .

    • @isshuu3100
      @isshuu3100 6 років тому +1

      brobr ahe he..

    • @MadhurPulekarPictures
      @MadhurPulekarPictures 6 років тому

      @@isshuu3100 धन्यवाद.

    • @isshuu3100
      @isshuu3100 6 років тому

      +Fookat TV ok

    • @nillohar1329
      @nillohar1329 5 років тому

      Ha barobar ahe 2nd part ala pahije

    • @warnalalge
      @warnalalge 3 роки тому +1

      आपण भयकथा व्हिडिओ
      बनवता

  • @rudrawadkar3033
    @rudrawadkar3033 5 років тому +1

    Nitin sir very right story vishay pa sarvat changla ghetala ani mandala pn sir aka shikshakachi talmal pn anubhav ali khup chan salute Sir apnala

  • @akshaymore1733
    @akshaymore1733 6 років тому +11

    मुद्धा जुनाच आहे पण ज्या प्रकारे मांडलाय ,,,, मुंग्या आल्या डोक्यातून... खूप भारी

  • @bhushanpawar8623
    @bhushanpawar8623 6 років тому +1

    धन्यवाद नितीनजी पवार सर तुम्ही एकाच भागामध्ये सर्व विषय मांडले शेतकरी शिक्षण रोजगार

  • @LaxmanDhorkule
    @LaxmanDhorkule 6 років тому +93

    आमची स्टोरी दाखवली
    डोळ्यात पाणीच आलं
    आमची पण शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे
    धन्यवाद टीम

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +2

    अगदी वास्तववादी चित्र दाखवलं तुम्ही 👌👍😘🙏

  • @mich_amar
    @mich_amar 6 років тому +13

    खऱ्या अर्थाने आज नवीन कलाकार दुसऱ्या पर्वात सहभागी झाले...
    उत्तम विषय आणि साजेशी मांडणी..
    सरपंचाच पुन्हा दर्शन झालं..😂
    मास्तर दाम्पत्य अजून कोरीपाटी च्या वातावरणात मिसळलं नाही वाटतं...पण संत्या आव्या बापूच्या संगतीने उत्तम टीम तयार होईल यात वादच नाही..
    आव्या म्हणजे एकदम त्रासलेले इंजिनियर cum शेतकरी.😊😊
    महत्वाचं म्हणजे Elephant,हत्ती चा वाद मुला मुलींच्या पालकांनी हाताळला पाहिजे.. दोन्ही गोष्टी माहीत करून दिल्या तर खूप प्रगती होईल...
    ऑल द बेस्ट..कोरीपाटी..👍

  • @rambhalerao3535
    @rambhalerao3535 6 років тому +1

    आजपर्यंत पाहिलेल्या भागापैकि सर्वात मस्त आणि वास्तव दाखविणारा भाग आहे हा. खरच कोरी पाटी प्रोडक्शन आणि सर्व टिमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

  • @krashnaandhale3537
    @krashnaandhale3537 6 років тому +18

    खुप छान.....
    अशा शिक्षकांची गरज आहे महाराष्ट्रा ला.

  • @sagarkalbhorpatil2938
    @sagarkalbhorpatil2938 4 роки тому +1

    मराठी शाळा आज टिकवणं काळाची गरज आहे 🙏

  • @vikrampawar3430
    @vikrampawar3430 6 років тому +5

    खूप महत्त्वाचा विषय मांडला...सत्य परिस्थिती आहे आत्ताची..खूप आभार नितीन सर आणि टीम 👌👌

  • @savegirls7125
    @savegirls7125 6 років тому +4

    खूपच महत्वाचा विषय मांडलात आपण त्या बद्दल आपले आभार।
    गाव ओसाड पडत चाललेत ,पैशाची झालर डोळ्यावर पांघरून लोक गाव सोडून बाहेरगावी राहायला कामाला जातात, जगात कुठे हि जाऊन जरी राहिला ना तरी आपल्या गावाशी असलेली नाळ कधी तोडू नका अरे जर गावच नसत तर आपण हि नसतो कारण आपण नेहमी एक लक्षात ठेवायला हवं
    "आपली माती आपली माणसं"

