पोलीस जोडीचा आजचा शेवटचा दिवस 😭अस्मिता खूप रडली 😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #पोलीसजोडी
    #policejodi

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 Рік тому +218

    पोलीस दलातील फार छान पती पत्नी ची जोडी तुम्हाला नवीन ठिकाणी असेच आनंदी, कर्तव्य दक्ष राहाल अशा शुभेच्छा.

  • @manoharbhavsar6962
    @manoharbhavsar6962 Рік тому +79

    पोलिस दलात इतकी माणुसकी पाहून खूप आनंद झाला. पुढील प्रवासास शुभेच्छा.

    • @shindesuresh8322
      @shindesuresh8322 Рік тому +1

      धन्यवाद

    • @sandipwagh6655
      @sandipwagh6655 Рік тому +3

      आंनदी रहा सुखी रहा आणि मनापासून सांगतो असेच हसत रहा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @avinashmagar1344
    @avinashmagar1344 Рік тому +27

    पोलिसातील मानुस खरचं शब्दांत नाही सांगता येत. सलाम तुमच्या कार्याला

  • @dilipkhade1093
    @dilipkhade1093 Рік тому +32

    सर तुमचे एक एक शब्द असे काळजाला लागतात सर तुम्हाला आणि ताईला सुख समृद्धी आरोग्य लाभो हीच श्री संत गजानन महाराज चरणी प्रार्थना जय गजानन🙏🙏

  • @rsgharge338
    @rsgharge338 Рік тому +31

    नोकरशाहीत, निवड, नियुक्ती, बदली, बढती, निवृत्ती या सतत चालणाऱ्या प्रकिया आहेत. हा क्षण सुख दुःख या संमिश्र भावनेचा आहे.फार छान सादरीकरण. भावी वाटचालीस शुभेच्छा...

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Рік тому +12

    साहेब आपण दोघांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.आणि भावना व्यक्त केल्यात.खूप बरं वाटलं आणि वाईटही वाटलं.वाईट त्यामुळे वाटलं.की आपली बदली झाली आणि.वेगवेगळ्या ठिकाणी आपली कर्तव्य नेमली गेली..कारण एकत्र परिवार हा संसाराचा गाडा असतो.आणि जेव्हा हा गाडा तुटतो तेंव्हा हे वातावरण विभिन्न होते..मँम जेंव्हा रडत होत्या माझ्यापण डोळ्यात अश्रू आले.मला महाराष्ट्र पोलिसांचा खूप अभिमान आहे.आणि आपण कर्तव्यदक्ष आणि जबाबदार आहात.त्यापेक्षां मोठं काहीही नाही.आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या आनंदमयी शुभेच्छा.आणि पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....जय हिंद जय भारत🙏🙏🙏

  • @sandeepchavan7153
    @sandeepchavan7153 Рік тому +5

    एक पोलीस म्हणून तुमची पर्सनॅलिटी खूप ग्रेट आहे सर ! मॅडम पण तुम्हाला अगदी शोभतात एवढा सरळ पणा आणि साधेपणा तुमच्या स्वभावामध्ये कुठून आला ? तुमच्या जोडीला सलाम , किती माणसे जमवलीत किती मित्र कमावलेत ! तुमच्या कर्तृत्वाला पण खूप सलाम hats off sir madam !

  • @shankarpol3960
    @shankarpol3960 Рік тому +156

    पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोघांना🙏🙏

    • @dilipsavakare7129
      @dilipsavakare7129 Рік тому +4

      पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

    • @umeshpatil-ex6ov
      @umeshpatil-ex6ov Рік тому +1

      🆂🅸🆂🆃🅴🆁 🆈🆄🆄🆁 🅽🅴🆇🆃 🅻🅸🅵🅴 🆅🅴🆁🆈 🅷🅰🅿🅿🆈

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 Рік тому +4

    भैया. ताई जिवनात पैसा संपत्ती महत्वाचीनाही प्रेम महत्वाच असत ज्या ठिकाणी जाल तेथेही असच प्रेम मिळवा. सामाजिक प्रेमात किती आनंद मिळतो हे आपण अनुभवले आहेच अशिच आपली जोडी आनंदात राहो जिवनात थोरामोठयाचे
    आशिर्वाद घेतराहा आपल्या सर्व कुटूंबास दिवाळीच्या शुभेच्छा

