कोकणातील जंगलात सापडल्या पुरातन रहस्यमय जैन मूर्ती आणि शिल्प । एक रहस्यमय आणि सुंदर गाव " पेंडुर "

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2021
  • पेंडुर येथील या जैनाच्या डोंगरावर अतिप्राचीन सुमारे दीड हजार वर्षापूर्वीची संकीन-डंकीनची शिल्प पाहायला मिळतात. आंबिका मातेची आठवण येते. पिंपळ आणि अष्टाच्या अजस्त्रमुळांनी मगरमिठी घातल्यानंतरही अंबिका मातेचे शिल्प आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहे.तिच्या कडेवर असलेले बाळ..ऊन-पावसाने हैरान झाले आहे. हे सगळं पाहताना मन थराथरून जाते.
    अंगावर काटा उभा राहतो.हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आणि भूगोलही डोळय़ांसमोर तरळू लागतो. शिल्पकाराची नेत्रदीपक कलाकृती आणि या भूमीचा धार्मिक इतिहास मग प्रज्वलीत होतो. नजर भिर-भिरते, येथील देखण्या शिल्पकृती हजारो वर्षाचा इतिहास सांगणा-या पाषानांना पाय फुटल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा अष्टाच्या झाडाची मगरमिठी ही आईच्या पदराप्रमाणे वाटते.
    अंबिका मातेचे हे शिल्प या वृक्षाच्या पदराखाली सुरक्षित आहे असे वाटू लागते. नाही तर तेही बेपत्ता झाले असते.. हे वास्तव पेंडुर कट्टा येथील सातेरी मंदिरापासून जवळ असलेल्या डोंगरावरचे आणि तेथील भग्नावस्थेत असलेल्या पाषाणांचे!
    आम्हाला आमच्या इतिसाबद्दल तेवढीशी ओढ नाही.त्याची जपणूक करावी याचेही भान नाही. या उदासीनतेमुळे अनेकांचे फावले आहे. इतिहासप्रेमी म्हणणा-या मंडळींनी येथील साक्षीदारांना सहजगत्या उचलून नेले.किल्ल्यावरच्या तोफा जशा नाहीशा झाल्या तशी देवराईत असलेली पाषाणे (विरगळ) हेही नाहीसे झाले.
    आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राचीन पाषाणांना मोठी किंमत आहे. हे मान्य असले तरी आम्ही आमच्याकडे असलेल्या खजिन्याबाबत तेवढेसे जागरूक नाही आहोत, याचेही भान ठेवायला हवे.
    कोकणात अनेक सत्तांतरे झाली आणि आपणही बदलत गेलो. कधी काळी सिंधुदुर्गात म्हणजे बाराशे वर्षापूर्वी जैन धर्माला मानणा-या शिलाहार राजांची सत्ता कोकण प्रांतावर होती. त्यांच्या काळात जैन संस्कृती येथे रुजली आणि वाढलीसुद्धा.. मात्र सत्ता बदल झाला, धर्म बदल झाला आणि सिंधुदुर्गात मंदिरांची रचनाही बदलली. येथे जैनांची असलेली धार्मिक स्थळे कालौघात नष्ट झाली;परंतु त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आढळतात. सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी जंगलात आड बाजूला डोंगरदऱ्यांमध्ये त्या काळातील सुरेख मूर्ती ऊन-पावसाचा मारा झेलत आजही उभ्या आहेत. हजार - दीड हजार वर्षापूर्वीचा हा अमूल्य ठेवा जंगलात खितपत पडला आहे.
    पेंडुर(तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग)मधील संकीन आणि डंकीन या स्थळावरची शिल्प अशीच लक्ष वेधून घेतात. या मूर्तीचा मोठा खजिना आपण जपायला हवा. या शिल्पांना बोलके करायला हवे.हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि संस्कृतीचा भूतकाळ जागृत करायला हवा.
    शिलाहार राजवटीत अपरांतात जैन धर्माचा प्रभाव होता. आठव्या शतकात राष्ट्रकुटांनी चालुक्याचे अधिपत्य झुगारून सत्ता स्थापन केली. राष्ट्रकुट नृपती गोविंद (तिसरा) या राजाने उत्तर कोकणाच्या राज्यकारभाराची जबाबदारी कपर्दिस (पहिला) याच्यावर सोपविली. ही शिलाहारांची पहिली शाखा. दक्षिण कोकणावर प्रभाव असलेल्या कृष्ण राजाने या भागावर शिलाहार वंशातीलच सणफुल्ला याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
    येथून शिलाहारांच्या कोकणातील कारकिर्दीला प्रारंभ झाला. अकराव्या शतकापर्यंत शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकणात म्हणजे गोवा ते रत्नागिरी या भागावर राज्य करीत होती. त्यांची पहिली राजधानी गोव्यातील. त्यावेळचे चंद्रपूर ऊर्फ गोपकपट्टण म्हणजे आताचे चांदोर येथे होते. त्यांनी नंतर ही राजधानी सिंधुदुर्गातील बलिपट्टण म्हणजे खारेपाटण येथे हलविली.
    शिलाहार राजा श्वम्मीयराने खारेपाटणमध्ये किल्ला आणि बंदर उभारून ही राजधानी वसविली. या राज्याचा कार्यकाल ७८५ ते ८२० या दरम्यान होता. पुढे अकराव्या शतकापर्यंत त्यांचा ब-यापैकी प्रभाव राहिला. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, त्यांच्या राज्यादरम्यान सहयाद्रीच्या द-या-खो-यात जैन संस्कृतीचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसार वेगाने झाला.
    याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. परंतु मुद्दा हा की, या प्रांतात असलेल्या जैन धर्माच्या खुणा आजही पाहायला मिळतात. बुद्धोत्तर आणि अशोकपूर्व कालखंडात जैन धर्म गोमांतकात आल्याचे मानले जाते. पुढे उपेक्षा, परकीयांची आक्रमणे आणि नैसर्गिक प्रकोपामुळे जैनधर्मियांच्या मूर्ती, श्रद्धास्थाने आणि वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या.
    शिलाहार राजांचा प्रभाव संपल्यानंतर या धर्माचा प्रभावही ओसरत गेला.कारण याचे आचरण सोपे नाही. ब्रह्मचर्य, आहारामधील पावित्र्य ही कठीण बाब होती. याचा फटका जैन धर्माला बसला. परकीय शत्रूंच्या हल्ल्यात पळवापळवीच्या काळात धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले.
    यावेळी काही मूर्ती लपविल्या गेल्या आणि काही मूर्ती अज्ञात स्थळी टाकण्यात आल्या.
    सिंधुदुर्गातील पेंडुर येथील जैन धर्मियांचे प्रार्थना स्थान आणि येथील भग्न पाषाणे हा गतकाळ जागृत करतात.या पेंडुरच्या जंगल परिसरात अशी अतिप्राचीन पाषाणे लोटून टाकण्यात आली आहेत.
    जिल्हयाच्या धार्मिक क्षेत्रातही जैन धर्माचा प्राचीन प्रभाव आजही जाणवतो. मसुरे, माणगाव, काळसे या गावांमध्ये जैन संस्कृतीच्या खाणाखुणा, गावऱ्हाटीत मुद्दामहून केली जाणारी जैन स्थळाची आठवण, काही ठिकाणी असलेली जैन ब्राह्मणांची मंदिरे, कट्टा येथील जैनांची विहीर, कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील मारुतीच्या मंदिरातील जैनाचा धोंडा आदी खुणा पाहायला मिळतात.
    जैन धर्माचे प्रथम र्तीथकर आदिनाथ यांच्या नावाने ओळखली जाणारी काही स्थळे आणि डोंगरही जिल्हयात आहेत. या मूर्तीना ऊन, वारा, पावसाच्या मा-याबरोबरच चोरटय़ांपासून धोका आहे. कोकणात प्राचीन मूर्ती चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जैन धर्माशी संबंधित अनेक मूर्ती आज ऊन-पावसात उभ्या आहेत. त्यांचे जतन होण्याची गरज आहे. हा ठेवा खूप प्राचीन असल्याने राज्यकर्त्यांनी त्यासाठी ठाम भूमिका घेऊन धोरण ठरविणे गरजेचे आहे.
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #कोकण #पेंडुर #रहस्यमयमूर्ती #कोकणगाव

