शैक्षणिक धोरण आणि पालकांचे धोरण जुळणे महत्वाचे ! - डॉ. संजय कळमकर
Вставка
- Опубліковано 19 січ 2025
- #sanjaykalamkar @sanjaykalamkar #k-12 #शैक्षणिकधोरण
#netizensfoundation @NetizensFoundationAcademy @NetizensFoundationSchool
धोरण नाही, सिस्टीम बदलणे महत्वाचे ! - डॉ. संजय कळमकर
सन्मित्र दिलीप शेटे स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आणि नेटीझन्स फाउंडेशनच्या वतीने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध वक्ते डॉ. संजय कळमकर यांचे ‘आनंदाने शिका- आनंदासाठी शिकवा’ या विषयावर व्याख्यान येथील दयानंद सभागृहात पार पडले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदास बस्वदे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या नर्म विनोदी शैलीत कळमकर यांनी सध्याची शिक्षण पद्धती, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी चौफेर संवाद साधला. शैक्षणिक धोरण आणि पालकांचे धोरण यात सांगड असायाला हवी. पुस्तके हेच संस्कार करण्याचे प्रभावी साधन असून तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी पालकांनी वेळेचा सदुपयोग करून वाचन संस्कृती वाढवण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले. साधारण सव्वा तास चाललेल्या या व्याख्यानास श्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती. ‘मार्क्सवादी’ विद्यार्थी, पालक आणि शिक्षक कधीच शिकण्याचा आणि जगण्याचा आनंद घेवू शकणार नाहीत हे कटूसत्य त्यांनी अनेक उदाहरणांवरून पटवून दिले.
या समारंभाचे प्रास्ताविक सुनिल हाके यांनी केले तर व्याख्यानाची भूमिका प्रा. सुधाकर तोडकर यांनी मांडली. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कचरूआण्णा शेटे, परमेश्वर बालकुंदे, कल्याण लवांडे, माणिकआण्णा गंगापुरे, श्रीमती सविता शेटे, डॉ. माधव लोहारे यांची उपस्थिती होती.
समारंभाच्या यशस्वितेसाठी प्रा. महेश तोडकर, संतोष लोहारे, सुनील बिराजदार, शशिकांत थळकरी, बाळासाहेब हरड, अनिल हुलगे, वेदप्रकाश भोसले, अक्षर शेटे, ओम नागुरे, बंकट जाधव, सुनंदा कोरे, वेंकटेश रेड्डी, मनोज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
.
प्रारंभी सरांचा छान परिचय करून दिला.
सरानी भुतकाळ, वर्तमान काळ सहजपणे उलगडून टाकला आहे.
फारच छान भाषण.
अप्रतिम सुत्रसंचलन
उत्कृष्ट व्याख्यान
खूप छान अप्रतिम 🙏🙏
खूप छान आहे अप्रतिम😂
अंतर्मुख करणारे व्याख्यान. खूप छान सर.
छान प्रबोधन आणि अप्रतिम मांडणी 🙏
खूप छान सूत्रसंचालन केले ताई
खूपच छान सर, अप्रतिम व्याख्यान
Nice recording.....
Shoaib sirrrrrrr 😅😅😅😅