माझी गोष्ट - सुदामराव नेवसे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 429

  • @rohitbodare9288
    @rohitbodare9288 2 роки тому +124

    सरपंच तुमचा संज्या मेला तरी तुम्ही आला नाही Rao .. असं काय बरोबर नाही बघा.
    तुम्ही पण वेबसिरिज च महत्त्वाचं पात्र आहे .

  • @shrikantpatole4649
    @shrikantpatole4649 2 роки тому +22

    दीपक राव दाखवण्यापेक्षा सरपंच सुदामराव नेवसे हे पात्र कधीही चांगले

  • @harshadgalande
    @harshadgalande 2 роки тому +71

    तुमचा लाडका संजु मेलेला दाखवला तरी तुम्ही दिसला नाही ..नक्की काय झाले आहे सरपंच... सरपंच हे पात्र डावलू नये खूप चांगल्या पद्धतीने आपली कला ते मांडतात🙏🏻❤️

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 роки тому +18

    सुदाम नेवसे लेट आहे पण थेट आहे . प्रत्येक कलाकारांचे जीवन संघर्षमय आहे . सरपंच भूमीका थेट केली . त्याना प्रत्येक भागात घ्या रामभाऊ !
    छान अभिनय करतात सरपंच सुदाम नेवसे साहेब .
    शुभेच्छा !

  • @manojlunkad8810
    @manojlunkad8810 2 роки тому +2

    गावचा सरपंच हाय लेट हाय पण थेट हाय हा डायलॉग त्यांची ओळख करून देतो खूप मस्त काम करतात .....सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक आडचनी येतात त्या सर्व बाजूला ठेवून सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार कार्य तूम्ही सर्व जन करीत असतात लोक काय देवाला नाव ठेवतात त्या कडे न पाहता तूम्ही तुमचे काम करीत रहा .... सुदाम नेवसे तूम्ही खूप कठीण काळात
    स्वता ला सावरत काम करत आहात तुमच्या कार्याला सलाम....

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 роки тому +25

    आपला कोणताच गुण वाया जात नाही.....हे नेवासे साहेबांकडून शिकायला मिळते......
    तुमचं तळमळीने.. आत्मीयतेने बोलणं ऐकून.... तुम्ही अजून काय तरी भारी होणार असचं वाटतयं....
    तुमच्यातील कलागुणांना सतत वाव मिळो.....एवढीच प्रार्थना...💐💐💐💐

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 2 роки тому +2

    रसिकांना हसवता हसवता प्रत्येक कलाकाराला किती प्रसंगाला तोंड द्यावे लागते कौटुंबिक घटना ऐकून यांची जाणीव होते व सरपंच तुम्ही खरंच एक हरहुन्नरी कलाकार आहात पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 2 роки тому +2

    गेल्या आठवड्यातील एपिसोड मध्ये सरपंच साहेब तुम्ही नव्हतात ... याच कारण दाखवा . लेट हाय पण तुम्ही थेट हाय तुम्ही. निळू फुले नंतर महाराष्ट्राचे सरपंच तुम्हीच आहात . लेट हाय पण थेट हाय 👌👌👌👌👍👍👍

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 роки тому +2

    आवाजाचे जादुगार सुदामराव नेवसे तुमची योग्यता फार मोठी आहे. माझी गोष्ट सिरीजद्वारे माहिती मिळते त्यामुळे सर्व कलाकार आपलेसे वाटतात 👍👍👍👍

  • @Swagat_Bhoite
    @Swagat_Bhoite 2 роки тому +4

    सरपंच तुम्हाला काम करताना पाहून खुप छान वाटते. अतिशय निरागस अभिनय करता तुम्ही.