  • @arunkumarrathod6968
    @arunkumarrathod6968 Рік тому +7

    पोलीस दलात किंबहुना आकस्मीत पाहावंयास मिळतात असी जोडी कर्तव्य बजावत असतांना स्वतः आनंदीआनंद राहण आणि दुस-याना मनोरन्जीत करणं यापुढेही असाच सहवास दरवळत राहाव हिच गुरुमाऊली चरणी प्रार्थना आणि पुढील कार्यास मनपुर्वक शुभेच्छा

  • @manjusutar711
    @manjusutar711 Рік тому +5

    तुमची जोडी खूप म्हणजे खूप सुंदर आहे असेच नेहमी सोबत रहा, अशीच चांगली चांगली कामे करत रहा जय हिंद पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,

  • @anirudhachavan656
    @anirudhachavan656 Рік тому +6

    खूप छान सर ज्या तुम्ही भावना व्यक्त केल्या खूप छान सर तुमच्या सारखीच अनेक पोलीस जोड्या या महाराष्ट्राला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना व तुम्ही ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी देखील तुमचं नाव असंच अलौकिक राहील धन्यवाद साहेब सलाम तुमच्या जोडीला जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarsurwase526
    @dnyaneshwarsurwase526 Рік тому +40

    खुप चांगले सेवा केली (कार्य केले )चारठाणा परिसरात अपन सर& माँडम आपण आमच्या कायमचे अठवणीत राहाल,, पोलिस जोडी म्हणून पुढील वाटचालीसाठी 💐💐💐हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास.💐💐💐💐

    • @dattachikane3003
      @dattachikane3003 Рік тому +1

      पुढील् वाटचालीसाठी शुभेच्छा साहेब व मॅडम

    • @vaishalikhandagale2472
      @vaishalikhandagale2472 Рік тому +1

      छान आहे जोडी पुढच्या वाटचालीस वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹🌹

  • @arcmi6643
    @arcmi6643 Рік тому +104

    तुमची पती-पत्नीची जोडी बघून खूपच आनंद होत आहे सर मॅम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 Рік тому +30

    आम्ही पन सांगलीत पोलीस होतो .आणी आताच्या जुन महिन्यात बदली झाली ७ वर्ष काढले सांगली मध्ये .बदली झाली तर तुमच्या सारखेच ताई आम्ही पणलय रडलो.तीथल्या माणसात आपण जिव्हाळा निर्माण केलेला आसतो म्हणुन लय वाईट वाटतंय .आपन सांगतो बदली केव्हा होईल केव्हा केव्हा होईल पण ज्या दिवशी आपली बदली होते .त्या दिवशी कळतय बदली म्हणजे काय . मला सांगलीची आठवण आली तर आता तरी रडते .आणी आज पन तुम्हाला बघुन मला ते दिवस आठवले.आज पन खुप रडली .आमचा प्रवास होता सांगली ते नाशिक अभिनंदन 👏 बदली झाल्या बदल

    • @milindkhaire5790
      @milindkhaire5790 Рік тому

      नवलच राव तुमच सात वर्ष बायको मुलांसोबत राहता तरी रडायला येत म्हणता,आयला इथं फौज मध्ये आम्ही बायको मुलांसोबत नोकरी संपुन जाते तरी त्यांना सोबत ठेवता येत नाही.... जरी चुकुन फैमिली सोबत नेली रे नेली तोच आठ दिवसात आदेश पारित करता कि अपनी बोरी बिस्तर समेटकर बोर्डर पर जाने के लिए मेंटली आणि फिजीकली तयार रहेगा।

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Рік тому +11

    काम व कर्तव्य अस पार पाडा कि तुमची कोठेही बदली झाली तरी जनतेच्या ही डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, पुढील कार्यास शुभेच्छा!

