अस्सल खांन्देशी पारंपारिक मऊ लुसलुशीत ज्वारीचे धिरडे /धिंडे |Jwariche Dhinde,Dhirale |Jawar Dosa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025
  • अस्सल खांन्देशी पारंपारिक मऊ लुसलुशीत ज्वारीचे धिरडे /धिंडे |Jwariche Dhinde,Dhirale |Jawar Dosa| Jwariche Dhinde Recipe
    साहित्य -
    पाॅलिश ज्वारी - ३ शेर
    मेथी दाणे - १.५ कप
    ज्वारीच्या कण्या - १ शेर
    जिर - १ चमचा
    धणे - २ चमचे
    लसूण पाकळ्या - २५ ते ३०
    कोथिंबीर मूठभर
    मिठ चवीनुसार
    👉🏼कृती -👇🏼👇🏼
    *सर्वप्रथम ज्वारी स्वच्छ करून घ्यावी, नंतर पाच ते दहा मिनिटे भिजत घालावी.. नंतर ज्वारी पाण्यामधून काढून 15 ते 20 मिनिट निथळत ठेवावी.. पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर ही ज्वारी मिक्सरवर फिरवून कांडून घ्यावी.. अशाप्रकारे ज्वारी घरी मिक्सरवर कांडता येते.. किंवा बाहेर गिरणीमधून सुद्धा ज्वारी कांडून आणता येते.. कांडलेल्या ज्वारीलाच पॉलिश केलेली ज्वारी असंही म्हणतात.. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी (सोमवारी) ज्वारी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन १ दिवस भिजत घालावी.. ज्या दिवशी ज्वारी भिजत घातली त्याच दिवशी( सोमवारी ) ज्वारीच्या कण्या आणि मेथीदाणे सुद्धा स्वच्छ धुऊन चार ते पाच तास भिजत घालावे आणि रात्री कुकरमध्ये भात किंवा खिचडी प्रमाणे दुप्पट पाणी घेऊन ज्वारीच्या कण्या आणि मेथी दाण्यांचा घाटा शिजवून तयार करावा...नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी (मंगळवारी) भिजत ठेवलेली ज्वारी दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि त्यात रात्री शिजवून ठेवलेला घाटा घालावा..आणि मिक्स करून घ्यावा... त्यामध्ये चवीसाठी एक चमचा जिरं, दोन ते तीन चमचे धने घालून मिक्स करून घ्यावे.. आणि मिक्सरमधून किंवा गिरणी वरून बारीक दळून बॅटर तयार करावे...**लसूण ,कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करावी. आणि एका भांड्यात आवश्यक तेवढे धिंड्यांचे रवण काढून त्यात एक चमचा लसूण कोथिंबीरची चटणी घालावी.. चवीनुसार मीठ घालावे.. आणि नॉनस्टिकच्या तव्यावर डोस्याप्रमाणे धिरडे पसरवून तयार करून घ्यावे..धिरड्यांवर बारीक कापलेला गुड घालावा..आणि तेल घालून धिरळे छान शेकून घ्यावे..गरम गरम धिंडे तुम्ही नुसतेच खाऊ शकता किंवा दुधासोबत सुद्धा अप्रतिम लागतात..
    टिप्स -
    धिंड्याचे रवण तयार केल्यानंतर त्यावर अगदी घट्ट झाकण ठेवू नये..त्यामुळे रवण आंबट होते.. खूप वास येतो. आणि धिरड्यांची चव खराब होते..
    छिद्रांची चाळणी, टोपली किंवा एखादी प्लेट रवणावर झाकण ठेवा.. म्हणजे रवण २/३ दिवस टिकत..आणि आंबट वास येत नाही..
    ज्वारी कांडलेली किंवा पाॅलिश केलेली वापरावी..त्यामुळे धिंडे छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात..
    ज्वारी मध्ये कोंडा राहिल्याने धिरडे थोडे भाकरी सारखे कडक होतात..व चव बिघडते..
    Facebook
    www.facebook.c...
    #Khandeshijwarichedhirade
    #Jwarichedhinde
    #ज्वारीचेधिंडे
    #ज्वारीचेधिंरडे
    #Winterrecipe
    #JalgoanTadkaRecipe
    #Authentickhandeshirecipe
    Please like,share, comments and Subscribe my channel and do not forget to press bell icon 🔔to get more recipes..
    Thanks for watching 🙏

КОМЕНТАРІ • 41