मन चंगा तो कठौती में गंगा । ह.भ.प. अवंतिका ताई टोळे । Kirtanvishwa | Sant Rohidas Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • मन चंगा तो कठौती में गंगा
    दासगणू संप्रदायी कीर्तन । Avantika Tai Tole
    परमार्थ साधण्यासाठी मनुष्य जन्मभर खूप कष्ट करतो. पूर्व पुण्याईने, आई-वडिलांच्या कृपेने, बालपणी त्याला उपासनेची गोडी लागते. मग जपजाप्य, नामस्मरण, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, यज्ञ-याग सारे सारे माणूस करतो. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर पोचता क्षणी त्याची विवेकबुद्धी जागी होते आणि तो आयुष्यभर केलेल्या या सर्व अध्यात्मिक खटपटींचा हिशोब मांडायला लागतो. त्याला जाणवते की ज्या प्रमाणात जेवढी खटपट केली त्या प्रमाणात तेवढी प्रगती नाही साधता आली. एवढ्या खटपटी नंतर सुद्धा आपली अध्यात्मिक प्रगती का झाली नाही ? परमार्थ मार्गातील प्रगती का साधली गेली नाही ? याचा विचार जे कोणी विवेकी साधक करत असतील तर त्यांच्या साठी मार्गदर्शन करणारे अनेक अभंग श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेले आहेत. त्यातील एका अभंगावर आपल्या दासगणू सांप्रदायिक कीर्तनातून निरूपण करणार आहेत सौ हरी भक्त परायण अवंतिकाबाई टोळे. या निरुपणाबरोबरच दासगणू महाराज यांनी रचलेल्या श्री संत रोहिदास महाराजांच्या चरित्राचे गायन, त्या आपल्या सम्मुख सादर करणार आहेत.
    Dasganu Sampraday Kirtan
    Sant Rohidas Charitra
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa #marathikirtan

КОМЕНТАРІ • 180

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +20

    खूप अप्रूपानें ऐकायला मिळालेलं हे आख्यान खूप गोड आहे आणि मांडणीही तितकीच गोड आहे. आणि अनेक संस्कृत प्रचुर दृष्टांत इतक्या ओघवती वाणींत कानीं येताना खूप आनंद येतोय रामा. खूप छान, आणि श्रवणीय असंच चाललंय. मन विश्राम पावतंय. धन्यवाद रामा! अनेकानेक शुभेच्छा! जय श्रीराम!

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 роки тому +9

    संत रोहिदासाचें आख्यान अप्रतिम किर्तन अतिशय समर्पक आणि श्रवणीय.🙏🌷 श्री राम समर्थ 🌷🙏

    • @PadmaLute-cq1qn
      @PadmaLute-cq1qn 6 місяців тому

      मन तृप्त झाले राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @rameshwardake3518
    @rameshwardake3518 2 роки тому +8

    अप्रतिम दृष्टान्त भजन 🙏

  • @arvindtambe307
    @arvindtambe307 3 роки тому +6

    हृदय स्पर्शी कथा संत रोहिदास यांचे कीर्तनातून समजली... सुंदर कीर्तन सादरीकरण...

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 роки тому +5

    एकदम सुंदर कीर्तन झाले. आपली सर्वच कीर्तने उत्तम मांडणी केल्यामुळे संपूच नये असे वाटते. 👌👏👏

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 роки тому +10

    अप्रतिम सुंदर कीर्तन!
    अभिनंदन ताई.

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 2 роки тому +5

    परमदयाळू परमेश्वराचे रूप इच्छाशक्ती या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः रोहिदास महाराज गुंजाळ निम जकर यांच्याकडून अंतकरण पुर्वक सदैव शुभेच्छा जय श्रीराम वंदे भारत मातरम

  • @kaminijoshi1359
    @kaminijoshi1359 3 роки тому +4

    खूप सुंदर कीर्तन आवाज छान आहे
    श्रीराम जय राम जय जय राम
    श्रीराम समर्थ

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 роки тому +5

    नमस्कार ताई दर्जे दार कीर्तन वा तबला हारमोनियम खुपच उत्तम मना पासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 3 роки тому +7

    अप्रतिम गायन वगोड गळा ,ताई तुझ्या संगित साधनेस मी नत मस्तक. राम कृष्ण हरी .