  • @vijaywaghmare4965
    @vijaywaghmare4965 Рік тому +10

    पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा sir and madam....... 🌷🌷🌷🌷🌷

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Рік тому +9

    पोलीस खात्यामध्ये राहुन देखील खुप छान विचार आणि बोलणे आहे आंण्णासाहेब तुमचे जिथे बदली होईल तेथे असेच आनंदी रहा खुप खुप शुभेच्छा .

  • @madhukaringale5478
    @madhukaringale5478 Рік тому +6

    भाऊ तुम्ही खरंच एक चांगले मानुस दिसता मला तुमचे विचार मनापासून आवडले

  • @mangeshkokate9907
    @mangeshkokate9907 Рік тому +2

    ज्या माणसांच्या बोलण्यात वागण्यात गोडवा असतो ती माणसं मेली तरी माणसं जोडत राहतात आणि ती माणसं मेली तरी आठवणीत राहतात कारण काय आहे या आयुष्यात एका क्षणाचाभरवसा नाही त्यामुळे जशी ही ताई आणि दादा जोडी ने आपल्या सर्वांना प्रेम दिले तसेच सर्वांनी द्या

  • @RamkisanRachewad
    @RamkisanRachewad Рік тому +7

    तुमचा जोडीतील आनंद उत्साह पाहुन आमा परीवाराला खुप खुप मनापासुन आनंद होत आहे कारण की तुमचा आनंद आसाच सदैव राहो व तुमचे आयुष्य निरोगी व सुखमय लाभो हिच आई तुळजाभवानी मातेचा चरणि प्राथॅना आहे जय हिंद जय भारत वंदे मातरम भारतमाता की जय जय श्री राम 👏👏👏👏👏

  • @sanjayhule9436
    @sanjayhule9436 Рік тому +10

    माझी खुप म्हणजे खुप आवडती जोडी आहे आणि सर बदली झाली त्यात एव्हडं नाराज व्हायचं काही कारण नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असतील. कायम हसा आणि हसवा 💐💐

  • @digamberphonawale3271
    @digamberphonawale3271 Рік тому +8

    परिवर्तन हा निसर्गच चा नियम आहे.. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @jamilshaikh5736
    @jamilshaikh5736 6 місяців тому +3

    पोलीस खात्यात इतकी संवेदनशील व भावनाप्रधान माणसं पहिल्यांदाच पाहिली,ऐकली व मन गहिवरुन आलं ! पुढील प्रवासासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा !

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Рік тому +3

    तुम्ही पोलीस मध्ये असुन भाषेवर इतकी पकड आहे याच नवल वाटतं आज पर्यंत पोलीस खात्या बद्दल आमच्या मनात अलगच भाव होता

  • @chintamanidesai7311
    @chintamanidesai7311 Рік тому +1

    माणसातील देवाला नमस्कार! पुढे काय होणार हे निश्चित कोणालाच सांगता येत नाही! पण लोकांशी प्रेम निभावणं हे मोठं यश आहे. त्या साठी मोठ मन लागत, ते तुमच्या पाशी आहे. पुण्य आणि सारे यश यातच आहे.

  • @yuvrajsawale4550
    @yuvrajsawale4550 Рік тому +44

    दोघांना शुभेच्छा संरक्षण खात्यात एकमेकांना सांभाळून घेता हाच मोठा पुरस्कार तथागत आपल्या पाठीशी आहे जय भीम जय शिवराय

  • @adv.janardandhandar55
    @adv.janardandhandar55 Рік тому +11

    भाऊ ,बदली,बढती,आणी बदनामी या गोष्टिला तर सामोरे जावचं लागतं हे त्रिकालाबाधीत सत्य आहे!आपणा दोघांना भावी वाटचालीस शुभेच्छा!!!!!!

    • @vandanagaikwad6846
      @vandanagaikwad6846 Рік тому

      बदलीच्या ठिकाणी आपण चांगले रमावे हीच खूप, खूप शुभेच्छा .

