सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #marathipodcast #beyondpolitics #sunetrapawar #sankarshankarhade
    आपण कायमच एक काम करत असतो ते म्हणजे राजकारण्यांना नावं ठेवणे. कारण वातावरणच काहीसं तसं आहे. पण प्रत्येक राजकारण्यांची एक वेगळी बाजू असेलच ना. तो हि आपल्यासारखाच जगत असेल. त्यामुळेच पक्ष, जात, रंग यांच्या पलीकडे जाऊन तो माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायचा हा एक प्रयत्न.
    सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा.
    पूर्ण एपिसोड नक्की बघा! आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा.
    Credits:
    Guest: Sunetratai Pawar.
    Host: Sankarshan Karhade.
    Creative Producer: Nikkhhil Thackar, Tejas Gokhale.
    Editor: Atharva Kodre, Pratik Gaikwad.
    Costume: Soha Potphode.
    Make up: Akanksha Pandya.
    Camera: Pushkaraj Thakkar, Vaishnavi Gaikwad, Shardul Kulkarni.
    Connect with us:
    Instagram: / baghmarathi
    Facebook: / baghmarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 293

  • @ap1511
    @ap1511 Місяць тому +184

    सुनेत्रा जी, तुमची शालीनता, घरंदाजपणा मनाला मोहून गेला. तुमच्या पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा.

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 Місяць тому +12

      सुनेत्राजी या वयातही तुमचा चेहरा खुपच मोहक वाटतो. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. यशस्वी व्हा.
      God bless the wonderful lady.

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 Місяць тому +3

      तुम्हालासलाम ।.इतक्या आघाड्यावर काम करता त्याचे कैअतुक वाटते ,शुभेच्या ।

    • @vasudhasahasrabhojane1748
      @vasudhasahasrabhojane1748 Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

    • @dnyanesh_shankar_sawant9399
      @dnyanesh_shankar_sawant9399 Місяць тому

      ंं

    • @rameshkulkarniy2322
      @rameshkulkarniy2322 29 днів тому

      😊😊.74​@@jyotipole5269

  • @neenapangarkar
    @neenapangarkar Місяць тому +92

    अतिशय मनापासून खरं बोलल्या ...बिलकुल देखावा नाही किंवा मोठे मोठे जड शब्द नाहीत... सुनेत्राताईंचा बडेजाव तर बिलकुल दिसला नाही आणि साधी सरळ उत्तरे... मुलाखत एक नंबर🎉🎉🎉

    • @vikasjadhav4486
      @vikasjadhav4486 23 дні тому +1

      ते गेल्या ३० वर्षांपासून मेहनत करून राहिलेले लोक कुठे गेले? ज्यांनी जमीन कसली, तूळ उपजाऊ केली आणि त्यावर हया ताई अचानक आदित्य ठाकरे सारख्या आल्या..
      मग त्या मेहनत कारच काय 😊

  • @raghavkulkarni21
    @raghavkulkarni21 Місяць тому +80

    सुनेत्राताई पवार यांचा Beyond Politics Interview पाहून आनंद वाटला. 👌
    सुनेत्राताईंचा मनमिळाऊ व बोलका स्वभाव जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संकर्षण भैय्यांना धन्यवाद🙏🇮🇳

  • @subhashtaklikar7202
    @subhashtaklikar7202 Місяць тому +82

    निवडणुकीच्या धुरल्यात एक शांत ,मुलाखत.स्वच्छ आणि शुध्द मराठीत.सुनेत्रा वहिनी आणि आमचा आवडता रंगकर्मी संकर्षण दोघानाही धन्यवाद.

  • @deepadeshmukh903
    @deepadeshmukh903 Місяць тому +29

    संकर्षण आणि सुनेत्रा ताई तुमच्या या अनौपचारिक गप्पा खूप आवडल्या.

