NASHIK | चांदवड तालुक्यातील महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • चांदवड - महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. 15 जुलैरोजी पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी चांदवड येथील तहसीलदार कार्यालयात कर्मचारी कामबंद आंदोलनामुळे शुकशुकाट होता. तर कर्मचाऱ्यांनी महसुल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागु करण्यात यावा, अव्वल कारकून , मंडळअधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमीत करावे, महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजुर करुन पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल विभागात सामावून घेण्यात यावेत. वेतन देयगे उणो प्राधिकारपत्रवर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा, महसुल सहाय्यक ग्रेडपे 1900 वरुन 2400 करण्यात यावी, महसुल सहायक व तलाठी यांना सेवातंर्गत एकसमान परिक्षा पध्दती लागु करण्यात यावी, महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसुचना दि. 3 फेब्रुवारी 23 नुसार तात्काळ अव्वल कारकुन यांची वेतन निश्चीती करण्यात यावी, महसुल सहाय्यक सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परिक्षा नियम 1999 मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी सदरच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राज्य समन्वयक राजु धांडे, चंदु प्रधान , लक्ष्मण नरमवार, किशोर हटकर यांनी केल्याने चांदवड येथील महसुल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने बरीच कामे खोळंबली आहेत. तर चांदवड महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय गुरगुडे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, गोविंद आमले, सागर खरोटे, इरफान कुरेशी , रोहीत आव्हाड, सुनील पवार, श्रीमती साबळे, श्रीमती देशपांडे, श्रीमती व्यास , राजाराम बिडगर, विलास साबळे, नाना बागडे, खंडेराव शिंदे, दादा सोनवणो, सुनील बोरसे, अशोक साबणो, संदीप जाधव आदी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी होते. यासंदर्भात संघटनेचे सदस्यअहवाल कारकून यांनी अधिक माहिती दिली.
    BYTE - संदीप जाधव, अहवाल कारकून
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    / @rnorightnewsonline6999
    ☛ Visit our Official website:
    www.rightnewso...
    ☛ Follow Rightnewsonline:
    / rno02680723
    ☛ Like us :
    / rnonewsonline
    ☛ Send your suggestions/Feedback:
    rightnewsonline@gmail.com
    ☛ Contact Us:
    9987891300
    #RNO

КОМЕНТАРІ •