रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • "मी 'ट्रायल आणि एरर' पद्धतीने नाटक बसवत नाही. कारण संहिता संस्करण, नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ह्यांतील प्रत्येक अंगाबद्दल दिग्दर्शक जोवर सांगोपांग विचार, तयारी आणि १००% नियोजन करत नाही तोवर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता, गती, आणि दर्जा येऊ शकत नाही असं मला वाटतं."
    कुमार सोहोनी
    नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला, ४५ वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा १०० हून अधिक कलाकृती हाताळलेला, निरनिराळे प्रतिष्ठित पुरस्कार लाभलेला, अनेक नवे कलाकार घडवलेला आणि कलाक्षेत्रातील अनुभवांवर आधारित दोन अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिलेला कुमार सोहोनींसारखा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक विरळाच.
    कुमार सरांनी दिग्दर्शित केलेल्या ७० हून अधिक नाटकांपैकी 'अथं मनुस जगन हं', 'रातराणी', 'वासूची सासू', 'अग्निपंख', 'सुखांशी भांडतो आम्ही', 'देहभान', 'कुणीतरी आहे तिथे', 'मी रेवती देशपांडे', 'अर्धसत्य', 'उलट सुलट', 'जन्मरहस्य', 'याच दिवशी याच वेळी' ह्या काही विशेष कलाकृती.
    नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने का लिहून काढावी, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे काय असतात, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन कसं करावं, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर आज कुमार सरांकडून ऐकायला मिळणार आहे. नाटकाच्या विविध अंगाबद्दलच्या शास्त्रीय ज्ञानाचा वापर करत असतानाच ह्या चौकटीबाहेर जाऊन सादरीकरणात नावीन्यपूर्ण प्रयोग कसे करावेत हे सुद्धा कुमार सर सांगताहेत रंगपंढरीच्या ह्या भागात.

КОМЕНТАРІ • 17

  • @आईच्याकविता

    खुप छांन , सध्या सरांची " शिदोरी " वाचते आहे.
    Thanks मॅडम 🙏

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 3 роки тому

    रंगपंढरी ने आमच्या सारख्या प्रेक्षकांना काय दिले तर नाटकाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 3 роки тому

    Oh my god
    So deep
    🙏🙏🙏
    रंग पंढरीचे मानावे तितके आभार कमीच ….
    मी जी काही एक कलाकार म्हणून एक एक पाऊल पुढे जात आहे त्यात तुमच्या ह्या कार्यक्रमाचा मोठा वाटा आहे, खुप काही शिकायला मिळते आहे
    खुप खुप आभार
    🙏🙏🙏

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 3 роки тому +2

    Good going Rangpandhari. I have watch all your episodes till now & would like to see "Madhurani" taking interview of yesteryear actors like respected "Ashok Saraf" & "Mahesh Kothare". Both of them have brought glory to marathi film industry. 👍🙏👍

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 роки тому

    Intelligent, Creative & Knowledgeable Personality. Great Interview

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 3 роки тому

    हा उपक्रम असाच सुरू राहूदे

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 роки тому

    साधं, सोप्पं, सुंदर बोलणं, विश्लेषण आणि प्रत्येक मुद्द्याची मांडणी 👌🏻👍🏻

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 3 роки тому

    I really like the way Madhurani gets a casual , candid and yet very respectful approach to the entire conversation.
    @rangpandhari.....cheers .. Please dont have us wait for so long for every conversation. Pls make frequent videos .

    • @soondslash
      @soondslash 3 роки тому

      it's not that easy to "make frequent videos" especially with this style of content so all we can do is be patient

  • @shriharikilledar3548
    @shriharikilledar3548 3 роки тому

    khup chhan....plese bring Makrand Anaspure and Nana Patekar on the show,,,,,

  • @bk8956
    @bk8956 3 роки тому

    Prashant damlencha interview ghya madhurani tai

  • @cadiwan
    @cadiwan 3 роки тому

    वा ! योगेश ! कमाल !!

  • @dhananjaydhamne5481
    @dhananjaydhamne5481 3 роки тому

    Mam ek Rajan bhise sir na bolva

  • @sunit1001sa
    @sunit1001sa 3 роки тому

    रंगपंढरी चे खूप खूप आभार. कॉलेज मध्ये असताना थिएटर करत होतो तेव्हा आमच्या डिरेक्टर दादाने सांगितलं होतं की ह्यामधून किती नट रंगभूमीला मिळतील माहीत नाही पण किती रसिक प्रेक्षक मिळतील हे नक्की माहितेय. ह्याचा प्रत्यय आज येतोय आणि रंगपंढरी तुम्ही आज अशी माणसं आमच्या पुढे उभी करता त्या बद्दल खरंच खूप धन्यवाद.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому +1

      धन्यवाद सुनीत! 🙏💜

  • @rrkelkar2556
    @rrkelkar2556 3 роки тому

    मी रंगपंढरी नियमितपणे पाहतो कारण तुमचे पाहुणे जीवनाविषयी बोलतात. आजचे पाहुणे बहुतेक स्वतःबद्दल बोलले. एपिसोड बोरिंग झाला. शिवाय रंगीबेरंगी कुर्ता distract करत राहिला.

  • @coherent5605
    @coherent5605 3 роки тому

    अर्धसत्य या नाटकामध्ये आतंकवाद याचे नाव गोडसे ठेवण्यात आलं होतं आणि त्याची बायको मुसलमान दाखवण्यात आली होती ??? नाटक पाहिलं नसल्यामुळे कृपया नक्की काय ते सांगितले तर बरे होईल??