  • @charuduttadhairyawan1046
    @charuduttadhairyawan1046 Місяць тому +115

    आज समजले , देवेंद्रजी आणि दादांच्या मैत्रीचे रहस्य.... "पुरण पोळी"

    • @kushal5969
      @kushal5969 Місяць тому

      Sadu bhau ahet te ekmekanche

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 Місяць тому

      साडू? ​@@kushal5969

    • @riteshade8972
      @riteshade8972 Місяць тому

      35 ka

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Місяць тому +1

      दादा आणि देवा भाऊ....२०१४ नंतर फारच जुळत गेले 😅

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 8 днів тому +1

    संकर्षण तुमची सहज सुंदर संवाद शैली भावली. सुनेत्राताईंच्या मनमोकळ्या गप्पा ही!

  • @apurvrajput
    @apurvrajput Місяць тому +99

    ठेव बाजूला तुझ्यातील देव आई
    जेवले आहेत सारे जेव आई
    - वैभव जोशी

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Місяць тому +18

    ❤सुनेत्राताईंचा मनमिळाऊ व बोलका स्वभाव मनाला अतिशय भावला, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील गरीब जनतेची चांगली सेवा होईल अशी आशा ठेवण्यास हरकत नाही. ताईंनी परिधान केलेल्या साडीचा कलर फार आवडला. आमच्या दादांनी भाजप बरोबर मैत्री केल्यानंतर घेतलेली ही खास साडी असावी . सुनेत्राताई तुमच्या पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा.
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Місяць тому +56

    सौ. सु नेत्रा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. सदगुरू महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. चिंता करू नये. 💐श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @shirishnagarkar5963
    @shirishnagarkar5963 Місяць тому +22

    अत्यंत मनमोकळ्या स्वभावाची गृहिणी आज दिसली. कुठेही निवडणूक लढवणारी उमेदवार नाही दिसली !
    किती निर्व्याज आणि भारदस्त व्यक्तिमत्व ! पहिल्यांदाच समजले !
    संकर्षण, तुझे खरोखरच कौतुक आहे अशा दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे पैलू सर्वांसमोर आणल्याबद्दल !
    ❤❤❤

  • @PK-ws5rb
    @PK-ws5rb Місяць тому +28

    मुलाखत अशी वाटलीच नाही. साध्या सोप्या भाषेतून संकरषरणने तुम्हाला बोलते केले अगदी आमच्यासारखच तुमचं आयुष्य आहे हे ऐकून तुमहचया विषयी आदर वाटला ताई. तुमचा स्वभाव समाजकारणी आहे हे जाणवलं ताई. All the best to you in coming elections

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u Місяць тому +51

    खूप भारी संकर्षण मुलाखत फारच छान घेतोस हा गुण माहीत न्हवता मस्त❤❤

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 Місяць тому +17

    खूप छान मुलाखत झाली. त्यांचे सगळे कार्य समजले. खरंच लवकर खासदार होऊन कार्य करतील अश्या शुभेच्छा

  • @ramkudale792
    @ramkudale792 Місяць тому +36

    खूप सुंदर मुलाखत. ओघवती वाणी शालीनता नम्रपणा कुटुंबवत्सल असं महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी मुलाखत

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Місяць тому +25

    ।।ॐ॥ सुनेत्राताई आपण शालीन व घरंदाज गृहिणी आहात हे शब्दाशब्दातून उलगडले. संत गोरोबांच्या गावातील असल्याने धार्मिकतेचा संस्कार सहज असावा. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @sunilthopate6637
    @sunilthopate6637 Місяць тому +28

    सुमित्रा ताई एक आदर्श व्यक्तीमत्व असेच लोकप्रतिनिधी संसदेत पाठवा

  • @ashishdeshmukh13
    @ashishdeshmukh13 Місяць тому +28

    खूप सुंदर मुलाखत! चतुर्थीला मटन खाण्यासारखा अहंकार कुठेही जाणवत नाही. नक्की निवडून या!

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      मटण उकड खाऊन हनुमान ची आरती करण्यापेक्षा बरे 💯

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Місяць тому +10

    शांत,समंजस व कर्तुत्ववान आमच्या सुनेत्राताई😊

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 Місяць тому +12

    लोकाभिमुख सौ.सुनेत्राताई , सुंदर संवाद !

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому +7

    मस्त, छान वाटल, आणि ताईंच्या साडीचा रंग खुपच आवडला. तुम्ही निवडून यालच, नक्कीच जिंकाल.