КОМЕНТАРІ • 407

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 роки тому +7

    हे एक बौध्दस्थळ आहे आणि त्यातील विखुरलेली बुध्दशिल्पे आहेत !
    मंदिर किंवा जैन मुर्त्या असत्या तर अशा दुर्लक्षित केलेल्या नसत्या !🇮🇳🙏✊

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 роки тому +2

    संचित,
    प्रत्येक वेळेस नविन काही तरी पहायला
    मिळत तुझ्या विडिओतुन.
    जस काही जादुगाराच्या पोतडीतून एक एक वस्तू बाहेर येते.
    खुप मेहनतीने आणी तळमळीने तु हे सर्व आम्हाला दाखवत असतो.इथला निसर्ग, परंपरा, मंदिरं ,पुरातन वास्तू ,शिल्प हा मौल्यवान ठेवा आपण जिवापाड मेहनतीने जपायला हवा. आणी ते जपण आपण कोकणप्रेमी सर्वांचच ते कर्तव्यच आहे असच समजायला हव.
    त्यासाठी संचित एकटा काही करु शकत नाही हयाची जाणीव सर्व स्थानिकांनी ठेवायला हवी. संचित तुझ्यामुळे ही जागृती नककीच होईल हयाची मला खात्री आहे.
    खुप खुप.... धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 роки тому +19

