मेथीची पात्तळ भाजी | Methichi Pattal Bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #pradnyajoshi
    #Punerikaku
    #marathi
    #मराठी
    +917020758132
    #methichipattalbhaji
    #methi
    #fenugreek
    #maharashtrian
    #मेथीचीपात्तळभाजी
    #मेथी
    #bhaji
    #भाजी
    #rojchejewan1009
    सगळे काही प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू चॅनल बद्दल
    • सगळे काही प्रज्ञा जोशी...
    PuneriKaku ने सुरू केलेल्या काही खास सर्व्हिसेस:
    • पुणेरीकाकुच्या नवीन सु...
    मेथीची पातळ भाजी
    साहित्य
    मेथीची जुडी आणि दोन माणसांसाठी त्यातली एक ते दोन कप मेथी निवडलेली
    डाळीचे पीठ
    गूळ चमचाभर ते दीड चमचा
    शेंगदाणे चमचाभर टीस्पून
    तुरीची डाळ चमचाभर
    आपले नेहमीचे भाताचे तांदूळ चमचाभर
    मीठ
    लसूण १५ ते २० सोललेला
    आणि मिरच्या हिरव्या तीन
    मेथी निवडा. धुऊनआणि ती बारीक चिरून कुकरच्या मोठ्या भांड्यात घ्यायची. एका वाटीमध्ये एक चमचा कच्चे दाणे, एक चमचा तुरीची डाळ आणि एक चमचा तांदूळ घ्यायचे,ते धुवायचे. त्याच्यावर थोडसं ते बुडेल आणि वर थोडसं पाणी घालायचं. आणि ही वाटी पण तयार ठेवायची प्रेशर पॅनमध्ये किंवा कुकरच्या भांड्यामध्ये. कुकरमध्ये हे भांड ठेवायचं जसं आपण भात लावतो तसं आणि त्याच्या त्या मेथीच्या भांड्यामध्ये ही वाटी ठेवायची डाळीची तुरीची डाळ आणि शेंगदाण्याची त्या दाण्याच्या वाटीत पण थोडे पाणी घाला शिजण्यासाठी आणि मेथी मध्ये पण एक वाटी पाणी घाला. शिजवली की मेथीच्या भांड्यातून वाटी वेगळी काढायची दाण्याची. आणि पाणी जे आपण घातलय, मेथी शिजवताना ते पाणी मेथी पासून वेगळं करायचं.आणि तुम्हाला पाहिजे तर प्रेशर पॅनमध्ये मेथी डायरेक्ट पण शिजवू शकता. पण जर कूकर च्या भांड्यात शीजवलीअसेल तर मग, एका कढईत किंवा जाड बुडाच्या भांड्यामध्ये मेथी काढून घ्यायची. त्याच्यात अजिबात पाणी नसलं पाहिजे. पाणी छोट्या पातेल्यात काढा. त्यात बसतील इतपत डाळीचे पीठ घालायचं आणि ते चांगलं हटून घ्यायचं. म्हणजे हलवून मिक्स करून घ्यायचं.मग ते गाळून ठेवलेलं म्हणजे वेगळं ठेवलेलं पाणी, दाणे, डाळ आणि तांदूळ मिश्रण घालायचं वाटीतलं. आणि उकळायला ठेवायचं. उकळताना फक्त त्याच्यात मीठ आणि गूळ घालायचा. मग मीठ आणि गूळ घालून उकळायला ठेवायचं आणि पूर्ण डाळीचे पीठ शिजलं की पिठल्यासारखं की ते बाजूला ठेवायचं.मग एका कढल्यामध्ये तेल घ्यायचं फोडणी साठी एक ते दोन टेबल स्पून, मग त्याच्यामध्ये तेल तापलं की मोहरी घालायची. मोहोरी तडतडली की गॅस बारीक करायचा. मग त्यात हिंग घालायचा आणि मग हळद. हळद घातली की गॅस बंद करायचा.फोडणी करायची आणि मग त्याच्यात बारीक बारीक चिरून ठेवलेला लसूण आणि उभ्या कापलेल्या मिरच्या घालायच्या. कारण छोट्या मिरच्या केल्या तर हिरव्या भाजीत दिसणार नाहीत. म्हणून अख्खी मिरची उभी कापायची आणि त्याचे दोन भाग करायचे आणि मग त्या दोन भागाचे अर्ध अर्धे करायचे. टोटल एका मिरचीचे असे चार भाग होतात क्रॉस टाइप करायचं. आणि ते अशा दोन मिरच्या लागतील अशा दोन मिरच्या आणि एक साधारण पंधरा-वीस लसूण असं बारीक बारीक चिरून असं तेलाच्या त्या फोडणीत टाकायचं. आणि मिरच्या साधारण तळल्या गेल्या पाहिजेत आणि लसूण आहे तो सोनेरी झाला पाहिजे. म्हणजे दोन एक मिनिटं लागतात तोपर्यंत त्या फोडणीत ते तळायचं आणि ती फोडणी शिजलेल्या भाजीत वरून टाकायची.
    Methi's Thin Curry
    Ingredients:
    A bunch of methi (fenugreek leaves) and for two people, select one to two cups of methi leaves.
