Dhananjay Munde यांच्या मदतीला महंत Namdev Shastri मैदानात? Bhagwangad च्या बैठकीत रात्री काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #dhananjaymunde #namdevshastri #beed
    "धनंजय मुंडे गडावरती आल्यानंतर एकूणच त्यांची मानसिक स्थिती जाणून घेतली. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना या प्रकरणांमध्ये गोवलं जातंय. त्रास दिला जातोय...जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करा. या संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी संप्रदायावरही झालाय. संवेदननशील मुद्द्यावरून राजकारण करणं ही भित्री पद्धत आहे." असं म्हणत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची थेट पाठराखण केलीये. मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्रीच भगवान गडावर दाखल झाले होते. मुक्कामी असल्याने रात्री उशिरापर्यंत मुंडेंची नामदेव शास्त्री यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मागील दीड महिन्यांपासून धनंजय मुंडे चहुबाजूने खिंडीत अडकले आहेत. त्यांच्याबरोबर रोज नवनवीन होणारे आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी, यामुळे धनंजय मुंडे यांच्या भगवानगड भेटीला विशेष महत्त्व आले होते. नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्याने अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून त्या शास्त्रींची भेट देखील घेणार असल्याचं बोललं जातंय. रात्री अडीच तास झालेल्या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? अंजली दमानिया शास्त्रींना भेटून धनंजय मुंडेंविरोधात कोणते पुरावे दाखवणार आहेत? यावरून आता पुन्हा एक नवा वाद निर्माण होतोय का? सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून.

КОМЕНТАРІ •