    घरबसल्या गाव फिरवणारो एकमेव youtuber. ह्या करताना काळजी घे पण. सुंदर vlog. तुझ्याबरोबर आम्हीपण फिरतोय असा वाटता

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 роки тому +13

    आपल्या मेहनतीमुळेच आम्हाला घरिबसल्या भारतीयांचा खरा ऐतिहासिक वारसा सुंदर बुध्दशिल्पे आणि बौध्दस्थळ बघायला मिळाले ! धन्यवाद !🇮🇳🙏✊

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 2 роки тому

      खूपच छान ,संचित खुप लांब लांब जातो,,खुप ऐतिहासिक स्थळ दाखवतोस पण काळजी घेत जा गुहे मध्ये खुप आत जातांना

  • @devj2849
    @devj2849 2 роки тому +2

    खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून मी 6 वर्षांपूर्वी तिथे भेट दिली होती मे महिना असताना ब्लॉग छान आहेत तुमचे

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 2 роки тому +1

    सं चित तुझ्य बदल काय बोलावे हेच कळेनासे झालेय किती सुंदर स्थले दाखवितोस पण तू एकटा फिरू नको कोणाला तरी बरोबर घे तुझी खूप काळजी वाटते श्री स्वामी समर्थ तुझ्या बर्राबर आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @samadhanpaithane9869
    @samadhanpaithane9869 3 роки тому +7

    ही बौद्ध विरासत आहे

    • @yogeshkamble4481
      @yogeshkamble4481 3 роки тому

      Barobar hi bauddha kalin murtya ahet karan tithe ek murti hoti jichya dokyavar ek hatti kamal takat hota ti mahamaya mhanje buddhanchi aai hoti

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Рік тому +1

    खरंच खुप छान माहिती दिली आणि आणखी एक हजार वर्षांपूर्वी चे इतिहासात अनेक गोष्टींचा समावेश होतो पण मुर्ती वारुळ देऊळ छान आवडला विडिओ पाहून मस्त होता हिरवं गार वातावरण सगळीकडे छान वाटले

  • @samadhanjadhav7855
    @samadhanjadhav7855 3 роки тому +8

    खुप छान संचित दादा,इतिहास सर्वांना माहित आहे पण मान्य कोन करत नाहित,बौद्ध हेच अंतीम सत्य.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 3 роки тому

      यात
      बौद्ध कुठुन आला?

    • @samadhanjadhav7855
      @samadhanjadhav7855 3 роки тому

      @@user-vz9tn7wn1l तुला ते बुद्ध शिल्प दिसत आसेल ना की नाही?

  • @vitthalvasantparulekar1660
    @vitthalvasantparulekar1660 2 роки тому +2

    हे जैन राजे शिलाहारा राज्यसत्ते च्या काळातील शिल्प आहे, साधारण 10-12 व्या शतकातील आहे. अशी शिल्पे कोकणात अनेक गावात आहेत, कुडाळ प्रांतावर जेव्हा 11 व्या शतकात कुडाळदेशकर प्रभुंची सत्ता आली तेव्हा ही शिल्पे मंदिरांच्या बाहेर ठेवण्यात आली आणि तिथे हिंदु देवतांची स्थापना करण्यात आली.

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 2 роки тому +1

    खूप छान भावा मन जिंकलस विचार खूप छान

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 роки тому +4

    दोन हत्तींच्या मध्ये असलेलेली मुर्ती बुध्दांची आई महामायाची आहे तर एक हात तोडलेली बुध्दमुर्ती भुमिस्पर्श मुद्रा तर दुसरी बुध्दमुर्ती वज्रपाणी आहे ! येथे उत्खनन केल्यास भव्य बुध्दविहार मिळेल !🇮🇳✊

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +1

    सुंदर.व्हिडिओ.मूर्ती.अडकलेले.झाड.पिंपळ.नाही.

