Це відео не доступне.
Перепрошуємо.

आळंदी दर्शन | Alandi | Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2021
  • संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.
    आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
    आळंदी मंदिर
    आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे.
    #Alandi

КОМЕНТАРІ • 17

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 Рік тому

    फार सुंदर व्हिडिओ, जय हरी माऊली.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      धन्यवाद , जय हरी माऊली 🙏

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 2 роки тому

    फार छान, शूभ दीपावली,श्री कीशोर आणि परीवार

  • @user-vh1yx1su1t
    @user-vh1yx1su1t Рік тому

    Ddanyawad dada namskar thank you

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 2 роки тому

    || राम कृष्ण हरी || 🙏🙏🙏🚩🚩
    मस्त ओव्यांचे सुंदर विवेचन
    धन्यवाद 🙏💕

  • @user-nw5mu7sk7n
    @user-nw5mu7sk7n 2 роки тому

    आजपर्यंत आळंदीमध्ये समाधीमंदीराला भेट देऊन यायचो . पण हा व्हिडीयो पाहून बरीच माहिती मिळाली . पुन्हा आळंदीला जाईन तेव्हा सर्व ठिकाणं पहायची आहेत. खूप छान माहिती दिली माऊली ...राम कृष्ण हरी.🙏

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 2 роки тому

    जय शिवराय

  • @user-gd2bo5mq2n
    @user-gd2bo5mq2n Рік тому

    आळंदी madhi गजानन महाराज. मंदिर आहे खूप मोठे नक्की पहा

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 2 роки тому

    आज कित्येक वर्षेनंतर आपल्या व्हिडिओच्या मार्फत आळंदी पाहत आहे खूप भारी वाटले दादा हा विडिओ पाहून 👍🏼

  • @mr.sujittalekar3759
    @mr.sujittalekar3759 2 роки тому

    खुप छान सर ❣️

  • @vijaybankar7227
    @vijaybankar7227 Рік тому

    He mandir kendre maharaj yaani bandhale na

  • @namdevkatkar740
    @namdevkatkar740 Рік тому

    ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी त कोठे आहे याबाबत सविस्तर कसे जायचे याबाबत सांगा

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      आळंदी मध्ये प्रवेश करतानाच नदीच्या काठावरच दिसेल मंदिर तुम्हाला . तिथे जावा कोणाला विचारण्याची सुद्धा गरज पडणार नाही समोरच दिसेल आळंदीत प्रवेश केल्यावर