मिलिंद शिंत्रे यांची मुलाखत अतिशय परखड,आणि वास्तववादी उत्तर, खरंच लोकांनी विचार करण्याची गरज आहे.आणि आता पुणे बदलतंय,त्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि धार्मिक वारसा जपायला हवा.
मी पक्की सदाशिव पेठी पुणेकर आहे.माझ्या पुण्याचा मला अत्यंत अभिमान आहे. शनिपाराजवळ घर.शाळा हुजूरपागा,कॉलेज स प .मिलिंद सर सांगत आहेत,त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत.मस्त झाली आहे मुलाखत.एकदम परफेक्ट बोलले आहेत सर. शुद्ध,स्पष्ट ,परखड मराठी ऐकून फार छान वाटलं. आत्ताचं पुणे बघून फार त्रास होतो.पुण्याची भाषा आता बिघडायला लागली आहे. बाहेरचे लोक इथे येऊन 41:33 राहतात , घरं घेतात आणि नावं ठेवतात हे योग्य नाही.
काही अंशी मुंबईत चाळीतले वातावरण असंच होतं. आमच्या आईवडिलांना काही कामासाठी गावी जायचं असलं तरी मुलांची काळजी नसायची. एक कोणी मोठी व्यक्ती आणि सगळ्या घरातील लहान मुलांना एकत्र सिनेमा/ सर्कशीतल्या नेत असत. हि मजा 😂 आम्ही अनुभवलेली आहे . खूप छान मुलाखत झाली आहे. मस्त झाली.
खूप दिवसानी परिपूर्ण पुणेकरची मुलाखत ऐकायला मिळाली, शुद्ध पुणेरी भाषा, पुणेरी हावभाव, हातवारे बघताना मजा आली व अजून जुने पुणे जरी बदलले असले तरी खरे पुणेकर तसेच आहेत याबद्दल खूप समाधान वाटले.
आम्ही नगरकर, पण सर्व सुट्टय़ा पुण्यात मावशी मामा कडे गेले. त्यामुळे लहानपणापासून पुणे खूपच आवडते शहर आहे माझे दुसरे कोणतेच नाही, पुण्यात आपटे रोड ला आवटे वाड्यात मोठी मावशी 2 खोल्यात राहायची, आधी पुण्यात तिचेच घर असल्याने सगळे नातेवाईक काही कामानिमित्त सतत असत. काकाही खुपच चांगले होते, त्यांची 5-6 मुले व आमची भर पण कधीही कोणीही नाराजी दाखवली नाही, उलट गेले की matini show/ regular show खुप सिनेमे पाहिले. आमचे मावस भाऊ आम्हाला 'काय नगरी ' म्हणुन चिडवायचे. वाडा तर ईतका छान व मोठा आहे (अजून) , खूप मजा यायची, सगळ्यांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन, टीव्ही बघून यायचो. असो खुप मोठी गोष्ट झाली, आता फक्त आठवणी. (आम्ही सध्या ) पुण्यातच स्थाईक .😀
मी १९८८ साली पुण्यात प्रथम आलो (बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून) आणि तेंव्हा पासून पुण्यातच आहे आमच्या इथे जी मिठाई मिळते तशी मला इतक्या वर्षात पुण्यात नाही मिळाली आता मात्र मला पुण्याचे जाज्वल्य अभिमान आहे पुण्यासारखी ज्ञान प्रबोधिनी देखील कुठेही नाही परखड मुलाखत ऐकून खुप छान वाटलं
मी वाड्यात वाढले. त्याचा मला अभिमान, आनंद आहे. सुख दुःखात सगळे एकत्र असायचो. तुम्ही हे सगळे सांगता आहात,मला ते सर्व डोळ्यासमोर दिसत आहे. पुनःप्रत्ययचा आनंद झाला.
शहराला आपलसं करून तिथल्या गोष्टी आत्मसाद केल्या तरच त्याला नावं ठेवली जात नाहीत.. मग तिथली भाषा असो वा राहणीमान.. मिलिंद दादा अतिशय छान बोलतातच त्यात वाद नाही.. ❤
किती सुंदर मुलाखत!! जसं पुण्यात वाड्यांमध्ये बरीच कुटुंबं एकोप्याने राहात होती तसेच मुंबई मध्ये चाळीत एकोप्याने राहात होती. तो एकोपा ना पुण्यात राहिला ना मुंबईत....😢😢😢😢😢
🎉 आमच्या आवडीच्या कट्टर पुणेकर असलेल्या व्यक्तीची मुलाखत म्हणजे आम्हा पुणेकरांच्या साठी पर्वणीच.इतर लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा , म्हणजे त्यांना पुणे आणि पुणेकर समजील.....आम्ही कट्टर , स्वाभिमानी पुणेकर.... Love you all Punekar 🎉 ज्या लोकांना पुण्याबद्दल असूया वाटते , पुण्यातली प्रत्येक गोष्ट आक्षेपार्ह वाटते अशा नतदृष्ट लोकांनी झोळी घेऊन पुण्यात पोट भरण्यासाठी येऊ नये ही नम्र विनंती 😮🎉
विषय छान होता..मजा आली...मुख्य म्हणजे शुद्ध मराठी ऐकायला मिळाले शिंत्रेंकडून.फक्त एके ठिकाणी चुकून "संध्या" असे म्हटले गेले.संधीचे अनेकवचन संधी असेच होते.