  • @PRADIPDEORE8686
    @PRADIPDEORE8686 6 років тому +10

    जबरदस्त वास्तव.
    आज सगळ्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती का निर्माण झाली याची कारणं खुप वेगवेगळी आहेत.
    1)स्पर्धेचे निर्माण झालेले युग
    2)दर्जेदार शिक्षण आणि शिक्षक यांचा अभाव
    3)ग्रामीण भागाच्या शिक्षणाकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष
    4)क्लास आणि जादा तासांची असलेली वणवा
    5)वशिला आणि पैसा घेऊन केलेली भरती यामुळेच गुणवत्ता राहिली नाही.
    अशी एक ना अनेक कारणे आहेत मराठी शाळांची. पण आजही ग्रामीण भागात काही प्रामाणिक शिक्षक प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी त्यांची गुणवत्ता टिकवत स्पर्धेच्या युगात मान ताठ ठेवली आहे.

  • @gautamnikam3513
    @gautamnikam3513 4 роки тому +1

    Lay bhari aahe tumcha gawa kadcha goshti aamhi roj dgtoy

  • @prathmeshshinde6626
    @prathmeshshinde6626 6 років тому +15

    शिक्षणाचे माध्यम मराठीच असावं, धन्यवाद कोरी पार्टी टीम

  • @ShubhamPatil-to8fd
    @ShubhamPatil-to8fd 6 років тому +1

    1no video, खुप छान 😍😘

  • @sagartupe3544
    @sagartupe3544 6 років тому +10

    शाळा म्हणजे काय?
    आणि शाळेच्या खऱ्या आठवणी आपण मोठे झाल्यावरच कळत.
    शाळेत असताना तिची किंमत नाय कळत पण मोठं झाल्यावर कामाला लागल्यावर शाळेची किंमत आणि खरी धम्माल आठवते.खरच लहानपण आणि शाळा कधीही न विसरणारा क्षण ......
    देशाचे खरे हिरो तर...
    भारतीय सेना आणि आपले शेतकरी ...
    जय जवान जय किसान......

  • @suhaskamble4211
    @suhaskamble4211 5 років тому +1

    भारी विषय होता आजचा .....खरच गरज आहे गावाकडील शाळा ठिकवून ठेवण्याची......इग्लिंश मिडीयम शाळामूळे गावाकडील शाळा बंद पडू लागल्या आहेत .....

  • @sathe3003
    @sathe3003 6 років тому +4

    खरंच खूप छान मित्रांनो..
    मराठी भाषा ही आपली ओळख आहे... आणि तिला आपण विसरून गेलो आहोत..
    इग्रंजाने पहिले सुद्धा आपल्यावर राज्य केले आणि आता सुद्धा करत आहेत..
    आपण आपल्याच देशात आपली भाषा बोलत नाही..
    खुप वाईट वाटते..

  • @ravjichikhalvale3364
    @ravjichikhalvale3364 5 років тому +1

    गावातली मांनसं सिमेंट ची नाही झाली...👌
    बापू अगदी अशील हाय अशील..🐍

  • @stargaming3103
    @stargaming3103 6 років тому +40

    i am living in Australia but i love marathi language and marathi schools 👍👍👍👍👍

  • @vinodpol6945
    @vinodpol6945 4 роки тому +1

    सर्वांनी विचार करण्यासारखा विषय आहे , छान वाटले

  • @gajanannaikwade2458
    @gajanannaikwade2458 6 років тому +5

    काय मस्त विषय घेतला होता. प्रत्येक सोमवारी आज काय नविन विषय पाहायला मिळेल असे वाटतय. आणि नितीन सर तुम्ही त्यात स्वतःचा जीव झोकून तयार करता व सर्व team संत्या,अव्या, बापू तितक्याच मेहनतीने त्यावर काम करतात. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @nileshdeshmukh4727
    @nileshdeshmukh4727 6 років тому +1

    गुरूजींच्या पाया पडण्याचा प्रसंग.. ह्रदयस्पर्शी

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 6 років тому +30

    एलिफंट दाखवत ..पण हत्ती म्हणजे काय तेच कडेना ..😂😂😂
    It's a trueth..👌

  • @harshalkshirsagar8955
    @harshalkshirsagar8955 4 роки тому +1

    Best episode ever ,fkt navodaya ch nav ekunch manal proud feel zal,very beautiful story,paristiti khambir ahe ,no convent only government school

  • @DJSRMOFFICIAL
    @DJSRMOFFICIAL 6 років тому +8

    नितीन सर एक नंबर विषय निवडला तुम्ही...!!

