खरचं सांगायचे झाले तर, मधुरानी यांना भांबावून सोडणारी आणि त्याचबरोबर विचार करायला भाग पाडणारी ही मुलाखात ठरली.. संजय मोनेजींचे सत्य आणि स्पष्ट बोलणे जास्त आवडीचे ठरले.. आतापर्यंत पाहिलेल्या मुलखतींमध्ये वेगळी मुलाखत आहे..😊
खूप छान आणि परखड. मुलाखतीचा शेवट पाहताना पुलं चा अंतू बर्वाचा शेवट आठवला - "कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं देखील, खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात."
Sanjay money so honest straight forward and transparent .I always like him.He should get more roles.प्रशांत दामले सारखे लोकाना हसवणे खूप सोपे पण Sanjay मोने सारखे अंतर्मुख करणे आणि त्यांच्या भूमिका कायम लक्षात ठेवण्यासारखा nat मिळणे कठीण. अशाच भूमिका करत रहा आणि असेच तर्कशुद्ध बोलत रहा मोने.माझ्या शुभेछा. आपण दोघे माहीम मध्ये राहतो ह्याचा मला अभिमान आहे
संजय मोनेनी अर्थातच मनातले बोल मांडले. ते किती टक्के खरे आहेत हे आपल्याला प्रेक्षक म्हणून नाटकांची घसरलेली पातळी पाहून खरे वाटतात. नाटकांच्या तालमी कमी होतात, संहिता ताकदवान नसते हे तर जाणवतेच , .मोनेंचा प्रामाणिकपणा जबरदस्त आहे. पण नटाने आपले काम उत्तम द्यायचे हे तर खरे. मधुराणीला अशा मुलाखतीच्या रिस्पॉन्स चीअपेक्षा न्हवती असे वाटले. ह्यावेळी मुलाखत घेताना तिचा कस लागला. पण तिने तिचे काम उत्तम करून मोनेंना योग्य प्रश्न विचारून बोलते करण्यात हातभार लावला. एक सूचना कि निर्माते, दिग्दर्शक ह्यांची हि बाजू मांडली जायला पाहिजे. फक्त नटनट्या ह्यांना बोलावण्यापेक्षा रंगभूमीतील इतर स्टेकहोल्डर्स ना बोलावले तर सर्वंकष कार्यक्रम होईल , इंटरेस्टिंग होईल हे नक्की.
Madhurani, you been really patient and was accomodating his feelings well by not disturbing in between. I was actually waiting for Sanjay Mone as a guess of this program. After listening to him, I have mixed reaction. Very happy he said things in a very straight forward way, however it's very harsh at times.
संजय मोने हा मराठी रंगभूमीचा एक लकाकता तारा आहे...सुकन्या व संजय दोघेही खूप उच्च स्तरीय कलाकार आहेत🙏 खूप छान मुलाखत ...अगदी रोखठोक 👏👏 आपली मते परखडपणे व कळकळीने मांडली आहे मोनें नी...धन्यवाद
Hi, today I saw your program,Khup chaan 👍💐 Sanjay Mone grt personality very simple living but have nurtured good values as an Actor I appreciate your talent dear,I follow you in ur different programs, interviews Stay blessed
छान व्यक्त झाले संजय जी!. तुम्ही सगळे रंगपंढरीचे आयोजक, एकेका मुलाखतीसाठी भरपुर परिश्रम घेता, खुप छान रंगते मुलाखत! इतकी छान भेट दिल्याबद्द्ल आपल्या सर्वांचा मनःपुर्वक आभारी आहे.
खुप सुंदर मुलाखत शेवट तर खुप छान असे परखड व्यक्ती पाहिजेत खर.... 🌸 तुमच डिअर आजो तर खुप आवडत मला मी ते नाटक आत्ता पर्यंत 47 वेळा पाहिले प्रत्येक वेळी नवीन आजो समोर येतात. हे फक्त तुमच्या सारखे मोठे मोठे कलाकार एवढ सुंदर सादर करू शकतात.