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 3 роки тому +7

    नमस्कार माऊली साष्टांग दंडवत प्रणाम 🌹🙏 भक्ती श्रेष्ठ आहे हे सुंदर तेने सांगितले जयहरी विठ्ठल रामकृष्ण हरी, श्रीराम 🌺🙏

  • @sharayupathak8979
    @sharayupathak8979 3 роки тому +3

    Khup chan jai Shri ram bhajan khup chan

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +7

    अत्युच्च भक्तिरसांत नाहूं घातलंत हो रामा! पुनश्च एकदां अगदीं आनंदपूर्ण धन्यवाद! जय श्रीराम!

  • @sadashivmanjrekar4910
    @sadashivmanjrekar4910 2 роки тому +4

    अवंतिका ताई आपल्या गळ्यात साक्षात सरस्वती निवास करीत असल्याने आम्ही बापुडे काय वर्णन करणार? मात्र कीर्तन ऐकण्याचा योग आल्याने मी आपला आभारी आहे. अवीट मधूरवाटले.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 2 роки тому +4

    अतिशय सुंदर! ताईंची ओघवती दैवी प्रासादिक वाणी ऐकताना कर्मेंद्रिये अगदी तृप्त होऊन जातात. किर्तन संपूच नये असे वाटते. खूप खूप धन्यवाद. किर्तन विश्वाचे ही मन:पूर्वक आभार. अशी किर्तने नेहमीच ऐकायला मिळोत असा लोभ वाटतो. आपल्या वाटचालीस शुभेच्छा! 🙏🌹🙏

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 3 роки тому +7

    अतिशय उत्तम असे आणि नवीन कीर्तन ऐकायला मिळाले। अतिशय सुंदर💐

  • @jayashridate7150
    @jayashridate7150 Рік тому +3

    अमृत वाणी 😇🙏 जय गंगे नर्मदे मंगले देवी अशुभ नाशिने।

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 3 роки тому +7

    ताई, शतशः प्रणाम।
    कीर्तन संपल्यानंतर सुद्धा किती तरी वेळ, अंतरंगात सतत स्पंदने निर्माण होत रहाण्या सारखा अनुभव जाणवतो आहे। 🙏
    आपणा सर्वांचे मनापासून आभार।

  • @mahendrashindijamekar4464
    @mahendrashindijamekar4464 Рік тому +3

    वंदनीय,सौ.अवंतीकाताई, संत रोहिदास यांचे चरित्र किर्तन आपल्या सुमधुर संगीतमय वाणितुन ऐकायला मिळाले अप्रतिम , अतिशय सुंदर, शतशः नमन, श्री नाथ समर्थ, महेंद्र शिंदीजामेकर, अंजनीग्राम शुरजी.

  • @सुलभदासबोध

    अप्रतिम कीर्तन सेवा , पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहे , धन्यवाद ताई

  • @nitingoregaonkar7953
    @nitingoregaonkar7953 7 місяців тому +1

    ह .भ.प . किर्तनकार सौ अवंतीका टोळे ताईना साष्टंग दंडवत . अतिशय खुप छान किर्तन झाले किर्तनाबरोबर
    शास्त्रीय संगिताचा उत्तम जाण खुप अभ्यास आहे भिमपलास , भैरवी रागाचा लिलया मांडणी ,तसेच शुद्ध
    उच्चार कधीही केंव्हाही, कितीही वेळा ऐकावे असेच किर्तन आहे . आपल्याकडून असेच नवनविन किर्तन ऐकण्यास मिळावे ही विनंती .