  • @avinashdangare6676
    @avinashdangare6676 Місяць тому +29

    सुनेत्रा ताई साहेब सादर प्रणाम नमस्कार आपला स्वभाव प्रांजळ , प्रेमळ व आपले बोलणे समजूतदार पणाचे आहे. संकर्षण आपणास धन्यवाद नमस्कार वंदे मातरम्

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Місяць тому +13

    खूपच छान मुलाखत.खरंतर ही मुलाखत न वाटता छान मनमोकळ्या गप्पा मारल्यासारखं वाटलं.👌🏻👌🏻👍🏻

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Місяць тому +19

    दादांच्या पडद्या मागील कलाकारांचे आज प्रथम विस्तृत दर्शन झाले,संकर्षण चांगले सुसंस्कृत प्रश्न विचारतो! संवाद चांगला झाला.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Місяць тому +41

    खुपच छान.वहीनी तु तर आमच्या घरातलीच वाटली ग,,,,,,,,किती साधी भोळी,,,,सुसु सारखा बेरकीपणा नाहीच

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Місяць тому +15

    खरच अतिशय मनमिळाऊ पणा आहे खूप सुंदर आमच्या मनापासून आपणास हार्दिक शुभे्छा सौ सुनेत्रा ताई. आपण विजयी व्हावं हीच प्रभू चरणी प्रार्थना🎉

  • @shriramsapre
    @shriramsapre Місяць тому +15

    फार छान मुलाखत! ताईंनी अगदी छान मुलाखत दिली.त्यांनी मोठ्या फरकाने निवडून यावे. त्या करित असलेली समाज सेवा अधिक उत्तम प्रकारे करतील याची त्यांचे देहबोली वरून खात्री वाटते. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
    आमचे आवडते चि.संकर्शन क-हाडे यांनी छान मुलाखत घेऊन ताईंची वैयक्तिक माहीती मिळाली.
    श्रीराम सप्रे ठाणे

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 27 днів тому +3

    All the best Sunetra tai
    Prasanna vyaktimatwa !
    Tumachi Samaj seva bhavali.
    Pharach Chan

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 Місяць тому +3

    सकर्षण खरोखर भावा तू खूप ग्रेट ॲक्टर आहेस कारण जमिनीशी नाळ तुम्ही खूप जोडून आहात त्यामुळे खूप समोर जाणार हे निश्चित🎉

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Місяць тому +5

    राजकारणाचा विषय सोडून झालेली मुलाखत खूप छान

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Місяць тому +8

    छान मुलाखत झाली.ताई एकदम निर्मळ आहेत.

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 Місяць тому +5

    फार सुंदर नैसर्गिक मुलाखत झालेय व

  • @archanalokhande7762
    @archanalokhande7762 6 днів тому +1

    आमच्या गावचे संकर्षण आम्ही पण परभणीचे खूप छान मुलाखत❤🎉

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Місяць тому +7

    आदरणीय सुनेत्रा ताईं,आपणास खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @anaghakulkarni7591
    @anaghakulkarni7591 28 днів тому +1

    खूप छान मुलाखत.प्रसन्न व निर्मळ व्यक्तिमत्त्व. पुढील कार्यास शुभेच्छा❤

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Місяць тому +18

    संकर्षण, खूपच खुमासदार मुलाखत झाली. सूनेत्रा ताई जवळून कळल्या. All the best for her ✌️

  • @ArchanaKanitkar-hb4es
    @ArchanaKanitkar-hb4es Місяць тому +6

    Sunetra Tai 🙏 tumche vichar aani mulakhat khup aavdli. Sankarshan mulakhat & kavita far far aavdtat.

  • @kmf7183
    @kmf7183 Місяць тому +16

    निवडणूक आल्यामुळे राजकारण्यांनसोबत "राजकारण" सोडून गप्पा..!😁☕

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv Місяць тому +26

    चोंबड्या सूसू ताईंच्या मानाने सुनेत्रा वहिनी खूपच साध्या आणि संस्कारीत वाटतात !