तुमचे हे सर्व बोलणे ऐकून माझ्या तर अंगावर शहारे आले. खूप मिस केले आपण हे सगळे .एका घरात लग्न असेल तर सर्व वाड्यात लग्न असायचे. एखाद्या घरातील कुणाचे निधन झाले तर वाड्यात अन्न शिजत नसत.जोपर्यंत अंत्ययात्रा जात नाही तोपर्यंत त्या घरातील लोकांना सांभाळले जात असे. खूप काही लिहावेसे वाटते. 😢
वाडा संस्कृती गेली हे तर चटका लावणारे आहेच, पण आता तर छोटी कुटुंबेही आणखी छोटी आणि विस्कळीत झाली आहेत. एकाकीपणाचा शाप जडलाय आता माणसाला..हे फार विदारक आहे. बाकी, मी पुण्याची नाही. पण पुण्यात नशीब आजमावायला आले. आणि पुण्याने मला भरभरुन दिले आहे. मला पुणेरीपणा टोचत नाही. उलट मी कृतज्ञ आहे...🙏... मात्र पूर्ण व्हिडिओ बघताना प्रचंड मजा आली 😂 ५१ व्या मिनिटापासून गणेशोत्सवाबद्दल जे बोललं गेलं आहे ते फार फार गांभीर्याने घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शंभर टक्के सहमत आहे.
मी पुणेकर आणि नुमवि ची विद्यार्थीनी आहे, मी पूर्ण सहमत आहे शिंत्रे च्या विचाराशी, या मुलाख़ाती मधून गणेश उसत्व तील कार्यकर्ते आणि गणेश भक्त यानी थोडा जरी विचार केला तरी भरूण पावले
मुलाखत छानच ! सगळे जण मिलिंदजींचे कौतुक करतायेत, आणि ते योग्य पण आहे..! पण मुलाखत घेनाऱ्याचेही श्रेय आहे!! उत्तम मुलाखत खुलवली ! सर्वेशचेही अभिनंदन ! 100 शहरी ओर एक .........!!
खूप छान आणि स्पष्टपणे केलेले विश्लेषण आवडले. प्रत्येक नागरिकाला जशी ही जाणीव होते तशीच ती राजकीय व्यक्तींना झाली तर ही परिस्थिती नक्कीच सुधारु शकते. मी मुंबई, पुणे आणि ठाणे येथे वास्तव्य केले आहे. प्रत्येक ठिकाणची व्यथा जवळपास सारखी आहे. फक्त ती समजून घेण्याची समज आणि वृत्ती ही कमी जास्त आहे. पुण्यातच नव्हे तर सर्व भारतात सकारात्मक वृतीत वाढ होवो ही सदिच्छा! ❤
खूप मजा आली छान होता एपिसोड मिलिंद शिंत्रे यांचा मी पूर्वीपासून फॅन आहे मुलाखत ऐकून त्यांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार त्यांची सर्व मत पटण्यासारखे आहेत त्यांचा स्पष्टपणा मला आवडतो
मी कसबा पेठेतील वाड्यात अनेक वर्षे रहात होतो. त्यामुळे वाडा संस्कृतीवरील विवेचनाने, वर्णनाने आपसूकच खूप भावूक झालो, अनेक जुन्या आठवणी, वाड्यातील प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. तो वाडा अजूनही आहे. घरमालकांना भेटायला गेलो होतो त्याला आता ८ वर्षे उलटली. परत जायला मन धजावत नाही. घरमालकांबरोबरच वाड्याच्या वार्धक्याच्या खूणा पाहून मन गलबलून येते. त्या वार्धक्याची सावली माझ्या मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींच्या खजिन्यावर पडू नये अस वाटत असाव कदाचित ! सोन्याच्या भावात कितीही वाढ होऊ दे पण या आठवणींच्या सोन्याचा भाव ???
पुण्यात मला बहुतांशी चांगलेच लोक भेटले, मला पुण्याबद्दल प्रेमच वाटतं, पण काही कमी जास्त असणारच.. ते तसं सगळीकडेच अस्त.. पेठेतील काही लोकांचं वागणं खटकू शकेल, पण त्यांचं बाकी बरेच गुण घेण्यासारखे आहेत. काही विक्षिप्त लोक हे सगळीकडेच असतात, ते पुण्याचं वैशिष्ट नाही आणि पुणे त्याला अपवाद पण नाही
फक्कड झाली मुलाखत !👌🏻👍🏻 मला वाटतं मुळात कुठल्याच 'पुणेकराला' 'मी पुणेकर ' असं सांगावं लागत नाही. चार जणांत तो विशेष कळून येतोच. समोरच्याचं नीट ऐकून घेणे, ( आणि मग कात्रीत पकडणे ), मार्मिक आणि तात्विक उत्तर,मदत करण्याची वृत्ती ( शक्य तेवढी शारीरिक आणि वैचारिक ) आणि सारासार विचार करून सांगितलेला तोडगा यावरून तो ओळखूच येतो.
नागपूर हे अतिशय सुन्दर शहर आहे . इतिहास आहे, आर एस एस आहे . अजून बकालपणा नाही आला . अगत्य आहे . आपुलकी आहे. बाहेरचे खूप विद्यार्थी येतात. मेडिकल हब आहे. उत्तरेकडील लोक येतात.पण त्रास नाही. असेच राहावे.
खरचं छान,जुन्या पुण्याची आठवण येतेच, गर्दी काही भागात अस्वछता हे नको वाटते सणांचे स्वरूप व तिथी बदलेले आहे गणेश उत्सव स्वरूप नकोस झाले आहे,शित्रे सरांनी वास्तवता दाखवली आहे.
