कोरोनात वडापाव दुकान बंद पडलं पठ्ठ्याने मोटर सायकलला बनवले दुकान | Man selling vadapav on his bike |
Вставка
- Опубліковано 14 гру 2024
- कोरोनात वडापाव दुकान बंद पडलं पठ्ठ्याने मोटर सायकलला बनवले दुकान | Man selling vadapav on his bike |
उद्योग भरारी संपर्क :- 7972657986
व्यवसायातल्या अमाप संधी आणि अर्थार्जनासाठी आपलं गाव सोडून शहरात स्थायिक न होता आपल्याकडे असणारे व्यावसायिक कौशल्य आणि प्रतिभेला गावातही वाव आहे. हे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी या गावातील महेश वाकचौरे यांनी दाखवून दिल आहे.
कोरोना काळात वडापाव व्यवसाय बंद झाल्यामुळे गावाकडे आलेल्या महेश यांनी आपल्या भन्नाट कल्पनेद्वारे चक्क मोटरसायकललाच वडापाव सेंटर बनवलं आहे. वडापाव तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शेगडी, इंधन आणि इतर कच्चा माल मोटरसायकल वर ठेवून चार वर्षापासून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधापासून ते गावगाड्यातील प्रत्येक ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष जाऊन गरमा-गरम वडापाव विक्री करून चांगलं अर्थार्जण करतात.
आवश्यक कच्चा माल मिरच्या,बटाटे गावातील शेतकऱ्याकडून खरेदी केल्यामुळे शहराच्या तुलनेत उत्पादन खर्चात बचत होते परिणामी नफा अधिकचा मिळतो. कुटंबाची भक्कम साथ, व्यावसायिक दूरदृष्टी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर गावातही रोजगार निर्माण करता येतो असे महेश वाकचौरे सांगतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उद्योग भरारी यूट्यूब चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद..
#businessidea
#desijugad
#udyogbharari
business idea
business idea marathi
udyog Bharari
desi jugad
fast food
उद्योग भरारी
बिझनेस आयडिया
बिझनेस आयडिया मराठी
देसी जुगाड
____________________________________________