  • @bhagawanpatil8656
    @bhagawanpatil8656 Рік тому +8

    तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!! पोलीस खात्यात असून आपण एवढे भावनाप्रधान झालात ,खूप शुभेच्छा

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 Рік тому +5

    भावा आणि ताई खुपचं तुमचे व्हिडिओ बघत होतो. तुम्ही व्हिडिओ आधिक जिमेदरी सांभाळुन होते.पण ताई तुम्हा दोघा ना पुडच्या नविन पोलिस स्टेशन ला असेच आपल्या सामान्य जनतेची सेवा करत राहावी भावा आम्ही सदैव पोलिस बांधवांच्या पाठीशी उभे राहु पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @bapusohonmane2159
    @bapusohonmane2159 Рік тому +3

    बदली झाली म्हणजे खूप खूप वाइट पण बदली ही अटळ आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे या सर्व घटनांतून आम्ही गेलो आहे तुमची ही परिस्थिती आम्ही अनुभवली आहे ते प्रसंग आजही डोळ्यासमोरून जात नाहीत खरे म्हणजे मुलांचे इथले मित्र येथे सोडून जायचे त्यावेळी त्यानाही भावना आवरता येत नाहीत मग त्यांच्या आणि आपल्या भाव भवनाचे वादळ तयार होते असो पुढील गावी नवे मित्र तयार होतात, मिळतात .....जय मल्हार....जय अहिल्या....जय शिवराय ..जय महाराष्ट्र

  • @vivekbhoir1942
    @vivekbhoir1942 Рік тому +5

    असो, ताई भाऊ, बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो स्वीकारावाच लागतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

  • @lobhajimule9943
    @lobhajimule9943 Рік тому +7

    बदली कुठे झाली तर स्वभाविक आहे त्या ठिकाणी काम करणं हे आपण शासनाचे सेवक म्हणून आपली जबाबदारी आहे त्यामुळे रडण्यात काय अर्थ आहे लढण्यात आणि जीवन जगण्यात आनंद आहे असे मला वाटते सर

  • @prabhuaitwar5366
    @prabhuaitwar5366 Рік тому +24

    पुढील वाटचाली साठी हदिक हदिक शुभेच्छा दोघाना ,🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिन्द 🇮🇳🇮🇳

  • @SujalYadav-hl2iz
    @SujalYadav-hl2iz Рік тому +5

    ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी सुध्दा चांगले लोक भेटतील दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sudhirnarvekar3136
    @sudhirnarvekar3136 Рік тому +6

    दादा - वहिनी तुम्ही दोघं सरकारी नोकरीत आणि तेपण पोलीस खात्यात तुम्ही हे सर्व सकारात्मक घेणे कारण यापुढे बरेच वेळा हि वेळ येणार , नवीन जागेसाठी शुभेच्छा

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Рік тому +19

    माणुसकी खेड्यातच आहे नोकरी करतांना सहज लोकांमध्ये मिसळता आले गर्व वजा केला कि प्रेम मिळते रडु नका ओ मावशी व काका या वाट पाहतो

  • @mangeshgaikwad4930
    @mangeshgaikwad4930 Рік тому +12

    पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ताई दादा 🙏

  • @rajunighot2571
    @rajunighot2571 9 місяців тому +5

    रडायचं नाही ताई तुमच्या सोबत आमचे मित्र पोलीस दादा आहे ना ताई तुमचं व्हिडिओ बघितल्यावर मला अतिशय आनंद होतो

  • @maulipadghan4203
    @maulipadghan4203 Рік тому +19

    ताई &सर आपण चारठाण पोलिस स्टेशन मधुन ‌निरोप घेत आहत थोडं दु :ख होत आहे असो त्याला इलाज नाही.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐 ताई आपला चेहरा नेहमी हसरा असतो आज तो दुःखी आहे आम्हाला पण मनातुन रडु आलं ..असो असेच आनंदी राहा, विडिओ बनवत रहा व आपल्या विडीओ मधुन दुसऱ्याला आनंदी ठेवा..