  • @kishorpatule6708
    @kishorpatule6708 4 роки тому +1

    मज आवडते ही मना पासूनी शाळा
    लाविते लळा ही जशी माऊली बाळा..
    शाळेची आठवण करून दिली ..

  • @arunpatil6715
    @arunpatil6715 6 років тому +17

    आज वरचा सगळ्यात चांगला एपिसोड मला फार आवडला

  • @maheshkamble393
    @maheshkamble393 6 років тому +1

    खूपच छान संदेश दिलाय सर.... मराठी शाळा टीकल्याच पाहिजेत..

  • @Z.P.BHAU.2500
    @Z.P.BHAU.2500 6 років тому +39

    मातृभाषेचे शिक्षण तेच श्रेष्ठ शिक्षण - APJ Abdul Kalam, मी शिक्षण घेतले मातृभाषेत माझी मुलं पण मातृभाषेत शिक्षण घेतात, आणि माझ्या मुलीने गावाकडच्या मराठी शाळेत 10 वीत सायन्स विषय घेवून 91 टक्के मार्क मिळविले, काय वाईट आहे सांगा मातृभाषेत शिक्षण घेतले तर, आणि मातृभाषे बरोबर इतर विषय असतातच, सेमी इंग्लिश पण असते च, आजचा भाग खुपच छान होता, समाज प्रबोधनकार भाग होता, धन्यवाद... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @supriyabhosale233
    @supriyabhosale233 5 років тому +1

    Wow heart touching.... Video chhan....

  • @ganeshakhairmode5865
    @ganeshakhairmode5865 6 років тому +3

    गावाकडच्या गोष्टी ,,,आणि गावाकडची शाळा यांचा नादचं नाय करायचा,,,सर तुम्ही जे भाग बनवताय ना याला तोडच नाय बघा,,,कडक असत सगळ ,,,,

  • @ajjumali1071
    @ajjumali1071 6 років тому +1

    या भागात दाखवल्याप्रमाणे च गावची परिस्थिती झाली आहे.एक नंबर विडिओ

  • @VijayAaranbh15
    @VijayAaranbh15 6 років тому +10

    खुप छान समाजप्रबोधन नितिन पवार सर👍👍 आणि संत्या, बापू , आव्या खरंच यार तुम्ही लय भारी अक्टींग करता राव तुम्हाला भेटायची खुप ईच्छा होती रैरै........
    असंच करावे

  • @amanpatel7054
    @amanpatel7054 6 років тому +1

    GAWWACHI SAHDA.EK NO.

  • @thefooddoc_
    @thefooddoc_ 6 років тому +3

    प्रत्येक विषय हाताळण्याची वेगळीच कला अवगत केलीय आपण ..
    सलाम koripati team ,नितीन सर

  • @shubhamkadam3553
    @shubhamkadam3553 6 років тому +1

    अतिशय उत्तम उपक्रम .माणसाला अगदी गावाकडं नेणारी वेब series

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k 6 років тому +5

    खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही समोर आणला.
    आजचे संवादही खुपचं भारदस्त आहेत. आजचे संवाद लिहिणाऱ्या लेखकाला खरचं सलाम.
    संपूर्ण महराष्ट्रातर्फे तुमचे खूप खूप आभार....👌👍

  • @vishaltippe4872
    @vishaltippe4872 6 років тому +1

    खरच या इंग्रजी माध्यमामुळे मातृभाषेची पाटी कोरी नाही पडली पुरे!! खूप खोल विषय मांडलाय कोरी पाटी प्रॉडकशन्स ने.. खूप खूप आभार.वर्तमान परिस्थिती हीच आहे. पण जे संस्कार, जी आपुलकी मराठी शाळेत आहे ती कुठेच नाही.मला गर्व आहे की मी मराठी शाळेत शिकलो.