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 2 роки тому +2

    सुंदर आख्यान सादरीकरण
    सादर जय रघुवीर

  • @smitapatky3680
    @smitapatky3680 3 роки тому +12

    खुप छान कीर्तन. गोड आवाज. अभ्यास खुप आहे.मी लहान असल्यापासून संत दासगणू महाराज यांचे कीर्तन ऐकते. ताई आपणांस सा.दंडवत. 🙏🙏 Smita Patki Beed.

  • @rahulchaudhari1203
    @rahulchaudhari1203 2 роки тому +1

    Khup chan ahe tai che kirtan, manapasun awadle

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 Рік тому +1

    सुश्राव्य कीर्तन.ह.भ.प.अवंतिका ताईला खरोखरच सरस्वती देवी प्रसन्न आहे.सुंदर आवाज वकात व कथानक छान.दास गणू महाराज यांनी उत्कृष्ट पद्य रचना केली व ताईने लीलया त्याचे गायन करून मन तृप्त झाले.जय श्रीराम.

  • @aditideshmukh5518
    @aditideshmukh5518 3 роки тому +10

    अति उत्तम...भावपूर्ण प्रस्तुती!!

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 роки тому +4

    निरुपणाचा अभंग अतिशय सुंदर आवाज सुमधुर पुर्व रंगाचे सादरीकरण उत्तम 🙏🙏

    • @vedikajoshi8508
      @vedikajoshi8508 3 роки тому

      खुप सुंदर अ प्री तम् किर्र तं न

  • @aarefamultani8845
    @aarefamultani8845 3 роки тому +3

    फार छान वाटले ह्याचे वर्णन सुध्दा करू शकत नाही म्हणून रामकृष्णहरि ताई

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 2 роки тому +3

    अतिशय सुंदर किर्तन

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 2 місяці тому +1

    Sunder. Tumcha utkarsh hovo hich swami Samarth charni prarthna.

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 3 роки тому +5

    अवंतिका ताई नमस्कार कीर्तन खूप सुंदर खूप गोड आवाज श्रीराम समर्थ

  • @vinayaghatage8821
    @vinayaghatage8821 2 роки тому +3

    अप्रतिम झाले किर्तन खूप छान.

  • @asha1347
    @asha1347 9 місяців тому +1

    खूपच छान तुमच्या जिभेवर जशी काही सरस्वती बसलेली आहे मन एकदम आनंदाने भारावून जाते धन्यवाद ताई

  • @vishwagurubharatmata3606
    @vishwagurubharatmata3606 2 роки тому +1

    *मन चंगा तो कठौती मे गंगा’* ही हींदी म्हणही संत रविदासांच्या(रोहिदास) वाणीतूनच आली आहे. म्हणजेच काय तर गंगा ही पवित्र भक्तीमुळे कटोती सारख्या अस्वच्छ पात्रात प्रकट झाली होती. *मनापासून तळमळीने देवाचे नामस्मरण केल्यास देवाला भक्तांकडे यावेच लागते* आपले मन पवित्र व इतरांनाप्रति मनामध्ये कोणताच द्वेष, राग नसेल प्रेम पूर्वक वागणे असेल तर कोणत्याही गोष्टी देवाकडून सहज उपलब्ध आहे हा विचार सर्व विश्वाचे भले करण्यासाठी पुरेसा आहे
    *।।श्रीदत्त।।*🙏🌹🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 5 місяців тому +1