  • @ketankambli3332
    @ketankambli3332 Рік тому

    संचित,,,जी ,, तुमचा हा व्हिडिओ २ वर्षापूर्वीचा
    आहे पण तो आता मला बघता आला ,,,,आणि
    माझासाठी तो नवाच आहे,,खूप छान वेताळ
    मंदिर ,सातेरी मंदिर वाटल 👍तिथला तो निसर्गरम्य परिसर,,,हिरवगार डोंगर रिमझिम
    पाऊस,,,, भरपूर व्हिडिओ आवडला ,,,,ती
    मारुतीची मूर्ती तुम्ही दाखवली एकदम मस्त वाटली,,,अगदी पहात रहाण्या सारखी सुंदर
    मूर्ती ,,ती वेगवेगळी शिल्पे दाखवली ,,,,मस्त
    दगडात कोरलेल्या मुर्त्या तर कमालीच्या सुंदर
    आहेत तुम्ही खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ
    बनवलात ,,,,,संचित जी तुम्हाला salute आहे
    असेच तुमचे बाकीचे व्हिडिओ पण मी एन्जॉय
    करत बघेन thankyou 🙏🙏🙏🙏🙏
    from (सुषमा परब कांबळी )

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 3 роки тому +1

    प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील 'देवळाचे धर्म आणि धर्माची देवळे, या त्यांच्या पुस्तकात काय म्हणतात वाचा.

  • @medhabavdekar2068
    @medhabavdekar2068 2 роки тому +2

    Apratim unbeliebable

  • @meeranivatkar4835
    @meeranivatkar4835 Рік тому

    सर्वात पहिला धर्मा chi स्थापना ही बोध धर्माची झाली आहे., ty

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि हा आजचा व्हिडिओ परिपूर्ण असा होता कारण तू ह्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोकांला आणि कोकणातल्या लोकांला प्राचीन मंदिरे , कातळ शिल्प , आणि कोकणातील जैवविविधता जपा आणि टिकून ठेवा हा संदेश तू आवर्जून दिलासा त्यामुळे हा व्हिडिओ परिपूर्ण आणि एक नंबर झाला आणि तुझ्या आदींच्या व्हिडिओमध्ये तू फक्त प्राचीन मंदिरे , कातळ शिल्प , आणि कोकणातील जैवविविधता दाखवत होता आणि ह्या व्हिडिओत जसा प्राचीन मंदिरे , कातळ शिल्प , आणि कोकणातील जैवविविधता जपा , जपलीच पाहिजे असा
    तडफदार संदेश त्या व्हिडिओंमध्ये देत नसल्यामुळे ते व्हिडिओ परिपूर्ण वाटत न्हवते आणि ह्या व्हिडिओत ते संदेश दिल्यामुळे हा व्हिडिओ परिपूर्ण आणि आम्हाला बघतानापण भारी वाटलं आणि लोकांला पण हेच पाहिजे आहे आणि हे आपण तरुण मुलांनी जपून ठेवायची सध्या गरज आहे आणि हे काम प्रसाद गावडे, रोड व्हील राणे , लकी , अनिकेत , अविनाश , सुनील माळी आणि इतर कोकणातील यु-ट्यूबर्स हे यु-ट्युबच्या माध्यमातून करत आहे कारण यु ट्यूब हे असे माध्यम आहे की ते सर्व तरुण मुलांपर्यंत आणि गावातील लोकांपर्यंत पोहचले आहे आणि त्यामुळे ह्या कोकण देव भूमीचे खऱ्या अर्थानी आपण कोकणातील तरुण मुलं रक्षण करुशक्तो आणि तू असे जपणारे टिकून ठेवणारे संदेश देऊन व्हिडिओ बनवले तर तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि आम्हाला बघायला आणि काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल असे व्हिडिओ बनवून तू आमच्यासाठी नको तर ह्या कोकण देव भूमीसाठी छान काम कर कारण भविष्यात ही कोकण देव भूमीच आपल रक्षण करणार आहे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      Yess nakkich karu ☺️☺️💐💐
      Thank you ☺️☺️💐💐

  • @sameerrahate2746
    @sameerrahate2746 3 роки тому +13

    Sir वेताळ मंदिर बाजूला जी मूर्ती आहे लक्ष्मी ची ती गौतम बुद्धांची आई महा माया ची मूर्ती आहे ज्या लेणी आहेत त्यात त्या आपण ज्याला लक्ष्मी ची मूर्ती बोलतो त्या महामाया महामाया म्हणून आहेत

    • @JourneywithSuyogvlogs
      @JourneywithSuyogvlogs 3 роки тому

      🙏नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल च्या एका नविन व्हिडिओ मध्ये..
      मालवण मधील *पेंडूर* तलाव....
      श्री देवी तिळंबा आई मंदिर....
      निसर्गरम्य असा *पेंडूर* गांव..
      *मालवण* *कोकण* ...
      अवश्य बघा व्हिडिओ आणि आवडला तर चॅनल ला *लाईक* *शेयर* *कमेंट* आणि *सबस्क्राईब* करायला विसरू नका..🙏
      चॅनेल ला *Subscribe* वर क्लिक करा
      ua-cam.com/video/9BBv5oFuEhE/v-deo.html

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 3 роки тому +2

    हा आपला वारसा आहे आपला इतिहास आहे.... ह्या गावातली लोकं घाबरतात की काय...ह्या बुध्दामय इतिहास आहे.... कोकणात बुद्ध इतिहासाचा एक सुंदर खजिना आहे हा... कृपया ह्याची नीट काळजी घ्या त्याचे संवर्धन करा.... 🙏🙏🙏🙏

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 роки тому +3

    Khupc chhan vatavrn aani mahiti

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 роки тому +1

    खूप छान

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 2 роки тому

    ASI झोपलय. अप्रतिम ठेवा दाखविल्याबद्दल धन्यवाद.