  • @supriyapawarraut1412
    @supriyapawarraut1412 6 років тому +5

    खूप सूंदर विषय मांडला आहे

  • @nilamkishorwagh4796
    @nilamkishorwagh4796 2 роки тому

    एकच नंबर भाग ,🙏अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं खरी वास्तविकता दाखवलीत ,👍

  • @sudhirkarennavar5238
    @sudhirkarennavar5238 6 років тому +4

    तुमची वीचाराला तोड नाही. काय वीषय असतात Mast.. पहीला आम्ही Entertainment साठी बगायचो अत्ता चांगला मुद्दा समजुन घ्यायला...अप्रतीम Episode

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 6 років тому

    मराठी शाळा टिकली पाहीजे
    शिक्षणांचा फक्त बाजार मांडलाय
    Thanks kori pati 👍👍

  • @010snaky
    @010snaky 6 років тому +5

    अत्यंत महत्वाचा विषय नाटक रूपामध्ये तुम्ही सर्व जगा समोर मांडता, ज्या विषयांना कोणी हात लावायला किंवा चर्चा करायला पण तयार नाही ते विषय आपण मांडत आहात, फारच महत्वाचं काम करत आहात आपण. नितीन पवार साहेब कृपया तुमचा हा मार्ग सोडू नका, कोणत्याही राजकीय किंवा व्यापाराच्या जाळ्यात अडकू नका हीच सदिच्छा. सबका मंगल हो!!

    • @vijayjadhav3675
      @vijayjadhav3675 6 років тому

      Ek no...... Theme..... Very good job.......

  • @ramsanas6131
    @ramsanas6131 4 роки тому +1

    खरच खुप सुंदर एपिसोड आहे हा

  • @bhaskarpatil8801
    @bhaskarpatil8801 6 років тому +4

    खूपच गंभीर विषय आहे आजच्या मराठी शाळेची फारच वाईट अवस्था आहे

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 4 роки тому +1

    खरी परिस्थिती मांडली मित्रानो

  • @rajeshbhojane5951
    @rajeshbhojane5951 6 років тому +21

    अप्रतिम । अप्रतिम ।अप्रतिम । मी एक शिक्षक आहे आमच्या समस्या अचूक मांडल्या बद्दल धन्यवाद। सद्याची मराठी शाळांची समस्या अशीच आहे,

    • @nitinkolape9296
      @nitinkolape9296 6 років тому

      Brobr aahe Sir...

    • @sujeettulajapure365
      @sujeettulajapure365 6 років тому

      आज शासकीय सेवेत जाणारे बहुसंख्य मुले ही जिल्हा परिषदेची आहेत खरंच लोकांत जागृतीची गरज आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रत्येक वर्षी नवीन शिक्षक असतो हे खेड्यातील लोकांना माहीत नाही.

  • @bapubhagwat875
    @bapubhagwat875 6 років тому +1

    पर्व पहिले व पर्व दुसरे भाग 30 सर्वात खूप सुंदर भाग अगदि मनाला भावलेला

  • @jyotiramkumkale3511
    @jyotiramkumkale3511 6 років тому +6

    खुप छान विषय निवडला तुम्ही,
    लहानपनीच्या आठवनी जाग्या झाल्या

  • @sureshrathod8396
    @sureshrathod8396 5 років тому +1

    That's reality ......Gramin area ... Really good concept sir .....

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 6 років тому +12

    भाऊ मी निशब्द आहे. पण इतकं नक्की की प्रोमो जी उत्सुकता निर्माण केली त्या पेक्षा सुंदर बनलेला आहे हा भाग. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @akshatkumar2396
    @akshatkumar2396 5 років тому +1

    खरंच भारी विषय होता .

