आमच्या गावात झाडाखाली जमिनीत सापडले धातूचे शिवलिंग,महाशिवरात्रीला वणवा पेटला,जळले झाड प्रकटले महादेव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 бер 2022
  • आमच्या गावात झाडाखाली जमिनीत सापडले धातूचे शिवलिंग,महाशिवरात्रीला वणवा पेटला,जळले झाड प्रकटले महादेव,झाला चमत्कार
    कोकणातील एक निसर्गसंपन्न ,निसर्गाच्या कुशीत वसलेले एक डांगमोडे ,मसुरे गाव,म्हणजे आमचं गाव या गावाची ग्रामदैवत श्री देव रवळनाथ . आमच्या गावात 1मार्च महाशिवरात्री च्या दिवशी सड्यावर(वरचा सडा-माळरान ) अचानक आग लागली ,मार्च महिना चालू आहे ऊन देखील खूप पडतंय ,त्यामुळे माळरानावर सगळी कडे सुकं गावात ( कराड ) होत आणि त्यामुळे आगीचा वेग देखील जास्त होता , आग आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला भस्म करून पुढे जात होती. वरच्या सड्यावर आमच्या गावातील एक आकेरी ब्राम्हण स्थळ आहे जिकडे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात . त्या ठिकाणी एक जून वडाचं झाड आहे आणि एक पुरातन शिवपिंडी देखील आहे .तर या वडाच्या पारांब्यांपर्यंत ही आग पोहचली आणि त्या पारांब्या देखील जाळून गेल्या . या वडाच्या पारांब्या जाळून खाक झाल्या पण त्यामध्ये असलेलं, मातीमध्ये पुरलेलं धातूंचे शिवलिंग निदर्शनास आले. पण शिवलिंग अर्ध जमिनीत तर अर्ध जमिनीवर होत . शिवलिंग शेषधारी होते. शेष पंचधातु पासून बनलेला होता शिवलिंग हे पितळ पासून बनवलेले आहे असं दिसून आले . शिवलिंग वरती बेलपत्र तसेच नेत्र कोरलेले आहेत . कधी बनवलं असेल,कोणी बनवलं असेल किंव्हा काळ सांगणे कठीणच.
    महाशिवरात्री च्या दिवशी जणू वानवा पेटून महादेव च प्रकटले अस सर्व वाटत होतं.
    तरीपण ते शिवलिंग नक्की काय आहे या विषयी देव कौल व इतर चौकशी करून गुरुवार दिनांक 10 मार्च 2022 रोजी तिथे उत्खनन करून ,त्याची प्रतिष्ठापना करायचं गावातील सर्व लोकांनी मिळून ठरवलं ,आणि त्याच दिवशी विडिओ बनवायचा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहचवायची अस ठरलं होत. त्यामुळे विडिओ 1मार्च 2022 ला न बनवता मी गुरुवारी बनवला पण त्या आधीच बातमी सर्वत्र पसरली होती . त्यामुळे खूप भाविक येऊ लागले दर्शन घेऊ लागले.
    तर गुरुवारी केलेलं उत्खनन आणि त्या उत्खननात नक्की काय सापडलं हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि share करा ☺️
    Google Map Location - Swayambhu Mahadev
    maps.google.com/?cid=15697524...
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_Thakur_Vlogs
    #shiv #shivling #kokan #konkan #shiva
    #shivpindi #lordshiva

КОМЕНТАРІ • 229

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +6

    ओम नमः शिवाय. कोकण परशुरामाची भूमी आहे हा शेकडो वर्षांपासून चा इतिहास आहे. व्हिडीओ माहिती पूर्ण झाला आहे.