पुण्यात जन्मलो . वाढलो . मुलाखततीने तेव्हाचे ( 1949 मधला जन्म आहे माझा )सगळे वातावरण , बालपण , एकमेकामधील आपुलकी हे डोळ्यासमोर उभे केले . मुलाखतीतले प्रश्न उत्तम . आणि मिलींददादा , तुमची उत्तरे तर शतकावर शतके झळकवलीयत . दिवाळी , रंगपंचमी , गणेशोत्सव यांचे सगळे स्वरूप बदललेय . अशा वेळी , ते पुणे राहिले नाही असे वाटतेच . खूप लिहावेसे वाटतेय . असो धन्यवाद आणि शुभेच्छा . पुणे .
I am 70 year old.I have really gone through all this.I really miss it.what is said by Mr Milind is 100%true.Just to tell I could see BhimsenJoshisab at Mehendale shop at A B chowk standing next to us.
मी पण पुणेकर लग्ना नंतर मुंबई ते आले सरांनी जे सांगितले ते अगदी बरोबर आहे लक्ष्मी रोडवरील आमची सेवा सदन शाळेचे नाव विसरलात खूप खूप सुंदर दिवसाची आठवण करून दिली 😢 असे वाटते पुन्हा तेच दिवस यावे . खूप सुंदर पुणे. गणपती बाप्पा विषयी अगदी बरोबर बोललात.
मुलाखत छान झाली, बाकरवडी आता पहिल्या सारखी राहीली नाही.गणेशोत्सोबद्दलचमत आता सर्वच ठिकाणी असाच तमाशा आहे तरी खरच खूप वाईट वाटत.पण पूण्यांच्या पाट्या सुद्धा फार प्रसिद्ध आहे त्याबद्दल बोलायला हवं होतं.
अतिशय सुरेख मुलाखत झाली . सर्वच प्रश्नाना समर्पक शब्दात उत्तर दिलेत. भाषेचा आणि पुण्याचा दोन्हींचाही अभिमान पदोपदी जाणवला.तुमच्या सारख्या विद्वानामुळेच आज थोडेफार पुणेरी पण टिकून आहे ..याचा आम्हालाही जाज्वल्य अभिमान आहे.
I am Punekar but frankly speakig Mumbaikar are 100% better in all the things than punekars ! They are good at heart, down to earth and helping nature ! I have experienced it in my foreign trip !
होय ताई तुमचे बरोबर आहे. नोकरीनिमित्त संपूर्ण भारत फिरल्यानंतर प्रत्येक शहराची वैशिष्ट्य लक्षात आली. पण हेच पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे की त्यांना जे योग्य आहे, ते चांगलं आहे त्याची जाण असते. ते पुण्याबद्दल बोलत राहतील पण कोणाला नाव ठेवणार नाहीत. पुण्याचे कितीही दोष काढले तरी बाहेर गेल्यावर पुणेकरांकडे आजही आदराने बघितले जाते .आपल्या पुण्याचा आपणच अभिमान ठेवायचा तर पुढे देशाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला जाईल
मी पक्की मुंबईकर. पुण्यात वाडे गेले तसे आमच्या मुंबईतील चाळी गेल्या. तीही आमची मुंबईची संस्कृतीची श्रीमंती होती. चाळी गेल्या आणि मुंबईचा मराठी माणूस हरवला आणि मराठी संस्कृती सुद्धा. आता मन नाही लागत... आता ते दिवस पुन्हा येणार नाहीत याची खंत वाटते 😢
अतिशय रंजक, माहितीपूर्ण मुलाखत! अस्सल भाषा, विचार, ते सुद्धा निर्भिडपणे मांडलेता नर्म विनोद, हलकासा तिरकसपणा... मजा आली. ही मुलाखत तरुण पुणेकरांसाठी आणि नवागतांसाठी खूप महत्वाची आहे. आपल्याकडे काय आहे याचा साक्षात्कार होतो आहे. धनवाद🙏🙏😊
ही बहुधा जुनी गोष्ट आहे. १५-२० वर्षांपूर्वी पुणेकर कौतुकाने आणि आवर्जून मुंबईला बॉंबे म्हणायचे. मुंबईकर स्वतः आम्ही मुंबईत राहतो म्हणायचे पण पुणेकर मात्र "काय बॉंबेत असता का?" असे विचारायचे. आता काय म्हणतात कल्पना नाही.
पुणेकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अतिशय शुद्ध आणि पवित्र सात्विक शहर आहे. जे पुण्याला नावं ठेवतात ते शेवटी त्यांचं सर्व विकून पुण्यातच रहायला येतात यातच काय ते समजून घ्या.😂😂
पुणे “overrated” नाहीये. इतिहासातील पुणेकरसुद्धा महानच. सांप्रतकालिन पुणेकर (जे बव्हंशी अत्यंत सुमार असतात) इतिहासाचं बाड बिस्तार घेऊन “greatness“ची टिमकी वाजवतात आणि इतरांना पाण्यात पाहतात ते खरे अडचणीचा विषय आहेत.
शिवाजी महाराज सर्व महाराष्ट्राचे भारताचे आणि आतातर संपूर्ण जगाचे आहेत पुणेकर.. या छोट्याशा वर्तुळात त्यांंना घेऊ नये फक्त किरकोळ मुद्दा पटवून देण्यासाठी
one of the best question to be asked in next podcast : what does the native Punekar People expects from a non punekar to keep this city beautiful and best as always
वाडे पडले ते पानशेतच्या पुरात...सर्व पेठा कसबा ,मंगळवार सगळे रस्ते मुळातून विस्कटले , मातीच माती आम्ही अनुभवली . मग वाडे लयास गेले आणि बिल्डिंग जन्मास आल्या.संस्कृती विलय पावली ....
