Thackeray, Shinde आणि Devendra Fadnavis, कोणत्या नेत्यांवर काळ्या जादूचे कोणते आरोप करण्यात आले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • #BolBhidu #DevendraFadnavis #EknathShinde
    २०१३ मध्ये महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला. अशाप्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. त्यानंतर अनेक राज्यांनी महाराष्ट्राचं अनुकरण करत हा कायदा लागू केला. त्यामुळं अंधश्रद्धेला विरोध करण्यासाठी कायदा करुन महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व सिद्ध केलं. पण तरीही जादूटोणा, काळी जादू, अघोरी पूजा, नरबळी अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत असल्याचं पहायला मिळतं. पण सध्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यातच काळी जादू झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
    मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला का जात नाहीत, याचं उत्तर शिंदे गटातील लिंबू सम्राटांनी द्यावं, असं राऊतांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या आरोपांचं केंद्रस्थान वर्षा बंगला असलं तरी शिंदे, ठाकरे आणि फडणवीस या तिघांवरही आजवर काळी जादू किंवा जादूटोण्यासारखे आरोप झाल्याचं पहायला मिळतं. सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांवर आजवर काळी जादू आणि जादूटोण्याचे कोणते आरोप झाले, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 149