  • @nageshrthalpati1206
    @nageshrthalpati1206 6 років тому +4

    गुरुजी ची अकटिंग आवडली । अंगाला अगदी काटाच आला । एका शिक्षकाच मुलावरच प्रेम डोक्यातून नाही तर हृदयातून दिसत होते। I like It .Best of luck all of you and your team

  • @hjayganesh143
    @hjayganesh143 6 років тому

    खूप मस्त आणि खरच हिच वस्तुस्थिती आहे काही दिवसांनी मराठी विषय नसेल शाळांमध्ये.......खुप खुप आभार सगळ्याचे

  • @s.pcreation4390
    @s.pcreation4390 6 років тому +6

    खरच महत्वाचा विषय मांडला, गरज आहे,आपली मातृभाषा विसरत चालेत, खूप खूप आभार.👌👌👌

  • @khushalshinde5060
    @khushalshinde5060 6 років тому +1

    हृदयस्पर्शी,
    गुरुजी खुप छान, डोळ्यात पाणी आल......

  • @someof8940
    @someof8940 6 років тому +5

    I am live in United Arab Emirates
    ( Lay bhari episode )👍👍💐💐

  • @bestmarathivideo
    @bestmarathivideo 6 років тому +1

    गावाकडच्या गोष्टी च्या टीम चे मनापासून आभार की एवढा संवेदनशील विषय तुम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला कारण भावी पिढीला दिशा देणारा भावी शिक्षक आज अंधारात त्याची वाट शोधत आहे शासन दरबारी त्याची व्यथा कोणी ऐकत नाही पण तुम्ही या एपिसोड मधून खूप उत्तम प्रकारे याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले
    मराठी शाळा ही टिकलीच पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्न आपण केले पाहिजे ।
    Thanks KORI PATI PRODUCTIONS

  • @AnilRenuse1674
    @AnilRenuse1674 6 років тому +62

    गरूजीच्या पाया पडत असल्याचा विडीवो गावाकडील शाळेची खुप आठवण आली😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Khandekarvikas
    @Khandekarvikas 6 років тому +1

    अशी वस्तुस्थिती आहे आज मराठी शाळाची....बाकी विषय एकदम मस्त मांडलाय...👌👌👌👌

  • @akashkshirsagar2559
    @akashkshirsagar2559 6 років тому +55

    मराठी शालेत माणूसकी शिकवली जाते ती इंग्लिश स्कूल मधे नाही ......

    • @9028898209
      @9028898209 6 років тому +1

      Akash Kshirsagar
      Aagdi barobar

  • @pavan-heartbeats
    @pavan-heartbeats 6 років тому +1

    लय भारी राव,,, आठवलं 3 किमी चिखलातून चालत जायचो felt nostalgic.

  • @krishrocksj2666
    @krishrocksj2666 6 років тому +4

    अगदी माझ्या मनातला विषय घेतला... अतिशय भावनिक झालो मी....थँक्स सामाजिक व शैक्षणिक विषयाला हाथ घातल्याबद्दल

  • @rajendra4mandrem873
    @rajendra4mandrem873 6 років тому +1

    अतिशय सुंदर. मी पण एक प्राथमिक शिक्षक आहे. सध्याच्या मराठी शाळांची अवस्था पाहून रडू येते. इंग्लिश नावाच्या भुताने सर्व लोकांना साध्या झपाटून सोडलाय. माझी शाळा सुद्धा गावा, नव्हे जंगलात आहे असे mhatle तर बरोबर होईल. पण तरी सुद्धा पालक मुलांना शाळेत पाठवतात कारण त्यांना पटतय गावातल्या शाळेच् महत्त्व. मी आलो होतो तेव्हा शाळेची पटसंख्या 8 होती. 5 वर्ष झाली साध्या पटसंख्या 14 आहे. देव करू वा इतर लोकांना देव सद्बुद्धी देवो वा शाळेची पटसंख्या वाढत जावो. भीती वाटते कधी कधी की माझ्या पण शाळेला असेच टाळे मारायची वेळ आली तर?. हे देवा आता तूच काई तो लोकांच्या डोक्यात प्रकाश टाक.