  • @devraogogale2840
    @devraogogale2840 Рік тому +41

    पुढिल वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 🎉🙏❤️ तुमच्या प्रत्येक विडीओ बघत आहोत ❤️👍👌

    • @baludange2291
      @baludange2291 Рік тому +1

      पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा ताई

  • @satishjadhao4173
    @satishjadhao4173 Рік тому +1

    ताई रडायच नाही...
    अहो यालाच तर जीवन म्हनतात..
    तुम्ही दोघे ही खुप सुंदर आहात...
    कदाचित देवाला सुद्धा तुमची परीक्षा घ्यावसी वाटली असावी...
    आणि लक्षात ठेवा या वीहरापासून तुमच्या दोघांचे प्रेम अधीकच वाढेल..
    आणि साक्षात श्रीकृष्ण देवा सारखा कोणी तरी येईल आणि तुमच्या दोघांना परत एकत्र आनेलच...ही प्रार्थना

  • @kirankamble4649
    @kirankamble4649 Рік тому +8

    लवकरच तुमची जोडी एकत्र येवो.. ईश्वर चरणी प्रार्थना...

  • @rakeshmore6880
    @rakeshmore6880 Рік тому +9

    जय हिंद
    आपल्याला काही वेळ काही ठिकाणी घालवाव लागत तेथे आपल्याला काही मित्र परिवार तसेच आपल्या घरच्या माणसांसारखे मिळतात ..जसे आपण कमवतो आपली माणस आपल्या जीव भावाची त्यांना सोडून जाणं म्हणजे खूप मनाला लागत .
    तरीही आपणाला जेथे पोस्टिंग मिळाली आहे तिथेही आपली माणस (प्रेमाची ) मोलीत हीच आई भवानी चरणी प्रार्थना
    आपला भाऊ
    जय हिंद

  • @ajitmore4848
    @ajitmore4848 Рік тому +18

    खरंच मन जिंकले तुम्ही पुढिल वाटचालिस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @sagarchaudhariauthoreditor4388

    मला खरोखरच असे सामान्य माणसांचे विडीओ खूप आवडतात धांगडधिंगा, फैशन ते नाचनारे बघण्यापेक्षा असे तरुण तरुणींचे विडीयो मस्त तरुणांना प्रेरणादायक ठरणारे आहेत।

  • @damukamble2310
    @damukamble2310 Рік тому +14

    आपल्या व्हिडिओ ने आमचं खूप मनोरंजन होत होतं ...पाच वर्षे आपण या ठिकाणी राहिल्यामुळे साहजिकच त्या लोकांविषयी आणि त्या मातीबद्दल आदर आपुलकी निर्माण होतेच ज्याला हृदय आहे त्यांच्या अशा भावना होतात . ताई तर खूपच इमोशनल झाल्या आहेत सावरा ताई स्वताला . जी माणसं दुसर्याला आनंद देतात ती कधी दुःखी राहू शकत नाहीत बदलीच्या ठिकाणी यापेक्षाही चांगली माणसं भेटतील . पण महत्त्वाचे म्हणजे आपलं व्हिडिओ आम्हाला पाहण्यात येवू दे सर मॅडम 🌹🌹🙏🙏😔🤗

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Рік тому +2

    बदली होणे हा नोकरी चा एक भाग आहे.तो स्वीकारणे भाग पडते की.धन्यवाद.आपल्या भावी जीवनास हारदिक शुभेछ्या.जय महाराष्ट्र.

  • @dhirajchavan6163
    @dhirajchavan6163 Рік тому +21

    पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ... happy रहा gbu sweet couple ❤️

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 Рік тому +1

    जी लोक चांगली असतात नोकरी इमानदारीने करतात त्यांना लोक शक्यतो विसरत नाही.पुढील वाटचालीसाठी आणि दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 असंच चांगलं काम तुमच्या हातुन घडो सदिच्छा.

  • @dr.vivekmorvekar4567
    @dr.vivekmorvekar4567 Рік тому +4

    खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघे.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना.भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..
    मी कोकणातील एक तुमचा चाहता आहे.
    परत एकदा तुम्हाला शुभेच्छा.🌷🌷🌷👋👋

  • @ranjeetgaikwad5378
    @ranjeetgaikwad5378 Рік тому +9

    असेच हसत खेळत आणि आनंदी रहा दोघे कायम.