    किर्तन विश्व ही सुसंस्कार गंगा आहे. ह. भ. प सौ अवंतिकाताई टोळे यांचे सुभक्तीदायक किर्तन जे सद्भावे सुमनाने श्रवण करतील ते श्रोते गंगास्नान करुन पुण्यवंत भक्तीवंत होतील. संत ऱ्हदय लोण्यिहुनही मऊ म्हणजे निष्कपटी निर्मळ प्रेमळ कसे ? याचा श्रोत्यांना प्रत्यय येईल. संतश्रेष्ठांचा देह पाहू नये तर त्यांचे भगवंतावरील शुद्ध प्रेम पहावे. श्रवणीय पावनीय प्रशंसनीय किर्तन सौ. अवंतिकाताई नी कथिले. किर्तन ऐकुन खरोखरीच मन सुप्रसन्न व सुस्वभावी सुसंपन्न झाले. पुनश्च सद्गुरु माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे ह. भ .प. सौ. अवंतिकाताईना विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्।।
    ऐसे सुभक्तीपुर्ण ऐकोनी किर्तन , पालटेल भक्तांचे मन , परी तत्क्षणी धरावे ब्रम्हनिष्ठ श्रघ सद्गुरुंना जावे अनन्यशरण , तयांचे निश्चित होईल कल्याण आणि चुकेल जननमरण..!!!
    सद्भावे विनम्रतेने प.पच. आईंचे लेकरु किर्तनकारांच्या चरणी घालिते लोटांगण..!!
    नमस्करोमी नमस्करोमी नमस्करोमी।।
    😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 3 роки тому +7

    खरच खूप खूप छान श्रवणीय ,आवाज ही गोड
    🙏💐👌🙏👌👍💐🙏

  • @pradeepratnaparkhe9310
    @pradeepratnaparkhe9310 3 роки тому +5

    ओजस्वी ओघवती वाणी ध्वनी चं कीर्तन खूप छान 🚩👏🚩

    • @rajashreemulaokar2597
      @rajashreemulaokar2597 2 роки тому

      अतिशय सुंदर किर्तन! "मन चंगा तो कठौती गंगा" त्यामागची संत रोहिदासांची कथा कळली. दासगणू महाराजांचे अभंग अतिशय बोधप्रद!

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 3 роки тому +6

    ताई चे कीर्तन खुपच छान झाले त्याबद्दल ताईला मनपूर्वक धन्यवाद 👏👏

  • @naryanpatil2631
    @naryanpatil2631 3 роки тому +3

    अतिशय सुंदर अस किर्तन
    ढोंगी साधूंच्या दांभीकपणावर
    प्रहार करणार किर्तन. धन्यवाद

  • @nandkumarkulkarni4430
    @nandkumarkulkarni4430 Рік тому +4

    अतिशय सुंदर, अप्रतिम, जबरदस्त पाठांतर, श्लोकांचे जबरदस्त स्पष्ट उच्चारण. अप्रतिम. अप्रतिम. अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 3 роки тому +3

    🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🍎🍎🍎🍎🍎🌄🌄🌄🌄🌄🌺🌺🌺🌺वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी जय हो ताई 🙏🙏

  • @seemazodge5507
    @seemazodge5507 3 роки тому +5

    खूप च मन लावून ऐकलं मी हे किर्तन.... खूप च सुंदर मांडणी🙏🙏

  • @nsavadhani2126
    @nsavadhani2126 3 роки тому +5

    🙏 सुंदर ! फार छान !! 👍

  • @asmitaloke4880
    @asmitaloke4880 3 роки тому +4

    खूप छान,भावजागृती होतेच,ताई ना पाठांतर खूप छान आहे असं जाणवलं,आणि त्या ते पाठांतर आचरतात नव्हे जगतात असच जाणवलं,अप्रतिम🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 9 місяців тому +1

    ह भ प अवतिताई नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार धन्यवाद

  • @vijayjoshi4763
    @vijayjoshi4763 3 роки тому +3

    ह. भ. प. टोपे यांचे किर्तन अप्रतिम होते आख्यान ही नवीन होते आवाजही सुमधुर आहे किर्तन खूप आवडले

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 3 роки тому +4

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏 kirtan vishavamadhe apali 🙏seva varnvar rahavi hi vinati🙏🙏🙏