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 2 роки тому +32

    तुमच काम खुप चांगल आहे सरपंच...तुम्ही प्रत्येक भागात असायला हव... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या तुमच्या मुलाकडून खुप खुप शुभेच्छा

  • @subhashsadamate3070
    @subhashsadamate3070 2 роки тому

    सरपंच लै भारी तुमचा अभ्यास खूप आहे तसा स्वभाव पण आहे ,आई वडील असतील तर सारं जग जिंकता येत खूप भारी वाटलं असच मनोरंजन करत रहा

  • @chandrakantmali183
    @chandrakantmali183 2 роки тому +55

    चांडाळ चौकडीच्या सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
    👑बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव फॅन्स क्लब..

  • @asentertainment.6590
    @asentertainment.6590 2 роки тому +2

    साधा आणि निर्मळ मनाचा माणूस... अशी माणसं भेटणे सुद्धा फार नशिबाचं काम आहे

  • @sachinnalawade6752
    @sachinnalawade6752 2 роки тому +5

    नेवसे सर आपला हा प्रवास खुपचं संघर्ष मय आहे. आपण या सर्व अडचणी वर मात करत अवघा महाराष्ट्र आपण हासवत आहात. याचा सार्थ अभिमान आहे सर .असाच अवघा महाराष्ट्र हसवत ठेवा हिच शुभेच्छा

  • @user-zy5kq6bd5s
    @user-zy5kq6bd5s 4 місяці тому +1

    बेस्ट सरपंच

  • @hanumantmore8246
    @hanumantmore8246 2 роки тому +4

    खुप छान नेवसे सर आम्ही नेहमी किर्तना मधुन सांगतो माय बाप केवळ काशी तेणे न जावे तिर्थशी आपली स्टोरी (कथा ) छान होती

  • @pramodvedpathak5260
    @pramodvedpathak5260 2 роки тому +4

    सरपंच सुदाम नेवसे खूप छान मुलाखत दिली खुप शुभेच्छा

  • @yuvrajpatil7681
    @yuvrajpatil7681 2 роки тому +3

    लेट हाय पण.थेट हाय....
    सुदाम साहेब सलाम तुमच्या जिद्दीला....

  • @pratapwaghmode8116
    @pratapwaghmode8116 2 роки тому +2

    खरंच सरपंच डोळ्यातून पाणी आले तुमचा जीवन प्रवास

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 2 роки тому +3

    सरपंच साहेब आपण खरेच ग्रेट आहात. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @ravikantkoli9756
    @ravikantkoli9756 2 роки тому +4

    लेट आहे पण थेट मिळाले नेवसे साहेब.
    पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

  • @navnathraykar3610
    @navnathraykar3610 2 роки тому

    nevse sir....tumhi aamchyasathi khup mothe aahat....bollywood chya heronna kaay karta

  • @nandkishorpatil6161
    @nandkishorpatil6161 2 роки тому +1

    सरपंच तुमी वेबसिरीजमधे दिसत नाहीत तुमी वेबसिरीजमधे या तुमचे कॉमेडी बोलने खुप छान आहे

  • @vishalbhumkar2018
    @vishalbhumkar2018 2 роки тому +1

    ग्रेट अभिनय सरपंच साहेब . तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे .

  • @tanajiborhade3453
    @tanajiborhade3453 2 роки тому +2

    ही मालिका सर्व कलाकारांवर अवलंबून आहे आणि प्रत्येकाचा त्यात खारीचा वाटा आहे

  • @vrashiketgapat2523
    @vrashiketgapat2523 2 роки тому +1

    Best saheb

  • @mohanthakare3277
    @mohanthakare3277 2 роки тому +8

    खरच खूप साधा सरळ आणि प्रामाणिक वेक्तीमत्व, सलाम तुमच्या कार्याला सर 🙏💐

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +39

    सरपंच साहेब तुम्ही का दिसतं नाही एपिसोड मध्ये ❤️❤️

  • @Abhi_Patil..
    @Abhi_Patil.. 2 роки тому +2

    जीवनात माणसाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो...खूप छान नेवसे साहेब..पुढ्च्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....💐💐