  • @amolpise5883
    @amolpise5883 Рік тому +4

    सर मँडम खरच काय कमवला असेल तार फक्त मानुस्की बास सलाम

  • @govindsolunke8359
    @govindsolunke8359 Рік тому +1

    शासकीय सेवेत असताना बदली अटळ असते ते आनंदाने सर्वाना आनंदाने निरोप देऊन बदलीचे ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे जनतेला सेवा द्यावी व माणुसकी कमवावी व जनतेचे आशीर्वाद घ्यावी

  • @dilipkhemnar9201
    @dilipkhemnar9201 Рік тому +5

    पोलिस जोडी आसं रडु नये नोकरी करताय म्हटल्यावर बदली हि होनारच मि शिर्डी वरुन बोलतो कधी आले शिर्डी ला तर कळवा

  • @krishnathakur4783
    @krishnathakur4783 Рік тому +2

    पुढील ठिकाणी सुद्धा असेच आनंदी राहाल हीच सदिच्छा

  • @rupeshchavan2034
    @rupeshchavan2034 Рік тому +4

    पुढची वाटचाल चांगलीच असेल , माझ्या शुभेच्या असेच आनंदात रहा.

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 Рік тому +1

    शुभेच्छा पुढील वाटचाली साठी..... दुसरीकडे पण सवय होईल... कारण आम्ही दोघे पण असाच बदली होऊन आलो आहोत 1 महिना पूर्वी.. मी पण खूप रडले 4 years राहिलो रत्नागिरीत... खूप लोक जोडलेले भेटायला आले होते जाताना.... खूप भावनिक क्षण असतो...

  • @उगीचच
    @उगीचच Рік тому +37

    मी येऊ शकले नाही चारठाना ल पण तुझी बदली ऐकली तर शॉक झाले g😇😇...पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा दोघांना...

  • @kartikpatil1__45
    @kartikpatil1__45 Рік тому

    खूप मस्त भावना मांडल्या आहेत सर तुम्ही ,आणि एक गोष्ट खूप आवडली तुम्ही सांगितलं की महिलांना देवाने त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक देणगी दिली आहे तशी देणगी पुरुषांना नाही दिली .
    अशीच सेवा करत रहा सर्वांची हीच देवाकडे प्रार्थना आणि तुमची जोडी आनंदी आणि निरोगी राहो हीच देवाकडे प्रार्थना. 💐💐💐

    • @kundapathare8787
      @kundapathare8787 Рік тому

      न ते

    • @laxmandhande7552
      @laxmandhande7552 Рік тому

      पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dilipgavai5635
    @dilipgavai5635 Рік тому +6

    सर तुमची जोडी 👫💜आणि विचार खुप छान आहे . तुम्ही एकमेकांना समजून घेता हा तुमच्यातला आदर्श आहे तुमच्या भावि आयुषास हरदिक शुभेच्छा.

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Рік тому

    खूप छान जोडी आहे तुमची खरंच पोलीस म्हटलं की खूप सोभा विचित्र असतात पण तुमच्याकडे बघून वाटतच नाही की तुम्ही पोलीस जोडी आहेत खूप छान स्वभाव आहे खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 Рік тому +3

    जिथे जाल तिथे आनंद वाटाल. खूप शुभेच्छा.

  • @babanthorat6623
    @babanthorat6623 Рік тому

    पोलीस दलात एवढ्यात प्रेमा ने काम करून खूप जनतेची सेवा करून असे जोडी कधी बघायला भेटले नाही असेच तुमचे प्रेमाने आयुष्य सुखाचे व भरभराटीचे जावो हीच माझ्याकडून खूप शुभेच्छा

  • @nielshinde416
    @nielshinde416 Рік тому +3

    पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांना आनंदमय सुभेछया दादा. 🙏

  • @sangrampatil2172
    @sangrampatil2172 Рік тому

    खरं म्हणजे तुम्ही दोघं पोलिस दलात सर्व्हिसला आहात हे पटतच नाही. खूप छान जोडी. इथून पुढे असेच व्हिडिओ बनवत रहा. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐💐

  • @kavitabapat1259
    @kavitabapat1259 Рік тому +7

    दोघांची जोडी व स्वभाव खूप चांगला आहै❤❤❤👌👌👍🌹🌹

  • @राजुशेठजगताप

    ताई वाईट वाटुन नको घेऊस तुम्ही ज्या सेवेत आहात तेथे असे प्रसंग येतच रहातात पण सगळेच म्हणजे तुम्ही नाही काही १० वर्ष जवळ राहून जाताना विचारत पण नाही 🌹🌹🌹👏👏👏