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h Місяць тому +1

    Raam Krishna hari ❤❤❤

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 5 місяців тому +1

    जय जय रामकृष्ण हरि अप्रतिम किर्तन

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 3 роки тому +3

    खूपच सुंदर कीर्तन, अतीशय सुंदर दासगणू महाराजांची पदे, व सुन्दर चाली, अतीशय खणखणीत आवाज, विषय खूप सुंदर रीतीने आपण सादर केला, स्पष्ट उच्चार, पाठांतर सुद्धा खूप आहे. 🙏🙏🙏

    • @suhasinideshpande39
      @suhasinideshpande39 2 роки тому

      सुहासिनी देशपांडे अतिशय सुंदर आणि अवर्णनीय किर्तन खरच अभ्यास संस्कृत विषयाचा तसेच पाठांतर या विषयी काय लिहावं. सौ. ताईंना मिळालेल्या या परमेश्र्वरी देणगी खूप उत्कृष्ट कार्यासाठी वाहून घेतले आहे.सौ ताईंना आणि त्यांच्या या संस्कृतीचे वर्धन करण्यासाठी ह्या उपक्रमाला मनापासून आदराने नमस्कार. किर्तनात लागणारे सर्व गुण आहेतच अतिशय सुंदर किर्तन.

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 роки тому +2

    व्यंकटेश स्तोत्राचा उत्तम दाखवला, प्रथमच, अप्रतिम !!!!!

  • @ashakokil5877
    @ashakokil5877 3 роки тому +3

    Khup chhan oghvati vani

  • @bharatshirurkar8680
    @bharatshirurkar8680 2 роки тому +1

    ही कीर्तन परंपरा अशीच चालू ठेवा अतिशय छान कीर्तन शुभेच्छा

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 роки тому +4

    खुप छान किर्तन केले आहे.

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Рік тому +1

    खुप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली आनंद वाटला किर्तन ऐकून

  • @deepakdarwhekar7658
    @deepakdarwhekar7658 2 роки тому +1

    Vani khup chan... Abhyasahi khup aahe... Manala bhavale.... God bless you

  • @udayrajdinanathjigandhe4555
    @udayrajdinanathjigandhe4555 3 роки тому +5

    श्रीराम!!🙏🏻

  • @medhalele657
    @medhalele657 2 роки тому +2

    .,khup sundar

  • @hirendralele1125
    @hirendralele1125 3 роки тому +3

    अतीशय सुंदर सादरीकरण धन्यवाद

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 3 роки тому +1

    खुप छान मांडणी ऐकतच राहावे असे वाटते

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 роки тому +3

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌷🌷🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 роки тому +3

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌👌आनंद आहे 👌👌🌹🙏🙏🙏

  • @sanjaypatne2189
    @sanjaypatne2189 3 роки тому +2

    अप्रतिम सुंदर किर्तन मन प्रसन्न झाले

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 3 роки тому +2

    Shreeram🙏🏽🙏🏽

  • @ganeshmisal8840
    @ganeshmisal8840 11 місяців тому +1

    Waw ऐकतच राहावं वाटत आहे

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 3 роки тому +4

    खुप छान कीर्तन
    गंगा मैया की जय

  • @DnyanrajaDTPServices
    @DnyanrajaDTPServices 4 місяці тому +1

    रामकृष्ण हरी।छान कीर्तन शुभेच्छा।

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 Рік тому +1

    अवंतीकाताई तुमचे किर्तन संपूच नये असे वाटत खुप सुंदर असत ते

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 3 роки тому +2

    भैरवी फारच गोड होती. अवंतिकाताईंना साष्टांग वंदन

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 роки тому +3

    अप्रतिम किर्तन...

