जागतिक महिला दिन
Вставка
- Опубліковано 27 гру 2024
- 🌹🌹 कळंत्री विद्यालयात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न...🌹🌹
➖➖➖➖➖➖➖➖
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालय व श्रीमती सरस्वतीबाई आवटे बालक मंदिर शाळेत आज जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या दोन्ही सत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्येचे दैवत सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एच.एच.पटेल विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका, अनुभवी शिक्षिका सौ.विजया मालपुरे या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पूर्वी महिलांचे दिनक्रम कसे होते तसेच महिलांचे जीवनातील महत्व पटवून दिले व नेहमी महिलांचा आदर सन्मान करावा असा संदेश दिला. शाळेतील विद्यार्थिनींनी विविध भारतीय कर्तृत्ववान महिला व समाज सुधारक महिलांची वेशभूषा परिधान करून माहिती सांगितली. कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्याध्यापक प्रमोद दायमा, संगिता मोराणकर, दिपाली पाटील, स्मिता चित्ते होत्या. कार्यक्रमात शाळेतील सर्व महिला शिक्षिकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचलन दीपाली पाटे व समाधान राठोड सर यांनी केले. आभार दीपमाला पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