  • @shraddhadani9645
    @shraddhadani9645 Місяць тому +5

    सुनेत्रा, ताईंचे विचार आणि कार्य बघून कौतुक वाटलं,

  • @satishchandrapetkar2260
    @satishchandrapetkar2260 Місяць тому +12

    आपण एक छान कविता केली. सर्वच राजकीय पक्षांना व नेत्यांना ती आवडली. म्हणजे beyond politics. आम जनतेचे प्रतिबिंब त्यात दिसलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्यांनी कळत नकळत असं सर्वत्र होत आहे, याची कबुली दिली आहे. श्री संकर्षण यांना एकच विनंती आहे की नेत्यांना भेटताना जनतेच्या ह्या भावना कळवाव्यात. अवघड आहे हे परंतु अशक्य निश्चितच नाही. मतभेद असू शकतात परंतु टोकाची कटुता कोणाच्याच फायद्याची नाही.

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Місяць тому +8

    खुपछान प्रगल्भ व्यक्तिमत्व 🎉🙏

  • @akolerakesh8955
    @akolerakesh8955 Місяць тому +22

    बारामती च्या महालक्ष्मी ला संधी देऊन महाराष्ट्र विकासा ला विजयी करा 🚩जय श्री राम 🚩

    • @yam668
      @yam668 Місяць тому +1

      Mahalakshmi chya mage Dada Navacha Mahakal aahe, to kasala vikas karato Maharashtracha swatacha ajun vikas Karel 10 pidhya basun khatil evhadha khaun gheil.hi tyachi sahadharm charini. Tyalach sath sath deil ha mukhavata ghalun ti aali aahe tyavar jau naka. aamch mat Supriya Taila.

  • @sayamashaikh3023
    @sayamashaikh3023 Місяць тому +3

    खूप छान. . माननिय ..ताई ..आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Місяць тому +3

    ताई ह्या खुप शुभ-लक्षणी असल्याने सर्व कुटुंबीय सुखी आणि संपन्न असुन ताई ह्या मनमीळावु आहेत!

  • @virajayir3032
    @virajayir3032 Місяць тому +35

    Sankarshan Dada, please Devendra Fadnavis sahebancha interview ghe. He is the most misunderstood politician in Maharashtra. Please aapan ek tyancha interview ghavya Ashi premal vinanti❤

    • @BaghMarathi
      @BaghMarathi  Місяць тому +10

      नक्कीच लवकरच फडणवीस साहेबांचा Interview आम्ही घेणार आहोत.

    • @virajayir3032
      @virajayir3032 Місяць тому +1

      Thank you so much. Looking forward to it

    • @Aaditya10021
      @Aaditya10021 Місяць тому +1

      वाह वाह.. वाट बघत आहोत 😊

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 27 днів тому

      Vah vah. Sankarshan la gheu det. Ani jara vegle vishay shodun kadha. Fadanvis is interesting character.. pan nehmiche vishay kadhal tar te political answer detil

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi Місяць тому +30

    महासंसदरत्न ताईंना घरी बसवून या वेळेस सुनेत्राताईना निवडून द्यावे

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому +1

      पंतप्रधान मोदी ला बसवून या वेळी विनोद तावडे ला पंतप्रधान करावे 💯

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 27 днів тому

      Kartil te tawde na pant Pradhan pan tumhi tai na pathimba dyal hywchi guarantee nahi

  • @rohitjoshi5588
    @rohitjoshi5588 Місяць тому +4

    छान मुलाखत...
    ताडकलस..परभणी जिल्हा मध्ये आहे ...पूर्णा तालुका ...

  • @shailatilloo7033
    @shailatilloo7033 Місяць тому +4

    Apratim interview khup chan

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Місяць тому +3

    छान मुलाखत! दीलखुलास!ओघवती.
    शुभेच्छा!!

  • @matrixmind76
    @matrixmind76 Місяць тому +3

    प्रसन्न व्यक्तिमत्व . अनेक शुभेच्छा

  • @asmitakamalwar6263
    @asmitakamalwar6263 Місяць тому +4

    खूप सुंदर मुलाखत👌

  • @sandhyagumaste616
    @sandhyagumaste616 Місяць тому +4

    सुनेत्रा ही सुशील रसिक सुशिक्षित आहेत.मुलाखत आवडली.

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Місяць тому +2

    खूपच छान सुनेत्रा वहिनींची अगदी हलकीफुलकी व मनमिळावू अशी मुलाखत, संकर्षण वराडे खूप छान मुलाखत घेतली आपण.