  • @nivruttikasle6564
    @nivruttikasle6564 2 роки тому +3

    अतिशय सूंदर कीर्तन ,💐💐💐💐👍

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 роки тому +2

    Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup khup chhan apratim margdarshn dhanyavad tai God bless you

  • @rekharahate8286
    @rekharahate8286 5 місяців тому +1

    खूपच छान 🙏

  • @harshadmajrekar1163
    @harshadmajrekar1163 3 роки тому +6

    नमस्कार अवंतिकाताई ! आपण सज्जन गडावरील महोत्सवात केलेला हा पूर्वरंग आख्यान अनेकवेळा श्रवण केला , तरी पुन्हा पुन्हा श्रवणाचा मोह आवरत नाही . आपलं संस्कृत तर आवडतंच पण पूर्वरंग मांडणी , सादरीकरणाची प्रवाही शैली आवडते. आपल्याला शुभेच्छा , कीर्तन विश्वचे मनःपूर्वक आभार

    • @mohansawant3029
      @mohansawant3029 3 роки тому +1

      नमस्कार माऊली जयहरी विठ्ठल रामकृष्ण हरी, अप्रतिम जी श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🌺🙏🌹🙏🌺🙏💐

  • @nileshoak2990
    @nileshoak2990 2 роки тому +2

    Enjoyed it. Thank you.

  • @gopalshinde8478
    @gopalshinde8478 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी
    अप्रतिम कीर्तन

  • @kalindikulkarni7503
    @kalindikulkarni7503 11 місяців тому +1

    खुप सुंदर कथा आवाजही अतिशय उत्तम मन अगदी भारावून गेले.🎉असे किर्तन ऐकून समाधानाने भाराऊन गेले.

  • @deepapendse6712
    @deepapendse6712 10 місяців тому +1

    श्रीराम .उत्तम

  • @vidyapawar8364
    @vidyapawar8364 3 роки тому +3

    अतिशय सुंदर निरूपण

  • @mudgalkothekar4970
    @mudgalkothekar4970 2 роки тому +2

    अतिशय सुंदर

  • @prabhabam9956
    @prabhabam9956 3 роки тому +1

    तुमचे प्रत्येक कीर्तन ऐकन्या सारखे इतरांनाही पाठवते

  • @peacepa26
    @peacepa26 3 роки тому +3

    बढ़िया! 🙏🙏🙏

  • @ashakunnawar7527
    @ashakunnawar7527 3 роки тому +2

    खूप च छान, कान अगदी धन्य झाले.

  • @jagobighane9688
    @jagobighane9688 Рік тому +1

    खुब सुंदर कीर्तन झाले जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र सुन ऐकले

  • @aartydharap6302
    @aartydharap6302 3 роки тому +3

    खूप छान

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 3 роки тому +1

    Atishay uttam.

  • @panditmilind719
    @panditmilind719 2 роки тому +1

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AIK

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 Рік тому +1

    अप्रतिम

  • @geetapatil3199
    @geetapatil3199 2 роки тому +2

    Excellent mam

  • @anuradhabhadsavle3817
    @anuradhabhadsavle3817 2 роки тому +2

    अवंतिका ताईंनी फारच छान कीर्तन केलं .

  • @vrundadeodhar9171
    @vrundadeodhar9171 3 роки тому +4

    फारच छान जय श्रीराम 🙏🌸🌺🙏

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 3 роки тому +4

    अप्रतिम. किर्तन

  • @1968santosh
    @1968santosh 10 місяців тому +1

    खूप छान, अप्रतिम वक्तृत्व, आणि गायन. ऐकताना असे सुश्राव्य कीर्तन संपूच नये असे वाटते. वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.

  • @gajanankhandeshwar8029
    @gajanankhandeshwar8029 2 роки тому +1

    Atishaya sunder

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317 Рік тому +1

    Excellent and Awasome.

  • @swatimhatre1006
    @swatimhatre1006 3 роки тому +3

    राम कृष्ण हरी

  • @anuradhagurjar8420
    @anuradhagurjar8420 3 роки тому +3

    👌Kirtan. 🙏

  • @user-fm9kn9zh8r
    @user-fm9kn9zh8r 3 роки тому +4

    नमस्कार. छान

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 2 роки тому +1

    अतिशय सुंदर किर्तन. आपण ताई फार छान सादरीकरण केले .आवाज सुंदर.. नमस्कार.