महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिन सोहळ्यातील ना. सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- आज 'महाराष्ट्र राज्य दिनी' कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण केले.
दि.१ मे १९६० महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन. याच दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या माझ्या सर्व कामगार बांधवांना 'कामगार दिना'च्या शुभेच्छा देतो.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. विकासाची गंगा प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यशासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारण योजना सन 2021-22 अंतर्गत 373 कोटीचा निधी विविध विकासाच्या कामावर खर्च करून त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आलेली असून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यात येत आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने हे वर्ष 'कृतज्ञता पर्व' म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्तने १८ एप्रिल ते २२ मे २०२२ कालावधीत कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहू महाराजांची उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीने सुरु केलेल्या शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्वाचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. यामाध्यमातून शाहू महाराजांचे कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टिने कृषि व्यापार, उद्योग घटकांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम, योजना राबवून या भागाचा विकास केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया, हीच कृतज्ञता पर्वात राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.
जय हिंद, जय महाराष्ट्र !!!