Volume variations पहिल्यांदा च जाणवले.. संजय मोनेंची रोखठोक मुलाखत आवडली.. दिग्दर्शक म्हणजे दिशा दर्शक... तंतोतंत पटलं... पार्श्वसंगीत घेणं... हा कॉन्सेप्ट आवडला.. त्यांनी जुन्या दर्जेदार आणि आताच्या कच्ची संहिता असलेल्या, दोन्ही कडे काम केलेलं असल्याने त्यांना रोखठोक मतं मांडण्याचा अधिकार आहे... असं खरं बोलायला हिम्मत लागते... प्रेक्षक म्हणून मला हा लिखाणात ला, संहितेच्या दर्जातील फरक नेहमीच जाणवतो... अजून एक माझा अनुभव त्यांना सांगावासा वाटतो... आता २१व्या शतकातही, चाकोरीबाहेर जाऊन कोणी काही नवीन निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला सहकार्य तर सोडाच, पण सर्वतोपरी प्रयत्न हाणून पाडण्याचंच काम प्रस्थापितांकडून केलं जातं. नाट्यगृह उपलब्ध होणं, ति. वि., जाहिरात, सगळीकडे अडवणूक च अनुभवायला मिळते. प्रस्थापित वृत्तपत्रांकडून प्रोत्साहन देणं दूरच, सध्या तीन महिने तुमच्या नाटकाबद्दल लिहायला वेळ नाही, असं सांगितलं जातं... अाता समविचारी लोकांनी एकत्र येऊन, आताचे जे नवीन पदाधिकारी आहेत त्यांच्या बरोबर जाणीवपूर्वक काही प्रयत्न करायला हवेत, असं मनापासून वाटतं. जुन्या नव्या पिढीच्या कलाकारांचे विचार ऐकायला मिळतात यासाठी रंग पंढरीचे आभार....
Rang pandhari....this is love...evdha pranjal kathan aaj kal aikayla milat nahi...aani mhanun te faar faar bhavle...really really close to ❤....shevati tachkan pani aale...sir na dirhayusha labho...faar faar sundar..
khup chhan mulakhat. Atishay parkhadpane mate vyakt keli. mulakhat uttam pan marathi rangbhoomi chi avastha ashi asel tar pudhchya pidhila changli natake baghayla miltil ka ? Sanjay sir tumche abhar. Satya paristhiti kathan kelit. Madhurani tumche kautuk. Chhan episode. Rangpandhari team che abhar.
मला पण पाहिल्यावर हाच प्रश्न पडला अरे हे काय होत ? मला वाटतं थोडे वयस्कर झाल्यावर मागे पहाताना अस होत असाव बाकी मोनेसाहेब परखडपणा कायमच भावतो आम्हाला Be Happy 👍
मोने साहेब मी तुमच्या गगनभेदी नाटकाच्या मध्यंतरात तुम्ही सतत सिगारेटी ओढत होतात. पण मला तुमचा नैसर्गिक अभिनय व तुमचे देखणेपण यामुळे मला तुम्ही फार आवडायचात. (स्थळ शिवाजी मंदिर दादर )
माणूस "आपलीच आपल्या कॉप्या काढत राहतो" !!! अगदी बरोबर. "मराठीमध्ये अभ्यास करावा अशा भूमिकाच येत नाहीत" !!! अगदी बरोबर 'नाटक माझ्यामध्ये भिनलं पाहिजे" अगदी बरोबर नाट्यक्षेत्रातल्या दांभिकपणाची तुम्हाला किळस येते असं दिसलं मधुराणी, आज प्रथमच एखाद्या बोलरने फास्ट बॉल टाकावा आणि बॅटस्मनने प्लेड करावा तसं आज झालं. तुला अपेक्षित उत्तरच मिळाली नाहीत. कारण संजयदादा हा माणूस सच्चा, साधा आहे असं असणं हे आजच्या जगात दुर्गुण आहेत. या जगात आपल्याला विकावं लागतं. अहो, माधुरी दीक्षितला सुद्धा "डिंग डाँग डिंग... " म्हणत तोकडे कपडे घालून नाचावं लागलं आणि ती पुढे आली. ऐश्वर्या रॉयच्या सिनेमाची पण जाहिरात करावी लागते. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या उत्तम भूमिका केल्यात आणि स्वतः स्वतःवर खुश झालात. तुम्ही "मला कशाची खंत नाही म्हणताना तुमचा चेहरा "खंत आहे" असं सांगत होता. पण मला खात्री आहे की तुम्हाला रात्री शांत झोप येत असेल कारण ईर्षा , स्पर्धा आणि अहंकाराचा तुम्हाला दर्प नाही रंगपंढरीचे परत एकदा अभिनंदन !!!