  • @dnyaneshwarmohan9690
    @dnyaneshwarmohan9690 Рік тому

    नेवसे साहेब तुम्ही आणि संजू मेबर छान काम करता

  • @vinod5494
    @vinod5494 2 роки тому +7

    संघर्ष केल्या शिवाय काय मिळत नाही.... प्रत्येक ला संघर्ष अटळ आहे .......खूप छान सरपंच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +6

    खरंच खूप साधा आणि सरळ स्वभाव आहे.
    सरपंचांना डावलू नये,ही टीमला विनंती.❤️🙏🏻

  • @mr.gabbargade7
    @mr.gabbargade7 2 роки тому +13

    सामान्य माणूस ते वेबसिरीजचे स्ंरपच तुमचा प्रवास प्रेरणादाई आहे.असेच आमचे मनोरंजन करत राहा, सरपंच तुमच्या सारखे व्यक्तीमत्व महाराष्ट्रातील प्रत्येक गावात असायला हवे तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @yograj3729
    @yograj3729 2 роки тому +7

    माझी गोष्ट याच्या माध्यमातून प्रत्येक पात्राच्या पडद्या मागील व्यक्ती भेटली याचा मनस्वी आनंद झाला आज माननीय सरपंच यांच्यातला मिमिक्री कलाकार कळाला हीच मिमिक्री कला चांडाळ चौकडीत पहायला आवडेल

  • @ranjitkumbhar7179
    @ranjitkumbhar7179 2 роки тому +3

    अभिनंदन नेवशे सरपंच पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 роки тому

    सरपंच तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये असायला पाहिजे तुमच्या आणि संजु मेंबरच्या विरोधक जुगलबंदिला मिस करतो आम्ही संजुला तुमची साथ पाहिजे

  • @pranaydimber1796
    @pranaydimber1796 2 роки тому +10

    बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव,पाटील,सरपंच ,संजू शेठ ,गणा, उज्जैन ,यापैकी एकपण कलाकार नसेल तर उणीव भासते ,हरहुन्नरी कलाकार , इतकं मनोरंजन ,बॉलिवूड मधून पण होत नाही तुमची टीम खूप हरहुन्नरी आहे all the best 👍and, thanks for entertainment .

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 2 роки тому +15

    "माझी गोष्ट" मध्ये आज सरपंचाचा आणखी एक गुण दिसला तो म्हणजे त्यांनी निळू फुलेंच्या आवाजात केलेली मिमिक्री,सरपंच तुम्ही खुपच छान आवाज काढला,तुमची मिमिक्री छान आहे.
    सरपंच तुम्ही ह्या आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शनला (बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव)कधीच सोडून जाण्याचा विचार करू नका,आज ह्या वेबसिरिजच्या माध्यमातून तुमचं नाव महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुद्धा निघतय,तुम्ही "लेट हाय पन थेट हाय"ह्या एका डायलाँगने प्रसिद्ध झालाय. काही कलाकार पैशासाठी काम करतात तर काही कलाकार फक्त प्रसिद्धी झाली तरी त्याचं मोल मिळालं ह्या भावनेतून काम करतात,माणसाने "मरावे परि किर्ती रूपे ऊरावे" ह्या उक्तीप्रमाणे जगावं,ज्या माणसांची कर्म चांगली असतील त्याला फळं सुद्धा चांगलीच मिळतात.सरपंच तुमची कर्म चांगलीच आहेत,तेंव्हा तुम्हाला अजून खुप नावलौकिक मिळणार ह्यात शंका नाही.खरच "आपली गोष्ट"च्या माध्यमातून प्रत्येक कलाकारांची व्यथा,त्यांचं वैयक्तीक जीवन कशा प्रकारचं आहे,हे आम्हा रसिक प्रेक्षकांना समजतय,पहायला मिळतय,मि धन्यवाद देतो आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शनला की,आपन सर्व कलाकारांचे खरं आयुष्य काय आहे, हे दाखविण्याचा खुप प्रामाणिक प्रयत्न केलाय.
    आपल्या सर्व कलाकारांना व टिमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🌹🌹
    अनिल (नाना) जगताप
    हडपसर गाव,पुणे २८💞💞💞

