रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • "भूमिका साकार करताना नटांना एखादी गॊष्ट जमत नसेल तर त्यामागचं मूळ कारण ७०% वेळा वरवर वाटत असलेलं नसतं. प्रत्येक अडचण नटांच्या skillset शी निगडित असेलच असंही नाही. प्रत्येक नटाची मानसिकता समजून घेऊन समस्येचं मूळ कारण दिग्दर्शकाला नेमकेपणाने शोधावं लागतं."
    - गिरीश जोशी
    'अबोली', 'प्रथम पुरुषी', 'फायनल ड्राफ्ट', 'लव्हबर्ड्स', 'पटकथा', 'माकडाच्या हाती शॅम्पेन', 'काटकोन त्रिकोण' अशी अनेक प्रयोगशील आणि गाजलेली नाटकं दिग्दर्शित करणारे गिरीश सर हे गेली तीस वर्षं रंगभूमीवर कार्यरत आहेत. 'रुद्रम', 'काकस्पर्श', 'रानभूल' आणि 'कदाचित' अशा अनेक मालिका आणि चित्रपटांचे लेखक/पटकथालेखक म्हणूनही ते ख्यातनाम आहेत.
    इंडो-जर्मन थिएट्रिकल कोलॅबोरेशन प्रकल्पाअंतर्गत निवड झाल्यावर जर्मनी मध्ये जाऊन नाटकांचा अभ्यास आणि जर्मन भाषेतून रूपांतरित केलेल्या 'खिडक्या' ह्या अतिशय वेगळ्या नाटकाचं भारतात केलेलं सादरीकरण हासुद्धा गिरीश सरांच्या कारकिर्दीतला एक उल्लेखनीय टप्पा.
    नाटक बसवताना मूळ संहिता, त्यातल्या व्यक्तिरेखा, नट मंडळी , संवाद ह्या सगळ्यांत भावनिकपणे अडकून न पडता नाटकाकडे 'अपेक्षित परिणाम साधायचे क्राफ्ट' अशा तटस्थ दृष्टिकोनातून गिरीश सर पाहतात. वरवर कोरडेपणाची वाटली तरी दिग्दर्शनाची ही वस्तुनिष्ठ पद्धत अनेक धाडसी, परस्पर-विरोधी, नवे प्रयोग करत राहण्यासाठी आणि नाटकाची अंतिम परिणामकारकता वाढवण्यासाठी कशी अनुकूल ठरते हे आजच्या भागात जाणून घेता येईल.
    संहितेतले टर्निंग पॉईंट्स म्हणजे काय, नव्या नटांची निवड करताना ऑडिशनशिवाय काय मार्ग आहेत, परदेशी नाटकात हल्ली कमीत कमी संगीत का वापरतात अशा दिग्दर्शनातील अनेक बारकाव्यांविषयी विस्तृतपणे बोलताहेत गिरीश सर.

КОМЕНТАРІ • 18