महिलांनी महिलांसाठी उभं केलेले महाराष्ट्रातील एकमेव असं कृषी पर्यटन । गोकुळ ऍग्रो टुरिसम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 бер 2023
  • Gokul Agro Tourism
    गोकुळ कृषी पर्यटन
    महिलांनी महिलांसाठी उभे केलेले ऍग्रो टुरिसम
    भाटघर धरणाच्या बॅक वॉटर जवळ ब्राह्मणघर ता.भोर जि. पुणे येथील गोकुळ ऍग्रो टुरिसम हे सीमा प्रशांत पाटणे व गावातील महिलांनी एकत्र येऊन उभे केले आहे. ब्राम्हणघर गावापासून कोकण परिसर चालू होतो.पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते यानंतर शेतीमध्ये जास्त कामे नसतात.ब्राह्मणघर व परिसरातील गावातील महिलांना रोजगार मिळावा या हेतूने सीमा ताई पाटणे यांनी गोकुळ कृषी पर्यटनाची सुरवात सात वर्षांपूर्वी केली.
    आज गोकुळ हे महाराष्ट्रातील एकमेव कृषी पर्यटन जे महिलांनी महिलांसाठी चालू केले आहे. गोकुळ मधील सर्व जबाबदारी या महिला सक्षमपणे पार पाडत असतात. ब्राह्मणघर मधील व आजूबाजूच्या गावामधील 25 महिलांना दररोजचा रोजगार हा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी गोकुळ सारखे अजून मॉडेल्स उभे राहिले पाहिजेत.
    गोकुळ मधील सर्व व्यवस्थापन महिलाच पाहत असल्याने येथे येणाऱ्या महिलांची संख्या सुद्धा जास्त असते. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत गोकुळ मध्ये येणारे महिला ग्रुप्स आपला दिवस निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करतात.
    सुरवातीला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत खिल्लार गाय तसेच कपिला गाई करत असते. जातिवंत अशा काजळी खिल्लार गाई आपल्याला गोकुळ कृषी पर्यटन मध्ये पाहायला मिळतात.यानंतर महिला सकाळी नाश्ता करून कृषी पर्यटन मधील ऍक्टिव्हिटीस चालू करतात.महिलांना नऊवारी साडी असेल किंवा वेगवेगळ्या गेम्स असतील तसेच स्विमिंग पूल असेल तसेच ज्यांना मेडिटेशन करायचे त्यांच्या साठी वेगळी जागा. गोकुळ मध्ये महिलांना एक निवांत व मोकळे वातावरण देण्याचा प्रयत्न या सीमाताई पाटणे करत असतात. गोकुळ मध्ये बांबूचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केलेला येथे दिसून येतो. शहरी भागातील महिलांना शेती व ग्रामीण जीवन शैलीचा अनुभव घेण्यासाठी गोकुळ कृषी पर्यटन नावारूपाला येत आहे.
    Gokull Agro Tourism...
    9689 822 277 / 9689 833 377
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Connect with us-
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23​
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com

КОМЕНТАРІ • 4