कोल्हापूर मधील इंपिरियल आईस्क्रीम , आणि गृहिणी उद्योग, शाहूपुरी येथील बाकरवडी छान असते. अर्थात इथे तुलना नाही करायची आहे. पुण्याच्या गोष्टीही खूप छान आहेत.
मिलिंद शिंत्रे यांची मुलाखत अतिशय परखड,आणि वास्तववादी उत्तर, खरंच लोकांनी विचार करण्याची गरज आहे.आणि आता पुणे बदलतंय,त्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि धार्मिक वारसा जपायला हवा.
सुंदर, खूप मजा आली, मिलिंद शिंत्रे यांनी अतिशय परखडपणे आपले विचार व म्हणणे मांडले अभिनंदन.
पुणेरी पाट्या बद्दल मात्र प्रश्न विचारायचा राहिला😊
अतिशय उत्तम..... अगदी बरोब्बर व्यक्त झाले आहेत श्री शिंत्रेजी
मी पक्की सदाशिव पेठी पुणेकर आहे.माझ्या पुण्याचा मला अत्यंत अभिमान आहे. शनिपाराजवळ घर.शाळा हुजूरपागा,कॉलेज स प .मिलिंद सर सांगत आहेत,त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत.मस्त झाली आहे मुलाखत.एकदम परफेक्ट बोलले आहेत सर.
शुद्ध,स्पष्ट ,परखड मराठी ऐकून फार छान वाटलं.
आत्ताचं पुणे बघून फार त्रास होतो.पुण्याची भाषा आता बिघडायला लागली आहे.
बाहेरचे लोक इथे येऊन 41:33 राहतात , घरं घेतात आणि नावं ठेवतात हे योग्य नाही.
काही अंशी मुंबईत चाळीतले वातावरण असंच होतं. आमच्या आईवडिलांना काही कामासाठी गावी जायचं असलं तरी मुलांची काळजी नसायची. एक कोणी मोठी व्यक्ती आणि सगळ्या घरातील लहान मुलांना एकत्र सिनेमा/ सर्कशीतल्या नेत असत. हि मजा 😂 आम्ही अनुभवलेली आहे . खूप छान मुलाखत झाली आहे. मस्त झाली.
खूप दिवसानी परिपूर्ण पुणेकरची मुलाखत ऐकायला मिळाली, शुद्ध पुणेरी भाषा, पुणेरी हावभाव, हातवारे बघताना मजा आली व अजून जुने पुणे जरी बदलले असले तरी खरे पुणेकर तसेच आहेत याबद्दल खूप समाधान वाटले.
🎉मजा आली. अस्सल
पूणेकरा ना भेटल्यावर
खूप मजा आली.
आम्ही नगरकर, पण सर्व सुट्टय़ा पुण्यात मावशी मामा कडे गेले. त्यामुळे लहानपणापासून पुणे खूपच आवडते शहर आहे माझे दुसरे कोणतेच नाही, पुण्यात आपटे रोड ला आवटे वाड्यात मोठी मावशी 2 खोल्यात राहायची, आधी पुण्यात तिचेच घर असल्याने सगळे नातेवाईक काही कामानिमित्त सतत असत. काकाही खुपच चांगले होते, त्यांची 5-6 मुले व आमची भर पण कधीही कोणीही नाराजी दाखवली नाही, उलट गेले की matini show/ regular show खुप सिनेमे पाहिले. आमचे मावस भाऊ आम्हाला 'काय नगरी ' म्हणुन चिडवायचे. वाडा तर ईतका छान व मोठा आहे (अजून) , खूप मजा यायची, सगळ्यांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन, टीव्ही बघून यायचो. असो खुप मोठी गोष्ट झाली, आता फक्त आठवणी. (आम्ही सध्या ) पुण्यातच स्थाईक .😀
गणेशोत्सवाबद्द्ल अगदी बरोब्बर बोललास!!! एकदम बरोब्बर!!!! ✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️
मी १९८८ साली पुण्यात प्रथम आलो (बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून) आणि तेंव्हा पासून पुण्यातच आहे
आमच्या इथे जी मिठाई मिळते तशी मला इतक्या वर्षात पुण्यात नाही मिळाली
आता मात्र मला पुण्याचे जाज्वल्य अभिमान आहे
पुण्यासारखी ज्ञान प्रबोधिनी देखील कुठेही नाही
परखड मुलाखत ऐकून खुप छान वाटलं
खूपच छान सांगणं पुणेकरांच्या ज्ञान सांगितलेलं छान वाटलं धन्यवाद
मिलिंद दादांचे शेवटचे वक्तव्य अगदीच परफेक्ट.
मी वाड्यात वाढले. त्याचा मला अभिमान, आनंद आहे. सुख दुःखात सगळे एकत्र असायचो. तुम्ही हे सगळे सांगता आहात,मला ते सर्व डोळ्यासमोर दिसत आहे. पुनःप्रत्ययचा आनंद झाला.
शहराला आपलसं करून तिथल्या गोष्टी आत्मसाद केल्या तरच त्याला नावं ठेवली जात नाहीत.. मग तिथली भाषा असो वा राहणीमान..
मिलिंद दादा अतिशय छान बोलतातच त्यात वाद नाही.. ❤
किती सुंदर मुलाखत!!
जसं पुण्यात वाड्यांमध्ये बरीच कुटुंबं एकोप्याने राहात होती तसेच मुंबई मध्ये चाळीत एकोप्याने राहात होती. तो एकोपा ना पुण्यात राहिला ना मुंबईत....😢😢😢😢😢
खूप छान मुलाखत. मिलिंद सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. सरांना पुन्हा ऐकायला आवडेल.