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 Місяць тому +4

    खूप छान मुलाखत

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 Місяць тому +7

    घर बोलकं करणारा सामान्य स्त्री चार संचार संसारातील कार्यक्रम.धन्यवाद

  • @ravindrakulkarni1908
    @ravindrakulkarni1908 Місяць тому +3

    खूपच सुंदर आणि माहिती
    पूर्वक मुलाखत अभिनंदन
    🎉🎉🎉

  • @viveksheth1693
    @viveksheth1693 Місяць тому +4

    खुप सुंदर मुलाखत...

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Місяць тому +5

    खुप छान मुलाखत sunetratai ना खुप खूप शुभेच्छा

  • @anitachandorkar3990
    @anitachandorkar3990 Місяць тому +10

    सुनेत्राजी तुम्ही खूप छान मुलाखत दिलीत 🌹🌹🙏🏿🙏🏿

  • @Mumbaikar2233
    @Mumbaikar2233 Місяць тому +18

    बारामती मधुन चांगला खासदार जाईल यावेळी 👌

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 Місяць тому +25

    कसलीही चिडचिड नाही तडतड नाही त्या ताईंसारखी ...
    राजस व्यक्तिमत्त्व आहेत सुनेत्रा वहिनी

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 Місяць тому +21

    बोलण्याची अदब व विषयाचं ज्ञान आहे की ह्यांच्यात पहिल्यांदा पाहिलं आजवर बोलताना.संसदेत वर्षभरात भीती गेली की छान विषय मांडतील ह्या.फडफड इंग्रजी नसलं अन नुसता मुद्दा सूटसुटीत मांडता आला लोकसभा अध्यक्षा समोर तरी पुरे आहे..मतदारांनी विचार करायला हरकत नाही..बदल हा निसर्गाचा नियम आहे.

  • @sujatapendse-wc6hc
    @sujatapendse-wc6hc Місяць тому +3

    Khup Chan Mulakhat ghetlie. Sunetratai tumhi khup chan bolta. Very down to earth personality. All the Best for your career👍

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 Місяць тому +4

    सुंदर,मजा आली

  • @smitabalwadkar4328
    @smitabalwadkar4328 Місяць тому +3

    Sahaj , sadhepana aani pramanik panane bolatat vahinee..!!! Khupach Chan

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 23 дні тому

    छान मुलाखत आहे. सुनेत्रा पवार या छान बोलल्या! संकर्षण दादा तू आम्हाला फार आवडतो. तुझा मिश्किल स्वभाव तुझ्या सगळ्या कार्यक्रमांत जाणवतो.😊

  • @udaydeopurkar8285
    @udaydeopurkar8285 Місяць тому +5

    Vah tayi, vah tayi, 🎉 all the best, mi dhulya chya Devpurkar

  • @urmilaarnikar4510
    @urmilaarnikar4510 Місяць тому +2

    Khup Sundar मुलाखत

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 Місяць тому +6

    शांत संयमी सुसंस्कृत वहिनी साहेब

  • @smeetsmeet24
    @smeetsmeet24 Місяць тому +1

    Khup ch Sundar.... this silent make me happy... excellent... many many wishes for your feature...😇

  • @sagarkantekure5275
    @sagarkantekure5275 Місяць тому +1

    धाराशिवची लेक निवडून येणारच💐 जय भवानी🚩

  • @PushpaMane-uu5yk
    @PushpaMane-uu5yk Місяць тому

    छान मुलाखत. संकर्षण धन्यवाद

  • @dhanashreet
    @dhanashreet Місяць тому +9

    कधी कधी प्रकाशझोतापासून दूर असल्याने एखाद्या व्यक्तीतलं talent लपून राहत/झाकोळल जात विशेषतः गृहिणींच

  • @santoshjoshi5633
    @santoshjoshi5633 Місяць тому +5

    जय भवानी ताईसाहेब

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 Місяць тому

    Apratim Apratim मुलाखत

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 16 днів тому

    शांत,संयमी, आणि घरंदाज वाटल्या सुनेत्रा ताई, संकर्शन खूप अनौपचारिक पद्धतीने मुलाखत घेण्याचे तंत्र खूप छान.

