घंटा - मराठी कविता/ कवी समाधान इंगळे/ Ghanta - Marathi Poem/Samadhan Ingle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • घंटा
    ती मला पाहताना
    एवढी काही लाजायची
    नेम नेमका चुकत गेला
    तेव्हाच घंटा वाजायची
    असे नेम कित्येक चुकले
    पण नित्यनेमे प्रयत्न केला
    शाळेमध्ये बोंब उडाली
    आपला घंटा कोठे गेला?
    घंट्याच्या शोधासाठी
    बराच प्रयत्न करून झाला
    मी तिला बोलून गेलो
    मीच तो चोरून नेला
    घंट्यासाठी हेडसरांनी
    युद्धपातळीवर प्रयत्न केले
    शाळा सुटत नाही म्हणून
    सारेच रडकुंडीला आले
    ती म्हणाली घंटा नाही तर
    शाळा केव्हा सुटायची
    मी म्हणालो हीच संधी आहे
    मजा लुटायची
    आमच्या बाई कंटाळल्या
    घड्याळाकडे बघताना
    शाळेची वेळ संपली
    'जा' म्हणाल्या जाताना
    आज घंटा वाजली नाही
    ती सुद्धा लाजली नाही
    नेहमी सारखी घंट्या सोबत
    आज डाळ शिजली नाही
    तिच्यासाठी चिंचा आणल्या
    तिच्यासाठी बोरं आणले
    तिच्याकडे पाहतात म्हणून
    कितीतरी पोरं हाणले
    तिच्यासाठी नेम बदलले
    तिच्यासाठी खेळ बदलले
    एकदा नाही दोनदा नाही
    किती किती वेळ बदलले
    तिच्यासाठी घंटा चोरली
    तिच्यासाठी पाटी फोडली
    ती आता पाहत नाही म्हणून
    कायमची शाळा सोडली
    समाधान इंगळे
    (माझी महाविद्यालयीन काळातील कविता आहे. खूप दिवसांनी वाचली त्यामुळे थोडा अडखळत होतो. पण कवितेची जादू अजून कायम आहे हे बघून मजा आली)

КОМЕНТАРІ •