🎉 आमच्या आवडीच्या कट्टर पुणेकर असलेल्या व्यक्तीची मुलाखत म्हणजे आम्हा पुणेकरांच्या साठी पर्वणीच.इतर लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा , म्हणजे त्यांना पुणे आणि पुणेकर समजील.....आम्ही कट्टर , स्वाभिमानी पुणेकर.... Love you all Punekar 🎉 ज्या लोकांना पुण्याबद्दल असूया वाटते , पुण्यातली प्रत्येक गोष्ट आक्षेपार्ह वाटते अशा नतदृष्ट लोकांनी झोळी घेऊन पुण्यात पोट भरण्यासाठी येऊ नये ही नम्र विनंती 😮🎉
गणेशोत्सव बद्दल चांगले कान उपटले.
विषय छान होता..मजा आली...मुख्य म्हणजे शुद्ध मराठी ऐकायला मिळाले शिंत्रेंकडून.फक्त एके ठिकाणी चुकून "संध्या" असे म्हटले गेले.संधीचे अनेकवचन संधी असेच होते.
हेच ते नाव ठेवणे म्हणजेच खरा पुणेकर थोडी चुक पण सोडणार नाहीत
पुणेकर
बरोबर , हेच म्हणायला आलो होतो
रूंद्या pan mhanale eke thikani 😅
ढेकूण चे ढेकण अनेक वचन असावे पुण्याच्या बाहेर तरी असे आहे संधी चे संध्या मात्र होत नाही
खूप छान मराठी ऐकलं.. बऱ्याच दिवसानंतर 👌🏻👌🏻👌🏻.. वा पुणेकर 👍🏻🥰🥰
पुण्याला ईतर गावची लोक नाव ठेवतात पण पुण्यातच पोट भरायला येतात.हे सर्व विसरतात
आणि पुण्यातच सेटल होतात आणि आपल्या गावच्या नावाने गळे काढतात
dusra option kay aahe Tyanchya gavat saglach Une aahe Mang the only option is Pune!
पुण्या ची बरीच लोक इतर गावी आहेत.ते पण असंच करतात.
Baher chya lokanmule khayla miltay tumhala
@@Maharashtra-wn1ff Baherchya lokanna khyala miltay ithe amchya Punyat nahitar ithe aale naste. Tyanchya yenya adhi pan amcha poat bharatach hota
तुमचे हे सर्व बोलणे ऐकून माझ्या तर अंगावर शहारे आले. खूप मिस केले आपण हे सगळे .एका घरात लग्न असेल तर सर्व वाड्यात लग्न असायचे. एखाद्या घरातील कुणाचे निधन झाले तर वाड्यात अन्न शिजत नसत.जोपर्यंत अंत्ययात्रा जात नाही तोपर्यंत त्या घरातील लोकांना सांभाळले जात असे. खूप काही लिहावेसे वाटते. 😢
वाडा संस्कृती गेली हे तर चटका लावणारे आहेच, पण आता तर छोटी कुटुंबेही आणखी छोटी आणि विस्कळीत झाली आहेत. एकाकीपणाचा शाप जडलाय आता माणसाला..हे फार विदारक आहे.
बाकी, मी पुण्याची नाही. पण पुण्यात नशीब आजमावायला आले. आणि पुण्याने मला भरभरुन दिले आहे. मला पुणेरीपणा टोचत नाही. उलट मी कृतज्ञ आहे...🙏...
मात्र पूर्ण व्हिडिओ बघताना प्रचंड मजा आली 😂
५१ व्या मिनिटापासून गणेशोत्सवाबद्दल जे बोललं गेलं आहे ते फार फार गांभीर्याने घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शंभर टक्के सहमत आहे.
खरं आहे.. गणेशोत्सव तर विभत्स झालाय... सगळं एकदम घाण झालं आहे... DJ प्रकार नको झालाय
मी पुणेकर आणि नुमवि ची विद्यार्थीनी आहे, मी पूर्ण सहमत आहे शिंत्रे च्या विचाराशी, या मुलाख़ाती मधून गणेश उसत्व तील कार्यकर्ते आणि गणेश भक्त यानी थोडा जरी विचार केला तरी भरूण पावले
भरून असा शब्द आहे .भरूण नाही
सगळीच गणेश मंडळ आपण समजता तशी नसतात 🙏🏼
95% Pune madhye ganesh mandal. Tashi ch ahet
Beautiful episode ….जे पुणेकर नहीं त्या लोकनी जरूर पाहवा… मी पुणेकर
आमचे आजोबा दक्षिणमुखी मारुती समोरच रहायचे त्यामुळे आपण वर्णन केल्या प्रमाणे वाड्यातले सर्व सण उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले
वा... सर्व पुणेकरांच्या वतीने त्यांचेच विश्लेषण अतिशय उत्तम प्रकारे प्रकटीकरण 😊
मुलाखत छानच ! सगळे जण मिलिंदजींचे कौतुक करतायेत, आणि ते योग्य पण आहे..!
पण मुलाखत घेनाऱ्याचेही श्रेय आहे!!
उत्तम मुलाखत खुलवली !
सर्वेशचेही अभिनंदन !
100 शहरी ओर एक .........!!
