Це відео не доступне.
Перепрошуємо.

Mrugagad | Chh. Shivaji Maharaj Forts and History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 бер 2023
  • Mruggad Fort
    मृगगडावर जाण्यासाठी खोपोलीला जायचे. पाली - खोपोली रस्त्यावर खोपोली पासून २० किमी वर परळी नावाचे गाव आहे. या ‘परळी’ गावातून सहा आसनी रिक्षेने ‘भेलिव’ नावाच्या गावात जायचे. भेलीव हेच पायथ्याचे गाव आहे. स्थानिक लोक या किल्ल्याला ‘भेलिवचा किल्ला’ असेही म्हणतात. भेलीव गावाच्याच मागे तीन सुळक्यांसारखे डोंगर दिसतात. त्यापैकी मधला डोंगर म्हणजे मृगगड. गावाच्या मागून एक वाट किल्ल्यावर जाते. जाण्याची वाट जंगला मधून असल्याने उन्हाचा त्रास बिलकूल होत नाही. किल्ला आणि त्याच्या पुढे असणारा तिसरा डोंगर यांच्या मध्ये एक खिंड आहे. त्या खिंडी मधूनच वाट किल्ल्यावर जाते. वरती थोडी कातळचढाई असल्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. भेलिवमधून किल्ल्यावर जाण्यास १ तास पुरतो.

КОМЕНТАРІ • 26

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 3 місяці тому

    Chaan mahiti

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому

    Khoop..sundar..💓

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Рік тому

    धन्यवाद सलाम शुभेच्छा.

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому +1

    परत एकदा अपरिचित पण तेवढ्याच थरारक किल्ल्याची अतिशय सुंदर माहिती मिळाली . गडावरील विहिर खरच पाहण्या सारखी आहे . तुम्ही हाती घेतलेल्या महान कार्याला मानाचा मुजरा .🙏🚩🚩
    वरती कातळावर ज्या खोबण्या ; खोलगट भाग आहे तशा खोबण्या तळगडावर पण आहेत .

  • @anilpawar4918
    @anilpawar4918 Рік тому

    विडीओ छान आहे

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому

    Seeing your vedio after a long long time . Khup chaan maahiti aani navin killa samajala. Dhanyawad.

  • @tukarambarbade4587
    @tukarambarbade4587 Рік тому

    Amegein Adbhut 👍

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Dada baryach divsanantar farach chhan aani mahitipurna vlog zala, gadavaril Mahadev Mandir, vadyanche avshesh aani baryapaiki shaboot asleli tatbandi farach sundar aahet.

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Рік тому

    अतिशय उत्कृष्ट वर्णन आणि भाषाही. अतिशय उत्तम चित्रफित बऱ्याच दिवसांनी पाहायला, ऐकायला मिळाली. धन्यवाद त्याबद्दल.

  • @azimshaikh8316
    @azimshaikh8316 Рік тому

    Love you bro

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 Рік тому

    तुमच्या शब्दात सह्याद्रीचे वर्णन एकने व इतिहास जानने ही पर्वणीच असते सर.. 🙌❤️

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      धन्यवाद Pratik 🙏

    • @pratiktravelvlogs7282
      @pratiktravelvlogs7282 Рік тому

      @@user-gp7wm3rv2j खरं सांगतो अनेक vlogers आहेत जे उत्तम चित्रण करतात मात्र ते दाखवतात ते डोंगर दर्यांच सौंदर्य तो सह्याद्री नसतो.. तोच डोंगर ह्या चॅनल वर सह्याद्री व दुर्ग या माध्यमातून तुम्ही आम्हाला दाखवता त्यामुळे एक मिनिट सुधा तुमची वीडियो skip करावी वाटत नाही.. त्यामुळे असेच पुढे जात रहा.. माझ्या गेल्याच महिन्यात ओटीपोटाच्या 3 शस्त्रक्रिया झाल्यात वर्ष भर trek पेलवन मला शक्य नाही अजून तरी तोवर तुमच चॅनल त्या माध्यमातुन सह्याद्री जगता येईल.. 🙏🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +2

      धन्यवाद मित्रा...काळजी घे, सह्याद्रीची ओढ च तुला बळ देईल परत खंबीरपणे उभ राहण्याच, किल्ल्यावर येण्याचं. खर मी किल्ल्यांकड ऐतिहासिक नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतो. पराक्रमी मावळ्यांनी एवढ्या उंचीवर घडवलेले किल्ले तुमच्या महागड्या drone किँवा कॅमेऱ्या ची त्यांच्यासमोर काय किंमत . बुरुजावर चा रेखीव दगड या असल्या कॅमेऱ्याने दिसत नसतो. त्याला तिथच जावं लागतं. किल्ले आणि डोंगर दऱ्या किती thrilling आहेत आणि youtuber ne कश्या पार केल्या हे आजकाल महत्वाचं झालंय. मुळात 500-1000 वर्षा पूर्वी त्या वीरांनी किल्ले कसे उभे केले आणि रक्ताच पाणी करून कसे राखले हे महत्त्वाचं. असो मला जे भावत ते लोकांसमोर पोहचवण्याचा प्रयत्न करतो. यात यश अपयश अस काही नाही प्रत्येक किल्ला त्याचा इतिहास लोकांसमोर पोहोचावा एवढाच हेतू.

  • @Undagnara
    @Undagnara Рік тому

    लई भारी 🙏

  • @vinodpatil3247
    @vinodpatil3247 Рік тому

    👌👌👌

  • @prasad_rajmane
    @prasad_rajmane Рік тому

    दादा खूप दिवसांनी व्हिडिओ आला.खूप वाट बघत होतो

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      धन्यवाद, प्रयत्न चालू असतो नेहमी व्हिडिओ अपलोड करण्याचा पण ऑफिस काम आणि इतर गोष्टी मूळ शक्य होत नाही पण जेव्हा शक्य होईल तेव्हा व्हिडिओ येतच राहतील हे नक्की