  • @abhaybangar4437
    @abhaybangar4437 Рік тому +7

    मी समजु शकते कारण माझे बाबा पण PSI होते आमी तर बदल्या बदल्यात तच मोठे झालो मी पण मैत्रीणी सोडून यायला खुप खुप दुःख होते रडू तर येणारच बेस्ट आँफ लक सर

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Рік тому +2

    सुंदर 💐. फार बरे वाटले व्हीडिओ पाहून. तुम्हा दोघांना पुढील वाटचाली साठी लक्ष लक्ष शुभेच्छा 💐

  • @sanjayhule9436
    @sanjayhule9436 Рік тому +24

    दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर आणि मॅडम 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐

  • @harshalbhosure15
    @harshalbhosure15 Рік тому

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या दादा आणि ताई आनंदी राहा ‌कारण लोकशाही संपली किंमत फक्तं ‌खोके आणी आता एकदम ओके अडचणी निर्माण करण हेच सरकार च काम आहे अस वाटु लागलंय

  • @yusufshaikh2909
    @yusufshaikh2909 Рік тому +53

    ताई साहेब तुम्ही रडू नका हो 🙏🙏😥😥😥😥

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 4 місяці тому

    पोलीस दलातील एक यशस्वी जोडी
    तुम्हा दोघांना व दोन कन्या यांना शुभेच्छां.
    यशस्वी भव.......

  • @zepakashisandeepsir5499
    @zepakashisandeepsir5499 Рік тому +3

    आपण चांगलीच सेवा केली असणार म्हणून एव्हढा जिव्हाळा 🙏

  • @raghunathmemane862
    @raghunathmemane862 Рік тому +2

    आपण कर्तव्या सोबत जनतेला न्याय दिलासा आणि महत्वाचे म्हणजे प्रेम दिले , आणि प्रेमाची पाळे मुळे झटकन रुझत असतात , साहजिकच ऋणानुबंध निर्माण होणारच . आपणास खूप खूप शुभेच्छा happy dipavali. 🙏

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 Рік тому +3

    फारच छान बोलतो राजा ,जोडी सुंदर, ईश्वर तुम्हाला आनंदी ठेवो

  • @Khumkar
    @Khumkar 4 місяці тому +1

    इतकी हळव्या मनाची पोलीस जोडी पण असू शकते दुर्मिळच ❤❤❤

  • @राजुघुले-थ8ढ

    सर तुम्हाला पहिला मानाचा जय हिंद ❤️🇮🇳पुढील वाटचाली खूप शुभेच्छा मी बारामतीकर ⏲️⏲️

  • @samratnewale9130
    @samratnewale9130 Рік тому

    सर्वप्रथम नमस्कार सर, पोलीस दलात राहून पण दोघं देश सेवा करीत आहात. फारच अभिमानाची गोष्ट आहे. पण पोलीस म्हटल्यानंतर समाजामध्ये जो दरारा असतो कारण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दरारा हा ठेवावाच लागतो. पण एकंदरीत पोलीस दलात राहून एवढे संवेदनशील आपण आहात खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. असो जय हिंद सर.

  • @amolkundarge
    @amolkundarge Рік тому +26

    पुढिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर आणि माॅडम 🎉🎉

    • @vinodjadhav5563
      @vinodjadhav5563 Рік тому +1

      Very nice Jodi

    • @sudhakaraldar8018
      @sudhakaraldar8018 Рік тому +1

      Tumchi jodi khup chaan ahi tumchi pudil waatchales khup khup subicha tumchi jodisarkhi jodi kote hi bgitli nahi

  • @pravinpawar6919
    @pravinpawar6919 Рік тому

    पोलिसांकडून लोकांच्या फार अपेक्षा असतात चांगल्या कामाची लोक पावती देत असतात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ITSNISHANTVLOGS
    @ITSNISHANTVLOGS Рік тому +7