  • @KOKANISHIVA
    @KOKANISHIVA 2 роки тому +48

    दादा‌ तु नेहमी बाहेरच्या गावी जाऊन तेथील प्रचीन वास्तु किंवा‌ पुरातन गोष्टी दाखवतोस पन आज तुझ्या गावतील‌‌‌ हि‌ माहीती देतान तुझ्या चेहर्यावरचा आनंद दिसतोय

  • @sangitanaikde6606
    @sangitanaikde6606 2 роки тому +5

    खूपच छान व्हिडिओ.. महाशिवरात्री च्या दिवशी मूर्ती सापडली म्हणजे काहीतरी चमत्कारच म्हणावा लागेल..अतिशय सुंदर मूर्ती आहे..पण मला आसे वाटते की त्या मूर्तीचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून तिच्या वरती काहीतरी छोटेसे आसाव..🙏👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @supriyaparulekar8663
    @supriyaparulekar8663 2 роки тому +5

    संचित तुझ्या गावी मिळालेली पिंडी पाहून खूप छान महाशिवरात्रि झालेला चमत्कार पाहून खूप आश्चर्य वाटलं खूप छान तू माझी सांगत असतोस त्याबद्दल तुझे अभिनंदन

  • @xplore8447
    @xplore8447 2 роки тому +6

    ओम नमः शिवाय 🙏🌿🌿🌼 आपली कोकण भूमी सदैव देवाच्या आशिर्वादाने पावन झालेली आहे. 🙏🙏

  • @hemlatajoshi5504

    संपुर्ण भारत शिवमय होणार!! हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏

  • @Sree_Ram_214
    @Sree_Ram_214 Рік тому +1

    तिथे खाली गुफा पण आहे 🤔

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 2 роки тому +10

    संचित.. तुला पहिल्या खुप खुप शुभेच्छा 💐💐 .खुप छान तुमच्या डांगेमोड गावाला महादेवाचा आशीर्वाद च लाभला महाशिवरात्रि च्या दिवशी शिवपिंडी सापडली ..हर हर महादेव 🌼🌼🙏🙏

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 роки тому +2

    संचीत मी हा विडिओ चार वेळा पाहिले ते लिंग शिवाजी महाराजांच्या काळात ले असेल नाही तर पोर्तुगीज वेळी तिथे ठेवलं असेल देवाची नासाडी करणार ह्या हेतूने तिथे ठेवले असेल

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 роки тому +1

    संचित महाशिवरात्र दिवशीच साक्षात्कार झालाय. नमस्कार माझा.

  • @snehalatalikhite8551

    वा सुरेख व्हिडिओ , धन्यवाद

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 2 роки тому +4

    हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @vinoddobkar672
    @vinoddobkar672 Рік тому +1

    Amchyakade pn, amche je mahapurush thikan aahe, tithe pn jevha vadachya zadala aag lagli tevha tya khali pn aamhala ek pashan milal aahe jase aaplya mandira made gol akarache pashan aatat tase, aamhi pn tyachi pooja vaigare karuk stannpann kel aahe

  • @pravin_koli
    @pravin_koli 2 роки тому +2

    माझा देव भोला आहे आणि भक्ताना दूर नाय ठेऊ शकत स्वतः पासून ❤️डोळ्यात पानी आल विडिओ द्वारे दर्शन करुण 🙏🙏🙏🙏🙏🙏📿🕉️❤️🙏❤️🙏📿🕉️

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 2 роки тому +4

    संचित कसा आहेस.

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 роки тому +1

    Prachin mandir aslpahejay tayavar zad ugal asayl kup prachin pantaychi pranpratishta zali jaybhilaynatha

  • @vaibhavarde9277
    @vaibhavarde9277 2 роки тому +14

    संचित मला वाटत ते शिवलिंग नसुन शिवलिंगावरिल आच्छादन ( मुखवटा ) आहे. मुळ शिवलिंग आजुबाजूला कुठेतरी अशेल किंवा शेजारी जे दुसरं शिवलिंग आहे ते जर समान मापाच असल्यास त्या लिंगाचेच ती आभुषणे असुशकतात

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 2 роки тому +4

    संचित.......छान व्हिडिओ.

  • @user-wv7gs3xo1g
    @user-wv7gs3xo1g 2 роки тому +4

    वडाच्या झाडाखाली शिवलिंग सापडल्यामुळे त्याला वटेश्वरलिंग असे म्हणतात