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 6 років тому +5

    खूप छान! छान विषय, यावर बिनकामाची बुलेट ट्रेन साठी पैसे ओतनाऱ्या सरकार ने नक्की लक्ष द्यावे , शिक्षण मूलभूत गरज आहे, त्या शिक्षणाच्या जोरावर देश प्रगती करणार आहे.

  • @ommhatre4765
    @ommhatre4765 6 років тому

    खूप छान .....आम्ही न चुकता सर्व एपिसोड बघतो ..मराठी शाळा हीच बेस्ट आहे ...

  • @sagarphanse9255
    @sagarphanse9255 6 років тому +4

    खुपचं छान मराठी शाळेबद्दल अभिमान आहे मला कारण मी पण मराठी शाळेत शिक्षण घेतलं आहे
    आता सगळे पालक आपला पाल्य इंग्लिश मिडीयम ला घालतात पण खरी मजा तर आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्यात आहे. मराठी शाळेमध्ये पण इंग्लिश हा विषय आता पहिली पासून सुरू करण्यात आला आहे. खर तर आता शिक्षणात स्पर्धा होण्यापेक्षा आता आपला मुलगा कोणत्या शाळेत शिकतो ह्याची स्पर्धा चालू आहे त्यामुळेच सगळे पालक आपला पाल्य इंग्लिश मिडीयम मध्ये टाकतो.
    आणि खरंच मराठी शाळा खूप छान असते आता आणि तुम्ही मुले बाहेर शिक्षणाला टाकतात तर गावातील शाळा बंद होईल तरी हा एपिसोड बघून तुम्ही तुमचे डोळे उघडा🙏🙏🙏
    बाकी एपिसोड खरंच मस्त होता👌👌

  • @hemlatabarkade8454
    @hemlatabarkade8454 4 роки тому +1

    खरच खूप वास्तव मांडलं आहे या भागा मध्ये 😔

  • @abhijeetjadhav2906
    @abhijeetjadhav2906 6 років тому +6

    खरचं ही आजची वस्तुस्थिती आहे....😔
    Z. P. शाळा बंदच नाहीत तर मोडकळीस आल्यात.

  • @ajinkyasuryavanshi4035
    @ajinkyasuryavanshi4035 6 років тому

    आज गुरूजींनी मन जिंकल..
    आव्या, बापु, संत्या या सगळ्यांपेक्षा गुरूजी भारी होते..
    Nice act.. 👌👍

  • @sonnaliShorts235
    @sonnaliShorts235 6 років тому +82

    खूप छान विषय आहे,खरच गावच्या शाळा बंद पडत आहेत,, आम्ही सुद्धा ४किमी चालत जायचो पण मजा यायची आता काही राहिले नाही,,, खूप वाईट वाटत

    • @haridaskumbhar3476
      @haridaskumbhar3476 6 років тому +2

      वाईट वाटत तर शहर सोडून गावी जावा ।

    • @allinone4070
      @allinone4070 6 років тому

      खरय

    • @santosh1123
      @santosh1123 6 років тому

      apan pn chhan ahat

    • @akashkoyate1159
      @akashkoyate1159 6 років тому

      Aamhi pan 3 km chalat jaycho ani jaycho

    • @sidkhot2488
      @sidkhot2488 6 років тому

      Sonali Nil tumhi mast lihle ahe

  • @roshandighe403
    @roshandighe403 6 років тому +1

    आज तुम्ही खुप चांगला संदेश पोचवताय लोकांन पर्यत. खर आहे गावातली माणसे शहराकडे यायला लागलीत त्यामुळे गावच्या शाळा बंन्द होतायेत. शेतकर्या विषयी पन जे काही 2 शब्द सांगीतलेत ते पन बरोबर आहे.
    या क्रिपट चा ज्यानी लेखन केला त्याला माझा सलाम मस्त लेखन आहे. कलाकारान बद्दल तर काय बोलायलाच नक्को ते नेहमी मस्त काम करतात. तुम्हाला सर्वाना भेटावस वाट्टत.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 6 років тому +4