    Gram flour
    Jaggery - 1 to 1.5 tsp
    Peanuts - 1 tsp
    Toor dal - 1 tsp
    Rice - 1 tsp
    Salt
    Garlic - 15 to 20 cloves, peeled
    Green chilies - 3
    Pick and clean the methi leaves, about one to two measuring cups worth.
    Let it drain for five minutes and then chop finely. Transfer the chopped methi to a large cooker pot. In a separate bowl, take 1 tsp raw peanuts, 1 tsp toor dal, and 1 tsp rice. Wash these thoroughly and add just enough water to soak them. Keep this bowl ready in the pressure pan or cooker pot.
    Place the bowl with peanuts, dal, and rice in the cooker along with the methi. Add about a cup of water to the methi. Cook this mixture for two whistles, and then simmer it on low for five minutes. Once cooked, remove the bowl with peanuts, dal, and rice from the methi pot and drain the water from the methi. You can either cook the methi directly in the pressure pan or use a separate cooker. Once done, transfer the methi to a thick-bottomed pan. Ensure there is no water left in the methi.
    Take the separated water from cooking and add enough gram flour to make a thin paste. Mix it well until there are no lumps. Then add the peanut, dal, and rice mixture and let it boil. While boiling, add salt and jaggery to taste (around 1 to 1.5 teaspoons of jaggery for this amount of methi should be enough). Once the gram flour mixture thickens like a thin gravy, remove it from the heat.
    In another pan, heat 1 to 2 tablespoons of oil. Once hot, add mustard seeds. After the seeds crackle, reduce the flame and add asafoetida and turmeric. Immediately turn off the flame and add finely chopped garlic and slit green chilies (chop each chili lengthwise into four pieces for better visibility in the curry). Fry the chilies and garlic until the garlic turns golden. This process should take about 2 minutes. Finally, pour this tempering over the cooked methi mixture.
    Hashtags: Marathi:
    #मेथीचीपातळभाजी #घरगुतीस्वयंपाक #आरोग्यदायकभाजी #पौष्टिकभाजी #स्वादिष्टभाजी #मराठीस्वयंपाक
    English:
    #MethiThinCurry #HomemadeCooking #HealthyDish #NutritiousCurry #TastyCurry #MarathiCuisine

КОМЕНТАРІ • 7

  • @snehaabhyankar2934
    @snehaabhyankar2934 2 дні тому +1

    भाजी‌ छान झाली आहे 😋

  • @komalbagul7549
    @komalbagul7549 2 дні тому

    Tasty 😋

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 2 дні тому

    Khup chan recipe 😋 😍

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 дні тому

    मी अशी भाजी करताना डाळीच्या पीठाऐवजी ज्वारी किंवा बाजरीचे थोडेसेच मिळून येण्यापुरते पीठ घालते. जास्त पीठामुळे भाजी पिठल्यासारखी वाटते. आणि त्यात गुलाबराव आमसूल किंवा चिंच घालते. त्यामुळे भाजी भाकरीबरोबर खूप चविष्ट लागते.

  • @SmitvarshtaHawal
    @SmitvarshtaHawal День тому

    भाजीच पाणीच फक्त घ्ययच का शिजलेली भाजी नाही का घालायची

    • @punerikaku
      @punerikaku  День тому

      Prashna nahi kalala

    • @punerikaku
      @punerikaku  День тому

      Ho. Daliche pith pattal karayala panich lagte na.