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 2 роки тому +1

    इतके सुंदर शिल्प असलेल्या गावाला काही करावेसे वाटत नाही, किंवा शिवभक्तानी लक्ष घालावे

  • @ajitchavan6698
    @ajitchavan6698 2 роки тому +1

    Masat❤️👍

  • @charusheelasawant1933
    @charusheelasawant1933 2 роки тому +1

    Barobar, Kokan chi sampatti baher jata kama naye,

  • @pravinsurve5756
    @pravinsurve5756 2 роки тому +1

    Amazing your are great Thanks

  • @prajaktajoshi5653
    @prajaktajoshi5653 3 роки тому +2

    1 no संचित . आणि तू bolatos ते बरोबर आहे. याच savrdhan व्हायला हव. आणि जपायला हव. Khavne गाव आहे मालवण madhe ch.chipi विमानतळ javal तिथे khavne shvar म्हणुन देव आहे त्या hi मूर्त्या jayn कालीन ch vatat आणि तिथे hi sateri shanta दुर्गा देवी आहे .khup ch chan आहे .

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      Nakiich bhet dein☺️☺️💐💐

    • @pushpamathkar2487
      @pushpamathkar2487 3 роки тому

      @@SanchitThakurVlogs संचित तु कोकण परिसरातील ऐतिहासिक वास्तू च्या माहिती सांगतोस त्या बद्दल खूप धन्यवाद या सर्वाचे जतन व्हायलाच हवे तू फार तळमळीने सांगतोस फिरताना काळजी घ्यावी

  • @balajimagar5901
    @balajimagar5901 3 роки тому +1

    Mast

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 3 роки тому +1

    माझा सासर आहे हे
    पन जात नाही . भारी वाटला. मस्त छान आहे

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому +1

    घर बसल्या देवळ दाखवलस खूप खूप छान 1नबर तुझा ब्लॉग

  • @vanitalahange2073
    @vanitalahange2073 3 роки тому +4

    संचित भाऊ, तुमच्या कोकणचे व्हिडिओ पाहुन खुप छान वाटते आणि मी पण कोकणात फिरायला गेले की काय असे वाटते. खरंच कोकणातील सर्व मंदिरे इतकी छान आहेत. आमच्या इकडे कुठेच नाहीत अशी मंदिरे. तुझे सर्व व्हिडिओ पाहताना त्यात हरवुन जाते. खुप छान 👌👌

  • @kirtipawaskar8863
    @kirtipawaskar8863 3 роки тому +1

    हे बौद्ध धर्माशी निघडित आहेत ,कोकण ला अपरांत नाव होतं,संघरक्षित भत्ते होते जे सर्व संभाळचे ,पेढुर हे बौध्द लोकांचें महत्वाचे ठिकाण होते,तिथुन धम्म प्रसार केला जायचा . आजहि हि ठिकाणे बौध्द धम्म ची साक्ष देत आहेत.

  • @ravikiranrawool457
    @ravikiranrawool457 2 роки тому +1

    98 पासून 2003 पर्यंत सिंधुदुर्गात ले बरेच गाव फिरलंय.पण अशी दुर्लक्षित इतिहासिक स्थळे माहित नव्हती.ती आता घर बसल्या दिसतात.संचित तुझ्यामुळे.थँक्स ,😘🌹🌹.यु..

  • @satyavanpanchal4330
    @satyavanpanchal4330 3 роки тому +2

    Mast bhava vedios

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 24 дні тому

    अप्रतिम

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 роки тому +1

    संचित,सुरेख व्हिडीओ,ही भगवान गौतम बुद्धांची सुरेख हसरी मूर्ती आहे ,पाहून समाधान वाटले,पुरातन काळी कोणतीही आधुनिक साधन नव्हती ,पण सर्व कोरीवकाम किती सुरेख आहे ,आज हे सर्व जपायला हवं,धन्यवाद

  • @nivrutinaik8130
    @nivrutinaik8130 3 роки тому +1

    Gharbaslya devdarshan zale,khup chan

  • @The_kokani_Explorer
    @The_kokani_Explorer 3 роки тому +1

    Khupch sundar😍

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @sulbhamhatre4129
    @sulbhamhatre4129 Рік тому