    खरच मराठी शाळांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

  • @jeewanwaghmare7736
    @jeewanwaghmare7736 3 роки тому

    खुपच छान विषय....मी ही शिक्षक आहे....पाटण तालुक्यातच आहे....आणी येत्या 2,3 वर्षात आमच्या ही शाळेची ही च अवस्था होणार आहे.....वास्तव विचार मांडल्या बद्दल...तुमच्या सर्व टिम चे धन्यवाद...🙏....खरच मराठी शाळा टिकल्या तर गावातील गोर गरीब लोकांचे मुल शिकतील....नाहितर त्याना शिक्षण ही मिळणार नाही

  • @technicalparshu
    @technicalparshu 6 років тому +7

    सलाम आपला नितीन सर आणि टीम गावाकडच्या गोष्टी

  • @akshayghanwat9303
    @akshayghanwat9303 6 років тому +1

    उत्तम मांडणी आणि विषय भन्नाटच निवडला.... त्यासाठी खूप धन्यवाद

  • @surajpinjarkar9271
    @surajpinjarkar9271 6 років тому +7

    खुप छान होता episode आपल्या मातृभाषेत जी मजा आहे ना टी कशातच नाही......

  • @dattatryachaure
    @dattatryachaure 6 років тому

    एपिसोड खूप छान आहे मला खूप आवडला,,संकल्पना खूप छान खरच मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत,मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण

  • @janardanredekar6345
    @janardanredekar6345 6 років тому +4

    खुप म्हणजे खुप सुंदर विचार मांडला आहे.. Elephant म्हणजे दाखवतय आणि हत्ती म्हटल की विचार करतय... हीच अवस्था होणार ह्याची भीती वाटत आहे..वेळीच सावध राहीलेल चांगल राहिल..

  • @chandrakantkore8195
    @chandrakantkore8195 6 років тому

    अतिशय सुंदर विषय अशी परिस्थिती सर्व ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत आहे. या पाश्र्वभूमीचा जरुर शासनाने तसेच समाजातील लोकांनी केला पाहिजे.

  • @noorahemadsheakh6314
    @noorahemadsheakh6314 6 років тому +6

    Good episode
    NITIN sir
    Thanks for this episode

  • @akshayrajput8664
    @akshayrajput8664 6 років тому +1

    खरंच वास्तव मांडल राव 👌👌

  • @omkarjadhav2884
    @omkarjadhav2884 6 років тому +16

    डोळ्या तुन पानि आल राव😭😭

  • @kushantjadhav4402
    @kushantjadhav4402 6 років тому

    सुंदर,शाळेची आठवण अली,गुरुजींच्या पाया पडणे,छान वाटलं,ending मस्त,आवडला एपिसोड

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 6 років тому +3

    आजची सत्य परस्थीती आहे जि.प. शाळांची अगदी प्रत्येकाच्या गावात असच आहे .
    फक्त एकदा तरी हरपळवाडी जि.प. शाळेत जाऊन याव अस मला वाटत खुप छान बदल केला आहे हरपळवाडीच्या ग्रामस्थानी इंग्लीश मिडियम आणी मराठी मिडियम यांचा मस्त मेळ बसवला आहे .
    खरच एकदा तरी जाऊन याच प्रत्येकाने. शिक्षकांनी तर आर्वजन जाव आणी तिथल्या शिक्षांकाना भेटून त्यांच मार्गदर्शन घ्याव.

  • @sandipnikam4071
    @sandipnikam4071 6 років тому +1

    खूप महत्वाच्या विषयाला हात घातला आज,,, शासनाने चालवलेली चालबझी आणि त्यात गुरफटत चाललेले पालक.
    चांगले मुद्दे मांडले गेले,, खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @nihalmulla9302
    @nihalmulla9302 6 років тому +3

    डोळ्यातून पाणी आलं राव ..😭😭

  • @vaishalimaske5993
    @vaishalimaske5993 4 роки тому +1

    Right ग्रामीण भागातले विद्यार्थी आज. अधिकारी आहेत. शहरात a गावत फरकच असतो kup. गाव ते गाव..