संजय मोनेंची परखड मतं ऐकायला आवडली... पडद्यामागचं जग अनुभवायला मजा येतेय.. पण इथं मधुराणीजींच्या अभ्यासाची, पूर्वतयारीची उणीव भासली... जे रंगकर्मी स्वतः अभ्यासू आहेत, विचारी आहेत उदा... मुक्ता बर्वे, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, विक्रम गोखले, इला भाटे यांनी प्रश्नांवर आधीच विचार करून उत्तरं तयार ठेवली होती असं जाणवलं... पण अतुल परचुरे, गिरीश ओक, आनंद इंगळे किंवा आजची मुलाखत अधिक खुलवण्यासाठी मधुराणीजींच्या अभ्यासाचा उपयोग झाला असता... उदा... एखाद्या रंगकर्मीची मुलाखत घेताना त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन साधारण त्यांच्या अनुभव विश्वाच्या पल्याडच्या भूमिका कुठल्या असू शकतील याचा थोडा विचार मधुराणीजींनी आधीच केलेला असेल तर वाहत जाणाऱ्या मुलाखतीला बांध घालायला मदत होईल... त्यांनी कामं केलेल्या दिग्दर्शकांची नावंही आधीच माहीत असतील तर प्रश्न विचारताना अधिक नेमकेपणाने विचारता येतील... रंग पंढरी हा ठेवा आहे... बखर लिहिल्यागत इतिहास लिहिला जातोय... नाटकावर प्रेम करणाऱ्या या पुढल्या अनेक पिढ्या याचा अभ्यास करणार आहेत... त्यामुळे मुलाखतकारानेही अधिक तयारीने उतरणं गरजेचं आहे... रंगकर्मीना आयत्या वेळी त्यांची महत्त्वाची भूमिका आठवली नाही म्हणून त्याची या बखरेत नोंदच झाली नाही असं व्हायला नको... अशावेळी मुलाखतकाराचाच समग्र अभ्यास उपयोगी पडेल असे वाटते... बाकी उत्तमच सुरू आहे... पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर झाली मुलाखत...मधुराणीने संजय मोनेंना छान बोलतं केलं.... त्यांनीही त्यांची स्पष्ट व परखड मते मांडली....रंगभूमी विषयी आणि स्वतःविषयी सुद्धा... मनापासून जे वाटले ते ते सर्व करत गेले आणि जे नाही पटले ते उगाच नाही केले...हा त्यांचा स्पष्ट स्वभाव त्यांनी चांगल्या शब्दात व्यक्त केला... तरुणाईचे त्यांनी स्वागत केलं नि तरुणांशी संवाद साधतात ...मैत्री करतात...हे खूप कौतुकास्पद आहे... त्यांच्यातील आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, स्वभावातील खरेपणा खूप भावला.... त्यांनी सादर केलेल्या आजवरच्या कलाकृती ना मनपूर्वक धन्यवाद देते ...खूप छान वाटले... त्यांना सु आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते ... 🙏🙏
Don't know how to rate this episode. Of course Sanjay Mone was expressing his frank opinions and experience. Not sure if Madhurani trying t to stick to the scripted question was a right approach - here it could/should led to exploring possible changes, improvement, transitions, ways to enable those, etc.
मोने जी आपण म्हणताय लाखोब लोखंडेच्या बचा वाच भाषण आपण कानडी शैलीत बोलला पण ते पात्र नाटकात स्वतः ला लाखोब लोखंडे म्हणूनच सांगत असेल तर फक्त सुरवातीपासून कानडी शैली आवश्यक होती ना? फक्त शेवटच्या बचावाचा भाषणापूरताच कशी चालेल?
Hi mulakhat baghun ek goshta lakshat ali ki jashi pidhi badlat geli tasa marathi rangbhoomi "vyavsayakade" jast valali.. Tya adhi che sagle kalakar abhyas karun, drama school madhe shikun, talun sulakhun nighat. Halli chya pidhi la ghai aste prayog karnyachi.. Khup kami loka astat jyanna marathi lekhakanchi nava mahit astat. Durdaivane asa hi hota apan jyancha natak karat ahot tya lekhakanchi itar natakanchi nava suddha mahit nastat. Rangpandhari madhe alele sagle jyeshta jase Mohan Agashe, Dilip prabhavalkar, suhas joshi, Ila bhate, vikram Gokhale, neena Kulkarni, vandana gupte hyanna baghitla ki vatta natak karna mhanje nemka kay. Vachan, bhasha, sangeet, nrutya, nepathya, prakash yojana , sahakalakar, lekhak, digdarshak hyanchi bhatti jamun yene mhanje natak. Arthik fayda zala tar to nirmatyala. Pan kalakarala milanara samadhan hya sathicha attahas. Sanjay mone he 2 pidhyan madhla dua ahet. Kay hota and kay zala he nemka dakhvanare. 1 serial karun zali ki " ata mala natak karaycha ahe" ase anek usanvar nat halli zale ahe. Punha ekhadi serial milali ki natakakade padh firvaychi ani manasarkhi sanhita milat nai mhanun natak karat nai hi sabab deychi. Dagdatun murti ghadte.. tyavarcha adhik anavashyak bhag kadhla ki. Natacha tasach ahe. Adhik karu naka.. adhik kadha mhanje je urel ti sundar kalakruti asel.