खुप छान बोलले सगळ्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत त्यांना उजाळा मिळाला. प्रत्येक गोष्ट तन्तोतंत खरी मांडली आहे. खुप छान👌👌
👌👍👏🙏 Sunder vishleshshan.👌👍👏🙏
खूप छान आणि स्पष्टपणे केलेले विश्लेषण आवडले. प्रत्येक नागरिकाला जशी ही जाणीव होते तशीच ती राजकीय व्यक्तींना झाली तर ही परिस्थिती नक्कीच सुधारु शकते.
मी मुंबई, पुणे आणि ठाणे येथे वास्तव्य केले आहे. प्रत्येक ठिकाणची व्यथा जवळपास सारखी आहे. फक्त ती समजून घेण्याची समज आणि वृत्ती ही कमी जास्त आहे.
पुण्यातच नव्हे तर सर्व भारतात सकारात्मक वृतीत वाढ होवो ही सदिच्छा! ❤
मिलिंद सरांच परखड बोलण एकच नंबर खुप आवडलं
हो आणि ते शुद्ध मराठी येणाऱ्या लोकांना च समजेल फक्त
मिलिंद सर वाड्यांबद्दल बोलताना दाटून आलेला गळाच सांगून गेला तो किती जिव्हाळ्याचा विषय आहे. खूप छान वाटलं. 🙏🏻👍🏻
खूपच मजा आली ऐकताना!👌👍😂
प्रत्येक पुणेकराचे विचार स्पष्ट मांडले आहेत, मस्तच 👍🏻
बांगलादेशी लोकांबद्दल जे शिंत्रे यांनी सांगितलं ते बरोबर आहे...हे दुखण॔ भविष्यात भारी होणार आहे असच वाटत
खूप मजा आली छान होता एपिसोड मिलिंद शिंत्रे यांचा मी पूर्वीपासून फॅन आहे मुलाखत ऐकून त्यांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार त्यांची सर्व मत पटण्यासारखे आहेत त्यांचा स्पष्टपणा मला आवडतो
समर्पक ,छान मुद्दे मांडले आहेत शिंत्रे यांनी 👍
मी कसबा पेठेतील वाड्यात अनेक वर्षे रहात होतो. त्यामुळे वाडा संस्कृतीवरील विवेचनाने, वर्णनाने आपसूकच खूप भावूक झालो, अनेक जुन्या आठवणी, वाड्यातील प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. तो वाडा अजूनही आहे. घरमालकांना भेटायला गेलो होतो त्याला आता ८ वर्षे उलटली. परत जायला मन धजावत नाही. घरमालकांबरोबरच वाड्याच्या वार्धक्याच्या खूणा पाहून मन गलबलून येते. त्या वार्धक्याची सावली माझ्या मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींच्या खजिन्यावर पडू नये अस वाटत असाव कदाचित ! सोन्याच्या भावात कितीही वाढ होऊ दे पण या आठवणींच्या सोन्याचा भाव ???
मला आयुष्यभर अभीमान वाटणार आहे. मी पुणेकर असल्याचा ❤❤❤
पुण्यात मला बहुतांशी चांगलेच लोक भेटले, मला पुण्याबद्दल प्रेमच वाटतं, पण काही कमी जास्त असणारच.. ते तसं सगळीकडेच अस्त.. पेठेतील काही लोकांचं वागणं खटकू शकेल, पण त्यांचं बाकी बरेच गुण घेण्यासारखे आहेत. काही विक्षिप्त लोक हे सगळीकडेच असतात, ते पुण्याचं वैशिष्ट नाही आणि पुणे त्याला अपवाद पण नाही
नागपूर : तर्री पोहे
सूरत : खमण ढोकळा
विदर्भ : सांभार वडी
हे काही वानगीदाखल उदाहरणे, जे इतर शहरातील नावाजलेले , उल्लेखनीय खाद्यपदार्थ !
खुप सुंदर मुलाखत, मिलिंद सरांनी अतिशय छान माहिती दिली आणि अगदी खरे वास्तव समोर आणले आहे , धन्यवाद सर
अतिशय उत्तम podcast. मुलींच्या अगदी मनातले बोलले आहेत गणेश उत्सवतल्या गण्यांबद्दल.
पूणे चे, कशाला मुंबई ची ही चाळ पद्धत गेली व हा आनंद आम्ही पण मुकलो आहे 🎉🙏
अत्यंत समर्पक शब्दात पुणे डोळ्यासमोर उभे केले त्याबद्दल मिलींदजी यांचे खूप खूप आभार.
फक्कड झाली मुलाखत !👌🏻👍🏻
मला वाटतं मुळात कुठल्याच 'पुणेकराला' 'मी पुणेकर ' असं सांगावं लागत नाही. चार जणांत तो विशेष कळून येतोच. समोरच्याचं नीट ऐकून घेणे, ( आणि मग कात्रीत पकडणे ), मार्मिक आणि तात्विक उत्तर,मदत करण्याची वृत्ती ( शक्य तेवढी शारीरिक आणि वैचारिक ) आणि सारासार विचार करून सांगितलेला तोडगा यावरून तो ओळखूच येतो.
Ganeshosthav....perfect maat vyakta kelat. Hopefully konitari hyatun bodh gheil
मुलाखत छान झाली.पुण्याला जाऊन आल्यासारखं वाटलं. अजून काही जाणून घेण्यास आवडेल, धन्यवाद😅
वाडा संस्कृती फार सुंदर आठवणी सांगितल्या.....आम्ही ह्या बाबी हरवून बसलो आहोत..
❤❤❤❤❤❤❤❤😂
नागपूर हे अतिशय सुन्दर शहर आहे . इतिहास आहे, आर एस एस आहे . अजून बकालपणा नाही आला .
अगत्य आहे . आपुलकी आहे.
बाहेरचे खूप विद्यार्थी येतात.