    खूपच सुंदर

  • @shamanarkar1
    @shamanarkar1 3 роки тому +4

    ओळखीच्या गावांचे अनोळखी इतिहास तुमच्या कडून समजतात. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @deepikashelar4009
    @deepikashelar4009 3 роки тому +1

    Kharach khup chaan mahiti ani kokanatlya vastunche sanvardhan zhalach pahije sahamat aahe tumchya matanshi

  • @krupamhapralkar619
    @krupamhapralkar619 3 роки тому +1

    Barobar boltoys tu, ya murtyanch savardhan vhayla havay as khup kalkaline vaatatay, bhari blog👍👌

  • @dineshtondwalkar9569
    @dineshtondwalkar9569 Рік тому

    Khup chhan

  • @kavitachalke2416
    @kavitachalke2416 2 роки тому +1

    खुप छान 😍🙌

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 11 місяців тому

    Beautiful vlog Sanchit. Hats off to you for your efforts and hard work.

  • @sameepparab
    @sameepparab 3 роки тому +3

    संचित...... मस्त 👌👌👌..... नविन...... गाव.....गावाचो परीसर आणि थयल्या देवस्थानाची माहिती जगासमोर घेऊन इलस
    🙏🙏🙏
    आणि..... संचित...... एक गोष्ट बरी हा रे.....तु ज्या देवळात जातस थय..... तुझ्या स्वागतासाठी दत्तगुरु महाराज्यांचे श्वान मात्र येतत नशिबवान आसस तु 🙏🙏🙏

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +2

      हो ना मी पण तोच विचार करतोय ...

  • @bhaskarsawant9444
    @bhaskarsawant9444 3 роки тому +1

    सुंदर माहीती

  • @mandarsawant6650
    @mandarsawant6650 3 роки тому +3

    Dada mi pan pendur cha aahe thanks video banvlya badal 😊🙏

  • @ParniCraft
    @ParniCraft 3 роки тому +1

    thumps up

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 2 роки тому +1

    👌👌

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 роки тому +2

    Yes khar tuz ki ya aitihasik gosti japlya pahije, ya murtinch sanvardhan kel pahije🙏 mala ya murtinbaddal aikun kinva google varun mahiti hoti pan mi gele navhte aaj tuzyamule bghitalya ani tula parat ekda thanks a lot ghari basun amhala amchya devanch darshan milal ajun ek amchya javal ek talambi deul tithe tale ahe tithla hi najara khup chan ahe next time parat jashil pendur madhe tevha dakhav 😊

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 роки тому +1

    दादा पेंडूर गावामध्ये अजून एक लोकेशन आहे पेंडूर सोनारवाडी या गावात ज्या वेळेला राम सीता लक्ष्मण वनवासात होते त्यावेळेला काही काळ पेंडूर सोनारवाडी गावातील त्या डोंगरांमध्ये राहिले होते व त्या वेळचे त्यांचे हाताचे ठसे पायाचे ठसे व काही अनेक गोष्टी त्या डोंगरांमध्ये आहे जर तू ना तू तु त्या ठिकाणी गेला तर नक्कीच पेंडूर सोनारवाडी गावात जा अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा त्याही खूप वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजेच राम सीता लक्ष्मण म्हणजे रामायण काळातील त्या गोष्टी आहे .
    वैभव वाडी येडगाव या गावातही एक लोकेशन आहे तिथेही आहे मुर्त्या आहेत तुझ्या पेंडूर गावातील दाखविले आहे त्याच्या जवळ त्यांचा इतिहास ही खूप वर्षांपूर्वीचा आहे .
    आणि तुझे म्हणणे ही बरोबर आहे आपल्या कोकणातला इतिहास आपल्या कोकणातच राहायला पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी करायला होय .
    अप्रतिम ब्लॉग

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому +1

      वैभववाडी मधील माहिती मला email करा
      sanchitthakurvlogs@gmail.com

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 2 роки тому +1

    Sanchu sorry 😞 ha ha video mi atta bhagto ahe hya agodar mi just tuza dhabil gavacha video bhagitala tya made mi tula pendur baddal lihil hot pan tu agodarach pendur cha video banvala hotash vetoba mandir made maze nav ahe v ingrowanchi tarikh pan ahe bar vatal tu mazya gavacha video banvalash thanks a lot 👌 ❤️ 🙏 😀 👌👌🙏🙏💖💓💖💓

  • @atulpednekar171
    @atulpednekar171 2 роки тому +1

    मी पण तुमचे सर्व vlog bgto .khup मस्त माहिती देता

  • @saishanaik366
    @saishanaik366 3 роки тому +1

    खुप छान सचिंत

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 3 роки тому +4

    संचीत, खूप छान गाव व तेथील माहिती दिलीस. धन्य वाद ! निसर्गरम्य, अप्रतिम.