  • @AmritaSitar
    @AmritaSitar Місяць тому +2

    खूप छान मुलाख़त !

  • @vishweshwarmadavi1313
    @vishweshwarmadavi1313 19 днів тому

    Best social struggle Sunetratai pawar maam . All the best maam. Future MP nakkich aahat tumhi.
    By.vishweshwar Dist chandrapur maharashtra

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Місяць тому +4

    Very nice Interview of BHAVI KHASDAR

  • @priyankashinde7216
    @priyankashinde7216 Місяць тому

    Khup simple n down to earth vatalya.....te baghun pan samjate tyana ki shant ahet ase vatate...

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Місяць тому +4

    चांगले विचार आहेत ताईंचे....
    आमच्या गावाकडच्या आहेत त्या
    किती घरदांज पणा शांतपणा ..आमच्या
    गावाकडे अशीच माणस असतात

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      कुलकर्णी rss बरोबर आहे म्हणून हे विचार बरोबर ना 💯

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Місяць тому +4

    Sunetra taina khup khup shubecha

  • @rajashrirane5733
    @rajashrirane5733 Місяць тому +4

    सुनेत्रा ताई best luck

  • @mohsinsheikh6778
    @mohsinsheikh6778 Місяць тому +1

    खुप छान मुलाखत

  • @devayaniranade9577
    @devayaniranade9577 Місяць тому +2

    So simple so sweet

  • @nandkishorshelke6820
    @nandkishorshelke6820 22 дні тому

    सुनेत्रा ताई खासदार होन्यासाठी खुप शुभेच्छा

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Місяць тому +4

    डॉ पद्मसिंह पाटील ची बहीण असून एक असं घराणं कि जे राज्याचे गृहमंती ज्यांनी चुलत भावाच्या खुनाची सुपारी दिल्याचं आठवतं खूपच चांगलं घराणं 🙏🚩. पुणे विद्यापीठात सुद्धा सिनेटर आहे, महत्वाकांक्षी म्हणून राजकारण

  • @ushaughade-hj7kc
    @ushaughade-hj7kc Місяць тому

    खुप छान मुलाखत … खुपच आवडली .👌😍

  • @tapanmehta77
    @tapanmehta77 Місяць тому

    Great respects for both of you

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 28 днів тому

    सुनेत्राताई अतिशय शालीन व्यक्तीमत्व आहे. त्यांना भेटण्याचा योग २-३ वेळा आला होता, तेव्हाच त्यांच्या ह्या भारदस्त व्क्तीमत्वाची जाणीव झाली. एवढं ऐश्वर्य असतांना down to earth असण हेच त्याचं मोठं असण्याचं लक्षण आहे. Hats of to सौ वहिनी साहेब 🙏🏼

  • @shraddhadani9645
    @shraddhadani9645 Місяць тому +2

    एकदम छान

  • @user-jv5im7kh9f
    @user-jv5im7kh9f Місяць тому +1

    संकर्षण तुमचे धन्यवाद. कारण अशी मुलाखत फक्त तुमच्यासारखे घेऊ शकतात. तरी काही प्रश्न बाकी आहेत. नेत्रा ताईंनी सुद्धा अनौपचारिक उत्तर दिली. त्यांना शुभेच्छा. त्या नक्कीच निवडून येणार.🙏🙏🤓🤓👍👍💐💐

  • @kokancashew247
    @kokancashew247 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत 👌🏻

  • @abhidapase1407
    @abhidapase1407 Місяць тому

    खूप छान मुलाखत...❤💐👍

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Місяць тому +7

    भावी खासदार 🎉

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 Місяць тому +1

    👌👌

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 18 днів тому

    सुनेञा ताई खुप छान सुदंर सादगीपूर्ण स्वभाव शालीनता आहे गर्व चा कूठेही अंश दिसत नाही अजीत दादा नसीब नाले आहेत दोघाची जोडी अप्रतिम ❤❤

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 Місяць тому +1

    Khoop chaan mulakat. Sunetra tai khoop elegant ani polished aahet.Tyanche vichar khoop changle aahet

  • @adeshpatil908
    @adeshpatil908 Місяць тому

    Khupach bhari interview !!