@@RangPandhari Me swataha hya kshetratli nahi. Vayani mothi nai, and anubhav gathishi nai. Pan keval hya kalakaranchi mulakhat baghun tyatla saman dhaaga olkhun je vatla te lihila. Kami adhik bolle asel tar kshamasva. 🙏
A lot of things that Sanjay Mone said are true. But the problem is that he forgets he is a part of this and instead of taking this "outsider" critical approach, he should take on the problem. Instead of being cynical he should raise an army of young students and do it himself. Being cynical about your own field is a lazy, repugnant approach.
खरचं सांगायचे झाले तर, मधुरानी यांना भांबावून सोडणारी आणि त्याचबरोबर विचार करायला भाग पाडणारी ही मुलाखात ठरली.. संजय मोनेजींचे सत्य आणि स्पष्ट बोलणे जास्त आवडीचे ठरले.. आतापर्यंत पाहिलेल्या मुलखतींमध्ये वेगळी मुलाखत आहे..😊
मुलाखत छान होती . मोनेचा स्पष्ट वक्तेपणा व रंगभुमीवरील सद् परीस्थिबद्दल वास्तव आतिशय सुंदर शब्दांत सांगितले .
आताच ऐकला एपिसोड. अतिशय परखड, प्रामाणिक आणि सुंदर. मधुराणीने पण चिवटपणे पाठपुरावा करून प्रश्नांची उत्तरे मिळवली...एकूणच सुरेख एपिसोड.
खूप छान आणि परखड.
मुलाखतीचा शेवट पाहताना पुलं चा अंतू बर्वाचा शेवट आठवला - "कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं देखील, खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात."
:-)
मुलाखत उत्तम झाली.
संजयजींनी अतिशय स्पष्ट, बेधडक आणि प्रांजळ अशी मुलाखत दिली. त्यांचे विचार पटण्याजोगे होते.
खूप छान मुलाखत,स्पष्टवक्ता कलाकार आहेत धन्यवाद
मधुराणी चे खूप कौतुक. तिची परीक्षा होती हा एपिसोड म्हणजे. Hats off
Sanjay money so honest straight forward and transparent .I always like him.He should get more roles.प्रशांत दामले सारखे लोकाना हसवणे खूप सोपे पण Sanjay मोने सारखे अंतर्मुख करणे आणि त्यांच्या भूमिका कायम लक्षात ठेवण्यासारखा nat मिळणे कठीण. अशाच भूमिका करत रहा आणि असेच तर्कशुद्ध बोलत रहा मोने.माझ्या शुभेछा. आपण दोघे माहीम मध्ये राहतो ह्याचा मला अभिमान आहे
तडवळकरसाहेब, मधुराणी, आणि रंगपंढरी टीम, या मुलाखतीसाठी एकच विशेषण............. अत्युत्कृष्ट!
खूप छान. अतिशय परखड समीक्षा. कुसुम मनोहर लेले मधील काम पाहिलं आहे. मुलाखत घेण्याची पद्धत छान.
का हा विखार नाही. सत्य परिस्थिति. एकदम प्रामाणिक माणूस. 🙏🙏
संजय मोनेनी अर्थातच मनातले बोल मांडले. ते किती टक्के खरे आहेत हे आपल्याला प्रेक्षक म्हणून नाटकांची घसरलेली पातळी पाहून खरे वाटतात. नाटकांच्या तालमी कमी होतात, संहिता ताकदवान नसते हे तर जाणवतेच , .मोनेंचा प्रामाणिकपणा जबरदस्त आहे. पण नटाने आपले काम उत्तम द्यायचे हे तर खरे. मधुराणीला अशा मुलाखतीच्या रिस्पॉन्स चीअपेक्षा न्हवती असे वाटले. ह्यावेळी मुलाखत घेताना तिचा कस लागला. पण तिने तिचे काम उत्तम करून मोनेंना योग्य प्रश्न विचारून बोलते करण्यात हातभार लावला.
एक सूचना कि निर्माते, दिग्दर्शक ह्यांची हि बाजू मांडली जायला पाहिजे. फक्त नटनट्या ह्यांना बोलावण्यापेक्षा रंगभूमीतील इतर स्टेकहोल्डर्स ना बोलावले तर सर्वंकष कार्यक्रम होईल , इंटरेस्टिंग होईल हे नक्की.
DS
Yes agree
No
@@bacchan27 what do you mean?
Episode khup honest ani chan watala...tai ek suggestion hot tumhi please sarv kalakarana tyanchya aawadichi pustak wicharal ka? Karan wachan he kalakarala khup samruddh karat ...Book recommendation varun aamhala pn shikayala milel
Madhurani, you been really patient and was accomodating his feelings well by not disturbing in between.