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +1

    रवळनाथ.मंदिर.वेताळ.मंदिर.समोर.आती.
    प्राचीन.आहे.सेकंद.टाईम.जरूर.दाखवा.

  • @nanduparab8302
    @nanduparab8302 2 роки тому

    खुपच छान , आता मी ७० वर्षेंची आहे पण घरी बसून तुमच्या बरोबर गावोगाव फिरत आहे निदान ह्या पृथ्वीग्र हावर जन्म घेतला एवढंच समाधान. तुमच्या संपुर्ण टिमला शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 2 роки тому

    God bless you ☝️

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 роки тому +1

    Aamhala ghar baslya pahayla milale puratan shilpa..Ani murti...thanx

  • @vaibhavghanekar6124
    @vaibhavghanekar6124 3 роки тому +1

    खरच याचं संवर्धन केलं पाहिजे .. किती छान आहे कोणी लक्ष पण नाही देत वाटत..‌

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      काही संस्थान काम करतात तरीपण महत्वाचं म्हणजे सरकारच लक्ष गेलं पाहिजे तरच कायमस्वरूपी संरक्षण होईल..

    • @vaibhavghanekar6124
      @vaibhavghanekar6124 3 роки тому +1

      तेच तर किती छान काम केल आहे मुर्ती वरती..

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      @@vaibhavghanekar6124 yes☺️👍💐

  • @sakshilad7384
    @sakshilad7384 3 роки тому +1

    Mast 👌

  • @hemlatapednekar6358
    @hemlatapednekar6358 3 роки тому +1

    Great khup chan info

  • @rajsatam3004
    @rajsatam3004 3 роки тому +2

    Mast video Dada

  • @nitinchinchawalkar1645
    @nitinchinchawalkar1645 3 роки тому +2

    Mitra kharach tu jabardast Kam kartoys

  • @renukakupekar7970
    @renukakupekar7970 3 роки тому +2

    मस्त विडिओ दाखवतोस

  • @prashantbhavsar5562
    @prashantbhavsar5562 3 роки тому +1

    हजारो वर्षांची अविस्मरणीय अविश्वसनीय
    अनमोल ऐतिहासिक ठेवा आपल्यामुळे पाहायला मिळाला
    आणि हा ऐतिहासिक कोकणातील ठेवा जपण्याची आपली तळमळ परमेश्वर कृपेने पूर्ण होवो 🙏🙏

  • @687harsh
    @687harsh 3 роки тому +3

    Bhari video

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 роки тому +7

    Thank you so much mazi request purn kelyabaddal mi mage comment keleli tula amchya gavi pendur gavat janyasathi 🙏😍💖😊

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +2

      Welcome ☺️☺️💐💐
      Jikde history ahe kahitri new ahe tikde mi nakkich jato☺️☺️💐💐

  • @deepalichavan9119
    @deepalichavan9119 3 роки тому +2

    मी ही कोकणातीलच आहे पण काय मुबंईत असल्या मुळे गावचे काही माहीत नाही आज तुझा मुळे कळत आहे कोकण तील इतिहास

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      Thank you☺️☺️
      Video paha like kara ani share pan kara☺️

  • @ravindrapotale2288
    @ravindrapotale2288 3 роки тому +1

    सुंदर मूर्ती आहेत
    आणि तुझी त्या प्रती असलेले प्रेम तुझ्या शब्दात कळते
    छान वाटले
    आणि कोकणचा निसर्ग अप्रतिम

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 3 роки тому +2

    अप्रतिम।👌👌

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 3 роки тому +1

    पावसाळ्यातील हिरवेगार कोकण 😍💓अप्रतिम सौंदर्य😍💓
    संचित तुझे व्हिडिओ म्हणजे .. घरबसल्या कोकण दर्शन, कोकणातील विविध गावांची तिथली वेगवेगळी वैशिष्ट्ये , ऐतिहासिक वास्तू यांचे उत्कृष्ट दर्शन ... पण हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे त्यांचे जतन गावातच झाले पाहिजे याची ग्रामस्थांनी काळजी घेतली पाहिजे .. हे सर्व दाखवताना पावसाळ्यात तु काळजी घे . 🙏धन्यवाद😘💕

  • @bhagyashrikhochare777
    @bhagyashrikhochare777 3 роки тому +1

    Apratim👌👌

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 роки тому +1

    संचित , नेहमी प्रमाणे छान माहिती देणारा व्ही डी ओ झाला आहे , सगळ्यात महत्वाचे जे आवाहन तू ग्रामस्ताना केले आहेस ते म्हणजे कुणाला हा ठेवा नेऊ देऊ नका जे काही संशोधन करायचे ते इथेच करा , मित्रा धन्यवाद या आवाहणासाठी 👍👍👍👍.