    सच बात है कभी कभी हमे उन ख़ास जगहों से जहाँ हमारा बहुत सुंदर समय बिता हो उन जगहों से हमें बहुत लगाव हो जाता हैं और वो गुजारे हुए पल हमे बहुत याद आते हैं। जय हिंद जय भारत🇮🇳💐

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Рік тому +1

    ताई आणि दादा पहिलाच व्हिडिओ बघितला मी तुमचा तरीही खुप आवडला आणि ताई रडत होत्या तर खुप वाईटही वाटले असच होत जेव्हा आपण परक्या लोकांना आपलस बनवले कि त्यांना सोडून जाऊच वाटत नाही

  • @ChandgadNews24media
    @ChandgadNews24media Рік тому +7

    पोलीस जोडीला सलाम...माणुसकी व हळव्या मनाची व्यक्ती ..

  • @prabhakarmore9985
    @prabhakarmore9985 Рік тому +1

    एखाद्या ठिकाणी खूप वर्ष राहिला की त्या जागेची त्या वातावरणाशी त्या माणसांशी जवळीक निर्माण होते आणि मग त्यांना सोडताना डोळे भरून येतात

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 Рік тому +3

    खरं आहे सर ५ ते ६ वर्षे एका ठिकाणी काडल्या नंतर दुसरीकडे जायचं म्हटलं तर खुप वाईट वाटते तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 Рік тому +1

    पोलिस दलातील जोडी जीते आशेल तीथे ईश्वर त्याना चांगली दिवती सगेच आसो हिच देवाकडे मागनिकरेल 🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हारी मावली

  • @devendradnyanadeobhamare9820
    @devendradnyanadeobhamare9820 Рік тому +2

    छान ! असेच चांगले कार्य तुमच्या हातून होत राहो. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @girishyadav2247
    @girishyadav2247 Рік тому +1

    दादा तुम्ही खूप छान राम सिता ची जोडी आहे शेवटी नोकरी करायची असेल तर दुःख हे आसनार खूप छान

  • @govinddeshmukh8144
    @govinddeshmukh8144 Рік тому +5

    छान शुभेच्छा,जनांसी ऐकते एकरुप झालं, कोठे बदली झाली आहे, शुभेच्छा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎉

  • @bandumule9243
    @bandumule9243 Рік тому

    तुम्ही एकूण एकाला समजून घेण्यास सक्षम आहात ही खूप मोठी गोष्ट

  • @sunilsawant5180
    @sunilsawant5180 Рік тому +8

    दादा ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 Рік тому

    खरच खूप छान जोडी आहे तुमची.तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे. लेडीज रडून भावना व्यक्त करतात....

  • @balasahebtirkhunde622
    @balasahebtirkhunde622 Рік тому +6

    ताईसाहेब रडू नका नवीन वाटचाल साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद 🙏

  • @nirmalas.401
    @nirmalas.401 Рік тому +1

    Tumha doghanchi jodi baghun khup chhan watate Dada. Police dept sarkhya ruksh dept la kam karun hi itke chhan romantic aahat yacha aanand hoto ani tumcha hewa suddha watato. Maze Mr pan Police aahet pan tyana baykani social media war asnyacha khup rag aahe. Mhanun acting aawad asun hi man marun rahawe lagte.
    Nawin jagi pan asech video banwat raha. Best of luck 👍

  • @ushawagh9138
    @ushawagh9138 Рік тому +7

    दादा तु जीथ राहशील तीथ सुखी राहो ईश्वराकडे प्राथना करते

  • @RAGHUNATHGHUTE
    @RAGHUNATHGHUTE Рік тому

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यापेक्षाही तुम्हाला चांगलं पोलीस स्टेशन चांगली माणसे मिळतील कारण तुमचा स्वभाव खूप गोड आहे छान छान रील बनवत जा आनंदी आणि सुखी रहा

  • @rajeshreesonawane3388
    @rajeshreesonawane3388 Рік тому +3

    पोलिस जोडीला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉

  • @gajananwaghmare8994
    @gajananwaghmare8994 Рік тому

    पुढील भावी जीवनासाठी आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा असेच मस्त आनंदी रहा असेच व्हिडिओ बनवत रहा🌹🌹