I was actually waiting for Sanjay Mone as a guess of this program. After listening to him, I have mixed reaction. Very happy he said things in a very straight forward way, however it's very harsh at times.
Loved it... so honest... Madhurani it was a challenge for you and you handled it well. Mr.Mone is so honest and a man of conviction. I LOVED it.
संजय मोने हा मराठी रंगभूमीचा एक लकाकता तारा आहे...सुकन्या व संजय दोघेही खूप उच्च स्तरीय कलाकार आहेत🙏 खूप छान मुलाखत ...अगदी रोखठोक 👏👏 आपली मते परखडपणे व कळकळीने मांडली आहे मोनें नी...धन्यवाद
किती छान मुलाखत, फारच सुंदर, 👌 मधुराणी तू मुलाखत फार छान घेतलीस.
संजय मोने chi हे मुलाखत मी आज तिसर्या वेळा ऐकते तरी समाधान होत नाही इतकी आवडली
Hi, today I saw your program,Khup chaan 👍💐 Sanjay Mone grt personality very simple living but have nurtured good values as an Actor
I appreciate your talent dear,I follow you in ur different programs, interviews
Stay blessed
अतिशय परखड स्पष्ट मुलाखत दिली.फार छान
छान व्यक्त झाले संजय जी!. तुम्ही सगळे रंगपंढरीचे आयोजक, एकेका मुलाखतीसाठी भरपुर परिश्रम घेता, खुप छान रंगते मुलाखत! इतकी छान भेट दिल्याबद्द्ल आपल्या सर्वांचा मनःपुर्वक आभारी आहे.
Sanjay mone - is sooooo sweet - honest - transparent - straight forward & ethnically strong , brilliant - would love to work with him one day 🌺🌈
अप्रतिऽऽऽऽऽऽऽऽम !!! प्रामाणिक, सत्य, स्पष्ट, परखड, अत्यंत वास्तववादी.........अशी अनेक विशेषणे
रंगपंढरी हार्दिक अभिनंदन
ही मुलाखत खूप कठीण होती पण मधुराणीने ती अतिशय सहजतेने भासेल अशी पेलली आहे. खूप छान.
The true unfiltered person who is bold enough to speak out the truth
खूपच छान मुलाखत.मधुराणी तुम्ही छान मुलाखत घेता.समोरच्याला बोलायला देता .खूपच छान
खुप सुंदर मुलाखत शेवट तर खुप छान असे परखड व्यक्ती पाहिजेत खर.... 🌸 तुमच डिअर आजो तर खुप आवडत मला मी ते नाटक आत्ता पर्यंत 47 वेळा पाहिले प्रत्येक वेळी नवीन आजो समोर येतात. हे फक्त तुमच्या सारखे मोठे मोठे कलाकार एवढ सुंदर सादर करू शकतात.
कुठलीही भुमिका अगदी सहज करणे हीच मोठी गोष्ट. परखड मते पण ती खरी असतात आम्हाला पटतात.बुध्दि मान नट.
खूप सूंदर
अतिशय परखडपणे दिलेली पहिली मुलाखत. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता स्वतःला काय वाटते ते सांगणारी ही मुलाखत खूप आवडली.
Superb superb interview.Special thanks to Madhurani .Mr Mone very very clear in his thoughts.
Very straight forward opinions......Nice to hear it...... Needed
अप्रतिम आणि प्रामाणिकपणे दिलेली मुलाखतीत
मजा आली
Volume variations
पहिल्यांदा च जाणवले..
संजय मोनेंची रोखठोक मुलाखत आवडली..
दिग्दर्शक म्हणजे दिशा दर्शक... तंतोतंत पटलं...
पार्श्वसंगीत घेणं... हा कॉन्सेप्ट आवडला..
त्यांनी जुन्या दर्जेदार आणि आताच्या कच्ची संहिता असलेल्या, दोन्ही कडे काम केलेलं असल्याने त्यांना रोखठोक मतं मांडण्याचा अधिकार आहे... असं खरं बोलायला हिम्मत लागते...
प्रेक्षक म्हणून मला हा लिखाणात ला, संहितेच्या दर्जातील फरक नेहमीच जाणवतो...
अजून एक माझा अनुभव त्यांना सांगावासा वाटतो...
आता २१व्या शतकातही, चाकोरीबाहेर जाऊन कोणी काही नवीन निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला सहकार्य तर सोडाच, पण सर्वतोपरी प्रयत्न हाणून पाडण्याचंच काम प्रस्थापितांकडून केलं जातं.
नाट्यगृह उपलब्ध होणं, ति. वि., जाहिरात, सगळीकडे अडवणूक च अनुभवायला मिळते.
प्रस्थापित वृत्तपत्रांकडून प्रोत्साहन देणं दूरच, सध्या तीन महिने तुमच्या नाटकाबद्दल लिहायला वेळ नाही, असं सांगितलं जातं...
अाता समविचारी लोकांनी एकत्र येऊन, आताचे जे नवीन पदाधिकारी आहेत त्यांच्या बरोबर जाणीवपूर्वक काही प्रयत्न करायला हवेत, असं मनापासून वाटतं.
जुन्या नव्या पिढीच्या कलाकारांचे विचार ऐकायला मिळतात यासाठी
रंग पंढरीचे आभार....
मधुवंती जी, तुम्ही खूप मनापासून दिलेल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल, व्यवस्थेतील त्रुटी सांगितल्याबद्दल धन्यवाद!
🙏।अप्रतिम मुलाखत. व्यक्त केलेले परखड विचार खुप आवडले . सर्वांचे खुप आभार..
Parakhad vichar! Khara Manoos!!🙏🙏 Atishay Aprarima Mulakhat, Madhurani ani sampoorna 'Rang Pandhari' Team!!!
नेहमी प्रमाणे मुलाखत छानच झाली आहे, पुढील मुलाखती साठी शुभेच्छा व आशीर्वाद
या मुलाखतीत मधुराणी wow च्या ऐवजी वा म्हणाली.
Great great... Thanks
अत्यंत सुंदर आणि तुझ्याप्रमाणेच प्रामाणिक मुलाखत, संजय
Rang pandhari....this is love...evdha pranjal kathan aaj kal aikayla milat nahi...aani mhanun te faar faar bhavle...really really close to ❤....shevati tachkan pani aale...sir na dirhayusha labho...faar faar sundar..
चपराक मुलाखत👌👌👌
Madhurani smartly asked questions.......bravo girl
Khup chhan episodes ! Maja aali..
Madhurani you really did very good job.We can feel while watching video that it was not very easy to get answers from Mr.Mone
khup chhan mulakhat. Atishay parkhadpane mate vyakt keli. mulakhat uttam pan marathi rangbhoomi chi avastha ashi asel tar pudhchya pidhila changli natake baghayla miltil ka ? Sanjay sir tumche abhar. Satya paristhiti kathan kelit. Madhurani tumche kautuk. Chhan episode. Rangpandhari team che abhar.
मला पण पाहिल्यावर हाच प्रश्न पडला अरे हे काय होत ? मला वाटतं थोडे वयस्कर झाल्यावर मागे पहाताना अस होत असाव
बाकी मोनेसाहेब परखडपणा कायमच भावतो आम्हाला Be Happy 👍
Sirana aikun khup fresh vatle. Sir tumi ajunahi Tarun aahat tumchya vicharanitkech
Most honest & brutal interview.
खूपच छान व परखड मुलाखत
Excellent. Thanks 👌👌👌
मोने साहेब मी तुमच्या गगनभेदी नाटकाच्या मध्यंतरात तुम्ही सतत सिगारेटी ओढत होतात. पण मला तुमचा नैसर्गिक अभिनय व तुमचे देखणेपण यामुळे मला तुम्ही फार आवडायचात. (स्थळ शिवाजी मंदिर दादर )
Excellent a very genuine person.
छान मुलाखत!! अशोक सराफ, चंद्रकांत कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले यांना बघायला आवडेल...
Thanks for your suggestions!
वास्तववादी चित्र निर्भर पणे मांडणारा नट, अप्रतिम
शेवटची ३-४ सेकंद मोनेसाहेब भावुक झाले होते का?
खूप छान. स्पष्ट मत व्यक्त केले हे मला आवडले.
ठसा ऊमटवु शकलो नाही ही खंत का बाळगता आपण
आपले नाव च सर्व काही आहे
अभीनंदन सर 💐🙏
Khoop chhan jhalaa interview!!
Kharach Mukta barve, Jitendra joshi, Prasad Oak yanni khup nav kamavla ahe 😊
I have seen good interview first time in my life thanks monesir
माणूस "आपलीच आपल्या कॉप्या काढत राहतो" !!! अगदी बरोबर. "मराठीमध्ये अभ्यास करावा अशा भूमिकाच येत नाहीत" !!! अगदी बरोबर 'नाटक माझ्यामध्ये भिनलं पाहिजे" अगदी बरोबर नाट्यक्षेत्रातल्या दांभिकपणाची तुम्हाला किळस येते असं दिसलं
मधुराणी, आज प्रथमच एखाद्या बोलरने फास्ट बॉल टाकावा आणि बॅटस्मनने प्लेड करावा तसं आज झालं. तुला अपेक्षित उत्तरच मिळाली नाहीत. कारण संजयदादा हा माणूस सच्चा, साधा आहे असं असणं हे आजच्या जगात दुर्गुण आहेत. या जगात आपल्याला विकावं लागतं. अहो, माधुरी दीक्षितला सुद्धा "डिंग डाँग डिंग... " म्हणत तोकडे कपडे घालून नाचावं लागलं आणि ती पुढे आली. ऐश्वर्या रॉयच्या सिनेमाची पण जाहिरात करावी लागते. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या उत्तम भूमिका केल्यात आणि स्वतः स्वतःवर खुश झालात. तुम्ही "मला कशाची खंत नाही म्हणताना तुमचा चेहरा "खंत आहे" असं सांगत होता. पण मला खात्री आहे की तुम्हाला रात्री शांत झोप येत असेल कारण ईर्षा , स्पर्धा आणि अहंकाराचा तुम्हाला दर्प नाही रंगपंढरीचे परत एकदा अभिनंदन !!!
Thanks for your nicely articulated feedback!
ती फुलराणी, लग्नाची बेडी या नाटकांविषयी देखील ऐकायला खूप आवडले असते.
Mone kayamach khochak aani spashat vakte panasathi prasidhha aahet aani te tyana shobat,, Karan tyat tyancha hetu changala asto.
Mone tumhala shubhechaa
Mast. Me tyancha shevgyachya shenga natak baghitala. Apratim kam kela aaahe.Dear ajjo baghyacha rahila.
Ekdam sadetod. Khoop awadali sampoorna mulakhat
छान
Vastavvadi 👍👍 add interviews of veshbhushakar , digdarshak , nepthyakar , nirmata and sangit digdarshak also if possible ..
संजय मोनेंची परखड मतं ऐकायला आवडली... पडद्यामागचं जग अनुभवायला मजा येतेय.. पण इथं मधुराणीजींच्या अभ्यासाची, पूर्वतयारीची उणीव भासली... जे रंगकर्मी स्वतः अभ्यासू आहेत, विचारी आहेत उदा... मुक्ता बर्वे, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, विक्रम गोखले, इला भाटे यांनी प्रश्नांवर आधीच विचार करून उत्तरं तयार ठेवली होती असं जाणवलं... पण अतुल परचुरे, गिरीश ओक, आनंद इंगळे किंवा आजची मुलाखत अधिक खुलवण्यासाठी मधुराणीजींच्या अभ्यासाचा उपयोग झाला असता... उदा... एखाद्या रंगकर्मीची मुलाखत घेताना त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन साधारण त्यांच्या अनुभव विश्वाच्या पल्याडच्या भूमिका कुठल्या असू शकतील याचा थोडा विचार मधुराणीजींनी आधीच केलेला असेल तर वाहत जाणाऱ्या मुलाखतीला बांध घालायला मदत होईल... त्यांनी कामं केलेल्या दिग्दर्शकांची नावंही आधीच माहीत असतील तर प्रश्न विचारताना अधिक नेमकेपणाने विचारता येतील... रंग पंढरी हा ठेवा आहे... बखर लिहिल्यागत इतिहास लिहिला जातोय... नाटकावर प्रेम करणाऱ्या या पुढल्या अनेक पिढ्या याचा अभ्यास करणार आहेत... त्यामुळे मुलाखतकारानेही अधिक तयारीने उतरणं गरजेचं आहे... रंगकर्मीना आयत्या वेळी त्यांची महत्त्वाची भूमिका आठवली नाही म्हणून त्याची या बखरेत नोंदच झाली नाही असं व्हायला नको... अशावेळी मुलाखतकाराचाच समग्र अभ्यास उपयोगी पडेल असे वाटते... बाकी उत्तमच सुरू आहे... पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
Such honest feedback helps us introspect and improve continuously. Thanks a lot!
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Khoop chhaan
Pudhe kadhitari.Vijay Kadam. Hyanchi Interview ghyal ka?
Thanks for your suggestion!
तडवळकरसाहेब, रंग पंढरी - पडद्यामागे असलेल्यांचे अनुभव/ अनौपचारिक गप्पा ऐकायला आवडेल . न विसरता जमवा. तो भाग तर फार निराळा निघेल.
नक्की विचार करू!
Part 1?
Wah! Masta! Legendary!
👌👌👌👌
हा विखार नाही.नागडं सत्य अाहे.
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर झाली मुलाखत...मधुराणीने संजय मोनेंना छान बोलतं केलं....
त्यांनीही त्यांची स्पष्ट व परखड मते मांडली....रंगभूमी विषयी आणि स्वतःविषयी सुद्धा...
मनापासून जे वाटले ते ते सर्व करत गेले आणि जे नाही पटले ते उगाच नाही केले...हा त्यांचा स्पष्ट स्वभाव त्यांनी चांगल्या शब्दात व्यक्त केला...
तरुणाईचे त्यांनी स्वागत केलं नि तरुणांशी संवाद साधतात ...मैत्री करतात...हे खूप कौतुकास्पद आहे...
त्यांच्यातील आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, स्वभावातील खरेपणा खूप भावला....
त्यांनी सादर केलेल्या आजवरच्या कलाकृती ना मनपूर्वक धन्यवाद देते ...खूप छान वाटले...
त्यांना सु आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते ...
🙏🙏
Thanks अदिती जी!
...matre shabha ne manat thase umtevle !!
ह्या भागातही एकच 'न आवडल्याची' खूण आहे... ते का आवडलं नाही, हे सांगतील का?
Uttam mulakhat spasht aani satya vichar
तिरकसपणातून मर्मभेदी टीका भावते पण हालचालींवरून स्वतः अस्वस्थ वाटतात सतत शारीरिक हालचाली आहेत
Don't know how to rate this episode. Of course Sanjay Mone was expressing his frank opinions and experience. Not sure if Madhurani trying t to stick to the scripted question was a right approach - here it could/should led to exploring possible changes, improvement, transitions, ways to enable those, etc.
मोने जी आपण म्हणताय लाखोब लोखंडेच्या बचा वाच भाषण आपण कानडी शैलीत बोलला पण ते पात्र नाटकात स्वतः ला लाखोब लोखंडे म्हणूनच सांगत असेल तर फक्त सुरवातीपासून कानडी शैली आवश्यक होती ना? फक्त शेवटच्या बचावाचा भाषणापूरताच कशी चालेल?
सगळेच प्रामाणिकपणेच बोललेत... वेगळं म्हणजेच प्रामाणिक, असं नाही... ज्याला जे वाटलं...समजलं... ते प्रामाणिकपणेच बोलले आहेत....
Prashn vichartana kadhi gochi hoeel kuthla shabd kadhi kondit paden yacha bharvasa navta .....chehra aani expression sudha madhurani che ghabaru gelya sarkhe vatle
Bapre Kay challenge hota madhurani pudhe
Ha interview ghene soppe navte
Hi mulakhat baghun ek goshta lakshat ali ki jashi pidhi badlat geli tasa marathi rangbhoomi "vyavsayakade" jast valali..
Tya adhi che sagle kalakar abhyas karun, drama school madhe shikun, talun sulakhun nighat. Halli chya pidhi la ghai aste prayog karnyachi..
Khup kami loka astat jyanna marathi lekhakanchi nava mahit astat. Durdaivane asa hi hota apan jyancha natak karat ahot tya lekhakanchi itar natakanchi nava suddha mahit nastat.
Rangpandhari madhe alele sagle jyeshta jase Mohan Agashe, Dilip prabhavalkar, suhas joshi, Ila bhate, vikram Gokhale, neena Kulkarni, vandana gupte hyanna baghitla ki vatta natak karna mhanje nemka kay. Vachan, bhasha, sangeet, nrutya, nepathya, prakash yojana , sahakalakar, lekhak, digdarshak hyanchi bhatti jamun yene mhanje natak. Arthik fayda zala tar to nirmatyala. Pan kalakarala milanara samadhan hya sathicha attahas.
Sanjay mone he 2 pidhyan madhla dua ahet. Kay hota and kay zala he nemka dakhvanare.
1 serial karun zali ki " ata mala natak karaycha ahe" ase anek usanvar nat halli zale ahe. Punha ekhadi serial milali ki natakakade padh firvaychi ani manasarkhi sanhita milat nai mhanun natak karat nai hi sabab deychi.
Dagdatun murti ghadte.. tyavarcha adhik anavashyak bhag kadhla ki. Natacha tasach ahe. Adhik karu naka.. adhik kadha mhanje je urel ti sundar kalakruti asel.
दुर्वा जी, ह्या विस्तृत, प्रामाणिक आणि विचार करण्याजोग्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@@RangPandhari Me swataha hya kshetratli nahi. Vayani mothi nai, and anubhav gathishi nai. Pan keval hya kalakaranchi mulakhat baghun tyatla saman dhaaga olkhun je vatla te lihila.
Kami adhik bolle asel tar kshamasva. 🙏
monesir atyant satyavadi ani manobhave bolale.
A lot of things that Sanjay Mone said are true. But the problem is that he forgets he is a part of this and instead of taking this "outsider" critical approach, he should take on the problem. Instead of being cynical he should raise an army of young students and do it himself. Being cynical about your own field is a lazy, repugnant approach.
Khup rokhthok aani खिळवून thevnara interview jalay hey matra kharaay
अरे संजा तु फकत टिका करतो नाटक आणि सिरियल वर जगत आहे तु मागॆ काढ ना
Thanks for your frank feedback.