मेडिकल हब आहे. उत्तरेकडील लोक येतात.पण त्रास नाही.
असेच राहावे.
Perfect
@@rashmiharkare6083 पण लोक वर्हाडी नाही बोलत हिंदी बोलतात
मिलिंद जी खूप छान बोलले, सगळ्याच गोष्टी पटल्या. त्यांची भाषा समृद्ध, शुद्ध मराठी, ऐकताना आनंद, अभिमान वाटला.👌👍💐❤😊
खरचं छान,जुन्या पुण्याची आठवण येतेच, गर्दी काही भागात अस्वछता हे नको वाटते सणांचे स्वरूप व तिथी बदलेले आहे गणेश उत्सव स्वरूप नकोस झाले आहे,शित्रे सरांनी वास्तवता दाखवली आहे.
मला सार्थ अभिमान आहे पुणेकर असल्याचा.
जय शिवराय.❤❤
54:05 हा विषय खरंच लक्ष देण्याची खूप गरज आहे
पुण्यात जन्मलो . वाढलो .
मुलाखततीने तेव्हाचे ( 1949 मधला जन्म आहे माझा )सगळे वातावरण , बालपण , एकमेकामधील आपुलकी हे डोळ्यासमोर उभे केले .
मुलाखतीतले प्रश्न उत्तम . आणि मिलींददादा , तुमची उत्तरे तर शतकावर शतके झळकवलीयत .
दिवाळी , रंगपंचमी , गणेशोत्सव यांचे सगळे स्वरूप बदललेय .
अशा वेळी , ते पुणे राहिले नाही असे वाटतेच .
खूप लिहावेसे वाटतेय . असो
धन्यवाद आणि शुभेच्छा .
पुणे .
फारंच अप्रतिम मुलाखत. मिलींद शिंत्रे यांच्याबरोबर गप्पा मारणे, हा एक वेगळाच आनंद असतो.
सुरेख मुलाखत 👌👌
पुणेकर म्हणून छान वाटले
वाडा संस्कृती आणि आत्ताचे फ्लॅट मधील आयुष्य यातला फरक प्रत्येक वेळी जाणवतो. प्रश्नही छान विचारले गेले आणि मिलिंद जींची उत्तरेही वैचारिक आणि समर्पक
I am 70 year old.I have really gone through all this.I really miss it.what is said by Mr Milind is 100%true.Just to tell I could see BhimsenJoshisab at Mehendale shop at A B chowk standing next to us.
मी पण पुणेकर लग्ना नंतर मुंबई ते आले
सरांनी जे सांगितले ते अगदी बरोबर आहे
लक्ष्मी रोडवरील आमची सेवा सदन शाळेचे नाव विसरलात
खूप खूप सुंदर दिवसाची आठवण करून दिली 😢
असे वाटते पुन्हा तेच दिवस यावे .
खूप सुंदर पुणे.
गणपती बाप्पा विषयी अगदी बरोबर बोललात.
अगदी खरे स्पष्ट ,परखड ,छान मत about ganeshotsov
सर म्हणतात ते खर आहे
मुलाखत छान झाली, बाकरवडी आता पहिल्या सारखी राहीली नाही.गणेशोत्सोबद्दलचमत आता सर्वच ठिकाणी असाच तमाशा आहे तरी खरच खूप वाईट वाटत.पण पूण्यांच्या पाट्या सुद्धा फार प्रसिद्ध आहे त्याबद्दल बोलायला हवं होतं.
मुलाखत काराने उच्चार सुधारावेत. मिलिंद खूप छान मुद्देसूद व समर्पक बोलून सर्व प्रश्न/ आरोप/वावड्या विफल ठरवल्या. गेले ते दिन गेले , समदूःखी.
पु. ल . देशपांडे यांनी बरोब्बर सांगितलं आहे
माझे तांबडी जोगेश्वरी पाशी माहेर आहे. अगदी असेच माझे अनुभव आहेत.हे सर्व ऐकताना फार मजा वाटत होती.खरेच आता खूप हसायला येत होतं.
अतिशय सुरेख मुलाखत झाली .
सर्वच प्रश्नाना समर्पक शब्दात उत्तर दिलेत. भाषेचा आणि पुण्याचा दोन्हींचाही अभिमान पदोपदी जाणवला.तुमच्या सारख्या विद्वानामुळेच आज थोडेफार पुणेरी पण टिकून आहे ..याचा आम्हालाही जाज्वल्य अभिमान आहे.
मिलिंद शिंत्रेंची मुलाखत म्हणजे पर्वणी
I am Punekar but frankly speakig Mumbaikar are 100% better in all the things than punekars ! They are good at heart, down to earth and helping nature ! I have experienced it in my foreign trip !
होय ताई तुमचे बरोबर आहे. नोकरीनिमित्त संपूर्ण भारत फिरल्यानंतर प्रत्येक शहराची वैशिष्ट्य लक्षात आली. पण हेच पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे की त्यांना जे योग्य आहे, ते चांगलं आहे त्याची जाण असते. ते पुण्याबद्दल बोलत राहतील पण कोणाला नाव ठेवणार नाहीत. पुण्याचे कितीही दोष काढले तरी बाहेर गेल्यावर पुणेकरांकडे आजही आदराने बघितले जाते .आपल्या पुण्याचा आपणच अभिमान ठेवायचा तर पुढे देशाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला जाईल
Wah😊😊❤❤❤❤
तुम्ही मांडलेले सर्वच मुद्दे गहन आणि महत्वाचे आहेत.