  • @ashokpatole2979
    @ashokpatole2979 2 роки тому +2

    सरपंच नेवसे खरंच एक द म भोळे आणि मनमिळाऊ माणूस आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @shivajisatpure7140
    @shivajisatpure7140 2 роки тому +4

    आम्हा सर्व प्रेक्षकांना तुमच्या टिमचे तेच कलाकार म्हणून आम्ही बगतो. आता कलाकार बदलू नका ही विनंती. नेवसे सरपंच तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये दिसत नव्हते. तुमचा संजू मेंबर मेला असताना तुमी आले नाही. तरी तुमची सुद्धा ह्या वेबसेरिजला गरज आहे तुम्ही उत्तम कलावंत आहात. सर्व टीमला शुभेच्छा 🌹असंच आम्हा प्रेषकांना हसवत राहा.......... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rohitpatil3587
    @rohitpatil3587 2 роки тому +3

    मस्त माणूस राव निवसे सरपंच.....👌👌👌

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 2 роки тому +2

    सरपंच तुमचे अनुभव संघर्ष मय आहेत. तरी आपण या सर्व परिस्तिथी वर मात करून कला क्षेत्रात वेगळा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अभिमान आहे.

  • @siddhupawar5148
    @siddhupawar5148 2 роки тому +4

    निळू फुले यांच्या आवाजात बोलला भारी वाटला

  • @user-sm1dt4eb3i
    @user-sm1dt4eb3i 2 роки тому +31

    खरचं खूप छान माझी गोष्ट ..
    मनमोकळा माणूस( सुदाम नेवसे.). मनमिळाऊ आणि निस्वार्थी माणूस आमचे मित्र व गुरुवर्य नेवसे सर .. आम्हाला आपला खूप अभिमान आहे.

    • @shantaramparkale5024
      @shantaramparkale5024 2 роки тому +1

      सरपंच तुम्ही लय ग्रेट आहे राव सलाम तुमच्या कार्याला

  • @milindbhopale8994
    @milindbhopale8994 2 роки тому +1

    नेवसे साहेब
    जीवनात खुप संघर्ष केला व जीवन सार्थक ठरले.
    फक्त हे पहाण्यासाठी आई-बाबा हवे होते!
    तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 роки тому +1

    सरपंच साहेब तुमची शेती खूप छान आहे ...एक नियोजन चांगलं केल आहे तुम्ही शेतीचे ..आज तुमचे आई वडील नाही राहिले पण त्याना तुमचा नेहमी अभिमान च असेल ...प्रामाणिक पपणे तुम्ही चांगलं काम करत आहे।आज तुमची देशभर चांगली सरपंच म्हणून ओळख आहे शिवाय तुम्ही शिक्षित आहात ...खरंच चांडाल चौकडी।सर्व मान्यवर यांचे कौतुक करावं तितकच कमी great work all team

  • @shekharmore_sm5486
    @shekharmore_sm5486 2 роки тому +2

    खरा माणूस तो म्हणाजे सुदान नेवसे
    करच कटा आला राव अंगावर
    पण तुम्ही मागल्या भागात आला नाही
    सज्य मेलेल्या सीन मध्ये दिसायला हवे होते

  • @satishpomane5132
    @satishpomane5132 2 роки тому +2

    सरपंच साहेब तुमच काम खूप चांगल आहे आणि तुम्ही प्रत्येक एपिसोड मधे दिसायला हव तुम्ही मागील दोन,तीन एपिसोड मधे दिसला नाहीत एपिसोड पाहत असताना काय तरी चुकल्या सारख वाटायच. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏💐💐🙏🙏

  • @yogeshghuge4501
    @yogeshghuge4501 2 роки тому +2

    खुप छान असतो तुमचा अभिनय एक दम ओरिजनल
    खुप अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या सारख्या माणसांचा
    सरपंचाचे पात्र खूप शोभून दिसते तुम्हाला
    आणि तुमचा डायलॉग खूप आवडतो मला
    गावचा सरपंच आहे मी
    लेट आहे पण थेट आहे

  • @ajaynavgire5617
    @ajaynavgire5617 2 роки тому +3

    माझा सगळ्यात आवडता नट सरपंच -सुदामराव💯🙏💓😇

  • @atulbhoite3247
    @atulbhoite3247 2 роки тому +1

    लेट आहे पण थेट आहे सरपंच आहे मी गावचा.
    खुप छान मस्त आपणास पुढिल वाटचालीस अनंत शुभेच्छा पत्रकार सुदाम नेवसे साहेब💐💐👍👍

  • @rayakalbhor1548
    @rayakalbhor1548 2 роки тому +4

    सरपंच नेवसे तुमचा अभिमान वाटतो, पुढील वाटचालीस शुभेच्छा.....👍

  • @NarendraRajput-ud5qv
    @NarendraRajput-ud5qv Місяць тому

    Proud of you, manpurvak subhechha 🎉❤

  • @gneshtorne2946
    @gneshtorne2946 2 роки тому

    सरपंच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @newmaharashtra.
    @newmaharashtra. 2 роки тому

    Tumchya saglya team la khup khup suveccha

  • @randhirhatkar5981
    @randhirhatkar5981 Рік тому

    Sarpanch 😘😘Kupch barhi bolta

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 роки тому

    हार्दिक स्वागत सरपंच साहेब

  • @devrayadevalakade.5558
    @devrayadevalakade.5558 2 роки тому +2

    खरचं सर तुम्ही भारी आहात..कारण " श्री शहाजी हायस्कूल" मध्ये शिकत असताना ही खूप मदत झाली होती.. आणि वेब सिरीज मध्ये ही खूप छान काम आहे.

  • @santoshmetkari5702
    @santoshmetkari5702 2 роки тому +2

    🙏🙏एक नंबर सरपंच 🙏🙏तुमच्या भावी वाटचालीस आमच्या लेट पण थेट शुभेच्छा 👍👍👍👍

  • @pramodkharade5654
    @pramodkharade5654 2 роки тому

    साधा प्रामाणिक आणि निरागस माणुस...

  • @aappanimbalkar4535
    @aappanimbalkar4535 2 роки тому +1

    सुदामराव सरपंच पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌🙏🙏🌹

  • @rahulgole36
    @rahulgole36 2 роки тому

    छान सरपंच साहेब 👌👌

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 2 роки тому +10

    चांडाळ चौकडी मधिल एक खास भुमिका सरपंच सुदामराव नेवसे

  • @umeshadale2944
    @umeshadale2944 2 роки тому +1

    खुपचं मस्त नेवसे साहेब तुम्ही खुपच संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलात तसेच यापेक्षा ही उत्तुंग भरारी घेण्यासाठी खुप खुप शुभेच्छा जसं तुम्ही चांडाळ चौकडी चा करामती टीम ला आपलं सर्वस्व मानता तसेच आम्हाला पण प्रत्येक कलाकार हा आमचा घरातील च व्यक्ती वाटतो तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती तुम्ही फक्त तुमचा मधे मतभेद होऊ देऊ नका तुम्ही एकीने रहा सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचा प्रत्येक एपिसोड ची आम्ही खुप वाट पाहत असतो तुम्हाला परत एकदा खुप खुप शुभेच्छा

  • @prakashhirave2182
    @prakashhirave2182 2 роки тому

    सुदामराव खरच आज बापू असते तर कायचे काय आनंद झाला असता त्यांना . कलाकाराला संधी मिळाली तर त्याचे सोने करणारा मनस्वी कलाकार म्हणजे आमचे सुदामराव नेवसे. सुपेकरांचाअभिमान.

    • @sudamnevase3450
      @sudamnevase3450 2 роки тому

      धन्यवाद,गुरुवर्य

  • @sandipkaranke5830
    @sandipkaranke5830 2 роки тому +12

    सुदामराव सर ग्रेट तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @mahaveerminitransport796
    @mahaveerminitransport796 2 роки тому +2

    नऊशे साहेब अभिनंदन आपल्या संघर्षासाठी. आपण या संघर्षातून असेच प्रगती करत जावे हीच सदिच्छा

  • @shikshasharada2541
    @shikshasharada2541 2 роки тому +1

    तुमचा संघर्ष खुप मोठा आहे सर ,पण तुमच्यातील जिद्द ,चिकाटी ,मेहनती स्वभाव आणि मनमोकळेपणा व कलाकारी वृत्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवणार यात शंकाच नाही. भावी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @digambarkatkar5743
    @digambarkatkar5743 2 роки тому

    पुढच्या वाटचालीस तुम्हाला सरपंच शुभेच्छा

  • @amolbhujbal5460
    @amolbhujbal5460 2 роки тому

    सरपंच नेवशे हा फार साधा माणूस आणि खरा आहे .... नेऊशे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणी सरपंच तुम्ही प्रत्येक भागात यायला हव..‌.

  • @sgofficialmusic8096
    @sgofficialmusic8096 2 роки тому +20

    संघर्ष हा कधीच संपत नसतो ♥️

  • @mayur...
    @mayur... 2 роки тому

    संजूशेठ किंगमेकर फॅन क्लब💥

  • @greencriminal8073
    @greencriminal8073 2 роки тому

    सरपंच खाजगी जीवनात ही वेबसिरीज मधील पात्रानुसार साधा आणि सरळ आहे

  • @user-jp7ml5fw7f
    @user-jp7ml5fw7f 2 роки тому +2

    चांडाळ चौकडी चे च सरपंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे सरपंच आहे तुम्ही नेवसे सर

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 2 роки тому +2

    आपला संजू मेला होता सरपंच तुम्ही कुठे होता सरपंच

  • @sandipkumbhar9884
    @sandipkumbhar9884 2 роки тому +10

    गेल्या काही भागात दिसले नाहीत पुढील भागात दमदार प्रवेश व्हावा . तसेच दिपकची कला ईतकी चांगली नाही जरा विचार व्हावे तसेच हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vhilanrohidaschavan
    @vhilanrohidaschavan 2 роки тому +1

    सर्वच कलाकार अप्रतिम अभिनय करत आहेत, मी तुमचे सर्व एपिसोड आवर्जून पाहतो खूप छान आहे वेब सिरीज प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकायला भेटते, सर्वांना मनापासून प्रेम पुढील वाटचालीस शुभेच्छा......

  • @samadhanc2000
    @samadhanc2000 2 роки тому +13

    Aanaa bolta haii vr case kara.... ❤

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 2 роки тому +1

    ब्रँड माणूस नेवसे सरपंच

  • @kiranlawand6765
    @kiranlawand6765 2 роки тому +29

    गेल्या दोन भागात सरपंच साहेब दिसले नाहीत का कुठे गेले होते

  • @nivruttimore.2127
    @nivruttimore.2127 2 роки тому +1

    लेट हाय पण थेट है

  • @shantilalkadale1844
    @shantilalkadale1844 2 роки тому +1

    सरपंच साहेब तुम्ही खूप मेहनत घेतली आहे सर मला तुमच्या बद्दल खूप अभिमान वाटतो ग्रेट आहेत तुम्ही आणि तुमचे काम

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 2 роки тому +4

    सुदाम राव यांना प्रत्येक भागात दाखवलं पाहिजे यांच्या शिवाय वेब सिरीज मध्ये मजा नाही 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sanjayphapale6965
    @sanjayphapale6965 2 роки тому

    तुमचे काम खूप छान असते

  • @sarthakbhosale4505
    @sarthakbhosale4505 2 роки тому

    गावचे प्रथम नागरिक उत्तम काम करता
    तुमच्या अभिनयाला सलाम😘👌💯💯💯💯💯

  • @sushilkharat5514
    @sushilkharat5514 2 роки тому +1

    निळु भाऊचा आवाज खूप छान काडला तुमी
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @akshaymalve2876
    @akshaymalve2876 2 роки тому +2

    पशु पशु पक्षी प्राणी चिमणी पाखरे महा एपिसोड करण्यात यावा अशी रामभाऊ आपणास विनंती आहे...आपणास माझी

  • @amhisatarkar6157
    @amhisatarkar6157 2 роки тому +1

    लेट हाय पण थेट हाय सरपंच सुदाम नेवसे

  • @relaxelectech8056
    @relaxelectech8056 2 роки тому

    लेट हाय पन थेट हाय नेवसे सरपंच.

  • @sachinchoramle6112
    @sachinchoramle6112 2 роки тому +3

    सरपंच साहेब नमस्कार 👍❤️👍

  • @dr.sandipbachkar3937
    @dr.sandipbachkar3937 2 роки тому

    खरा गावातील हिरो शोभतात सरपंच साहेब 😍😍❤️

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 роки тому +1

    नेवासे सर, आपण खरचं महान आहात आपल्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आपणा जी भुमिका करता तीला थोडी ग्रे शेड असल्याने आम्ही आपणास दुर्लक्षित केले होते पण तीच तुमच्या चांगल्या कामाची पोचपावती आहे असे मला वाटते. तसेच आपणास या वेबसिरीज मध्ये
    एकदम सरपंचाची भुमिका मिळाली. त्यामुळे भुमिका करताना आपल्या तोंडी असणारा संवाद "लेट हाय पण थेट हाय" हा खऱ्या अर्थाने सार्थक ठरतो.हा आपल्या साठी योगायोग असावा.
    बाकी माझी गोष्ट या मधून आपल्या कलाकारांचे
    अंतरंग किंवा कलाकाराची दुसरी बाजू आपल्या चाहत्यांना कळते माहिती पडते.त्यामुळे आपल्या गावरान फिल्म चे सर्व कलाकार आम्हाला जवळचे आमच्यातील एक आहात असे वाटते.
    सिनेमा ने जेवढी प्रसिद्ध मिळते त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने आपल्या प्राॅडक्शन ला आणि त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला अल्पावधीतच
    मिळाली आहे.आणि हेच खरे यश आहे.
    आपणास आणि आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @shaileshc007
    @shaileshc007 2 роки тому

    💥💥💥💥💥Sarpanch 💥💥💥💥💥

  • @rahulthorat9761
    @rahulthorat9761 2 роки тому +4

    सरपंचांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @CriptoInformationFor_Beginners
    @CriptoInformationFor_Beginners 2 роки тому +1

    चांडाल चौकडी मध्ये तुम्ही काम करून खूप मोठे झाला आहे

  • @bhimraokamble5583
    @bhimraokamble5583 2 роки тому +5

    संघर्ष हेच यशाची पायरी असते तुमची जीवन कथा ऐकून चांगल वाटले जय भीम जय महाराष्ट्र

  • @shreyastatus2397
    @shreyastatus2397 2 роки тому +7

    लेट आहे पण थेट आहे.♥️❤️❤️❤️

  • @akshay2125
    @akshay2125 2 роки тому +2

    सरपंच साहैब तुम्ही आसेच काम करत रहा तुम्हाला ईश्वर काही ही कमी पडु देणार नाही तुम्ही आसेच आम्हाला हसवत रहा तुम्हाला ‌व तुमच्या टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🔥🔥🔥
    शुभेच्छुक:- Drx.Akshay Suresh Doke. Jalna Maharashtra India 🇮🇳🙏🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 роки тому

    सरपंच.मस्तच.