    • @santoshsandim966
      @santoshsandim966 3 роки тому +1

      संचित सर तुम्ही खूपच चांगली माहिती देताय अशीच माहिती दया तुमची पण काळजी घ्या

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      Thank you☺️☺️💐💐

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      Ho ☺️

  • @Athavgurav7015
    @Athavgurav7015 3 роки тому +2

    विडिओ खूपच भारी असतात.माहीती पण खुप छान सांगतो. आभारी आहे माहीती कळते.

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 3 роки тому +1

    Tuzyamule.aaj mla.murtivishi.smjle.mi pendu guramvadichi.aahe tuze.khup.danywad

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому

      ☺️☺️👍💐

    • @JourneywithSuyogvlogs
      @JourneywithSuyogvlogs 3 роки тому

      🙏नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल च्या एका नविन व्हिडिओ मध्ये..
      मालवण मधील *पेंडूर* तलाव....
      श्री देवी तिळंबा आई मंदिर....
      निसर्गरम्य असा *पेंडूर* गांव..
      *मालवण* *कोकण* ...
      अवश्य बघा व्हिडिओ आणि आवडला तर चॅनल ला *लाईक* *शेयर* *कमेंट* आणि *सबस्क्राईब* करायला विसरू नका..🙏
      चॅनेल ला *Subscribe* वर क्लिक करा
      ua-cam.com/video/9BBv5oFuEhE/v-deo.html

  • @gaurimestry6230
    @gaurimestry6230 3 роки тому +2

    Starting Part 🤗🤗 Sweet Malvani Language...😃😃

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 2 роки тому

    Doing a good job bro

  • @varshagosavi5867
    @varshagosavi5867 Рік тому

    खुप छान तु आमचे गाव दाखविले

  • @surajpendurkar1196
    @surajpendurkar1196 2 роки тому +1

    माझं गाव पेंडुर ,चे गावडे आम्ही

  • @deepalimalvankar6596
    @deepalimalvankar6596 3 роки тому +2

    छान information sanchit. ..मुर्ती सुरेख सुंदर आहेत ..मुर्तीचें जतन नीट केले पाहिजे

  • @rupeshrane2892
    @rupeshrane2892 3 роки тому +2

    मस्तच 👌👍

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +1

    खरंच खुप सुंदर 😍👌

  • @shrutikambli2203
    @shrutikambli2203 3 роки тому +1

    खरचं खूप छान 👌👍 😊

  • @singleboy____7135
    @singleboy____7135 3 роки тому +2

    Khup chan👌🥰

  • @rajashrighadi116
    @rajashrighadi116 3 роки тому +1

    khup chan👌ha etihas japun thevn khup garjech ahe.

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 3 роки тому +2

    Khup chan✨👍👍

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 3 роки тому +3

    खूप छान व्हिडीओ 🙏 हा इतिहास आहे जपला पाहिजे 👍👌👌👌😊

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 роки тому +1

      Thank you ☺️💐

    • @avinashsarmalkar1265
      @avinashsarmalkar1265 3 роки тому +2

      आभारी भावा छान छान माहिती देतो मला तुझी कळ कळ समजते ।

  • @deepalichavan9119
    @deepalichavan9119 3 роки тому +1

    दादा तु छानच व्हिडीओ टाकतोस आणि माहिती पण छान सागतोस मी तुझे सगळे व्हिडीओ न चुकता बगते आणि मला नैचर पण खुपच आवडते आणि ते तु दाखतोस लय भारी आहेस तु इतके कष्ट करुन तु आम्हाला दाखवतोस त्या बद्दल धन्यवाद🙏🏻

  • @vanita8744
    @vanita8744 3 роки тому +1

    Video chan aaji sudha premal aahe jai hanuman 🙏🙏

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 3 роки тому +2

    मस्त

  • @mahesh6362
    @mahesh6362 3 роки тому +1

    धन्यवाद सर तुम्हाला तुमच्या कार्याला सलाम

  • @rupeshchaudhari7029
    @rupeshchaudhari7029 3 роки тому +1

    👌👌🥰

  • @ramkrishnakadam4037
    @ramkrishnakadam4037 3 роки тому +1

    Very nice information thanks

  • @lover3441
    @lover3441 3 роки тому +2

    खुप छान सचीत 👌👌👌👌👌👌🌹☺

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Aajji la Big like very cooperative aani khup chaan video dada thank you for sharing aani asha thikanni jatana hatat Kathi tevat Jaa for precautions haa Sundar tevha japayela hava it's precious

  • @ashwinishetty6634
    @ashwinishetty6634 3 роки тому +2

    Masta