मी पक्की मुंबईकर. पुण्यात वाडे गेले तसे आमच्या मुंबईतील चाळी गेल्या. तीही आमची मुंबईची संस्कृतीची श्रीमंती होती. चाळी गेल्या आणि मुंबईचा मराठी माणूस हरवला आणि मराठी संस्कृती सुद्धा. आता मन नाही लागत... आता ते दिवस पुन्हा येणार नाहीत याची खंत वाटते 😢
ईतीहास संशोधन मंदीर.ग्रेट
Khop chhan!!!
मस्त 👌🏻
अतिशय रंजक, माहितीपूर्ण मुलाखत!
अस्सल भाषा, विचार, ते सुद्धा निर्भिडपणे मांडलेता
नर्म विनोद, हलकासा तिरकसपणा... मजा आली.
ही मुलाखत तरुण पुणेकरांसाठी आणि नवागतांसाठी खूप महत्वाची आहे.
आपल्याकडे काय आहे याचा साक्षात्कार होतो आहे.
धनवाद🙏🙏😊
अतिशय उत्तम
जगात भारी पुणेकर
पुणे कर व्हायचा क्राइटरिया म्हणजे अर्धवट ज्ञानावर शहाणपण पाजळत बसणे!
ही बहुधा जुनी गोष्ट आहे. १५-२० वर्षांपूर्वी पुणेकर कौतुकाने आणि आवर्जून मुंबईला बॉंबे म्हणायचे.
मुंबईकर स्वतः आम्ही मुंबईत राहतो म्हणायचे पण पुणेकर मात्र "काय बॉंबेत असता का?" असे विचारायचे. आता काय म्हणतात कल्पना नाही.
पुण्यातील निवांतपणाचे केलेले वर्णन तंतोतंत मी पण अनुभवलेले आहे, तसेच वाड्याचे अनुभव पण एकदम सारखे, मी त्या पाच नंबर शाळेशेजारील बोळात राहत होतो
पुणेकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अतिशय शुद्ध आणि पवित्र सात्विक शहर आहे.
जे पुण्याला नावं ठेवतात ते शेवटी त्यांचं सर्व विकून पुण्यातच रहायला येतात यातच काय ते समजून घ्या.😂😂
मी तेच करणार आहे. लंडन to पुणे.
@@h_a-www 😂😂😂😂
Baher che lok aalet mhnun khayla milaty nhitr 1to 4 😂😂
100% correct about Ganesh Utchav. Even during weddings eveyone dancing looks very odd.
छान मुलाखत
पुण्यात येऊन शिक्षण घेणे यात काही गैर नाही पण त्या नावाखाली काय काय थेर करतात ते एकदा रात्री फिरून पहा मग कळेल .
पुणे “overrated” नाहीये. इतिहासातील पुणेकरसुद्धा महानच. सांप्रतकालिन पुणेकर (जे बव्हंशी अत्यंत सुमार असतात) इतिहासाचं बाड बिस्तार घेऊन “greatness“ची टिमकी वाजवतात आणि इतरांना पाण्यात पाहतात ते खरे अडचणीचा विषय आहेत.
Mi punekr nahi pn punekr etranna panyat vgaire pahat nahi
Aamhi ❤nagpanchmiche ❤khel❤rastyavar khelaycho❤ panshetcha pur aathvto❤
कोल्हापूरची बाकरवडी
Amche ekte milindsirch pure saglyana punyabaddal bolayla, ase khup ahot
शिवाजी महाराज सर्व महाराष्ट्राचे भारताचे आणि आतातर संपूर्ण जगाचे आहेत
पुणेकर.. या छोट्याशा वर्तुळात त्यांंना घेऊ नये फक्त किरकोळ मुद्दा पटवून देण्यासाठी
मी पुण्याची.शाळा कॉलेज सगळे कॅम्प मधे झाले.M A मात्र पुणे युनिव्हर्सिटीत
खुपच chan ❤❤
one of the best question to be asked in next podcast : what does the native Punekar People expects from a non punekar to keep this city beautiful and best as always
निव्वळ अप्रतिम... दुसरा शब्द नाही. शिंत्रे साहेबांना भेटायला अतिशय आवडेल. पाहू कधी योग येतो ते... 👍🏻👍🏻👍🏻
प्रत्तेक सार्वजनिक उत्सव हा ओण्गाळपणे साजरा केला जातो ही गोष्ट दुर्दैवानं म्हणावस वाटते .
वाडे पडले ते पानशेतच्या पुरात...सर्व पेठा कसबा ,मंगळवार सगळे रस्ते मुळातून विस्कटले , मातीच माती आम्ही अनुभवली . मग वाडे लयास गेले आणि बिल्डिंग जन्मास आल्या.संस्कृती विलय पावली ....
1च नंबर सर ,मला ही जाज्वल्य अभिमान आहे पुणेकर असल्याचा
Khup sundar mulakhat jhali ganpatitil miravanukibaddalche mat kinva vichar khup chhan ani yoga ahet shintre sir ashi mulakhati Tya tya velela jasta viral vhayala havya ahet
मी एक अस्सल पुणेकर आहे उत्तम मुलाखत, अस्सल पुणेकराची व्यथा मांडली आहे
कोल्हापूर मधील इंपिरियल आईस्क्रीम , आणि गृहिणी उद्योग, शाहूपुरी येथील बाकरवडी छान असते. अर्थात इथे तुलना नाही करायची आहे. पुण्याच्या गोष्टीही खूप छान आहेत.
हे गृहस्थ साठीच्या आतले दिसतात, त्यामुळे खरे पुणे बद्दल त्याना अल्प माहिती आहेत.