काय आहे ६३ आकड्यामागची गम्मत | Gela Madhav Kunikade | Prashant Damle |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • Gela Madhav Kunikade | Press Conference | Prashant Damle | Vinay Yedekar | Vasant Sabnis #gelamadhavkunikade
    बिनधास्त गप्पा
    With Celebrity
    कलाकार घडण्याची गोष्ट
    गौरी थिएटर्स निर्मित
    प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित
    "गेला माधव कुणीकडे"
    आठवतंय का?
    माधवचं आठवड्याचं गणित!
    अहो आठवत नसेल तर काळजी कशाला?
    ना इकडे ना तिकडे...
    सगळ्यांना घेऊन आता माधव आलाय तुमच्याकडे...
    गेला माधव कुणीकडे
    शुभारंभाचा प्रयोग :
    शनिवार, १५ जून, विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
    १ तारखेपासून @ticketalay वर बुकिंग सुरू!!!
    #gelamadhavkunikade
    #fakt63prayog #ticketalay
    #prashantdamle #vinayyedekar
    संकल्पना, संशोधन, लेखक,
    संकलन आणि छायाचित्रण
    गौरव सावंत
    निर्मिती
    राजमुद्रा फिल्म्स
    आजच्या भागात आपल्याला
    भेटायला येत आहेतच
    गेला माधव कुणीकडे या नाटकाबद्दल
    ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर आणि प्रशांत दामले
    सहकलाकार नीता पेंडसे, तन्वी पालव,
    राजसिंह देशमुख, अक्षता नाईक
    यांच्याकडून जाणून घेऊया
    या नाटकातील काही प्रसंग..
    हा एपिसोड पहा आणि
    तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत
    comments द्वारे नक्की पोचवा
    लेखक
    वसंत सबनीस
    दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत
    राजीव शिंदे
    प्रकाश योजना
    किशोर इंगळे
    सुत्रधार
    अजय कासुर्डे
    कलाकार
    नीता पेंडसे, तन्वी पालव, अक्षता नाईक,
    राजसिंह देशमुख, विनय येडेकर आणि प्रशांत दामले
    #rajmudra_films
    #bindhastgappa
    #bindhastgappawithcelebrity
    #natak #theatre #actor #drama #marathinatak #marathi #natakmemes #ekankika #pune #natakmandali #play #acting #theatrememes #mumbai #art #rangbhumi #stage #marathitheatre #marathimeme #purushottamkarandak #artist #natakmeme #indiantheatre #theater #performance #comedy #marathimemes #kalakar #purushottam #actorslife
    #तिसरीघंटा #मराठीनाटक #मराठीरंगभूमी
    #एकांकिका #नाटक #बालनाट्य #दिर्घांक
  • Розваги

КОМЕНТАРІ • 11

  • @rajmudra_films
    @rajmudra_films  Місяць тому +7

    *'अरे हाय काय अन् नाय काय'... माधव परत येतोय*
    *'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ*
    ‘अरे हाय काय अन् नाय काय'... असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर 'गेला माधव कुणीकडे' असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.!
    'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या 'गेला माधव कुणीकडे' या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.००वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु होईल.
    रसिकांना हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावत रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस नाटकं देणाऱ्या प्रशांत दामले यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणत रसिकांना मनोरंजनाची अफलातून ट्रीट दिली आहे. काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक. मायबाप रसिकांसाठी ' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले.
    वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.

  • @chakde11
    @chakde11 Місяць тому +1

    सुस्वागतम् 🎉

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    कमालय बाबा तुमची 🔥🔔🌏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    हेच जीवन आहे पन आवघडय पण त्यात आनंद मीळतो आणी तुम्हाला आणी Prekshekanahi 🙏🏼👨‍👩‍👧😍🔔🌏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    सरांनबर काम करन कसोटी आसतेच या सगळ्यांनबर पण आपन त्यांना गुरु मानल की ते.घडवतातच सुंदर.टीम
    मला तुमच्या सगळ्यांची साईन मीळेल कारन वेडी आहे आभीनय तुम्ही करताय आणी जगतीय पन आणी करतीय.पन 🙏🏼

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    सर येखाद गाण 🙏🏼

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    चांगल लीहायेच आसेल तर चागल वाचल पाहीजे 🔔🌏👏🔥

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +2

    खरच सगळे जशाचे तसे आणी तुमचे वय 63 नाही राद्रर तुमच्या सगळ्याचेच वय आदीचे बरका आशी तुम्ही काम केलीत वय जानवतच नाही तुम्ही काम आस केलीत सगळ्यांनीच जानवतच नाही 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👨‍👩‍👧😍🔔🌏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔥🔔🌏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 26 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂❤