रणजीत निंबाळकरांची जगण्याची लढाई संपली, काकडे कुटुंबावर खुनाचा चा गुन्हा दाखल होणार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #baramati #bakasur#sundar#mathur #bakasur #bailgada #bailgada_sharyat_official #bailgadasharyat
    निंबूत गोळीबार प्रकरण : सुंदर बैलाच्या व्यवहारात गोळीबार झालेल्या रणजीत निंबाळकर यांची जगण्याची लढाई संपली! आता गौरव काकडे गौतम काकडेवर होणार खुनाचा गुन्हा दाखल!
    काल मध्यरात्री 11:00 वाजल्यानंतर ते आज पहाटेपर्यंत बारामती तालुक्यात मोठी खळबळजनक घटना घडली. बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेले ट्रिपल महाराष्ट्र हिंदकेसरी गौतम काकडे यांच्या घरी बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    काल रात्री अकराच्या सुमारास गौतम शहाजी काकडे यांच्या घरी निंबूत येथे बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून गौतम काकडे यांचा भाऊ गौरव याने फलटण येथील सुंदर बैलाचे मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात गेल्याने निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
    या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर स्वामी विवेकानंद नगर फलटण यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता या घटनेतील जखमी निंबाळकरांचे निधन झाल्याने हा गुन्हा आता खुनाचा गुन्हा म्हणून रूपांतरीत होईल.
    याप्रकरणी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबूत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला.
    यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये 27 जून 2024 रोजी देऊन हा व्यवहार स्टॅम्पवर लिहून देण्याचे ठरले होते. व्यवहार करताना आपण समक्ष हजर होतो, असे रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबूतला नेला.
    27 जून 2024 रोजी सकाळी 11 म च्या सुमारास रणजीत निंबाळकर व संतोष तोडकर हे गौतम काकडे यांच्याकडे बैलाच्या व्यवहाराची चर्चा करण्यासाठी निंबूत येथे गेले होते. त्यांच्याशी चर्चा करून रणजीत निंबाळकर परत फलटण येथे दुपारी दोन वाजता पोहोचले, तेव्हा त्यांनी गौतम काकडे हे आपले बैलाचे राहिलेले पैसे न देता, तुम्ही स्टॅम्पवर सही करा असे म्हणत होते, मात्र मी पैसे दिल्याशिवाय सही करणार नाही असे म्हणून परत आलो आहे असे त्यांनी सांगितल्याचे अंकिता निंबाळकर यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.
    दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर, दहा महिन्यांची मुलगी अंकुरण, नातेवाईक वैभव भारत कदम आणि पिंटू प्रकाश जाधव हे चारचाकी गाडीतून निंबूत येथे निघाले होते. लोणंद येथे आल्यानंतर संतोष तोडकर हे थांबले होते. संतोष तोडकर हे रणजीत निंबाळकर यांना म्हणाले, सर, तुम्हाला या व्यवहाराचे पूर्ण पैसे दिले आहेत, तुम्ही सही का केली नाही? त्यावर रणजीत निंबाळकर यांनी आम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळाले, बाकी पैसे अजून गौतम काकडे यांनी दिले नाहीत असे सांगितले.
    त्यावेळी संतोष तोडकर यांनी मला गौतम काकडे यांनी तुम्हाला पूर्ण व्यवहाराची रक्कम दिल्याचे व व्यवहार पूर्ण केल्याचे सांगितले आहे, असे म्हणून संतोष तोडकर त्यांच्या गावाकडे निघून गेले. त्यानंतर गौतम काकडे यांनी 32 लाख रुपये नेण्यासाठी बोलवल्याने त्यांच्या घरी निंबूत तेथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर व त्यांचे नातेवाईक वैभव कदम व पिंटू जाधव हे पोचले.
    त्यावेळी त्यांच्या घरी आल्यानंतर गौतम काकडे व हे सर्वजण घराजवळील अंगणात बाजेवर बसले होते, तेव्हा गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत, असे का सांगितले? तुम्ही असे बोलायला नको होते, मी तुम्हाला सकाळी पैसे देतो, तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे सांगितले.
    त्यावेळी रणजीत निंबाळकर यांनी माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल, तर तुमचे पाच लाख रुपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल परत द्या असे सांगितले. त्यानंतर सगळे गाडीकडे निघाले, त्यावेळी गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना, तू बैल कसा घेऊन जातो तेच मी बघतो, असे म्हणून त्यांनी फोन लावून पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले.
    त्यानंतर त्यांनी गौरव यास देखील फोन करून बोलावून घेतले गौरव व अनोळखी तीन मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे परत आले व गौतम काकडे यांनी गौरव व त्या अनोळखी तीन मुलांना, या सराला मारा लय बोलतोय हा असे म्हणाले. त्यावेळी गौरव च्या हातात काठी होती. ती काठी गौतम काकडे यांनी घेऊन तो मारण्यासाठी रणजीत निंबाळकर यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केली. त्यावेळी वैभव कदम हे गौतम काकडे यांना तुम्ही वाद घालू नका आपण उद्या व्यवहार चर्चा करू असे सांगत अडवत होते.
    अनोळखी तीन जण शिवीगाळ करत असताना गौरव याने तू बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाही असे म्हणून त्याच्याकडे असणाऱ्या पिस्तूल मधून रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात एक गोळी झाडली. गोळी लागताच रणजीत निंबाळकर खाली पडले. त्यानंतर गाडीतून रणजीत निंबाळकर यांना वाघळवाडी व तिथून बारामतीतील भोईटे हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

КОМЕНТАРІ • 280

  • @Akki0512
    @Akki0512 3 місяці тому +158

    किती पण अजित पवारांच्या जवळचा असला तरी गौतम काकडे वर कारवाई झाली पाहिजे

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr 3 місяці тому +113

    मी स्वता बैलगाडा मालक आहे पण आता माझी ईच्छा नाही बैलगाडा शर्यत चालू होयला नको बंदी आली पायजे असे कीती तरी बळी जातात चांगल्या माणसाचे कीती तरी अपघात होतात नाद वाईट वळणावर चाला आहे मी स्वता अर्ज करणार आहे राष्टपतीला लेटर पाठवून बंदी आणायला सांगणार आहे,,
    अजुन कीती बळी जाणार असेच आम्ही बघू शकत नाही,,,

    • @navnathmazire4626
      @navnathmazire4626 3 місяці тому +4

      आमची सहमती आहे तुमच्या या मताला...

    • @darshankatkar9370
      @darshankatkar9370 3 місяці тому +3

      लवकरात लवकर करूया

    • @akshaywankar1935
      @akshaywankar1935 3 місяці тому +12

      Tu lai shana ahes
      Khup lokancha udar nirwahache sadan ahe sharyat shetra
      2-4 kharab lokanmule purn shetra kharab hot nahi

    • @DigmabarPawar-od5pk
      @DigmabarPawar-od5pk 3 місяці тому

      ​@@akshaywankar1935 💯👍🏻

    • @anilchaugule7141
      @anilchaugule7141 3 місяці тому

      सदैव मनात राहतील सर.

  • @anilbodke662
    @anilbodke662 3 місяці тому +2

    असा माणूस परत होणार नाही, भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @rajuchavan8602
    @rajuchavan8602 3 місяці тому +8

    खुप वाईट वाटत
    Miss you sir 😢

  • @DHANANJAYPARKHE-qm3tc
    @DHANANJAYPARKHE-qm3tc 3 місяці тому +21

    शर्यत क्षेत्रातील एक हसमुख चेहरा निंबाळकर सर 😢😢😢

  • @prashantgangurde7590
    @prashantgangurde7590 3 місяці тому +3

    खरच परखड आणि खरं बोलणारा आनंदी व्यक्ती बैलगाडा क्षेत्रात आला आणि त्याचा शेवट झाला...हे क्षेत्र खरं बाहेरून वाटत तितक सोपं नाही

  • @hanmantjadhav-sx1mg
    @hanmantjadhav-sx1mg 3 місяці тому

    बैलगाडी शर्यतीतील माणसाचा चेहरा आपल्या पासून दुरावला 😢😢😢

  • @KailasnathEkke2007
    @KailasnathEkke2007 3 місяці тому +3

    माजलेल्या काकडे घराण्याला फशी झाली पाहिजे

  • @asadkhanmujawar2310
    @asadkhanmujawar2310 3 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @jaykunkeshwar_konkan_Kashi
    @jaykunkeshwar_konkan_Kashi 3 місяці тому

    गोळीबार करून बैलगाडा शर्यत क्षेत्राला गालबोट लावणाऱ्या प्रवृत्तींना बैलगाडा क्षेत्रातून कायमचं हद्दपार करावं

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 3 місяці тому +2

    आज पासून बैलगाडा शर्यत बगणार नाही... जे झालं ते खूप बेकार झाला..

  • @vidhyalakade4351
    @vidhyalakade4351 3 місяці тому

    गौत्याला शिक्षा झाली पाहिजे 😢

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 3 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @tushardimble4850
    @tushardimble4850 3 місяці тому +2

    दिलदार मनाचा राजा माणूस 🫡

  • @Lonkaryogesh909
    @Lonkaryogesh909 3 місяці тому

    परंपरा टिकावी म्हणुन चालु झालेली बैलगाडा शर्यत जर पुढे जावुन बैलांपेक्षा मोठा माणुस प्रतिष्ठेचा होत असेल आणी त्यातुन माणसांचा जिव जाणार असेल तर
    शर्यंत बंदी झाली तर काहीच चुकीच नाही

  • @VaibhavPachundkar-vf7jc
    @VaibhavPachundkar-vf7jc 3 місяці тому

    Sirancha swabhav nadla bhavpurn shradhnjali sir khup bhole and sadhe hote

  • @karanbhoir2971
    @karanbhoir2971 3 місяці тому

    ते दोघ व्यापारी आहेत शर्ती च नाव काढलं घेता तुम्ही

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 3 місяці тому

    hi asali jati kapun kadha bailgada sharyat kuthe neli tya gautya ne

  • @sachinjadhav-xq8ey
    @sachinjadhav-xq8ey 3 місяці тому

    Gunegharani faqt ekach kutumb nahi tar tyanchya acadamy madhe shiknare vidyarthi yanchi pan vat bikat keli ahe

  • @mangeshshelke6792
    @mangeshshelke6792 3 місяці тому +2

    Gautam la jalma thhep jali pahije gautam sharyat shatarala kalima hahe tyache mule sharyat shatra la dag lagala jato

  • @PrathameshPatil-xj4qb
    @PrathameshPatil-xj4qb 3 місяці тому

    Tyala mothyat mothi shiksha zalich pahije

  • @mayurgayakwad1001
    @mayurgayakwad1001 3 місяці тому

    Miss you king 😢😢

  • @Picturesquare85
    @Picturesquare85 3 місяці тому

    RIP SIR RIP BAILGADA SHARYAT🙏

  • @mrindiananimation871
    @mrindiananimation871 3 місяці тому

    तुम्ही बातम्यावाले हे पाहा तो त्यांचा वाद होता उगच ह्यात बैल गाडी क्षेत्राला बदनाम करू नका आणी सुंदर बैलाला 🙏🏻🥺

  • @suryakanthpatil730
    @suryakanthpatil730 3 місяці тому

    आरोपीला जन्मठेपेची शीकशा न्यायाने द्यावी

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 3 місяці тому

    ase ajun lay kutri ahet mothe mothe malak mhnun ghenare

  • @manojjadhav4792
    @manojjadhav4792 3 місяці тому +70

    गौत्याला सोडू नका . हाराम कोराचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.

  • @abhijitjagtap2806
    @abhijitjagtap2806 3 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @ganeshdada4335
    @ganeshdada4335 3 місяці тому +90

    काकड्या बैल गाडा प्रेमी शौकिनांच्या मनातून उतरला.....

  • @pandurangshinde4039
    @pandurangshinde4039 3 місяці тому +49

    गौतम काकडे च एन्काऊंटर करा सरकार कडे विनंती 😢😢

  • @shreedhartavate9656
    @shreedhartavate9656 3 місяці тому +71

    गौतम काकडे वर कायमस्वरूपी बॅन अना

    • @sagarwaghmare416
      @sagarwaghmare416 3 місяці тому +1

      बॅन नाही भाऊ कडक शिक्षा झाली पाहिजे

    • @Prasad1204SQRQZQ
      @Prasad1204SQRQZQ 3 місяці тому

      बरखास्त तर झालाच पाहिजे पण फाशी झाली पाहिजे तेव्हाच परत अस काही घडणार नाही...

  • @Samyyyyyyy307
    @Samyyyyyyy307 3 місяці тому +68

    बैलगाडा क्षेत्रातील सच्चा माणूस हरपला. RIP SIR🥀🥺

    • @vishuking1995
      @vishuking1995 3 місяці тому +1

      Are baba jivant ahe

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 3 місяці тому

      off zale sir sodun gele aaplya la🥺😭😭😭😭😭😭🥺🥺​@@vishuking1995

    • @santoshshete-wr1jo
      @santoshshete-wr1jo 3 місяці тому

      ​@@vishuking1995 गेले रे बाबा सर

  • @nirajmore4160
    @nirajmore4160 3 місяці тому +31

    गौतम काकडे यांना बैलगाडी शर्यतीतून बंदी घातली पाहिजे

  • @KaustubhBansode
    @KaustubhBansode 3 місяці тому +113

    माणूस किती पण मोठा पैशेवाला असुद्या कायद्या पुढ कोणीच मोठं नाही भैया आणि त्याचा भावाला शिक्षा ही झाली च पाहिजेत

    • @sankukawale5288
      @sankukawale5288 3 місяці тому +2

      💯

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 3 місяці тому +13

      Kaydya pekshya motha Paisa ahe
      Udaharan:- porche case

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 3 місяці тому +3

      Social media ver porche case badal aga nasti lagli tar tyacha divshi case close zali asti Easse lihun.

    • @vijaymulik5531
      @vijaymulik5531 3 місяці тому +3

      Kakade la kahi honar nahi . Paise deun dabanar case. Police lokana paise bhetale manaje zale

    • @SachinLongale
      @SachinLongale 3 місяці тому +3

      10 हजार रुपये च्या वर बक्षीस ठेवता येणार नाही. नियम ठेवा हे आपोआप बंद होईल

  • @vaibhavtaware5170
    @vaibhavtaware5170 3 місяці тому +19

    लायकी नाय तर बैल ग्याचा नव्हता गवत्या. भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 3 місяці тому +15

    बैलगाडा क्षेत्रातील परखड विचार मांडणारे
    सर्जा सुंदर चे मालक हरपले
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shreyas3727
    @shreyas3727 3 місяці тому +37

    गौतम काकडे तू कधी फक्त एकटा बाहेर पड सांगतो काय हे ते एक रणजित सर प्रेमी❤

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 3 місяці тому +2

      Kahi karu shaknar nahi bhava tulacha choptil javl gelas tar 😢

    • @Sharyatlover0563
      @Sharyatlover0563 3 місяці тому

      भावा घरी बोलून कोणीही मारू शकतो इकडे मुंबई मध्ये असे लय ठोकलेत आमच्याकडे भाईलोक​@@BlackFace_0

  • @Akki0512
    @Akki0512 3 місяці тому +25

    भैया नाही आरोपी बोला 😡

  • @ChayaKadam-r6w
    @ChayaKadam-r6w 3 місяці тому +2

    कोणता दादा मध्ये पडला तरी सोडू नका त्याला फासावर द्या

  • @santoshabhang9899
    @santoshabhang9899 3 місяці тому +5

    चौकातून गाढव दिंडी काढली पाहिजे गौतम पाटलाची

  • @chandrakantyedage7154
    @chandrakantyedage7154 3 місяці тому +10

    पारंपरिक धनदांडग्यांना आणि लबाड लोकांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @छंदमाझावेगळा
    @छंदमाझावेगळा 3 місяці тому +1

    तुम्ही व्हिडिओ बनवताना कृपया या गोष्टीचा विचार करा की हा माणसांचा वाद आहे यामध्ये तुम्ही बैलाला दोषी ठरवू शकत नाही त्यामध्ये सुंदर ची काय चूक आहे तुम्ही व्हिडिओला Viwe वाढवण्याच्या नादामध्ये एखाद्या बैलाला दोषी ठरवून काय सांगायचंय

  • @ajijshaikh7652
    @ajijshaikh7652 3 місяці тому +1

    गौतम तूझी ऐपत नव्हती व्यवहार व्यवस्थित पणे पार पाडण्याची तर तू बैल घ्यायला नको होता व हा असला घानेरडा प्रकार करायला नको होता

  • @parshulokhande4989
    @parshulokhande4989 3 місяці тому +7

    हा व्यवहार live पण झाला असता पण घरातले संबंध म्हणून गांडवल सरांना always miss you sir 💐💐💐

  • @Neha4233
    @Neha4233 3 місяці тому +13

    Sarv ghar he 20 वर्षा sathi जेल madhe taka mulgi pan

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 3 місяці тому +2

      ​@Ganesh_12346 aata paise nay chalnar open jhala aahe sagla
      20 varsh jail hoil

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 3 місяці тому +2

      Pori la nko tichi kay chuki nay

    • @HSC_IT
      @HSC_IT 3 місяці тому +3

      निंबाळकर सर ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
      दोषी आहेत त्यंच्यबर कारवाई होणार .... सगळ्यात म्हतबचा गौरव काकडे सगळ प्रकरण स्वतःवर घेणार ... गौतम जामिनावर बाहेर येणार ....

    • @Neha4233
      @Neha4233 3 місяці тому +1

      @@Patil000kdgdjsi tychi pan मुलगी अनाथ zali bhau बाई विधवा zali kiti choti मुलगी hoti वर्षा chi काही पैशा mude एक जीव gela aahe to pan ghari boloun zal aahe sarv

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 3 місяці тому

      @@Neha4233 pan mulgi ghari naste mulgi baher aahe shikalyla

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 3 місяці тому +7

    शर्यत क्षेत्रात शेठ अनेक झाले, पन बैल गाडी क्षेत्रातील तुमच्या सारखे सर परत होने नाही, भावपूर्ण श्रद्धांजलि सर

  • @saurabhmagar08
    @saurabhmagar08 3 місяці тому +8

    सरांना न्याय मिळालाच पाहिजे #justicefornimbalkarsir

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 3 місяці тому +7

    खुप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली सर आरोपींना कठोर कारवाई झालीच पाहिजे 😢

  • @vinayakshinde3529
    @vinayakshinde3529 3 місяці тому +11

    तो भैया नाही तो खुनि आहे

  • @tushargodase6414
    @tushargodase6414 3 місяці тому +2

    व्यापारी थोडी आता मैदानात येणार आहे आला तर लय मारतील

  • @kaluramdangale9664
    @kaluramdangale9664 3 місяці тому +2

    बैलगाडा शर्यत ही पारंपरिक राहीली नाही,, शर्यत ही पैसैवाल्याने यांचा घोडेबाजार सुरू केला आहे, बैलगाडा शर्यत म्हणजे पैसा कमवायचा धंदा सुरू झाला आहे,

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 3 місяці тому +1

    Bailgadi sharyat atta band zalya pahijet bas zala

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 місяці тому +9

    Sarja& sunder
    Anikta ranjit nimbalakar 😭❤️

  • @aravindmane4033
    @aravindmane4033 3 місяці тому +3

    बैलाने काय केलंय तुला सारख सुंदर च नाव घेतोस त्या मुक्या प्राण्याने काय केलय जरा बातमी नीट सांग

  • @s.gamer1001
    @s.gamer1001 3 місяці тому +19

    सुंदर परत सरांच्या दावणीला आला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭😭

    • @sushildeshmukh761
      @sushildeshmukh761 3 місяці тому +1

      आता काय उपयोग आहे

    • @Mathur00099
      @Mathur00099 3 місяці тому +4

      Rahul Bhai aanar bg ani nana sarja sundar mathur gajavnar nav sir ch

  • @नितीनराठोड-छ8झ
    @नितीनराठोड-छ8झ 3 місяці тому +4

    गौतम काकडे कोणाच्या पाठीमागं लपून हे करतोय ते ओळखले पाहिजे

  • @SsSs-ee8xl
    @SsSs-ee8xl 3 місяці тому

    जास्त मोह चांगला नसतो.जिवंत उदाहरण आहे. सुंदर विकून नवीन मोठी खरेदी करायची होती. मोठी खरेदी मोठ नाव करायच्या नादात आज जिवाला मुखले. भाव पुर्ण श्रध्दांजली 😔

  • @dhaneshganjave284
    @dhaneshganjave284 3 місяці тому +2

    ह्या गोष्टी ला कारण पैसे. राजकीय सबंध, गुंडागिरी.मोठा इनाम, नावासाठी काही पण करणारी माणसे. आता बैलगाडा शेतकरी नाही राहिला. पैसे वाला आहे त्यांचा आहे. ह्या गोष्टी चे बळी ठरले आपले निंबाळकर सर. भावपूर्ण श्रदांजली 🙏🙏🙏🙏

  • @Akki0512
    @Akki0512 3 місяці тому +7

    त्याला भैया नाही आरोपी बोला

  • @madankhutwad5848
    @madankhutwad5848 3 місяці тому

    अरे माणसा त्या सुंदरचा ह्या प्रकरणात काय संबंध त्याने सांगितले का तू पैसे देऊ नको तर गोळ्या घाल , परत सुंदरला दोष देऊ नको , माणसांनी झक मारली ह्यात त्या मुक्या नंदीचा काय दोष...

  • @riverrichvillageresortrive7201
    @riverrichvillageresortrive7201 3 місяці тому +2

    सरांच्या सर्जा नी वेगाचा शेवट कधी केला नाय पन सरणा शेवट करावं लागलं मिस यू सर

  • @Karadkar_Ganya
    @Karadkar_Ganya 3 місяці тому +2

    अरे कॉमेंट चुकीच्या करू नका please 🙏🏻
    Sir आहेत भावांनो 😢🥺

  • @arunyelwankar3404
    @arunyelwankar3404 3 місяці тому

    Kutumba samor asa hala karayla ny payje hota.😢kup wait ghatna ghadli.yar ky te lahn lekru bol asel.tyanchii patni kay jiv bola asel.😢 Someshwara che khote nav gheun wawa karnara.bhagwanta bagun ghe tuch aata.

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 3 місяці тому

    बैलगाडा शर्यत क्षेत्राला भैय्या काकडे हा कलंक आहे त्याला या क्षेत्रात कायम स्वरुपी बंदी घातली पाहिजे 😢

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 місяці тому +9

    बैलगाडा क्षेत्र बंद करा

    • @navnathmazire4626
      @navnathmazire4626 3 місяці тому +4

      मी सहमत आहे तुमच्या या मताशी...

    • @ajitjadhav2760
      @ajitjadhav2760 3 місяці тому +1

      Mi dekhil sahmat ahe ...

    • @avishkardeshmukh9247
      @avishkardeshmukh9247 3 місяці тому

      ये येडा हायस का गौत्या साठी आम्हाला कशाला शिक्षा

  • @sanjaykamble1868
    @sanjaykamble1868 3 місяці тому +1

    कमिटी भुमिका काय घेणार फक्त नावाला कमिटी आहे अजून झोपली आहे की काय

  • @BARAMATI96
    @BARAMATI96 3 місяці тому +17

    बैलगाडा क्षेत्र बंद करावे म्हणून पुणे जिल्हा तर्फे आज कोर्टात याचिका दाखल करतोय

  • @ROHITINDORE-iw7vt
    @ROHITINDORE-iw7vt 3 місяці тому

    गौतम काकडे ला कायम स्वरुपी बैलगाडी क्षेत्रात बंदी घातली पाहिजे

  • @AjaySawant-j7l
    @AjaySawant-j7l 3 місяці тому

    Mi kahi Gautam kakade yancha virodhi nahe pn Kakade yani nivruti getleli hoti tch yogy hot 😔😔😔

  • @Ajay-hs7vi
    @Ajay-hs7vi 3 місяці тому +7

    Bailgada shryat band kra

    • @Karadkar_Ganya
      @Karadkar_Ganya 3 місяці тому +1

      Are bhau bailgada shryat banda kara boltoy jaski tula ly kalte

  • @sachinjadhav-xq8ey
    @sachinjadhav-xq8ey 3 місяці тому

    Pahije tar dada la pan aat taka jar vachavat astil tar kayda sarvana sarkha ahe koni he tyatun vachla nahi pahije je pan khunachi shiksha ahe ti bhigavi lagel je ke involve ahet tyana

  • @vijayjagtap1019
    @vijayjagtap1019 3 місяці тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐

  • @priyamchavan4663
    @priyamchavan4663 3 місяці тому

    " नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐
    Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔
    देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 3 місяці тому

    Mukya janavaravar tika karu nka 🙏 ryachi kay chuki bicharyachi

  • @ganeshgole9669
    @ganeshgole9669 3 місяці тому +2

    बैलगाडा संघटनेने ह्या काकडे वर कायम बंदी घालावी

  • @abhijeetjadhav6330
    @abhijeetjadhav6330 3 місяці тому

    सर तुम्हाला कधीच विसरू शकत नाही..😢 नेहमी सत्याने वागणारे, सत्य बोलणारे , खोटे त्यांना कधीच पटले नाही ..असे हे सर आज आपल्याला सोडून गेले अतंत दुःख वाटतेय..😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली sir ..😢 always miss u sir 😢

  • @arunyelwankar3404
    @arunyelwankar3404 3 місяці тому

    Gavtam la shrafh lagnr tya barkya mulich aatma talmaltoy Ani tychya bhawala.

  • @yogeshpatil9427
    @yogeshpatil9427 3 місяці тому +2

    संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला कलंक लावणारी घटना😢😢

  • @jaydeepdeshmukh5873
    @jaydeepdeshmukh5873 3 місяці тому

    बैलगाडी क्षेत्रातील वास्तव सरवसामण्या माणसांपर्यंत पोहचावणारा हिरा आज या जगातून हरवला. खूपच दुःखद घटना आहे. आज बैलगाडी क्षेत्रातील काळा दिवस आहे. गौतम काकडे याला शिक्षा झालीच पाहिजे.😢😢😢

  • @Vadapav457
    @Vadapav457 3 місяці тому

    Tya gautam kakde la attak karra 3 var kadak karvai krraaa yacha bailgada sharyt mdha jaher nishad gautam chaa

  • @VikramMulgaonkar-vn2jo
    @VikramMulgaonkar-vn2jo 3 місяці тому +1

    ज्याने केले आहे त्याच्यावर व्हिडियो करा की म्हणजे रणजित सर यांना न्याय मिळेल

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 3 місяці тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @santoshnana1641
    @santoshnana1641 3 місяці тому +1

    सर भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐, दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी

  • @avinashdahibhate5940
    @avinashdahibhate5940 3 місяці тому +1

    बैलगाडा शर्यत ढाण्या वाघ हरपला भावपूर्ण श्रद्धांजली सर मला

  • @tushargodase6414
    @tushargodase6414 3 місяці тому +1

    त्याचा एक बी बैल पळू देउ नका

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 місяці тому +5

    खूप वाईट झालं

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 3 місяці тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली निबाळकर सर 😢😢😢😢😢😢

  • @chandrakantyedage7154
    @chandrakantyedage7154 3 місяці тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर...

  • @JitendraPawar-f5j
    @JitendraPawar-f5j 3 місяці тому +1

    Rahul dada tumi tumacha Mitrala niye dya

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 3 місяці тому

    Bailgada saryat band karun taklel bar

  • @SagarbhauLonkar
    @SagarbhauLonkar 3 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @pankajkharad-e1y
    @pankajkharad-e1y 3 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @pankajjadhav2088
    @pankajjadhav2088 3 місяці тому +3

    काकडेला आरोपी बोला

  • @pmdeokar4545
    @pmdeokar4545 3 місяці тому +2

    हे क्षेत्र लवकर बंद होवो

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 3 місяці тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर... मनाला हदरावून टाकणारी घटना.. 🙏

  • @sagarsurve3610
    @sagarsurve3610 3 місяці тому +1

    मैदानी रिपोर्ट कठे गायब जाला

  • @HareshKevane
    @HareshKevane 3 місяці тому +2

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐

  • @saurabhmagar08
    @saurabhmagar08 3 місяці тому +2

    सरांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @satishJadhav-ti8us
    @satishJadhav-ti8us 3 місяці тому

    Setkaryacha kahi fayar nahi

  • @fijasayyad3078
    @fijasayyad3078 3 місяці тому

    Bhojpuri shradhanjali